संत सोपान काका समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत सोपानदेव समाधी अभंग

देव म्हणॆ नाम्या मार्गशीश गाठा
देव म्हणॆ नाम्या मार्गशीश गाठा । जावे सासवडा उत्सवासी ॥१॥
सोपानासी आम्ही दिधले वचन । चला अवघे जन समुदाय ॥२॥
अलंकापुरीची यात्रा केली असे सांग । मग पाडुरंग सिदध झाले ॥३॥
दुरोनी पातका दिसती मनोहर । उठावले भार वैष्‍णवांचे ॥४॥
निवृत्ति मुक्ताई घेतला सोपान । जातो नारायण कर्हेतरी ॥५॥
नामा म्हणे देव गंधर्व सुगरण । चालिले सोपान समाधीसी ॥६॥

कळवळी मन नाही देहभान
कळवळी मन नाही देहभान । वटेश्वर सोपान सोंवळे झाले ॥१॥
संत साधुजन होती कासावीसी । आले समाधीपाशी तांतडीने ॥२॥
समाधी भोवते कुंकमाचे सडे । पाहाती निवाडे अवघे जन ॥३॥
वरी कळ्वळी मन नाही देहभान । वटेश्वर सोपान सोंवळे झाले ॥१॥
संत साधुजन होती कासावीसी । आले समाधीपाशी तांतडीने ॥२॥
समाधी भोवते कुंकमाचे सडे । पाहाती निवाडे अवघे जन ॥३॥
वरी मृगछाला दिसताती लाल । दर्भ आणि फुले समर्पिली ॥४॥
दुर्वा आणि बेल टाकिले मोकळे । साहित्य सकळ समर्पिले ॥५॥
निवृत्ति पांडुरंग बैसले येउन । नमन सोपान करीतसे ॥६॥

सोपानदेवे ग्रंथ केला होता सार
सोपानदेवे ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर निवृत्तीच्या ॥१॥
सवे मुक्ताबाई सदगुरु निवृत्ती । लक्ष्मीचा पती घेतलीया ॥२॥
जयजयकार ध्वनि होताती अपार । जाती योगेश्वर समाधीसी ॥३॥
राही रखुमाबाई नीळकंठ जवळी । समाधीच्या पाळी अवघेजन ॥४॥
समाधी पायरीवरी वटेंश्वर सोपान । मागितला मान पाडुंरंग ॥५॥
प्रतीवषी भेटी देउ उभयता । अलंकापुरी जाती उत्सवासी ॥६॥
नामा म्हणे देवा कृपा केली फार । दिधला की वर भक्तराजा ॥७ ॥

धुप आणि दीप उजळिल्या ज्योती
धुप आणि दीप उजळिल्या ज्योती । तेव्हा ओसंडती अवघे जन ॥ १॥
सोपान वटेश्वर केला नमस्कार । उतरले पार भवसिंधु ॥२॥
घेतियले तीर्थ तंव झाले विकळ । झांकियले डोळे ब्रह्म-बोधे ॥३॥
निवृत्ति मुक्ताई राहिली बाहेरी । आंता तुम्ही हरि सांभाळावे ॥४॥
देव त्रषीश्वर निघाले बाहेर । केला नमस्कार नामदेवे ॥५॥

जयजयकार टाळी पिटली सकळी
जयजयकार टाळी पिटली सकळी । घातियेली शीळा समाधीसी ॥ १॥
निवृत्ति मुक्ताईने घातयेली घोण । करितो समाधान पांडुरंग ॥२॥
सोपान वटवेश्वर सुखधामी शेजा । करिताती पूजा समाधीची ॥३॥
खेद दु:ख झाले अवघ्या साधुजनां । केली प्रदक्षिणा समाधीसी शेजा ॥४॥
निवृत्ति मुक्ताईने वंदिली समाधी । देहभान शुध्दि हारपली ॥५॥
नामा म्हणे देवा उठा अवघेजण । करु आचमन भोगावती ॥६॥

जाती ब्रह्मादिक जाती
जाती ब्रह्मादिक जाती चराचर । मायीक व्यवहार ऐशा परी ॥१॥
प्रकृती पुरुषाचा मांडियेला खेळ । जाईल सकळ नाशिवंत ॥२॥
चंद्रसुर्य जाईल, मृगज़ळ । जाती तिन्ही ताळ शून्यपोटी ॥३॥
होईल निरामय अवघे चराचर । ब्रह्मीचा विस्तार होईल ब्रह्मी ॥४॥
नामा म्हणॆ स्वामी जाताती सकळ । ब्रह्मी माया मुळ झाली कैसी ॥५॥
समाप्त

अजून काही समाधीचे नवीन अभंग किंवा आवश्यक सुधारणेसाठी संपर्क करा.

धनंजय महाराज मोरे
मोबा. ९४२२९३८१९९

वारकरी संत समाधी अभंग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *