सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

401-18
परी कर्मीं असोनि कर्में । जो नावरे समेंविषमें । चर्मचक्षूंचेनि चामें । दृष्टि जैसी ॥401॥
परंतु कर्म करीत असून जो कर्माच्या वाईट अथवा चांगल्या परिणामाने लिप्त होत नाही, जशी चर्मचक्षूंच्या चर्माने खरी दृष्टी लोपत नाही; 401
402-18
तैसा सोडवला जो आहे । तयाचें रूप आतां पाहें । उपपत्तीची बाहे । उभऊनि सांगों ॥402॥
तसा तो कर्मातीत झाला आहे; त्याची लक्षणे तुला युक्तीने बाहू उभारुन सांगतो. 402
यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते ।
हत्वाऽपि स इमा.ण्ल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥18.17॥

403-18
तरी अविद्येचिया निदा । विश्वस्वप्नाचा हा धांदा । भोगीत होता प्रबुद्धा । अनादि जो ॥403॥
तरीही प्रबुद्धा अर्जुना, जो अज्ञानाच्या निद्रेत विश्वरूपी स्वप्नाचा अनुभव पुष्कळ वर्षे घेत होता, 403
404-18
तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपेचेनि थांवें । माथां हातु ठेविला नव्हे । थापटिला जैसा ॥404॥
तो “तत्त्वमसि” हे महावाक्य कानी पडून गुरुकृपेच्या बलाने मस्तकावर नुसता हात ठेवणे नव्हे, तर जसा थापटून जागा केला आहे, 404
405-18
तैसा विश्वस्वप्नेंसीं माया । नीद सांडूनि धनंजया । सहसा चेइला अद्वया- । नंदपणें जो ॥405॥
तसा अर्जुना, जगद्रुपी स्वप्न व अज्ञानरूपी निद्रा टाकून सहज निजस्वरूपाचे दर्शनाने जागा झाला, 405

406-18
तेव्हां मृगजळाचे पूर । दिसते एक निरंतर । हारपती कां चंद्रकर । फांकतां जैसे ॥406॥
तेव्हा चंद्र उगवल्यावर मृगजळाचे दिसणारे पुर आपोआप नाहीसे होतात
407-18
कां बाळत्व निघोनि जाय । तैं बागुला नाहीं त्राय । पैं जळालिया इंधन न होय । इंधन जेवीं ॥407॥
किंवा बाल्यदशा निघून गेल्यावर बागुलबुवाला जशी कोणी भीत नाही, किंवा लाकूड जळल्यावर त्यात जसा लाकूडपणा राहत नाही, 407
408-18
नाना चेवो आलिया पाठीं । तैं स्वप्न न दिसे दिठी । तैसी अहं ममता किरीटी । नुरेचि तया ॥408॥
अथवा जागृत झाल्यावर स्वप्ने दृष्टीस पडत नाही, तसा अर्जुना, त्याला मी व माझे हा अभिमान राहत नाही, 408
409-18
मग सूर्यु आंधारालागीं । रिघो कां भलते सुरंगीं । परी तो तयाच्या भागीं । नाहींचि जैसा ॥409॥
मग अंधार पाहण्याकरिता जरी सूर्य वाटेल त्या भुयारात शिरला, तरी तेथे जसा अंधार राहत नाही, 409
410-18
तैसा आत्मत्वें वेष्टिला होये । तो जया जया दृश्यातें पाहें । तें दृष्य द्रष्टेपणेंसीं होत जाये । तयाचेंचि रूप ॥410॥
तसा मी आत्मा आहे, अशी ज्याची पूर्ण समजूत झाली, तो ज्या वस्तूकडे पाहील ती वस्तू व त्याची दृष्टी ही त्याला आत्मरुपीच दिसतील. 410

411-18
जैसा वन्हि जया लागे । तें वन्हिचि जालिया आंगें । दाह्यदाहकविभागें । सांडिजे तें ॥411॥
अग्नि ज्या पदार्थास लागतो तो पदार्थ जसा अग्निरूप होतो व मग जसा दाह्य व दाहक हा भेद शिल्लक राहत नाही, 411
412-18
तैसा कर्माकारा दुजेया । तो कर्तेपणाचा आत्मया । आळु आला तो गेलिया । कांहीं बाहीं जें उरे ॥412॥
तसे कर्माचे ठिकाणी द्वैत मानून ते कर्म करण्याचा आत्म्यावर आळ आलेला नाहीसा झाल्यावर जे काही उरते, 412
413-18
तिये आत्मस्थितीचा जो रावो । मग तो देहीं इये जाणेल ठावो? । काय प्रलयांबूचा उन्नाहो । वोघु मानी? ॥413॥
त्या आत्मस्थितीत राहणारा जो श्रेष्ठ पुरुष तो हा देह माझा आहे व मी देहाहून निराळा आहे असे मानेल काय? हे पहा, प्रलयकाळी जलाची वृद्धी होऊन सर्व जलमय झाल्यावर त्यात लहान लहान ओघाला आपल्याहून निराळे ठेवीत नाही, 413
414-18
तैसी ते पूर्ण अहंता । काई देहपणें पंडुसुता । आवरे काई सविता । बिंबें धरिला? ॥414॥
त्याप्रमाणे अर्जुना, ब्रह्माचे ठिकाणी अहंता उत्पन्न झाली असता म्हणजे ब्रह्मच मी आहे, असा आगाध बोध झाला असता तो ब्रह्मरूप झालेला अहंकार देहा पुरता कसा आवरला जाईल? हे पहा सूर्याचे प्रतिबिंब धरल्याने सूर्य का आपल्या हाती लागणार आहे? नाही. 414
415-18
पैं मथूनि लोणी घेपे । तें मागुती ताकीं घापे । तरी तें अलिप्तपणें सिंपे । तेणेंसी काई? ॥415॥
ताक घुसळून लोणी काढल्यावर ते पुन: ताकांत घातले तर ते पूर्वीप्रमाणे ताकाची एकरूप होईल का? 415

416-18
नाना काष्ठौनि वीरेशा । वेगळा केलिया हुताशा । राहे काष्ठाचिया मांदुसा । कोंडलेपणें? ॥416॥
अथवा हे वीरेशा, लाकडात स्वभावात:च गुप्त असलेला अग्नी घर्षणादि उपायाने प्रगट केल्यास तो लाकडाच्या पेटीत कोंडून ठेवल्यावर राहील का? 416
417-18
कां रात्रीचिया उदराआंतु । निघाला जो हा भास्वतु । तो रात्री ऐसी मातु । ऐके कायी? ॥417॥
किंवा रात्रीच्या अंधारातून जो सूर्य बाहेर निघाला आहे, तो “रात्र” अशी गोष्ट कानांनी ऐकल तरी का! 417
418-18
तैसें वेद्य वेदकपणेंसी । पडिलें कां जयाचे ग्रासीं । तया देह मी ऐसी । अहंता कैंची? ॥418॥
ज्याप्रमाणे जाणण्याची वस्तू व जाणणारा ही ज्याचे बोधांत नाहीशी झाली आहेत, त्याला मी देह आहे अथवा देहात आत्मा आहे, असा गर्व कुठून असणार? 418
419-18
आणि आकाशें जेथें जेथुनी । जाइजे तेथ असे भरोनी । म्हणौनि ठेलें कोंदोनी । आपेंआप ॥419॥
आणि, आकाशाने जेथून ज्या ठिकाणी जावे, त्याठिकाणी ते भरलेले असल्यामुळे सहजच ते सर्व ठिकाणी व्याप्त आहे, 419
420-18
तैसें जें तेणें करावें । तो तेंचि आहे स्वभावें । मा कोणें कर्मीं वेष्टावें । कर्तेपणें? ॥420॥
तसे तो जे जे करितो, ते आत्मस्वरूप आहे; मग कोणत्या क्रमाने तो आपलेकडे कर्तेपणा घेईल? 420

421-18
नुरेचि गगनावीण ठावो । नोहेचि समुद्रा प्रवाहो । नुठीचि ध्रुवा जावों । तैसें जाहालें ॥421॥
गगनाशिवाय कोणतेही ठिकाण नाही, समुद्राला प्रवाह नाही व ध्रुव नक्षत्राला कुठेही जाता येत नाही, तशी या मनुष्याची स्थिती झाली आहे. 421
422-18
ऐसेनि अहंकृतिभावो । जयाचा बोधीं जाहला वावो । तऱ्ही देहा जंव निर्वाहो । तंव आथी कर्में ॥422॥
अशाप्रकारे ज्याला आत्मज्ञानाच्या योगे कर्माचा कर्तेपणाचा अभिमान बाधित म्हणजे मित्र आहे; तथापि त्याचा देह आहे, तोपर्यंत त्याच्याकडून करणे होणारच; 422
423-18
वारा जरी वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखीं उरे । कां सेंदें द्रुति राहे कापुरें । वेंचलेनी ॥423॥
वारा वाहण्याचा जरी बंद झाला, तरी झाडाचे हालने बंद होत नाही अथवा कापूर जरी संपला, तरी करंड्यात वास शिल्लक असतो; 423
424-18
कां सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु । भूमी लोळोनि गेलिया अंबु । वोल थारे ॥424॥
अथवा गाण्याचा समारंभ संपला, तरी गाणी ऐकून मनास झालेल्या आनंदाचा भर जसा कमी होत नाही, किंवा पाण्याने जमीन ओली होऊन पाणी कमी झाले असता जशी त्याची ओल मागे राहते; 424
425-18
अगा मावळलेनि अर्कें । संध्येचिये भूमिके । ज्योतिदीप्ति कौतुकें । दिसे जैसी ॥425॥
अरे, सूर्य मावळल्यावर संध्याकाळी पश्चिमेकडे आकाशांत सूर्य ज्योतिचे तेज (संधी प्रकाश) जसे दिसते, 425

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *