गीता महात्म्य अभंग गीता जयंती अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

गीता आरती

मोक्षदा एकादशी- गीता जयंती🙏🏻

गीता गीता म्हणतां पापा होय नाश।
कैवल्यहि त्यास प्राप्त होय।।
गीतेची अक्षरें पडतां श्रवणीं।
जाय तत्क्षणीं भवभय।।
एक एक श्लोकी कोटी अश्वमेध।
पुण्यही अगाध म्हणतां गीता।।
नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता।
तयाच्या सुकृता पार नाहीं।।

।।भगवान श्रीगोपालकृष्ण महाराज की जय।।
।।श्रीमद्भगवद्गीतामाता की जय।।

गीता भागवत वेद उच्चारितां ।
पापाची तों वार्ता कोठें राहे ॥१॥

कळ वासना नामीं जे रंगली ।
साधनें राहिली मग कैंची ॥२॥

म्हणोनिया नेम ऐसा तारी जीवा ।
होय तोचि देवा आवडता ॥३॥

उगवला दिवस जाय तो क्षणांत ।
विचारूनि हित वेगीं करा ॥४॥

तुका म्हणे स्मरा वेगीं विठोबासी ।
न धरा मानसीं दुजें कांहीं ॥५॥

आपुलिया हिता जो असे जागता ।
धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्या पुत्र होती जीं सात्विक ।
तयाचा हरिख वाटे देवा ॥२॥
गीता भागवत करिती श्रवण ।
अखंड चिंतन विठोबाचें ॥३॥
तुका म्हणॆ मज घडो त्यांची सेवा ।
तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥४॥

हरिगुण गावत नाचुंगी ॥ टेक ॥
अपने मंदिरमें बैठ बैठकर । गीता भागवत वाचुंगी ॥१॥
ग्यान ध्यानकी गठरी बांधकर । हरि हर संग मैं लागुंगी ॥२॥
मीराके प्रभु गिरिधर नागर । सदा प्रेमरस चांखुगी ॥३॥

टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची । १ ॥
पंढरीचा हाट कउलांची पेठ । मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार । होतो जयजजयजयक भिमातीर ॥३॥
हरिनाम गर्जता भया नाही चिंता । ऐसे बोले गीता भागवत ॥४॥
खटनट यावे शुध्द होऊनि जावे । दवंडी पिटी भावे चोखामेळा ॥५॥

भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरि तयावरी ॥१॥
स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेसी ॥२॥
तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचे नाहीं तया ॥३॥
एका जनार्दनी संशय सांडोनि । दृढ धरीं मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥

ऐसा पुत्र देई संता । तरी त्या आवडी पंढरीनाथा ॥१॥
गीता नित्यनेमे । वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे ॥२॥
संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा ॥३॥
कन्या व्हावी भागीरथी । तुझे प्रेमे जिच्या चित्ती ॥४॥
ऐसे करी संतजना । दासी जनीच्या निधना ॥५॥

f

गीता संहिता व्हिडिओ

गीता पारायण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

15 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *