कुठे, कसे व कोणाबरोबर जेवायला हवे यासंबंधी गरुड पुराणात सांगितले आहेत नियम पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

गरुड पुराण हे वैष्णव पंथाशी संबंधित धर्मग्रंथ आहे. असा हा सनातन धर्माचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये अध्यात्मातून जीवन सुधारण्यासाठी आचार्य कांडाचे वर्णन केले आहे. भगवान विष्णूच्या 24 अवतारांचे वर्णन गरुड पुराणात श्रीमद्भगवद्गीता प्रमाणेच केले आहे. गरुड पुराणात केवळ जीवनच नाही तर मृत्यूनंतरच्या घटनांचेही तपशीलवार वर्णन केले आहे. म्हणूनच या ग्रंथात नमूद केलेल्या गोष्टींची माहिती प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे.

गरुड पुराणात 279 अध्याय आणि 1800 श्लोक आहेत.
गरुड पुराणात असेही सांगितले आहे की आपण कोणाच्या घरी अन्न खाऊ नये.
अशा लोकांच्या घरी भोजन केल्यास सर्व पुण्य नष्ट होतात.
तुम्ही पापाचे बळी (भागीदार) बनता आणि एवढेच नाही तर तुम्हाला नरकही भोगावा लागतो.
म्हणूनच आपल्याला माहित पाहिजेत की कोण आहेत ते लोक,
ज्यांच्या घरचे जेवण चुकूनही खाऊ नये.

आपण कुठे, कसे आणि कोणाबरोबर जेवायला हवे यासंबंधी गरुड पुराणात सांगितले आहेत नियम!

‘जसा आहार तसा विचार’, म्हणून गरुड पुराणात दिलेले नियम जरूर पाळा!

आपण कुठे, कसे आणि कोणाबरोबर जेवायला हवे यासंबंधी गरुड पुराणात सांगितले आहेत नियम!

पुरातन काळापासून परान्न अर्थात दुसऱ्याच्या घरचे जेवण हे निषिद्ध सांगितले आहे.  

उठसुठ कोणाकडेही जेवू नये.
ज्याठिकाणी जेवायला बोलवले जाते, तिथेही अन्नपरीक्षा घेतल्याशिवाय जेवू नये.

असे काही नियम आपले पूर्वज कटाक्षाने पाळत असत.
परंतु,
अलीकडच्या काळात आपण मागचा पुढचा विचार न करता आवडती वस्तू दिसली की पटकन तोंडात टाकतो. त्याचे विपरीत परिणामही भोगावे लागतात.

म्हणून स्व-गृहाव्यतिरिक्त बाहेर कोणाकडेही जेवताना
किंवा
खाताना गरुड पुराणात दिलेले नियम आपण पाळतोय ना,

ते लक्षात घ्या. 

जसे अन्न खातो, तसे आपले विचार तयार होतात.

म्हणून अन्न ग्रहण करताना काही नियम कटाक्षाने पाळायला हवेत.

ते नियम पुढीलप्रमाणे आहेत-

1,  एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नसेल आणि या गोष्टीची आपल्याला पूर्ण कल्पना असेल, तर त्या व्यक्तीच्या घरी कदापिही जेवू नका. तसे केल्याने तुम्हीदेखील अप्रत्यक्षपणे त्याच्या पापात सहभागी होतात. 

 2, जे लोक दुसऱ्यांना लुबाडून धन संपत्ती कमावतात, अशा लोकांची संगत आणि सहभोजन टाळा. 

 3, चारित्र्यहीन व्यक्ती, व्यसनी व्यक्ती, वाईट विचारधारणा असणारी व्यक्ती त्यांच्या वाऱ्यालाही थांबू नका. सहभोजन तर दूरच! वाईट लोकांच्या संगतीत येऊन आपणही वाईटच बनतो. 

4,  आजारी व्यक्तीच्या घरी जेवू नका. आजारी व्यक्तीच्या घरी आजाराच्या प्रादुर्भावामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. 

 5, जे लोक इतरांच्या चुगळ्या करतात, एकमेकांच्या मागे नावे ठेवतात, असे लोक विचाराने हीन दर्जाचे असतात. अशा लोकांची मानसिकता आपण सुधारू शकत नाही. मग त्यांनी शिजवलेले अन्न देखील नकोच!

 6, शीघ्रकोपी लोकांकडे जेवण टाळा. त्यांना कोणत्या गोष्टीचा राग कधी येईल सांगता येत नाही. रागाच्या भरात ते तुम्हाला भरल्या ताटावरून उठवायलाही कमी करणार नाहीत. चार चौघात अपमानित करतील. म्हणून अशा लोकांबरोबर जेवणे नको!

7,  ज्यांना दुसऱ्यांप्रती सहानुभूती नाही, दया नाही, क्षमा नाही, शांती नाही अशा लोकांचे वाईट विचार अन्नात समाविष्ट होतात आणि ते अन्न ग्रहण केल्याने आपलीही मानसिकता तशीच बनत जाते. 

8,  व्यसनी लोकांबरोबर जेवणे टाळा. तुम्ही व्यसनी नसलात, तरीदेखील व्यसनी लोक तुम्हाला व्यसन लावायला मागे पुढे पाहणार नाहीत. उलट तसे करणे त्यांना आणखीनच गौरवाचे वाटते. म्हणून अशा लोकांबरोबर जेवण आणि मैत्री टाळा.

9. कलह क्लेश च्या वातावरणात ही जेवण करू नये,
10. वटवृक्षाखाली सुद्धा बसून जेवू नये.
11. वाढलेल्या जेवणाला कधीच नाव ठेवू नये.
12. उभारून जेवण करणे हेही चुकीचे आहे,
13. चप्पल घालून ही जेवू नये.

कोणाच्या घरच जेवण करू नये.

14. जेवण जास्त गोड किंवा जास्त तिखट करू नये,
15. कोणी सोडलेलं अन्न आपण खाऊ नये.
16. अर्धी ठेवलेली फळं, मिठाई अर्धी खाऊ नये.
17. जेवण सोडून गेल्यावर परत जेऊ नये.
189. प्राणी किंवा पक्षी यांनी शिवलेले अन्न कधी खाऊ नये.
19+. श्राद्धच ,वास येणारे आणि फुक मारून थंड केलेलं जेवणे चुकीचं आहे.
20. अन्नात केस पडला असेल तर ते जेवणं पण चुकीचं आहे.
21. वेश्याव्यवसाय च्या हातच ,
22. कंजूस असणार्याच्या हातच,
23. दारू विकणार्याच्या हातच,आणि
24.व्याजाचा धंदा करणाऱ्याच्या हातच कधीच जेऊ नये.

महाभारतात ६४ लोकांची यादी दिलेली आहे.

गरुड पुराणातील महत्वाचे.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *