क्षीरापती चे, अभंग व महात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Dwadashi che Abhang
Dwadashi che Mahatmya
द्वादशीचे अभंग
द्वादशीचे महात्म्य.
द्वादशीचे ७, अभंग आहेत.
वारकरी भजनी मालिका

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?
कोणी कोणती एकादशी करावी ?
एकादशी अभंग पाहा.
द्वादशी अभंग पहा.
क्षिरापती अभंग पहा
एकादशी व्रताचे फळ, व विधी पहा
२६ एकादशी महात्म्य पहा.

-: एकादशी व्रताचे नियम :-
दशमीला एकाच वेळी जेवण करावे,
एकादशीला निराहार म्हणजे काहीच खाऊ नये,
रात्रभर हरिजागर, कथा, किर्तन, सत्संग करावे.
शक्य असल्यास प्रदक्षणा करावी, अनवाणी राहावे, मौन धरावे.
द्वादशीला एकभुक्त म्हणजे एकाच वेळेस जेवण करावे तेही सूर्योदयाच्या अगोदर.

-: महत्वाची सूचना :-
एकादशीच्या जागराचे भजन न झोपता आपण रात्रभर भजन करत असतो,

द्वादशीचे सकाळी ब्रह्म मुहूर्तावर (४ :१५ मिनिटांनी) स्नान करावे, नंतर नित्याचा काकडा घ्यावा, व सूर्योदयाचे अगोदर नैवद्य तयार करून तो द्वादशीचे अभंग म्हणून भगवान परमात्म्याला द्यावा.

नंतर तो प्रसाद आपण ग्रहण करताना म्हणजेच उपवास सोडण्याची अगोदर क्षिरापती (खिरापती) चे अभंग सुद्धा म्हणावे, हे सर्व अभंग म्हणून मग सर्वांना प्रसाद द्यावा, अर्थात सर्वांनी उपवास सोडावा (भोजन करावे.)

, , , ,

क्षीरापतीचे अभंग


क्षीरसागरीचे नावडे सुख। क्षीरापती देखे देव आला ॥१॥
कवळ कवळ पाहा हो। मुख पसरूनि धांवतो देवो ॥२॥
एकादशी देव जागरा आला। क्षीरापतीलागी टोकत ठेला ॥३॥
द्वादशी क्षीरापती ऐकोनि गोष्टी। आवडी देव देतसे मिठी ॥४॥
क्षीरापती घालितां वैष्णवामुखीं। तेणें मुखें देव होतसे सुखीं ॥५॥
क्षीरापती सेविता आनंदु। स्वानंदें भुलला नाचे गोविंदु ॥६॥
क्षीरापती सेविता वैष्णवा लाहो। मुखामाजी मुख घालितो देवो ॥७॥
क्षीरापती चारा जनार्दन मुखीं। एका एकी तेणें होतसे सुखी ॥८॥


पाहें प्रसादाची वाट। द्यावें धोवोनियां ताट ॥१॥
शेष घेऊनि जाईन। तुमचे झालिया भोजन ॥२॥
झालों एकसवा। तुम्हां आडूनियां देवा ॥३॥
तुका म्हणे चित्त। करूनी राहिलों निश्चित ॥४॥

३ पावला प्रसाद आतां विठो निजावें।
आपुलाले श्रम कळों येताती भावे ॥१॥
आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा।
पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥२॥
तुम्हांसी जागवू आम्ही आपुलिया चाडा।
शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा ॥३॥
तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन।
नाहीं निवडिलें आम्हां आपणा भिन्न ॥४॥


बहुडविले जन मन झाले निश्चळ।
चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥
पर्यंकी निद्रा करावे शयन।
रखुमाई आपण समवेत ॥२॥
घेऊनियां आलो हाती टाळ वीणा।
सेवेसी चरणा स्वामीचिया ॥३॥
तुका म्हणे आतां परिसावी सादरे।
बोबडी उत्तरें पांडुरंगा ॥४॥

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?
कोणी कोणती एकादशी करावी ?
एकादशी अभंग पाहा.
द्वादशी अभंग पहा.
क्षिरापती अभंग पहा
एकादशी व्रताचे फळ, व विधी पहा
२६ एकादशी महात्म्य पहा.

, , , ,

एकादशी, द्वादशी, अभंग. विधी, नियम इत्यादी माहिती

एकादशी, द्वादशी, अभंग. विधी, नियम इत्यादी माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *