संत सेना न्हावी महाराज समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत सेना महाराज निर्याण


स्वहिताकारणे सांगतसे तुज
स्वहिताकारणे सांगतसे तुज । अंतरीचे गुज होतें कांहीं ॥१॥
करा हरिभजन तराल भवसागर । उतरील पैलपार पांडुरंग ॥२॥
कृपा नारायणे केली मजवरी । तुम्हालागी हरि विसंबेना ॥३॥
सेना सांगुनियां जातो वैकुंठासी । तिथी तें द्वादशी श्रावणमास ॥४॥


माझे झाले स्वहित
माझे झाले स्वहित । तुम्हां सांगतो निश्चित ॥१॥
करा हरीचें चिंतन । गावें उत्तम हे गुण ॥२॥
श्रावण वद्य द्वादशी । सेना समाप्त त्या दिवशीं ॥३॥

वारकरी संत समाधी अभंग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *