औक्षण करणे किंवा ओवाळणे कसे करावे व काय फायदा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🔯औक्षण🔯
औक्षण करणे किंवा ओवाळणे, हा हिंदु धर्मात सांगितलेला छोटासा विधी आहे.
वाढदिवस, परदेशगमन, परीक्षेतील यश, युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची ही पद्धत आहे.

औक्षणाचा विधी कसा करावा आणि त्यामागील शास्त्र काय यांविषयी येथे सविस्तर जाणून घेऊया !
१. पाट ठेवून त्याभोवती रांगोळी काढावी. ज्याचे औक्षण करायचे त्याला (संस्कार्य व्यक्तीला) पाटावर बसवावे.

दिवाळीची संपूर्ण माहिती पाहा.

पाटाच्या भोवती रांगोळी काढणे
२. संस्कार्य व्यक्तीच्या कपाळावर मधल्या बोटाने खालून वर ओले कुंकू लावून त्यावर अक्षता लावाव्यात.


आज्ञाचक्राच्या जागी अक्षता लावण्यामागील शास्र
अक्षता आज्ञाचक्राच्या जागी लावल्याने नंतर ओवाळतांना तबकातील दिव्यातून प्रक्षेपित होणार्‍या गोलाकार, गतीमान रजोगुणी लहरी अक्षतांतील पृथ्वी अन् आप या तत्त्वांच्या कणांमुळे धरून ठेवल्या जातात आणि आवश्यकतेप्रमाणे जिवाच्या आज्ञाचक्रातून शरिरात प्रक्षेपित केल्या जातात. या वेळी रजोगुणी लहरींतील क्रियाऊर्जा न्यून झाल्याने त्यांचे रूपांतर सात्त्विक लहरींत होते. सात्त्विक लहरींची गती ही पहिल्याच्या तुलनेत अल्प असल्याने या लहरी शरिरात हळुवार संक्रमित होतात. त्यामुळे जिवाला मिळणारा सात्त्विकतेचा लाभ बराच काळ टिकतो अन् जिवाला याचा त्रासही होत नाही. –

३. निरांजनाचे तबक हातात घेऊन त्यातील अंगठी किंवा एखादा दागिना आणि सुपारी हातात घेऊन त्यांनी व्यक्तीच्या तोंडवळ्याभोवती पुढीलप्रमाणे ओवाळावे.

अंगठी आणि सुपारी यांनी ओवाळण्यामागील शास्त्र
————–s———————-

अंगठी आणि सुपारी या दोन्ही गोष्टी जिवाने हाती घेतलेल्या कार्याला पूरक, म्हणजेच कारक आहेत. औक्षण करण्यापूर्वी देवतेला शरण जाऊन प्रार्थना केल्याने तबकातील सर्वच घटक देवतांकडून येणार्‍या सात्त्विक लहरींनी भारित झालेले असतात. सोन्याची अंगठी ही सत्त्वगुणप्रधान असल्याने अंगठीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरी या सुपारीतून प्रक्षेपित होणार्‍या आपतत्त्वाच्या लहरींमुळे थोड्याफार प्रमाणात रजोगुणी, म्हणजेच प्रवाही बनतात. यामुळे अंगठीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचे रूपांतर जिवाला पेलवेल, अशा सगुण लहरींत होणे सोपे जाते. यामुळे जिवाला त्याच्या क्षमतेएवढे देवतेचे तत्त्व मिळण्यास साहाय्य होते. –

  • प्रथम व्यक्तीच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी एकाच वेळी अंगठी आणि सुपारी यांचा स्पर्श करावा.
  • अंगठी आणि सुपारी यांनी व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओवाळण्यास आरंभ करून डाव्या खांद्यापर्यंत यावे. मग असेच उलट दिशेने ओवाळून उजव्या खांद्यापर्यंत यावे. असे तीनदा करावे. प्रत्येक वेळी अंगठी आणि सुपारी यांचा स्पर्श तबकाला करावा.

अंगठी आणि सुपारी यांचा तबकाला स्पर्श करण्यामागील शास्त्र

औक्षण करतांना जिवाच्या ईश्वराप्रती असलेल्या भावामुळे ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी कार्यरत होतात आणि हातात धरलेल्या सोन्याच्या अंगठीकडे आकर्षिल्या जातात. अंगठीने ओवाळतांना अंगठीकडून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींचे रूपांतर रजोलहरींमध्ये होते आणि या लहरींचे दुसर्‍या जिवाच्या सभोवती संरक्षक-कवच निर्माण होते. त्यानंतर सात्त्विक लहरींनी भारित अंगठी ताम्हणाला टेकवली असता तिच्यातील लहरी तांब्याच्या ताम्हणात आकर्षिल्या जातात. ताम्हणातून या लहरी औक्षण करणार्‍या जिवाच्या शरिरात त्याच्या हातांद्वारे संक्रमित केल्या जातात. त्यामुळे औक्षण करणार्‍या आणि औक्षण करवून घेणार्‍या अशा दोन्ही जिवांना सात्त्विक लहरींचा लाभ मिळतो.’ *

  • श्री गुरुदेव दत्त *

दिवाळीची संपूर्ण माहिती पाहा.

आमचे महत्त्वाचे सण

खंडोबा संपूर्ण सूची, पूजा, व्रत, सण

चंपाषष्ठी, माहात्म्यव व्रत विधी, आरती संपूर्ण माहिती

चंपाषष्ठी उत्सव का साजरा करतात.? चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष…
कार्तिक, त्रयोदशी, दिवाळी-diwali, वैदिक-हिंदू संस्कृती, श्रीकृष्ण सर्व, सण

धनत्रयोदशी दिवाळी दिपावली

धनत्रयोदशी आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस…
कार्तिक, चतुर्दशी,, दिवाळी-diwali, वैदिक-हिंदू संस्कृती, श्रीकृष्ण सर्व, सण

नरक चतुर्दशी दिवाळी दिपावली

नरक चतुर्दशीतिथीइतिहासमहत्त्वसण साजरा करण्याची पद्धत नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ…
दिवाळी-diwali, द्वितीया,, वैदिक-हिंदू संस्कृती, सण

भाऊबीज दिपावली- दिवाळी

भाऊबीजभाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक…
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *