कढीपत्ता वा गोडनिंब : धनंजय महाराज मोरे

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

कढीपत्ता – भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध.

भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध.
‘कढीपत्ता’ म्हणजे परसबागेतील दुर्लक्षित रोपटेच म्हणा ना ! पण त्याचे अस्तित्व घरोघरी आहेच हं ! जसे हळदीबरोबर कुंकू (हळद – कुंकू) हा समास होतो, आल्याबरोबर लसूण, तसे कोथिंबीरीबरोबर कढीपत्ता असे जणू समीकरणच झाले आहे.२० – २५ वर्षापूर्वी काढीत टाकण्यापुरता तो कढीपत्ता. म्हणजे स्वादिष्ट कढी होते एवढ्यापुरता महाराष्ट्राला ढोबळमनाने कढीपत्ता माहिती होता. पण आज कांदेपोहे असो, उपीट असो अथवा कुठलीही सांबर किंवा महाराष्ट्रीय आमटी कढीपत्त्याशिवाय अपूर्णच. एवढे स्वादाचे काम कढीपत्ता करतो. दक्षिणात्य प्रत्येक पदार्थात व चटण्या यांमध्ये कढीपत्ता असतोच. स्वादाबरोबरच कढीपत्ता भूक उदिप्त करतो. असे त्याचे महत्त्व आहे.

‘कढीपत्ता’ हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून, ते एक सुंदर आणि साधे औषध आहे. पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले. त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते.

कढीपत्त्याचे झाड बऱ्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते. जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो. त्याला बऱ्याचदा बिया लागलेल्या सापडतात. या बिया गोळा करून अंगणात लावल्या की फार चांगल्या पद्धतीने रुजतात आणि झाड मोठे झाले की त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात.
कढीपत्त्याचे ‘आहार’ आणि ‘औषध’ अशा अनुषंगाने उपयोग पाहूया.
कढीपत्त्यात हरितद्रव्य अधिक असल्याने लोह, चुना, ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व, तसेच आयोडिनचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे.


कढीपत्त्याने कर्करोग होत नाही. मधुमेहाने प्रमाण कमी होते. कोलेस्टोरॉलचे प्रमाण कमी होते. याचा पाला पोटात गेल्यावर फायबर असल्याने व कॅन्सर विरोधक तत्व यात असल्याने कॅन्सरला प्रतिबंध होतो.
१) आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी कढीपत्ता वापरतो. प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते. त्यामुळे जेवण रुचकर लागते.
२) जुलाब लागले असता, कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की, ‘पोटातल्या वेदना’ आणि ‘जुलाबाचे वेग’ वेगाने नियंत्रणात येतात.
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो, त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत.
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे. नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत.
५) मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत. याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते.


७) कोलेस्टेरॉल वाढले असेल तर, कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत.
८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत. केस पांढरे होत नाहीत. शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते.
९) कर्करोगाने पिडीत रुग्ण ‘केमो’ आणि ‘रेडियो’ थेरपी घेत असताना, त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते. अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून खायला लावावीत. रुग्णाला बराच आराम मिळतो.
१०) सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर, अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.


११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे ‘अमृत’ आहे. कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.
१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर, कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो.
१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर, मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत. याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.
१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर, डोळ्यांचे विकार कमी होतात.
15) कढीपत्ते केसांना काळं करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात. केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी फायदे आहेत. ते पाहून घेऊया…
केसांसाठी म्हणून उपयुक्त आहे कढीपत्ता


गरजेपेक्षा जास्त केमिकलचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं नुकसान होतं. कढीपत्त्यात असे सर्व पोषक तत्त्वे आहेत, जे केसांना निरोगी ठेवतात. या पानांना बारीक करून त्याचा लेप बनवावा. मग तो लेप केसांच्या मुळाशी लावावा. आपण कढीपत्ता खावू शकतो, यामुळे केस काळे, लांब आणि घनदाट होतात. सोबतच केसांची मूळं मजबूत होतात. कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी१, बी३, बी९ आणि सी असतात. याशिवाय आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस आढळतं. याचं दररोज सेवन केल्यानं आपले केस काळे, लांबसडक होतील. तसंच डँड्रफ म्हणजेच कोंड्याची समस्याही दूर होईल.
कसा कराल कढी पत्त्याचा वापर

कढी पत्ता वाळवून घ्यावा. वाळल्यानंतर पानांचं पावडर तयार करून घ्यावं. आता २०० मिमी खोबरेल तेलात किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये जवळपास ४ ते ५ चमचे कढीपत्त्याचं पावडर मिक्स करून उकळून घ्यावं. चांगल्या उकळीनंतर ते थंड होऊ द्यावं. मग तेल गाळून एका हवाबंद बॉटलमध्ये टाकावं. झोपण्यापूर्वी दररोज हे तेल लावावं. जर तेल थोडं कोमट करून लावलं तर अधिक फायदेशीर ठरतं. दुसऱ्या दिवशी नैसर्गित शॅम्पूनं केस धुवावेत. चांगला फायदा होईल.
केसांसाठी तयार करावा मास्क


कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनीटं तसेच ठेवा, नंतर शॅम्पूनं केस धुवा. असं नेहमी केल्यानं केस काळे आणि घनदाट होतात.
कढीपत्त्याचा दहा तयार करा
कढी पत्ता पाण्यात उकळून घ्या. यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेल. सोबतच केस पांढरे होण्यापासून वाचवेल आणि आपली डायडेस्टिव सिस्टमही स्वस्थ ठेवेल. 
कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे.…असा हा ‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता आहारात नियमित ठेवा. कच्चा चावून खा.आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.

आरोग्य अर्थात रोग लक्षणे, व उपाय

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *