दिपोत्सव ओव्या ज्ञानेश्वरी पारायण दीपोत्सव

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

येर्‍हवीं तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु ।
तर्‍ही संतकृपादीपकु ।
सोज्वळु असे ॥1.76॥

जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा ।
का दीपाधारें वर्ततां ।
नाडळिजे ॥187-2॥

जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजाते प्रगटी ।
तरी सद्बुद्धि हे थेकुटी ।
म्हणों नये ॥238-2॥

जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणे कंपु ।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु ।
योगयुक्तु ॥341-2॥


मी अविवेकाची काजळी । फेडूनी विवेकदीप उजळीं ।
तैं योगियां पाहे दिवाळी ।
निरंतर ॥54-4॥

ऐसे सर्वज्ञानाचा बापु । जो कृष्ण ज्ञानदीपु ।
तो म्हणतसे सकृपु ।
ऐकें राया ॥210-4॥

जैशी पूर्वदिशेच्या राउळीं । उदयाचि सूर्ये दिवाळी ।
की येरीही दिशां तियेचि काळी ।
काळिमा नाही ॥86-5॥

परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं ।
करी साधुहृदयराउळीं ।
मंगळ उखा ॥142-5॥



ते बुध्दीही आकळितां सांकडें । म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे ।
परि निवृत्तिकृपादीपउजियेडें ।
देखेन मी ॥32-6॥

दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा ।
तो माझ्या ठायी तैसा ।
मी तयामाजीं ॥396-6॥

तया चक्रवाकांचें मिथुन । सामरस्याचें समाधान ।
भोगवी जो चिद्गगन ।
भुवनदिवा ॥ 16-6 ॥

जो सवर्ज्ञतेचा वोलावा । जो यादवकुळींचा कुळदिवा ।
तो श्रीकृष्णजी पांडवा- ।
प्रति बोलिला ॥270-8॥



दीपु ठेविला परिवरीं । कवणाते नियमी ना निवारी ।
आणि कवण कवणिये व्यापारीं ।
राहाटे तेहि नेणे ॥128-9॥

जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हे नोळखिजे ।
तैसा सर्वस्वें जो मज भजे ।
तो मी होऊनि ठाके ॥428-9॥

तया तत्त्वज्ञां चोखटां । दिवी पोतासाची सुभटा ।
मग मीचि होऊनि दिवटा ।
पुढां पुढां चालें ॥142-10॥



तीं अक्षरें नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका ।
अर्जुनालागीं चित्कळिका ।
उजळलिया श्रीकृष्णें ॥178-11॥

कां घरींचिया उजियेडु करावा । पारखियां आंधारु पाडावा ।
हे नेणेचि गा पांडवा ।
दीपु जैसा ॥198-12॥

कां स्नेहसूत्रवन्ही । मेळु एकिचि स्थानीं ।
धरिजे तो जनीं ।
दीपु होय ॥154-13॥

नातरी केळीं कापूर जाहला । जेवीं परिमळें जाणों आला ।
का भिंगारीं दीपु ठेविला ।
बाहेरी फांके ॥183-13॥



काळशुद्धी त्रिकाळीं । जीवदशा धूप जाळीं ।
न्यानदीपें वोंवाळी ।
निरंतर ॥389-13॥

श्रीगुरु वोंवाळिजती । का भुवनींजे उजळिजती ।
तया दीपांचिया दीप्तीं ।
ठेवीन तेज ॥434-13॥

म्हणौनि सद्भाव जीवगत । बाहेरी दिसती फांकत ।
जे स्फटिकगृहींचे डोलत ।
दीप जैसे ॥476-13॥

उदक होऊनि उदकी । रसु जैसा अवलोकीं ।
दीपपणें दीपकीं ।
तेज जैसें ॥893-13॥



दीपांचिया कोडी जैसें । एकचि तेज सरिसें ।
तैसा जो असतुचि असे ।
सर्वत्र ईशु ॥1077-13॥

दीपकाची अर्ची । राहाटी वाहे घरींची ।
परी वेगळीक कोडीची ।
दीपा आणि घरा ॥1124-13॥

नातरीं दीपमूळकीं । दीपशिखा अनेकीं ।
मीनलिया अवलोकीं ।
होय जैसें ॥55-14॥|

नातरी येथिंचा दिवा । नेलिया सेजिया गांवा ।
तो तेथें तरी पांडवा ।
दीपचि कीं ॥221-14॥

पैं होऊनि दीपकलिका । येरु आगी विझो का ।
का जेथ लागे तेथ असका ।
तोचि आहे ॥257-14॥


जैसा भिंगाचेनि घरें । दीपप्रकाशु नावरे ।
का न विझेचि सागरें ।
वडवानळु ॥14-308॥

सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची ।
दिवाळी करी ॥12-15॥

ज्ञानेश्वरी पारायण संपूर्ण १८ अध्याय

सार्थ ज्ञानेश्वरी संपूर्ण १८ अध्याय

संत ज्ञानेश्वर समग्र वाङमय

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *