सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

426-18
पैं लक्ष भेदिलियाहीवरी । बाण धांवेचि तंववरी । जंव भरली आथी उरी । बळाची ते ॥426॥
तसेच निशान मारल्यावरही बाण जसा त्यातील शक्ती कमी होईपर्यंत पुढेच जातो; 426
427-18
नाना चक्रीं भांडें जालें । तें कुलालें परतें नेलें । परी भ्रमेंचि तें मागिले । भोवंडिलेपणें ॥427॥
अथवा कुंभाराच्या चाकावर तयार झालेले भांडे कुंभाराने काढून घेतल्यावरही पूर्वी दिलेल्या गतीने चाक फिरतच असते, 427
428-18
तैसा देहाभिमानु गेलिया । देह जेणें स्वभावें धनंजया । जालें तें अपैसया । चेष्टवीच तें ॥428॥
तसा आहे धनंजया, देहाचा अभिमान नाहीसा झाल्यावरही, ज्या कर्मांनी देह उत्पन्न झाला आहे, ते कर्म त्या देहाकडून चेष्टा करविलच, त्याचे चेष्टा याचा इच्छेवर अवलंबून नसतात. 428
429-18
संकल्पेंवीण स्वप्न । न लावितां दांगीचें बन । न रचितां गंधर्वभुवन । उठी जैसें ॥429॥
संकल्पा शिवाय स्वप्न दिसते, न लावता जशी अरण्यात झाडे उत्पन्न होतात व रचना केल्या शिवाय आकाशात जशी गंधर्व नगरे दृष्टीस पडतात, 429
430-18
आत्मयाचेनि उद्यमेंवीण । तैसें देहादिपंचकारण । होय आपणयां आपण । क्रियाजात ॥430॥
तशी आत्म्याच्या संकल्पाशिवाय देहादि पांच कारणे मागे सांगितली, ती क्रिया करण्यास कारणीभूत होतात. 430

431-18
पैं प्राचीनसंस्कारवशें । पांचही कारणें सहेतुकें । कामवीजती गा अनेकें । कर्माकारें ॥431॥
परंतु पूर्वजन्मीच्या संस्काराने पाचही कारणे व हेतू अनेक क्रिया करितात. 431
432-18
तया कर्मामाजीं मग । संहरो आघवें जग । अथवा नवें चांग । अनुकरो ॥432॥
त्या कर्मात मग सर्व जगाचा संहार होवो, अथवा नवे जग उत्पन्न होवो; 432
433-18
परी कुमुद कैसेनि सुके । कैसें तें कमळ फांके । हीं दोन्ही रवी न देखे । जयापरी ॥433॥
परंतु, कुमुद कसे झुकते व कमळांची प्रभा कशी फाकते, हे आपल्या पासून होणारे दोन्ही परिणाम सूर्यास माहीत नसतात; 433
434-18
कां वीजु वर्षोनि आभाळ । ठिकरिया आतो भूतळ । अथवा करूं शाड्वळ । प्रसन्नावृष्टी ॥434॥
किंवा आकाशातून विज पडून जरी ठिकर्‍या ठिकर्‍या उडाल्या किंवा पाऊस पडून जरी जमीन हिरवीगार झाली, 434
435-18
तरी तया दोहींतें जैसें । नेणिजेचि कां आकाशें । तैसा देहींच जो असे । विदेहदृष्टी ॥435॥
तरी या दोन्हीलाही जसे आकाश जाणत नाही, तसा तो देहाभिमान रहित देहातच वास करतो, 435

446-18
तो देहादिकीं चेष्टीं । घडतां मोडतां हे सृष्टी । न देखे स्वप्न दृष्टी । चेइला जैसा ॥436॥
तो, तसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्न पहात नाही, तसा देहादीका पासून सृष्टीचा उद्भव झाला किंवा लय झाला, तरी जाणत नाही. 436
437-18
येऱ्हवीं चामाचे डोळेवरी । जे देखती देहचिवरी । ते कीर तो व्यापारी । ऐसेंचि मानिती ॥437॥
एरवी, हा देही आहे असे जे चर्मचक्षूंनी पाहतात, ते त्यालाच कर्म करणारा असे मानतात. 437
438-18
कां तृणाचा बाहुला । जो आगरामेरें ठेविला । तो साचचि राखता कोल्हा । मानिजे ना? ॥438॥
अथवा, गवताचे बुजगावणे करून ते शेताच्या कडेने उभे केले, म्हणजे कोल्हा त्याला खरा रखवालदार समजत नाही काय? 438
439-18
पिसें नेसलें कां नागवें । हें लोकीं येऊनि जाणावें । ठाणोरियांचें मवावें । आणिकीं घाय ॥439॥
वेडा मनुष्य वस्त्र नेसलेल्या आहे, किंवा नागवा आहे हे जसे लोकांनी जाणावे लागते किंवा रणांत पडलेल्या मनुष्याच्या अंगावरचे घालत जसे दुसऱ्यांनी मोजावे लागतात, 439
440-18
कां महासतीचे भोग । देखे कीर सकळ जग । परी ते आगी ना आंग । ना लोकु देखे ॥440॥
अथवा एखादी महासती सती जाते वेळेस न्हाणे, माखणे, मळवट भरणे इत्यादी सौभाग्यशृंगार जरी करीत आहे असे लोकांस दिसले तरी तिला अग्नी दिसत नाही, स्वतःच्या शरीराचे तिला भान नसते किंवा लोकांकडेही तिचे लक्ष नसते, तर ती पती स्वरूपी तल्लीन झालेली असते, 440

441-18
तैसा स्वस्वरूपें उठिला । जो दृश्येंसी द्रष्टा आटला । तो नेणें काय राहटला । इंद्रियग्रामु ॥441॥
त्याप्रमाणे आत्मस्वरूप प्राप्तीच्या योगे जो द्रष्टा द्रष्ट्यासह नष्ट झाला,(पाहणारा व पाहण्याची वस्तू हा भाव नाहीसा झाला), तो इंद्रिय समुदायाने काय कर्म केले हे जाणत नाही 441
442-18
अगा थोरीं कल्लोळीं कल्लोळ साने । लोपतां तिरींचेनि जनें । एकीं एक गिळिलें हें मनें । मानिजे जऱ्ही ॥442॥
अरे, समुद्राचे तीरावर असलेल्या लोकांस जरी असे वाटले की थोरल्या लाटेने धाकट्या लाटांस एकदम गिळून टाकले आहे, 442
443-18
तऱ्ही उदकाप्रति पाहीं । कोण ग्रसितसे काई । तैसें पूर्णा दुजें नाहीं । जें तो मारी ॥443॥
तरी उदकाच्या दृष्टीने पाहू गेले असता कोणती लाट कोणत्या लाटे खाऊन टाकते? त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपास मिळाला त्यास कर्म टाकावे असे कर्माविषयी तो द्वैत रहात नाही. 443
444-18
सुवर्णाचिया चंडिका । सुवर्णशूळेंचि देखा । सुवर्णाचिया महिखा । नाशु केला ॥444॥
पहा, सोन्याच्या देवीने, सोन्याच्या त्रिशुळाने सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला, 444
445-18
तो देवलवसिया कडा । व्यवहारु गमला फुडा । वांचूनि शूळ महिष चामुंडा । सुवर्णचि तें ॥445॥
हा सर्व प्रकार भक्तांच्या दृष्टीने खरा असा भासतो, परंतु या दृष्टीने त्रिशूळ, महिषासुर व देवी हे सर्व सोनेच आहे; 445

446-18
पैं चित्रींचें जळ हुतांशु । तो दृष्टीचाचि आभासु । पटीं आगी वोलांशु । दोन्ही नाहीं ॥446॥
तसेच भिंतीवर काढलेल्या चित्रांत एक तलाव व एक अग्निकुंड हा फक्त दृष्टीचाच भेद आहे; परंतु त्या दोहोस वस्त्र लावले असता ते भिजत नाही व जळतही नाही; 446
447-18
मुक्ताचें देह तैसें । हालत संस्कारवशें । तें देखोनि लोक पिसे । कर्ता म्हणती ॥447॥
त्याप्रमाणे जो ज्ञानी आहे त्याच्या देहाचा व्यवहार पूर्व कर्मानुसार असतो, परंतु हे न समजता वेडे लोक त्याला कर्मकर्ता असे म्हणतात; 447
448-18
केलें कर्मीं जे द्यावें । तें झणें मज होआवें । आजि भोगूं ना कां बरवे । हातींचे भोग? ॥191॥आणि जो कर्म करीत असता जरी त्यायोगे त्रैलोक्याचा घात झाला, तरी त्याने केला असे म्हणू नये. 448
449-18
अगा अंधारुचि देखावा तेजें । मग तो फेडी हें बोलिजे । तैसें ज्ञानिया नाहीं दुजें । जें तो मारी । ॥449॥
अरे, सूर्याने अंधार पहावा आणि मग त्याला दूर करा, असे म्हणावे, त्याप्रमाणे ज्ञानाला अशी काही दुसरी वस्तू नाही की, जिचा तो नाश करील. त्याचे ठिकाणचा द्वैतभाव जाऊन सर्व जग त्याला स्वस्वरूप झालेले असते; 449
450-18
म्हणौनि तयाचि बुद्धी । नेणे पापपुण्याची गंधी । गंगा मीनलिया नदी । विटाळु जैसा ॥450॥
म्हणून त्याच्या बुद्धीला पाप व पुण्य याचा गंधही नसतो. जशी एखादी नदी गंगेस मिळाली असता तिचा अपवित्रपणा नाहीसा होतो. 450

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading