सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी १५१ ते १७५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , ,

151-1
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः॥1.17॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शंखान्दध्मुः पृथक् पृथक्॥1.18॥
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्॥1.19॥
भावार्थ :-
हे राजा ! महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टदुमनं तसेच विराट राजा, अजिंक्य असा सात्यकी ॥17॥
द्रुपद राजा आणि द्रौपदीचे पाच पुत्र, सुभद्रेचा महाशक्तिशाली पुत्र अभिमन्यू या सर्वांनी आपले वेगवेगळे शँख वाजविले. ॥18॥
त्या भयंकर अश्या तुंबळ ध्वनीने आकाश व पृथ्वी दणाणून गेली. त्यामुळे धृतराष्टराच्या पुत्राची हृदये विदीर्ण झाली. ॥19॥
तेथ भूपति होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक । हा काशीपति देख । महाबाहु ॥1-151॥
त्या पांडवसैन्यात द्रुपद राजा, द्रौपदीचे पाच पुत्र इत्यादी अनेक वीर, महाशक्तिशाली काशीराज होते. ॥151॥
152-1
तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु । धृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥1-152॥
त्याप्रमाणे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, पराजित न होणारा सात्यकी, नृपश्रेष्ठ दृष्टदुम, शिखंडी, ॥152॥
153-1
विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर । तिहीं नानाशंख निरंतर । आस्फुरिले ॥1-153॥
तसेच विराट आणि इतर जे जे सेनापती होते, त्यांनी आपापली शंख वाजविण्यास प्रारंभ केला. ॥153॥
154-1
तेणें महाघोषनिर्घातें । शेष कूर्म अवचितें । गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती ॥1-154॥
त्या शंखांचा महाध्वनी ऐकून शेष व कुर्मदेखील दचकून गेले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास ते प्रवृत्त झाले ॥154॥
155-1
तेथ तीन्ही लोक डळमळित । मेरु मांदार आंदोळित । समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ॥1-155॥
या महान नादामुळे सर्व त्रैलोक्य डलमळू लागले. मेरू व मांदार पर्वत पुढे-मागे हलू लागले आणि समुद्रातील पाण्याच्या लाटा कैलासापर्यंत उसळू लागल्या. ॥155॥

156-1
पृथ्वीतळ उलथों पहात । आकाश असे आसुडत । तेथ सडा होत । नक्षत्रांचा ॥1-156॥
पृथ्वी उलथू पाहत होती. आकाशाला मोठंमोठे धक्के बसत असल्याने नक्षत्रांचा सडा पडतो की काय, असे वाटू लागले. ॥156॥
157-1
सृष्टी गेली रे गेली । देवां मोकळवादी जाहली । ऐशी एक टाळी पिटली । सत्यलोकीं ॥1-157॥
सृष्टी गेली रे गेली, देव आता निराधार झाले, अशी सत्यलोकामध्ये एकच आरोळी उठली. ॥157॥
158-1
दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला । तैसा हाहाकारु जाहला । तिन्हीं लोकीं ॥1-158॥
दिवसाच सूर्य स्तब्ध झाला. प्रलयकाळाप्रमाणे तिन्ही लोकांत मोठा हाहा:कार झाला. ॥158॥
159-1
तें देखोनि आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु । मग लोपिला अद्‍भुतु । संभ्रमु तो ॥1-159॥
ही परिस्तिथी पाहून श्रीकृष्ण विस्मित झाले, कदाचित सर्व सृष्टीचा नाश होईल, हे जाणून त्यांनी विलक्षण ध्वनी शांत केला. ॥159॥
160-1
म्हणौनि विश्व सांवरलें । एर्‍हवीं युगांत होतें वोडवलें । जैं महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ॥160॥
त्यामुळे जग सावरले गेले; नाही तर श्रीकृष्णादिकांनी जेव्हां मोठे शंख वाजविले, त्याच वेळी महाप्रलंय होण्याची वेळ आली होती. ॥160॥

161-1
तो घोष तरी उपसंहरला । परी पडसाद होता राहिला । तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥161॥
तो महानाद शांत झाला; परंतु त्याचा प्रतिध्वनी जो मागे राहिला होता, त्यामुळे कौरव सैन्याची दाणादाण उडाली. ॥161॥
162-1
जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु । तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ॥162॥
सिहं हत्तीच्या कळपात गेला, तर त्यांच्या समुदायाचे विदारण करतो, त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरव सैनेची हृदये विदीर्ण झाली. ॥62॥
163-1
तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती । एकमेकांतें म्हणती । सावध रे सावध ॥163॥
तो प्रचंड प्रतिध्वनी ऐकून कौरवांनी उभ्या-उभ्याने धैर्य सोडले, तरी पण एकमेकांना सावध रे सावध असे म्हणू लागले. ॥63॥
164-1
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥1.20॥

भावार्थ :- धृतराष्टराचे पुत्र युद्धासाठी सज्ज झालेले पाहून एकमेकांवर शस्त्र चालविण्याचा प्रसंग प्राप्त झाला. त्या वेळी ज्याच्या ध्वजावरती मारुती आहे, अशा अर्जुनाने युद्धासाठी आपले धनुष्य हाती घेतले. ॥20॥
तेथ बळें प्रौढीपुरतें । महारथी वीर होते । तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥164॥
त्या रणांगणावर बलाढ्य व धैर्ययुक्त महावीर होते. त्यांनी धीर देऊन पुनः सैन्याला सावरले. ॥64॥
165-1
मग सरिसेपणें उठावले । दुणवटोनि उचलले । तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ॥165॥
त्यावेळी ते सैन्य युद्ध करण्यासाठी एकदम तयार झाले आणि दुप्पट आवेशाने क्षुब्ध झाले. त्यामुळे त्रैलोक्य देखील क्षुब्ध झालेले दिसून आले. ॥65॥

166-1
तेथ बाणवरी धर्नुधर । वर्षताती निरंतर । जैसे प्रळयांत जलधर । अनिवार कां ॥166॥
प्रलयकालाच्या वेळी ज्याप्रमाणे मेघ अखंड वर्षाव करीत असतात, त्याप्रमाणे धनुर्विद्येतील प्रवीण योद्धे बाणांचा अखंड वर्षाव करू लागतात. ॥66॥
167-1
ते देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मनें । मग संभ्रमें दिठी सेने । घालीतसे ॥167॥
हे दृश्य पाहून अर्जुनाच्या मनात संतोष झाला आणि त्याने उत्सुकतेने कौरवांच्या सैन्याकडे पहिले. ॥67॥
168-1
तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले । तंव लीलाधनुष्य उचललें । पंडुकुमरें ॥168॥
त्यावेळी युद्धासाठी सज्ज झालेले कौरव त्याला दिसले. अर्जुनाने सहज लीलेने आपले धनुष्य उचलले. ॥68॥
169-1
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच ।
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥1.21॥
यावदेतान्निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे॥1.22॥
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः॥1.23॥

भावार्थ :– हे राजा ! त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. ॥21॥
युद्ध करण्यासाठी उभे असलेल्यांचे मी निरीक्षण करतो आणि मला कोणाबरोबर युद्ध करायचे आहे, ते पाहतो. ॥
22॥दुर्बुद्धी असणाऱ्या दुर्योधनाला यश मिळावे, या हेतूने जे योद्धे आले आहेत, त्यांना मी पाहतो. ॥23॥
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथु पेलावा । नेऊनि मध्यें घालावा । दोहीं दळां ॥169॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, ” हे देवा ! रथ लवकर हाक आणि दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर ॥69॥
170-1
जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक । न्याहाळीन अशेख । झुंजते ते ॥170॥
येथे युद्धासाठी जे आलेले आहेत, त्या वीर सैनिकांना मी थोडा वेळ पाहणार आहे, तोपर्यँत तू रथ येथे उभा कर. ॥170॥

171-1
एथ आले असती आघवें । परी कवणेंसीं म्यां झुंजावें । हे रणीं लागे पहावें । म्हणौनियां ॥171॥
येथे सर्व आले आहेत; पण मी या रणांगणात कोणाबरोबर लढावे, याचा विचार करणे जरूर आहे. म्हणून (मी पाहतो) ॥171॥
172-1
बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव । वांटिवेवीण हांव । बांधिती झुंजीं ॥172॥
फार करून कौरव हे उतावळे व दुष्ट बुद्धीचे असून त्यांच्या राज्यात सुबत्ता असूनही ते निष्कारण युद्धाची हाव धरतात. ॥172॥
173-1
झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती । हें सांगोनि रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥173॥
हे लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे म्हणाला — ॥173॥
174-1
सञ्जय उवाच ।
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्॥1.24॥
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति॥1.25॥
तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितृनथ पितामहान् । आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा॥1.26॥
श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान्॥1.27॥

भावार्थ:- संजय म्हणाला, ” हे भरतकुलोत्पना धृतराष्ट्र, अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी (तो) उत्तम रथ थांबवून. ॥24॥
भीष्म,द्रोण आणि इतर सर्व राजे त्यांच्या समोर म्हणाला, “हे पार्था, जमलेल्या या कौरवाना पाहा. ॥25॥
त्या ठिकाणी जमलेली वडील माणसे, आजे, गुरू, मामा, बंधू, पुत्र, नातू, तसेच जिवलग मित्र,सासरे,स्नेही या सर्वांना दोन्ही सैन्यामध्ये अर्जुनाने पाहिले. पहिले. ॥26॥
येथे जमलेले आपले बांधवांच आहेत असे पाहून तो कुंतीपुत्र अत्यंत करुणेने व्याकुळ झाला आणि कष्टी होऊन असे म्हणाला, ॥27॥
आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव श्रीकृष्णें रथु पेलिला । दोही सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ॥174॥
हे राजा एका ! अर्जुन एवढे बोलला. इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्यांनी दोन्ही सैन्यामध्ये उभा केला. ॥74॥
175-1
जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख । पृथिवीपति आणिक । बहुत आहाती ॥175॥
ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण इत्यादी आदिकरून आप्तसंबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते, ॥75॥

, , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *