मंगलाचरण पहिले वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान
काकडा भजना बद्दल अधिक माहिती.

वारकरी संप्रदायातील महत्त्वाचा एक भजन प्रकार म्हणजे काकडा भजन, काकडा भजनाच्या सुरुवातीला गजर घेतल्या जातो.
काकडा हा सकाळच्या वेळी म्हटला जातो, प्रसंगी तो दुपारपर्यंतही म्हटला जाऊ शकतो. वाटचालीमध्ये, दिंडीमध्ये, दुपारी मध्यान्हापर्यंत, म्हणजे साधारण बारा वाजेपर्यंत ही म्हणायला चालतो, शक्यतो काकडा भजन हे सकाळी चार ते सहाच्या दरम्यान म्हटल्या जावे असा पूर्व परंपरा प्राप्त संकेत आहे.
काकडा भजन प्रामुख्याने भगवान परमात्म्याला, साधुसंतांना, सर्व समाजाला, ईश्वराचे भजन करण्यासाठी जीवनाची सुरुवात, जशी जन्माने तशी दिवसाची सुरुवातही जागरणाने होते. आणि म्हणून सकाळी जागे झाल्यावर शुचिर्भूत होऊन स्नानादी नित्यकर्म करूनच काकडा भजन म्हटल्या जाते.

काकडा भजनाला शक्यतो स्नान, पूजा, करूनच बसावे. काकडा भजन शक्यतो विणा, मृदंग,आणि टाळ या साहित्यावर म्हटले जावे,
मंदिरामध्ये व मंडपामध्ये काकडा घेत असताना विणेकरी यांनी शक्यतो अधिष्ठानाकडे म्हणजे देवाकडे किंवा व्यासपीठाकडे तोंड करून बसावे, त्याच्या डाव्या आणि उजव्या हाताला इतर टाळकरी आणि भजनी मंडळींनी बसावे, शक्यतो अंगावरती पांढरा वारकरी पोशाख असावा. काकडा भजनाची सुरुवात ही वारकरी सांप्रदायिक गजर करून होते खालील प्रमाणे गजर सर्वांनी आणि सामूहिक गजर म्हणावा.
टीप : गजर कसा म्हणायचा यासाठी कृपया खालील ऑडिओ प्ले करा.

काकडा भजनाची सुरुवात ही वारकरी सांप्रदायिक गजर करून होते.
खालील प्रमाणे गजर सर्वांनी आणि सामूहिक गजर म्हणावा.
टीप : गजर कसा म्हणायचा यासाठी कृपया खालील ऑडिओ प्ले करा.

|| पुंडलिक वर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.||

गजर :
गायक : बाबा महाराज सातारकर.

|| अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, ||
तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र,
तया आठविता महा पुण्य राशी,
|| नमस्कार माझा सदगुरू ज्ञानेश्वराशी.||

रामकृष्ण हरी भजन :
गायक : डिगांबर बुवा कुटे.

|| मंगलाचरण पहिले ||

काकडा भजन : रूप पाहता लोचनी ते येग येग विठाबाई पर्यंत एकूण ११ अभंग.
गायक : डिगांबर बुवा कुटे.

१ रूप पाहतां लोचनीं.

रुप पाहतां लोचनीं । सुख झालें वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥
बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी ॥३॥
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥

२ वचन ऎका कमळापती.

वचन ऎका कमळापती । माझी रंकाची विनंती ॥१॥
कर जोडितों कथेकाळीं । आपण असावें जवळीं ॥२॥
घ्यावी घ्यावी माझी भाक । जरी कां मागेन आणिक॥३॥
तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाची राखावा ॥४॥

३  राहो आतां हेंचि ध्यान

राहो आतां हेंचि ध्यान । डोळां मन लंपट ॥१॥
कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥२॥
होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३॥
तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडो द्या ॥४॥

४  तुज पाहतां सामोरी

तुज पाहतां सामोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥
माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडली पंढरीराया ॥२॥
नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥३॥
तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळीं ॥४॥

५  तुम्ही सनकादिक संत

तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृपावंत ॥१॥
एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥२॥
माझी भाकावी करुणा । विनवा पंढरीचा राणा ॥३॥
तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥४॥

६  आतां तुम्ही कृपावंत

आतां तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥१॥
गोमटें तें करा माझें । भार ओझें तुम्हांसी ॥२॥
वंचिलें तें पायांपाशीं । नाहीं यासी वेगळें ॥३॥
तुका म्हणे सोडिल्या गांठी। दिली मिठी पायांसी ॥४॥

  लेकुराचें हित । जाणे/वाहे माउलीचें

लेकुराचें हित । जाणे/वाहे माउलीचें चित्त ॥१॥
ऎसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥२॥
पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्वही साहे ॥३॥
तुका म्हणे माझें । तुम्हां संतांवरी ओझे ॥४॥

  करुनि उचित । प्रेम घाली

करुनि उचित । प्रेम घाली हृदयांत ॥१॥
आलों दान मागायास । थोर करुनियां आस ॥२॥
चिंतन समयीं । सेवा आपुलीच घेई ॥३॥
तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावे देवा ॥४॥

९  न धरी उदास । माझी

न धरी उदास । माझी पुरवावी आस ॥१॥
ऎका ऎका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥२॥
मायबाप बंधुजन । तुंचि सोयरा सज्जन ॥३॥
तुका म्हणे तुजविरहित । कोण करील माझें हित ॥४॥

१०  गरुडाचे पायीं । ठेवी

गरुडाचे पायीं । ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥
वेगीं आणावा तो हरी । मज दीनातें उद्धरी ॥२॥
पाय लक्ष्मीच्या हातीं । तिसीं यावे काकुळती ॥३॥
तुका म्हणे शेषा । जागे करा ह्रषीकेशा ॥४॥

११  येग येग विठाबाई । माझे

येग येग विठाबाई । माझे पंढरींचे आई ॥१॥
भिमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणींची गंगा ॥२॥
इतुक्यासहित त्वां बा यावें । माझें रंगणीं नाचावें॥३॥
माझा रंग तुझे गुणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

संपूर्ण १३५ अभंगाचा काकडा पहा

मालिका सूची.
मंगलाचरण पहिले, – दुसरे, – तिसरे.
काकडा भूपाळ्या.
वासुदेव.मुका-बहिराजोगी-बाळछंद. – गौळणी.

WARKARI-BHAJNI-MALIKA वारकरी-रोजनिशी-WARKARI-ROJNISHI

मंगलाचरण पहिले समाप्त’

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

10 Comments

    • मंगलचरण दुसरे व तिसरे मोबाईल मध्ये ओपन होत नाही.

  1. खरचं भजनी मालिका मनातून आवडली रामकृष्ण हरि.

    • विजय महाराज
      राम कृष्ण हरी 💐

      आपण पाठवलेला सुंदर अभिप्राय आमचा उत्साह वाढवणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *