आत्म्याचा प्रवास, भाग 3, चिता कशी रचावी ? प्रेत जळतांना कोणती प्रार्थना करावी ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संकलन व लेखन
राष्ट्रीय कीर्तनकार
ह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे

Atmyacha Prawas 3
Dehaci Mr̥tyupurva Avastha,
Marana Javal Alayavaraci Tayari.

The pre-death state of the body, preparation for approaching death.

[ लेखांक ३ रा ]

कालच्या लेखात घरातुन प्रेत स्मशाना पर्यंत कसे आणावे,
हे आपण सविस्तर पाहीले.

आता पुढे काय होते ते आज पाहु….

प्रेत स्मशानात आणल्यानंतर भूमि प्रोक्षण करून प्रेताला देण्याकरिता अग्नी तयार करावा.
तीन हात रुंद व पाच हात लांब चिता रचुन त्यावर प्रेत ठेवावे.
प्रेतावरील सर्व हार फुल काढावीत,
ताटी मोडून फेकुन द्यावी.
जीवात्म्याची प्रेतावस्थे मधून मुक्तता व्हावी म्हणून अंत्येष्टी
म्हणजे
और्ध्वदेहिक कर्म मी करतो असा संकल्प करावा.

(अमुक गोत्रस्य, अमुक प्रेतस्य प्रेतत्व विमोक्षार्थं और्ध्वदेहिकं करिष्ये | )
इथे या ठिकाणी गेलेल्या व्यक्ती चे गोत्र व नाव घालावे.

प्रेताला हात जोडुन प्रार्थना करावी,

हे प्रेता लोकरी सारखी आणि स्रीसारखी मउ भूमी मृत्यूपासून तुझे रक्षण करो.
या स्मशानभूमितील पूर्वकालीन प्रेते निघुन जावोत,
नव्याने आलेल्या प्रेताचे कल्याण होवो.
अशी प्रार्थना करून भूमि प्रोक्षण करावी.

क्रव्यादमानं अग्निं प्रतिष्ठयामि
असे म्हणून दहनभूमिच्या बाजूस अग्नि प्रज्वलित करावा.

प्रेताचे मुख, दोन नाकपुड्या, दोन नेत्र, दोन कान, या सात ठिकाणी तूप लावावे.
त्यावर तिळ टाकावेत, अग्नी, काम, लोक, अनुमति, आणि प्रेत या देवतांना उद्देशून अग्नीवर तिळाच्या आहुती द्याव्यात.
त्यानंतर प्रेताच्या कपाळ, मुख, दोन बाहु आणि ह्रदय या पाच ठिकाणी सातूच्या पिठाचे पिंड ठेवावेत,
मृत्यू समयी त्रिपाद किवा पंचक असेल लागले असेल तर तसा संकल्प करून त्रिपाद असेल तर तीन व पंचक असेल तर पाच यवपिठाचे पुतळे करून प्रेतावर ठेवावे. *

त्यानंतर प्रेतावर पिंपळ, उंबर, चंदन, कापूर यांची चिता रचावी.
क्रव्यादमग्निं या मंत्राचे पठण करून
पुरुष प्रेताच्या डोक्याकडे

स्त्रीप्रेताच्या पायाकडे प्रथम अग्नी द्यावा,
त्यानंतर
वातास्ते वान्तु पथि पुण्य गंधा
मनःसुखा गात्रसुखानुलोमा |


सुगंधी वारे वाहोत,
ते वारे मन, गात्रे, त्वचा, मांस आणिअस्थी यांना सुख देवोत.
ते वारे आम्हास पुण्यश्लोकाला नेवोत.
मधुर जल अंतरिक्षात व स्वर्गात अखंडपणे प्राप्त होवो.

हे पितरांनो, मोक्षसाधनांनी पापमुक्त होवुन तुम्ही पुण्योद्भव वैभवाचा उपभोग घ्या.
हे प्रेतवाहक पीतृगामी अग्ने, मृत शरीर व चर्म यांना वेडेवाकडे जाळु नका,
प्रेत इतस्तः उडवु नका.
हे सर्वज् अग्ने, देवाधीन मृत शरीरास पूर्णपणे दग्ध करून तू ते पितरांना देवुन टाक.
हे धर्मसहीत मृत मनुष्या तुझे नेत्र सूर्याला प्राप्त होवो,
प्राण वायुला प्राप्त होवो,
आणि
सूक्ष्म शरीर द्यावापृथ्वी, ओषधी आणि अंतरिक्षास प्राप्त होवो.

हे सर्वज्ञ अग्नीदेवा स्वधा पूर्वक अर्पिलेल्या मृतदेहामधे नवा जीव ओतून तू ते पितराना अर्पण कर.
हे मृत शरीरा, मार्गाप्रभागस्थित, भक्त रक्षक पूषन् सर्वगामी वायु,
तसेच
सूर्यदेव तुला पुण्यलोकी सुस्थापित करो.

हे मृत पुरुषा तपःसामर्थ्याने निष्पाप आणि स्वर्लोकनिवासी बनलेल्या पितरांकडे जा.
अशी प्रार्थना प्रेत जळत असताना करावी.

त्यानंतर प्रेताच्या पायाकडून उलट्या दिशेने तीन प्रदक्षणा घालाव्यात त्या या प्रमाणे आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेवुन प्रेताला अपसव्य म्हणजे डावि प्रदक्षिणा घालवि,
यावेळेस एका दगडाने खांद्यावरिल मडक्याला एक भोक पाडतात,
अशा तिन प्रदक्षिणा करुन प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून
ज्या
दगडाने माठाला छिद्र पाडले गेले तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात,
मग
त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून देतात,
तेव्हा
त्या माठाचा फ sss ट् असा आवाज होवुन तो फुटतो यालाच घटस्फोट असे म्हणतात.

( आता नवरा किवा बायको जिवंत असतानाच घटस्फोट घेतला जातो )

या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते
आणि
सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला आता तुम्ही इथुन जा.

मग तो दगड म्हणजे अश्मा गळ्यात घातलेल्या वस्त्रामधे बांधतात.
आत्मा हे सगळं पहात असतो,
त्याला आपला देह जळताना पाहुन वाईट वाटते,
त्याला रडायला येते, ( येथे अशी कुणी शंका घेवु नये की आत्मा रडतो का ?
तर
आत्मा अजुनही चार कोषामधे बद्ध आहे,

यात मनोमय कोष असल्यामुळे वासना, भावना असतात )
प्रेताला अग्नी दिल्यावर आपण कवटीचा आवाज होई पर्यंत तिथेच थांबावे.

तदनंतर सर्वांनी प्रेताला नमस्कार करून स्मशानातून बाहेर पडावे,
मागे वळून पुन्हा चितेकडे पाहु नये.
सर्वांनी जवळील जलाशयावर स्नान करावे त्यानंतर अश्म्यावर तिलांजली द्यावी.
(आता हे कोणीही करत नाही. )
अश्मा उत्तरीयात म्हणजे गळ्यातील वस्त्रात बांधुन बाराव्या दिवसाचे सपिंडीकरण श्राद्ध होईपर्यंत त्यास घराबाहेर शुद्ध ठिकाणी सांभाळुन ठेवावे.
(बाराव्या दिवसाचे सपिंडीकरण काय असते ते आपण नंतर पहाणार आहोत. )

तो आत्माही आपल्या सोबत घरी येतो,
मात्र
तो फडक्यात बांधलेल्या अश्म्यावर बसतो म्हणून फडक्यात बांधलेला अश्मा दाराच्या बाहेर ठेवतात,
दहा दिवस हा आत्मा तिथे बसलेला असतो.

घरात दक्षिणेकडे कडे तोंड करुन दिवा लावला जातो,
याला नमस्कार करुन आलेली मंडळी निघुन जातात.
घरातिल माणसं अंघोळ करुन पिठलभात खायला मोकळी होतात……..

पुढे काय होते… ? उद्या पाहु क्रमशः-
क्रमशः

WARKARI ROJNISHI
वारकरी रोजनिशी
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
www.warkarirojnishi.in
www.96kulimaratha.com
96 कुली मराठा
९६ कुळी मराठा

आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *