सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २२६ ते २५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

226-18
या शरीराचेनि मिसकें । कर्मची लागलें असिकें । जितां मेलया न ठाके । इया रीती ॥226॥
या शरीराच्या निमित्ताने कर्म हे पाठीस लागले आहेच आणि याप्रमाणे ते जिवंतपणी व मेल्यावरही कर्म करण्याचे राहत नाही.॥26॥
227-18
यया कर्मातें सांडिती परी । एकीचि ते अवधारीं । जे करितां न जाइजे हारीं । फळशेचिये ॥227॥
हे बघ, या कर्मचा त्याग करण्याचा एकच प्रकार आहे. तो असा की, कर्म करीत असतात फलेच्छेच्या आधीन होऊ नये.॥27॥
228-18
कर्मफळ ईश्वरीं अर्पे । तत्प्रसादें बोधु उद्दीपें । तेथ रज्जुज्ञानें लोपे । व्याळशंका ॥228॥
कर्माचे फळ ईश्वरास अर्पण केले, म्हणजे त्याच्या प्रसादाने ज्ञान उत्पन्न होते आणि मग दोरीचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यावर जशी सर्पाची शंका दूर होते,॥28॥
229-18
तेणें आत्मबोधें तैसें । अविद्येसीं कर्म नाशे । पार्था त्यजिजे जैं ऐसें । तैं त्यजिलें होय ॥229॥
तसा या आत्मबोधाने अज्ञाना सह कर्माचा नाश होतो. पार्था, जेव्हा कर्माचा अशा रीतीने त्याग करावा, तेव्हाच तो खरा त्याग होय.॥29।
230-18
म्हणौनि इयापरी जगीं । कर्में करितां मानूं त्यागी । येर मुर्छने नांव रोगी । विसांवा जैसा ॥230॥
म्हणून जगामध्ये सात्विक त्यागाच्या हातोटीने कर्म करतो, त्यालाच आम्ही कर्म त्यागी असे मानू. एरवी रोग्याला मुर्छा आली असता ज्याप्रमाणे त्याला विश्रांती मिळाली असे लोक समजतात,॥230॥

231-18
तैसा कर्मीं शिणे एकीं । तो विसांवो पाहे आणिकीं । दांडेयाचे घाय बुकी । धाडणें जैसें ॥231॥
त्याप्रमाणे तो कर्म करताना कंटाळतो, तो विसावा घ्यावा म्हणून दुसरे कर्म सुरू करतो. ती असे की, याप्रमाणे दांड्याच्या घावाच्या वेदना बुक्क्यांनी कमी करावयाच्या तसाच हा प्रकार आहे.॥31॥
232-18
परी हें असो पुढती । तोचि त्यागी त्रिजगतीं । जेणें फळत्यागें निष्कृती । नेलें कर्म ॥232॥
परंतु ही असो; ज्याने फळत्याग करून कर्माला निष्कर्मत्व आणिले तोच या त्रिभुवनात त्यागी होय.॥32॥
अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् ।
भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् ॥18.12॥

233-18
येऱ्हवीं तरी धनंजया । त्रिविधा कर्मफळा गा यया । समर्थ ते कीं भोगावया । जे न सांडितीचि आशा ॥233॥
एरवी तरी अर्जुना, जे कर्मफळाची अशा सोडीत नाहीत तिच्या तीन प्रकारच्या कर्मफळाचा भोग घेण्यास समर्थ असतात.॥33॥
234-18
आपणचि विऊनि दुहिता । कीं न मम म्हणे पिता । तो सुटे कीं प्रतिग्रहीता । जांवई शिरके ॥234॥
आपण कन्येस जन्म दिला असूनही ‘ती माझी नाही’ असे म्हणून पिता जेव्हा कन्यादानाचे उदक सोडतो, तेव्हा त्याची तिजवरील माया सुटून पाणि ग्रहण करणारा जावाई तिच्या मायापाशांत पडतो.॥34॥
235-18
विषाचे आगरही वाहती । तें विकितां सुखें लाभे जिती । येर निमालें जे घेती । वेंचोनि मोलें ॥235॥
जे विषाच्या (बचनाग वगैरेच्या) बागा किंवा व्यापार करितात, ते त्याची विक्री करून त्याजवर नफा मिळवून सुखाने प्रपंच करतात, पण जे त्याचे सेवन करतात, ते द्रव्य खर्चूनही मरण पावतात!॥35॥

236-18
तैसें कर्ता कर्म करू । अकर्ता फळाशा न धरू । एथ न शके आवरूं । दोहींतें कर्म ॥236॥
त्याप्रमाणे कर्तेपणाचा अभिमान धरू कर्म करो, किंवा मी कर्ता नाही, असे समजून फळाची आशा सोडून कर्म करो, तरी दोघांनाही कर्म करणे चुकत नाही.॥36॥
237-18
वाटे पिकलिया रुखाचें । फळ अपेक्षी तयाचें । तेवीं साधारण कर्माचें । फळ घे तया ॥237॥
रस्त्यावरील पिकलेल्या (आम्र) वृक्षाच्या फळाची जो इच्छा करील त्याचे ते फल असते (म्हणजे त्यास ते फळ बंधनकारक होते.
238-18
परी करूनि फळ नेघे । तो जगाच्या कामीं न रिघे । जे त्रिविध जग अवघें । कर्मफळ हें ॥238॥
वाटेवरील वृक्षांच्या पिकलेल्या फळांचा इच्छा करितो, त्यासच ती बाधक होते; परंतु कर्म करून तो फळाची आशा करीत नाही, जन्ममृत्यूच्या सपाट्यात सापडत नाही. कारण, हे तीन प्रकारचे जग कर्माचे फळ आहे.॥38॥
239-18
देव मनुष्य स्थावर । यया नांव जगडंबर । आणि हे तंव तिन्ही प्रकार । कर्मफळांचे ॥239॥
देव, मनुष्य व स्थावर याला जग असे म्हणतात, आणि हे तिन्ही प्रकार तर कर्मफळाचेच आहेत.॥39॥
240-18
तेंचि एक गा अनिष्ट । एक तें केवळ इष्ट । आणि एक इष्टानिष्ट । त्रिविध ऐसें ॥240॥
ते कर्म एक अनिष्ट (प्रतिकूल), एक केवळ इष्ट (अनुकूल) आणि एक इष्टानिष्ट (मिश्र) असे तीन प्रकारचे आहे;॥40॥

241-18
परी विषयमंतीं बुद्धी । आंगीं सूनि अविधी । प्रवर्तती जे निषिद्धीं । कुव्यापारीं ॥241॥
परंतु जे विषयासक्त आहेत, ते अविधीचा अंगीकार करून निषिद्ध अशा कर्माची ठिकाणी प्रवृत्त होतात;॥241॥
242-18
तेथ कृमि कीट लोष्ट । हे देह लाहती निकृष्ट । तया नाम तें अनिष्ट । कर्मफळ ॥242॥
आणि त्यायोगे कृमी, कीटक अथवा माती वाईट देह पावतात, त्याला कर्मफळ असे म्हणतात॥42॥
243-18
कां स्वधर्मा मानु देतां । स्वाधिकारु पुढां सूतां । सुकृत कीजे पुसतां । आम्नायातें ॥243॥
किंवा स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारनुरूप वेदांत सांगितल्याप्रमाणे जेव्हा सुकृत करतात,॥43॥
244-18
तैं इंद्रादिक देवांचीं । देहें लाहिजती सव्यसाची । तया कर्मफळा इष्टाची । प्रसिद्धि गा ॥244॥
तेव्हा अर्जुना, तेव्हा इंद्रादीक देवतांचे देह प्राप्त होतात; त्या कर्म फळाला पुण्यकर्म असे म्हणतात;॥44॥
245-18
आणि गोड आंबट मिळे । तेथ रसांतर फरसाळें । उठी दोंही वेगळें । दोहीं जिणतें ॥245॥
आणि गोड व आंबट ही एकत्र केली असता ज्याप्रमाणे या दोहों वरचढ असा निराळ्या रुचीचा मधुर रस उत्पन्न होतो,॥45॥

246-18
रेचकुचि योगवशें । होय स्तंभावयादोषें । तेवीं सत्यासत्य समरसें । सत्यासत्यचि जिणिजे ॥246॥
किंवा प्राणवायू योगाभ्यासाने कुंभक होतो, त्याप्रमाणे सत्य व असत्य यांचे ऐक्य झाल्यावर ते त्या दोहोंनाही जिंकण्यास कारण होते.॥46॥
247-18
म्हणौनि समभागें शुभाशुभें । मिळोनि अनुष्ठानाचें उभें । तेणें मनुष्यत्व लाभे । तें मिश्र फळ ॥247॥
म्हणून शुभ व अशुभ कर्मे समभाग मिळून जे कर्म घडते, मनुष्यदेह याचा लाभ हेच मिश्र फळ होय.॥47॥
248-18
ऐसें त्रिविध यया भागीं । कर्मफळ मांडलेसें जगीं । हें न सांडी तयां भोगीं । जें सूदले आशा ॥248॥
या जगात तीन प्रकारचे कर्मफळ आहे; या कर्मफळाची अशा टाकत नाहीत, ते जन्म-मरणाचे फेऱ्यात पडतात.॥48॥
249-18
जेथें जिव्हेचा हातु फांटे । तंव जेवितां वाटे गोमटें । मग परीणामीं शेवटें । अवश्य मरण ॥249॥
ज्या जेवणाऱ्याला सहन होईल इतके तिखट पदार्थ खाऊन समाधान होते. त्याला त्यायोगे परिणामी अवश्य मरण प्राप्त होते.॥49॥
250-18
संवचोरमैत्री चांग । जंव न पविजे तें दांग । सामान्या भली आंग । न शिवे तंव ॥250॥
जोपर्यंत अरण्य लाभले नाही, तोपर्यंतच संवचोराची मैत्री बरी, किंवा वेश्येचा जोपर्यंत स्पर्श झाला नाही तोपर्यंतच ती बरी असते.॥250॥

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *