स्त्रियांचे सोळा शृंगार सोला भूषण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

STRIYANCHE 16 AOLA SHRUNGAR

सोळा भूषण शृंगार (स्त्रियांचे)- १
 पातिव्रत्य-हा जरताती पाटाव, 
२ संसार-व्यवहार-दक्षता-जरतारी चोळी, 
३ शिशु संगोपन चातुर्य-कमरपट्टा 
४ सासू सार्‍यांची सेवा-कर्णभूषणें, 


५ शुद्ध-अश्रमधर्म-सांगसंपादनत्व-हस्तभूषणें, 
६ निर्मल गृह व्यवस्थ, 
७ अतिथिसत्कार-मस्तकभूषन, 
८ लेखन वाचनादिकला-मोहनमाळ, 


९ ईश्वर आस्तिक्य-मंगळसूत्र, 
१० मृदु मंजुळ भाषण-मूदाराखडी, 
११ परिस्थितीनुरूप कालक्रमण-गोठ, 
१२ पतिसेवा परायणत्व-कुंकुमतिलम 


१३ दुःखितांस साह्म-बिजवरा, 
१४ अढल घैर्य-बुगडी, 
१५ संकटकाली वीरता-काप
आणि १६ स्वकुलधर्मामिमान-कंकण. 
या सोळा शृंगारांनीं युक्त असते ती जगद्वंद्य होते. 
(गृहिणी रत्नमाला. वर्ष १ अंक. १, १९३६)

सोळा शृंगार – 


(अ)
१ मज्जन,
२ चीर,
३ हार,
४ तिलक,


५ अंजन,
६ कुंडळ,
७ नासामौक्तिक,
८ केशपाशरचना,


९ कंचुक,
१० नूपुर,
११ सुगंध (अंगराग),
१२ कंकण,


१३ चरणराग (अलक्तक),
१४ मेखलारणन (क्षुद्रघंटिका),
१५ तांबूल आणि
१६ करदर्पण (आंगठयांत घालावयाचा एक अलंकारविशेष,

यावर आरसा बसविलेला असे त्यांत मुखो-लोकन करतां येत असे.)

आदौ मज्जनचीरहारतिलकं नेत्राज्जनं कुंडले
नासामौक्तिककेशपाशरचना सत्कंचुकं नूपुरौ ।
सौगन्धं करकङ्‌‍कणं चरणयो रागो रणन्मेखला
ताम्बूलं करदर्पणं चतुरता शृंगारकाः षोडश ।

(सु.) (कविवल्लभदेव-पंधरावें शतक.)

 
 (आ)
१ मज्जन,
२ वस्त्र, ३ आलक्तक,
४ केशपाश,


५ सौगंघ्य,
६ भूषण,
७ मुखसुत्रास,
८ कज्जल,


९ भाषण,
१० हास्य,
११ चातुर्य,
१२ चालन,
१३ पातिव्रत्य,
१४ गान,
१५ कटाक्ष व
१६ क्रीडा. (दुर्बोध श. कोष.);

(इ)
१ शौच,
२ उटणें,
३ स्नान,
४ वेणीफणी,


५ वस्त्र-आभूषणें,
६ काजळ.
७ अळत्याचा रंग,
८ देंतरंजन,


९ तांबूल,
१० वसंत,
११ अलंकार,
१२ सुगंध,


१३ पुष्ह्पहार,
१४ कुंकू,
१५ तिलक व
१६ हनुवटीवर गोंदणें, (तत्त्व-निज-विवेक)

संकलक : धनंजय महाराज मोरे 

           Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)
             EMAIL: more.dd819@gmail .com
आमचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लि करा

नारी महात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *