आत्म्याचा प्रवास, भाग 1, देहाची मृत्यू पूर्व अवस्था, मरण जवळ आल्यावरची तयारी.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संकलन व लेखन
राष्ट्रीय कीर्तनकार
ह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे

Atmyacha Prawas 1
Dehaci Mr̥tyupurva Avastha,
Marana Javal Alayavaraci Tayari.

The pre-death state of the body, preparation for approaching death.

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||

|| लेखांक पहिला ||

मनोगत

या पूर्वी अकरा लेख जरी झाले असले तरी अनेक वाचकांनी विचारलेल्या शंकांमुळे लिखानातील तृटी लक्षात आल्या आहेत. त्या तृटी पूर्ण करून पुन्हा प्रथम भागापासून ही लेख माला वाचकांच्या प्रचंड मागणी नुसार सुरू करित आहे.

वाचकांचा प्रचंड लाभलेला प्रतिसाद पाहुन खरोखरच लिखानाचे सार्थक झाले व मनस्वी आनंद झाला. वाचकांनी प्रथम भागापासून सुरू होणाऱ्या या मालिकेस उदंड प्रतिसाद द्यावा व ही दुर्मिळ माहीती अनेक समुहावर व वैयक्तिक प्रसारीत करावी हि विनंती.
आपला दासुनुदास
राष्ट्रीय कीर्तनकार
हभप. श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे

प्रथम या देहाची मृत्यू पूर्विची अवस्था काय असते ?

प्रथम या देहाची मृत्यू पूर्विची अवस्था काय असते व आपण काय करावे ते पाहु.
शरीर कृश झालेले असुन तोंडातील दात पडलेले आहेत,  

डोळ्यांनी दिसणे बंद होते,
कानाने ऐकू येणे बंद होते,
घशाची घरघर सुरू होते,
श्वास मंद होतो,
स्मृती नाहीशी होते,
वाचा बंद होते,

अशी लक्षणे दिसुन आली की मृत्यू समीप आला आहे असे समजावे.
अशा वेळेस मृत समयी त्याचे मन शांत असणे अत्यंत महत्वाचे असते.
मरण प्रसंगी मरणार्या व्यक्तिची अवस्था फार विचित्र असते,
केलेल्या कृतकर्माचा पश्चात्ताप होत असतो,
कळतनकळत केलेल्या पापांबद्दल दुःख होत असते,
संतती,  संपत्ती,  आप्त, गोत यांच्या बद्दल मोह निर्माण होतो व
मनाची चलबिचलता वाढते.  

त्यामुळे मनाची शांतता नाहीशी होते व एक प्रकारची चमत्कारिक अवस्था निर्माण होते.
अशा वेळेस पूर्व आयुष्यातील केलेली पापे डोळ्यासमोर चित्रपटा सारखी दिसु लागतात.
केलेले अपहार व
दुसऱ्याची केलेली फसगत डोळ्यासमोर दिसु लागते
व एकप्रकारचे भय निर्माण होते,
बोलता येत नाही,
तगमग तगमग अशी अवस्था निर्माण होते.
अशा वेळेस मनःशांतीची फार गरज असते. म्हणून सुखासमाधानाने मरण येण ही सुद्धा फार मोठी ईश्वरी कृपाच समजावी.
विनासायासेन मरणम् |

मरण जवळ आल्यावरची तयारी

घरातील माणसांनी जमीन गाईच्या शेणाने सारवावी,  ( जमीन नसेल तर फरशी स्वच्छ पुसुन घ्यावी )

त्यावर सुगंधी द्रव्य शिंपडावे,
घोंगडी किंवा लोकरीच्या आसनावर मरणार्या व्यक्तीस दक्षिणेकडे डोके करून, वर तोंड करून निजवावे.

तुळशीपत्र,  भस्म,  चंदनाचे गंध,  गंगाजल,  तुळशीतील माती इत्यादिने त्याचे शरीर सुशोभीत करावे.

पुत्राच्या मांडीवर त्याचे डोके ठेवावे.
देवासमोर समयी लावावी,
सुगंधी अगरबत्ती लावावी,
त्याच्या हाताचा स्पर्श करून अनेक प्रकारचे दान करावे.
घराची दारे खिडक्या उघडी ठेवावीत.
घरातील सर्वांनी रामरक्षा,  
पुरूष सूक्त,
रूद्रसूक्त,  
विष्णुसहस्रनाम,
भगवत् गीतेचा नववा,
बारावा व पंधरावा अध्याय म्हणावा.
वैखरीने श्रीराम जय राम जय जय राम जप करावा,  
घरातील वातावरण शांत व प्रसन्न ठेवावे जेणे करुन मृतकाला शांत मरण येईल.
पुढच्या गतीकरता हे सर्व अत्यंत गरजेचे आहे.
यंयंवापि स्मरणभावान त्यजंत्यंते कलेवरम् |
किंवा
अंते मति सा गति या न्यायाने
अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम् |
अशा शांत वातावरणात ईश्वराचे नामस्मरण ऐकता ऐकता मरण आले तर निश्चितच त्याला उत्तम गती प्राप्त होते.
प्राण गेल्यावर पुढे काय करावे पुढील लेखात पाहु.

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||
[ लेखांक दुसरा २ रा ]

कालच्या लेखात मृत्युची प्राथमिक अवस्था
या संदर्भातील माहीती आपण पाहीली पुढे :-

प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो,
पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे हा देह जमिनीवर पडतो.
यावेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडतात,  
या दहा प्राणांची नावे आहेत
१) प्राण,  
२) अपान,  
३) व्यान,  
४) उदान,  
५) समान,  
६) नाग,  
७) कूर्म,  
८) कृकुल,
 ९) देवदत्त,  
१०) धनंजय.

सगळ्यात शेवटी धनंजय वायु शरीरातुन बाहेर पडतो हा वायु देहाला अग्नी स्पर्श होई पर्यंत देहात असतो असे गरूड पुराणात सांगितले आहे.
नंतर आत्मा चार कोषासह सूक्ष्म देह धारण करुन बाहेर पडतो
तेंव्हा
या देहाला मरण येते.
आत्मा अजरामर आहे.
देहा भोवतीच हा आत्मा घुटमळत असतो,  
घरात रडारड सुरु होते,  
शेवटी स्मशानभूमित या देहावर अग्नी संस्कार करण्यासाठी न्यावे लागते ते कसे न्यावे तर,  
सर्व लोक जमा झाल्यावर शांततेणे व प्रसन्न वातावरणात प्रेत यात्रा काढावी.
प्रथम प्रेताला कोमट पाण्याने स्नान घालावे शरीर स्वच्छ करावे कारण ते अग्नीच्या मुखात द्यायचे असते.
आपल्या जीवनातला हा शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंतेष्टी म्हणतात.
अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ.

स्नान घालुन शरीर स्वच्छ कपड्याने पुसावे,  
शरीरास सुगंधी अत्तर लावावे,  
गळ्यात चंदनाची किंवा तुळशीची माळ घालावी,  
सपूर्ण शरीर शुभ्र वस्राने गुंडाळावे फक्त चेहरा व पाय उघडे ठेवावेत,  
उरलेले वस्त्र उत्तरीय वस्त्र म्हणून अग्नी देणाऱ्याने अग्नी संस्काराच्या वेळेस गळ्यात घालायचे असते.
याच वस्त्रात अश्मा बांधुन दहा दिवस घराबाहेर ठेवायचे असते,  
कारण याच अश्म्यावर जीवात्मा दहा दिवस बसलेला असतो.
हे उत्तरीय वस्त्र बाराव्या दिवसा पर्यंत क्रिया कर्म करताना वापरायचे असते,  
बारा दिवसा पर्यंत या उत्तरीय वस्त्राची गाठ सोडु नये.


प्रेताला ताटीवर सुतळीने घट्ट बांधावे,
प्रेतावर फुले व तुळशी वहाव्यात,  
गंगा ठेवावी. प्रेत चौघांनी खांद्यावरून न्यावे किंवा गाडीतून न्यावे.
सर्वात मोठ्या मुलाने किंवा धाकटयाने अग्नी शिंकाळ्यात घेवुन सर्वात पुढे चालावे,  
मागे वळुन पाहु नये,  
प्रेत व अग्नी याच्या मधुन कोणी जावु नये.
वृद्धास पुढे करून प्रेता मागे वृद्ध मंडळींनी चालावे

मागुन बाकीच्या मंडळींनी चालावे.
ज्यांना स्मशानात जाणे शक्य नसेल त्यांनी चार पावलेतरी प्रेताच्या मागुन चालावे.
हे सत्कर्म आहे.

अर्ध्या रस्त्यात गेल्यावर
किंवा
जिथे विसावा असतो तिथे जमिनीवर एक नाणे व सुपारी ठेवुन क्षणभर प्रेत खाली ठेवावे,  
पुढील खांदेकरांनी मागे यावे व मागच्यांनी पुढे जावे.
ज्यांच्या पत्नीला दिवस गेले असतील त्यांनी खांदा देवु नये.
स्मशानातील भूमी शेणाने प्रोक्षण करावी,  
दहन भूमीच्या वायव्य दिशेस अग्नी ठेवावा.
पाच हात लांब व तीन हात रूंद चिता रचावी.
व पुढील संस्कार करावेत.
ते संस्कार काय असतात पुढील लेखात,  पुढे काय होते उद्या पाहु :-

क्रमशः –

WARKARI ROJNISHI
वारकरी रोजनिशी
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
www.warkarirojnishi.in
www.96kulimaratha.com
96 कुली मराठा
९६ कुळी मराठा

आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *