४३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ४३.

द्वारकेतुन श्रीकृष्ण,सुभद्रा अभिमन्युसह बरीचशी यादव मंडळी विराट नगरी विवाहास जमली.थाटामाटा त अभिमन्यु-उत्तरेचा विवाह पार पडला. पांडवांनी रितसर आपले राज्य परत करण्यासाठी दूत पाठविला असतां,दूता करवी दुर्योधनाने उलट निरोप पाठविला की,तेरा वर्षे पुर्ण होण्याआधीच तुम्ही प्रगट झाल्यामुळे,द्युतअटीनुसार परत १३ वर्षे वनवास पत्करा! असच कांही तरी घडेल हे श्रीकृष्ण जाणुन होताच.”सुष्टांचे संवर्धन,संरक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करण्याची वेळ समीप आली आहे,आतां युध्दाशिवाय पर्याय उरला नव्हता.


ऊपलव्य शहराबाहेर द्रुपदराजा आणि विरांटांच्या सैन्याने तळ दिला. तिथुनच सर्व राजांना सत्य हकिकत सांगुन मदतीसाठी पाचारण केले,इकडे दुर्योधनानेही पांडवांना नेस्तनाबुत करण्याचा चंग बांधुन युध्दाची तयारी केली.त्याने ही मदतीसाठी राजांना पाचारण केले. कौरवांविषयी मित्रभाव असणारे राजे कौरवांकडे ससैन्य व पांडवांशी स्नेहभाव आणि त्यांची बाजु न्याय्य आहे हे पटलेले राजे ससैन्य उपलव्याकडे निघाले.सारा भारत या युध्दाने व्यापुन गेला.सत्य आणि असत्य,धर्म आणि अधर्म असे या युध्दाला स्वरुप आले. पुढील विनाश टळण्याच्या दृष्टीने युधिष्ठीराने पांच गांवा ची मागणी दुर्योधनाकडे केली,पण उर्मट पणे दुर्योधनाने निरोप पाठवला की,सुई च्या अग्रावर मावेल एवढीही भूमी मिळणार नाही.कृष्णशिष्टाईही वाया गेली अखेर युध्द अटळ झाले.
श्रीकृष्णाची मदत घेण्यासाठी अर्जुन व दुर्योधन एकाचवेळी द्वारकेस पोहोचले. दुपारच्या भोजनोत्तर विश्रांती घेत कृष्ण झोपला होता.दुर्योधन आधी आंत जाऊन श्रीकृष्णाच्या उशागत बसला.अर्जुन नम्र पणे नंतर जाऊन त्याच्या पायथ्याशी उभा राहिला.कृष्णाला जाग आल्यावर, डोळे उघडताच प्रथम पायथ्याशी उभा असलेला अर्जुन दिसला.उठुन बसल्यावर


उशालगत बसलेला दुर्योधन दिसला.दोघां चा हेतू त्याने जाणला.हसुन त्यांचे स्वागत करीत अकस्मात येण्याचे कारण विचारल्यावर दुर्योधन म्हणाला,मी प्रथम आलो, रितीप्रमाणे प्रथम माझे कार्य व्हावे. श्रीकृष्ण हसुन म्हणाला, दुर्योधना तूं व्याही व अर्जुन मेव्हणा,दोघेही मला सारखेच आहात.आतां मी वृध्दत्वाकडे झुकलेला,माझ्याने शस्र धरवल्या जाणार नाही.एकाने माझे सारे सैन्य व दुसर्‍या कडे फक्त मी असेन,अर्जुन लहान असल्यामुळे मागण्याचा प्रथम हक्क त्याला आहे.बोल अर्जुना!काय पाहिजे तुला?मला फक्त तू. हवा कृष्णा!दुर्योधन खुश झाला.एकटा कृष्ण त्याला नकोच होता.त्यानंतर दुर्योधन बलरामाकडे गेला. पण बलराम म्हणाला,मी तटस्थ राहणार व तिर्थयात्रेला जाणार! यादववीर त्यांच्या मर्जीनुसार दोन्हीकडे वाटल्या गेले.सात अक्षौहिणी सैन्य पांडवांकडे व कौरवाकडे ११ अक्षौहिणी सैन्य जमा झाले.(एक अक्षौहिणी म्हणजे २१,८७० हत्ती,२१,८७० रथी,तिप्पट म्हणजे ६५,६१० घोडेस्वार व पांचपट म्हणजे १,०९,३५० पायदळ या हिशोबाने सरासरी तीन लाख मनुष्ये एका अक्षौहिणीत होतात)


सर्व तयारी झाल्यावर श्रीकृष्णाच्या आज्ञेने सर्व सैन्य कुरुक्षेत्रावर जमा झाले. दोन्हीकडील सैन्य परस्परांशी लढण्यास सिध्द झाली. अर्जुनाचा सारथी बनलेल्या कृष्णाला रणमैदानाच्या मधे रथ घ्यायला सांगीतला.अर्जुनाने दोन्ही सैन्याकडे दृष्टी टाकली तेव्हा त्याला आप्त,नातलग,गुरु दिसले.यांना वधावे का?गदगदल्या स्वरांत तो कृष्णाला म्हणाला,केशवा! या लाखो निरपराध वीरांना,पुज्य गुरु,प्रिय बंधु यांना ठार करुन राज्य मिळवलंतर काय कामाचं? अरे!त्रेलोक्याच्या राज्या साठी सुध्दा यांच्यावर शस्र चालवु शकणार नाही मग या एवढ्याशा कुरुराज्यासाठी कसे काय शस्र उचलु?आक्रोश करीत रथात शस्र टाकुन उद्वेगाने खाली बसला. अर्जुनाची अशी विषण्य अवस्था झालेली पाहुन,श्रीकृष्ण म्हणाला,अर्जुना! तुला हा दुबळेपणा शोभत नाही.

ज्या आजोबांच्या अंगाखांद्यावर खेळलो,ज्या द्रोणगुरुंनी स्वतःच्या पुत्रापेशा अस्रशस्र विद्येत निपुन केले,त्यांचेवर कसं शस्र चालवु?त्यापेक्षा आम्ही परत वनवास पत्करु! केशवा! तूं योग्य अयोग्य सारं जाणतोस.प्रत्यक्ष विष्णु आहेस.मी मनोभावे तुला शरण आलोय,मार्ग दाखव.श्रीकृष्णाने त्याला बराच ऊपदेश करुन शेवटी म्हणाला, पार्था, तूं युध्दात कामी आलास तर वीर गती मिळुन स्वर्गप्राप्ती होईल आणि विजयी झालास तर,पृथ्वीवरील राज्य भोगशील.अरे! सुख-दुःख,लाभ-हानी, जय-पराजय हे सारखच मानुन युध्दास तयार हो! तरी अर्जुनाचे मन स्थिर झाले नाही,चलबिचल थांबली नाही.मान खाली घालुन आपल्याच विचारांत गर्क होता.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *