शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा, अडाणी राहून सुसंस्कृत राहिलेलं कधीही चांगलं…

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अंतकाळी कोणीही नाही

अतिशय दुःखद आणि हृदय हेलावून टाकणारी घटना घडली… डॉ. अरुण गोधमगावकर सर यांचे वृद्धाश्रमातच निधन झाले… डाॅ. अरुण गोधमगांवकर सर, हे एक नामांकित बालरोगतज्ज्ञ डॉक्टर होते… त्यांनी आयुष्यभर अनेक बालकांना जीवनदान दिले… ते मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी वृद्धाश्रमात राहत होते… ते नांदेड जिल्ह्यातील… मूळचे नायगाव तालुक्यातील गोधमगावचे होते,.. परंतु ते नंतर बिलोलीला स्थायिक झाले होते… त्यांनी स्वतःच्या मुलाला एम. डी. डॉक्टर व मुलीलाही स्री रोग तज्ज्ञ डॉक्टर करून, काही वर्षापूर्वीच त्या दोघांनाही अमेरिकेला पाठवले होते… सून व जावई हे पण डॉक्टरच आहेत… सगळेच आपापल्या जीवनात व्यस्त असल्याने, आई वडिलांकडे लक्ष द्यायला कोणीच रिकामे नव्हते… उतारवयात डॉक्टर साहेबांच्या पत्नीचे निधन झाले होते… त्यावेळेस देखील अमेरिकेहून त्यांचा ना मुलगा आला, ना ही मूलगी आली… मग गावकऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले… त्यानंतर डॉक्टर साहेब लातूर जिल्ह्यातील अहमदपूर य़ेथे रुक्मिणी वृद्धाश्रमामध्ये रहायला गेले…

चार वर्षाचा काळ तेथे व्यथित केला आणि काही दिवसांपूर्वी दिनांक १८ ऑगस्ट, २०१८ रोजी डॉ. अरुण गोधमगावकर सर यांचे दुःखद निधन झाले… वृद्धाश्रम चालकाने त्यांच्या अमेरिकास्थीत मुलगा, मुलगी आणि जावई यांना निरोप देऊन हा दु:खद प्रसंग कळवला… परंतु “आमचे कोणाचेही येणे होणार नाही, आमचा कसलाही आक्षेप नाही, तुम्ही अंत्यविधीचा कार्यक्रम ऊरकून घ्या”, असे सांगितले… अखेर तेथील आश्रमवासीयांनी अतिशय जड अंत:करणाने डॉक्टरांना अश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला… शेवटी मनात विचार येतो की, कोणी नाही कोणाचे… हुशारी, धन काय कामाचे?… पोरंबाळे कोणाचे?… घर, संसार कोणाचा?… लेकी – सुना कोणाच्या?… शेवटी कोणीच कोणाचे नाहीत का? मरावे एकट्यालाच लागले, अशी वाईट परिस्थिती आहे… समाज अतिशय वाईट पऱिस्थितीतून जात आहे, असे वाटते… जी परिस्थिती डॉक्टरांवर आली, ती कुणावरच येऊ नये… ज्या माता पित्याची स्वतः जन्म दिलेली मुले, जर त्या माता – पित्याला वृद्धाश्रमामध्ये पाठवतात आणि शेवटी त्यांच्या अंत्यविधीलाही त्यांना यायला अजिबात वेळ नाही… त्यापेक्षा मोठे दुर्दैव त्या मातापित्यांसाठी दुसरे कोणतेच असू शकत नाही… यातून एक गोष्ट सिध्द होते की, शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा, अडाणी राहून सुसंस्कृत राहिलेलं कधीही चांगलं… आपल्या आई वडिलांची काळजी घेणे, हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे की नाही?…

बाळासाहेब हांडे संग्रहित सर्व साहित्य पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *