संत नामदेव महाराज चरित्र प्रकरण २, भाग १, २, ३, ४, ५, ६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

*🌿प्रकरण-२. जीवनातील विविध प्रसंग,🌿* *☘️भाग-१. सिद्धबेटातील प्रसंग☘️*

        आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींची जन्मभूमी सिद्धबेटांमध्ये सर्व संत गोरोबा काका, ज्ञानेश्वरादी भावंडे शास्त्रचर्चा करायला एकत्र जमले होते. तेंव्हा तिथे नामदेव महाराज आले. निवृत्तीनाथांनी त्यांना उठून प्रदक्षिणा करून नमस्कार केला परंतु नामदेव महाराजांनी काही प्रतिनमस्कार केला नाही. निवृत्ती नाथांनी स्मितहास्य केले. परंतु मुक्ताबाईंना काही हे रूचले नाही. त्या साक्षात ब्रह्मचित्कला, शक्ती होत्या. नामदेव महाराजांना अभिमान झाला होता की प्रत्यक्ष देव माझ्या हाताने जेवतो. मी इतरांना कशाला नमस्कार करू. ते श्री पांडुरंगाला केवळ त्या मुर्तीपुरतेच मर्यादित मानत होते. त्यांचे गर्वहरण  करणे आवश्यक होते. ज्ञानेश्वर माऊली, सोपान देवानेही नामदेव महाराजांना नमस्कार केला. नामदेव महाराज मनात विचार करतात सर्व संत श्री पांडुरंगाचे भक्त आहेत. ते दर्शनाला पंढरपुरला येतात. तेच पंढरीनाथ माझ्या हातांनी दुध, नैवेद्य भक्षण करतात मी यांना नमस्कार का करू? माझा अधिकार केवढा मोठा आहे. मुक्ताबाईंनी नमस्कार केला नाही. नामदेव महाराजांना हे खटकले. मुक्ताईने नामदेव महाराजांना सांगीतले आधी अभिमान दुर करा. तुम्हाला आत्मज्ञान काहीच नाही. गुरूविना संतपण काय कामाचे ? मुक्ताबाई नामदेव महाराजांवर नाराज झाल्या. त्या नामदेव महाराजांना म्हणाल्या “उसाच्या शेजारी एरंड वाढतो पण त्याला गोडी येत नाही. दिव्याची सर कापुराला येणार नाही. चंदनाच्या झाडाला जसा सर्पाचा वेढा असतो तसा अज्ञानी माणसाला अहंकाराचा वेढा असतो. पंढरी विठोबा तुमचा नैवेद्य भक्षण करतो असे सांगत मिरवता परंतु तुमच्या मनाला तीळमात्र बोध नाही. चौदाशे वर्षाचे चांगदेवही असेच होते. निवृत्तीदेवांनी हसून समजूत काढली, “मुक्ताबाई असे म्हणू नये. नामदेव महाराज हे थोर संत आहेत. ते भुवैकुंठ पंढरपुरात राहतात. त्यांचे भाग्य केवढे मोठे ! यांनी तर प्रत्यक्ष श्री पांडुरंगरायाला आपल्या प्रेमभक्तीने लहान वयातच आपलेसे केले. म्हणून तुम्ही त्यांना नमस्कार केला पाहीजे”. यावर मुक्ताबाईंनी मोठे मार्मिक उत्तर दिले. .

    “घडा भाजल्याशिवाय केवळ मातीच आहे. पाण्यात विरून जाईल. अज्ञान्याला संत कसे कळतील? समुद्राला तरंगलाटा येती का?  यांना असेे जाऊ देऊ नका.#क्रमश…..
|#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼*

 *☘️प्रकरण-२. जीवनातील विविध प्रसंग,☘️* *🌿भाग-२. नामदेवांंची परिक्षा🌿*

        संत गोरोबाकाकांना बोलवा. हे मडके भाजले की कच्चेच आहे याचा निर्णय होऊ द्या. कच्चे असेल तर भाजावे लागेल. मगच त्यात ज्ञानरूपी पाणी ठेवता येईल”. असे म्हणून गोरोबाकाकांना बोलावले. गोरोबा काका सिद्धसंत होते. त्यांच्या भक्तीने त्यांचे मेलेले मुल जिवंत झाले. त्यांचे ज्ञान अनुभवसिद्ध होते. ते अनुभवरूपी थापटणे घेऊन आले. मुक्ताबाईंनी त्यांना नमस्कार केला. त्या वि गोरोबाकाकांना म्हणाल्या, “काका, तुम्ही ज्ञानी, कृपावंत संत आमची परीक्षा घ्या. कोण ज्ञानाने कच्चे आहे ? त्याचा निवाडा करा”. गोरोबाकाकांनी प्रथम निवृत्तीनाथांना डोक्यावर थापटणे मारले त्यांनी ते सहर्ष सहन केले. ज्ञानेश्वर माऊली, सोपानदेव, मुक्ताबाई यांना थाटपणे मारल्यानंतर त्यानी सुद्धा सहन केले. हे चौघेही भावंड प्रकांड आत्मज्ञानी, साक्षात ईश्वराचा अवतारच होते. त्यांना देहभान नव्हते. ते केवळ लीला देह धारण करून जगाला खरे ज्ञान देण्यासाठीच अवतरले होते. नामदेव महाराजांना गोरोबाकाकांनी थापटणे मारल्याबरोबर नामदेव महाराजांना ते सहन झाले नाही. त्यांना वेदना झाल्या. ते रडू लागले. मुक्ताबाई गोरोबाकाकांना म्हणाल्या, काका, हे मडके कच्चेच आहे. ज्ञानरूपी पाणी यात साठवता येणार नाही. यांना ज्ञानानीनेच भाजावे लागेल. यांना भाजा”. कसे भाजावे तर मुक्ताबाई म्हणाल्या, गोरोबाकाका ब्रह्मरूपी अग्नीवर चैतन्याचा केर पेटवा”. अंतर्बाह्य हा कच्चा कुंभ भाजा. कच्ची मातीरूपी जीवदशा जाऊन पक्की शिवदशा येईल. म्हणजेच त्यांना त्यांच्या अविनाशी, अविकारी आत्मरूपाचे ज्ञान होईल. प्रत्यक्ष पांडुरंगरायांची हिच इच्छा आहे. ” असे ऐकताबरोबर नामदेव महाराज घाबरले. त्यांना वाटले खरेच भाजतात की काय । ते कुणाची अनुमती न घेता मागे पुढे न पाहता पळत थेट पंढरपुरात आले. पंढरीनाथांना कवटाळून रडू लागले. देवा विनाकारण मी तेथे गेलो. मला त्यांच्या हाती देऊ नका. मुक्ताबाईने तर कहरच केला, गोरोबाकाकांना बोलावून मला भाजा म्हणाल्या, मी जिवाने गेलो असतो. तुमच्या सेवेचे पुण्याईने मी इथवर आलो देवा. मला वाचवा. ते माझ्या मागोमाग येतील. तुम्हाला भरीस घालतील. एवढीसी मुक्ताई जशी आगीचा लोळ, सगळेच ब्रह्मांड जसे त्यांनी हातावरच उचलून धरले. मी त्या सर्वसंताना घाबरलो माझे रक्षण करा”, यावर देवांनी नामदेव महाराजांची मोठ्या प्रेमाने समजूत काढली. “नामदेवा गुरूविना माझी प्राप्ती म्हणजे स्वप्नातील धन, त्या धनाचा जसा प्रत्यक्ष जीवनात काही उपयोग नाही. आता अज्ञान सोड आणि सद्गुरूला शरण जा.#क्रमश…..
|#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

संत नामदेव महाराज समाधी अभंग पहा

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼*

*🍃प्रकरण-२. जीवनातील विविध प्रसंग,🍃* *☘️भाग-३.विसोबा खेचरांनी दिला गुरूपदेश☘️*

 “नामदेवा गुरूविना माझी प्राप्ती म्हणजे स्वप्नातील धन, त्या धनाचा जसा प्रत्यक्ष जीवनात काही उपयोग नाही. आता अज्ञान सोड आणि सद्गुरूला शरण जा. श्री क्षेत्र औंढ्या नागनाथासी विसोबा खेचर आहेत. त्यांना अनन्यभावाने शरण जा. तेच तुला माझ्या सर्वव्यापक रूपाचे ज्ञान करवून देतील. त्याप्रमाणे नामदेव महाराज पंढरपूराहून औंढा नागनाथ येथे आले. तेथे शिवालयात विसोबा खेचर राहतात असे समजले. ते त्यांना भेटायला गेले. पाहतात तर काय ? विसोबा खेचर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेऊन झोपलेत, नामदेव महाराजांना मोठे दुःख झाले. मनात आणि  मला काय ज्ञान देणार. केवढे  हे अज्ञान? ” जरा नाखुशीनेच ते पुढे होवून विसोबा खेचरांना म्हणाले, ” अहो महाराज देवावर पाय ठेवून काय झोपता?  उचला तुमचे पाय “.  विसोबा खेचर हासले .नामदेव महाराजांना म्हणाले ” अरे मी आता वयोवृद्ध झाल्यामुळे शक्तिहीन झालो आहे.. तुच जिथे देव नसेल तेथे उचलून बाजूला ठेव ” असे म्हणताबरोबर नामदेव महाराजांनी  त्यांंचे पाय उचलून  दुसऱ्या जागी ठेवले.  तर तिथे शिवपिंड निर्माण झाली. नामदेव महाराजांनी पाय उचलावेत तिथे पुन्हा शिवपिंड तयार व्हावी, असे अनेकवेळा झाले. शेवटी थकलेे. त्यांना ज्ञान झाले ईश्वर तर सर्वव्यापक आहे. पांडूरंग परमात्मा फक्त पंढरपुरात विठेवर उभा नाही तर जळी-स्थळी भरला आहे. नामदेव महाराजांचे ज्ञानचक्षु उघडले. त्यांनी विसोबा खेचरांना गुरू मानुन नमस्कार केला विसोबानी त्यांना गुरूपदेश केला. ईश्वर एकदेशीय नसुन सर्वव्यापक आहे. सर्वकाळी आहे.  देश, वस्तू, काल, भेद मालवा।  आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥’ विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांना आत्मज्ञान जिले. नामदेव महाराज चराचरात ईश्वराला पाहू लागले.
#क्रमश…..
|#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

*🌼॥#श्री_नामदेवेे_महाराज_चरिञ॥🌼🚩*

*☘️प्रकरण-२. जीवनातील विविध प्रसंग,☘️* *🍃भाग-५. एकादशी महिमा🍃*

संत नामदेव महाराज समाधी अभंग पहा

        नामदेव महाराज स्वतः एकादशी उपवास धरत. घरी आलेल्यांनाही अन्न देत नसतात. एकदा प्रत्यक्ष भगवान विठ्ठल त्यांच्या घरी त्यांची परिक्षा पाहण्यासाठी एकादशीच्या दिवशी एका ब्राह्मणाचे रूप घेवून आले. ब्राह्मण देवता अन्न मागू लागले. नामदेव महाराज त्यांना म्हणाले, “आज एकादशी आहे. अन्न मिळणार नाही.” यावर ब्राह्मण देव काकुळतीला येऊन म्हणाले.’ “अन्नावाचून मला दुसरे काहीही नको. मी पुष्कळ दिवसापासून उपाशी आहे” ते ब्राह्मण देव अशक्तपणामुळे हातपाय झाडायला लागले. थोड्याच वेळात तिथेच त्यांनी जीव सोडला. सर्व लोक जमले. ब्राह्मणाविषयी हळहळ व्यक्त करायला लागले. नामदेव महाराजांना दोष देवू लागले. अन्न दिले असते तर बिचाऱ्या ब्राह्मणाचा जीव वाचला असता. असे एकमेकांना म्हणू लागले. नामदेव महाराजांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. ब्राह्मण बोलाविले. चिता रचून प्र त्यावर ब्राह्मणदेवाला ठेवला. अग्नि चितेला लावलाच ज्वाळ भडकल्याबरोबर भगवान विठ्ठल चितेवरच आपल्या मूळ स्वरूपात प्रगट झाले. नामदेव महाराजांनी नमस्कार केला. भगवान विठ्ठलांनी नामदेवाला आशीर्वाद दिला. नामदेव महाराज परिक्षेत उत्तीर्ण झाले. असे सांगीतले. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. नामदेव महाराजांमुळे उपस्थित सर्वांना भगवान विठ्ठलाचे दर्शन झाले. एवढा एकनिष्ठ भाव एकादशी व्रता विषयी होता. भगवान विठ्ठल देवळात परत गेले. सत्वशील भक्तांचे एकनिष्ठ व्रताचे प्रत्यक्ष भगवान परमात्माच रक्षण करतात.

#क्रमश…..
|#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼🚩*

*☘️प्रकरण-२. जीवनातील विविध प्रसंग,☘️* *🌿भाग-६. फिरविले देऊळ जगामाजी ख्याति🌿*

     एकदा बादशहाने नामदेवांना पकडले व फरमाणले रामनाम सोड, अल्लाचे नाव घे, पण नामदेवाचा रामनामाचा जप चालूच राहीला. बादशहाने नामदेवांना हत्तीच्या पायाखाली चिरडून मारण्यासाठी  मदमस्त हत्ती अंगावर सोडला पण नामदेवांनी काहीच झाले नाही.

       एकदा नामदेव महाराज औढ्या नागनाथाच्या देवळात किर्तन करायला गेले. तेव्हा तेथील ब्राह्मणांनी हे क्षुद्र समजून हाकलून लावले. काहीही न बोलता नामदेव महाराज देवळामागे जावून किर्तन करायला लागले. भगवान शंकराने आपले देऊळच फिरवले. हे पाहून तेथील लोक वरमले. नामदेव महाराज भावविभोर होवून विणा लावून गायला लागले. “हिन जात मोरी पंढरीके राया । ऐसा नामा दर्जी तुने काहेकू बनाया || टाळ, विणा लेकर नामा राऊल में आया । पुजा करते बम्मनोंने ढकेल दिया || देवलके पीछे नामा अल्लख पुकारे । जिधर जिधर नामा उधर देवलही फिरे || नाना वर्ण गवा उनका वर्ण दुध । तुम कहाँके बम्मन और हम कहाँके सुद (क्षुद्र)

|| मन मेरी सुई तनो मेरा धागा | खेचरजीके चरणपर नामा शिंपी लागा ।।” तल्लीन होऊन देहभान विसरून नाचत नाचन किर्तन केले. किर्तनातूनच समाजप्रबोधन केले. *’नाचू रंगी । ज्ञान दीप लावू जगी ।।’* आणि खरोखरच ज्ञानदीप लावला. आजही औढा नागनाथाचे देऊळ फिरवलेले दिसते. नंदीचे मुख पूर्वेकडे आहे.

#क्रमश
#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *