संत सावता माळी महाराज समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत सावतामाळी म.अभंग गाथा डाऊनलोड करा.
संत सावतामाळी म. संपूर्ण चरित्र वाचा.

येथे संत श्री सावता माळी महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे अभंग

संत सावता महाराज माळी यांचा आज दिनांक २७ जुलै २०२२ रोज बुधवारला अर्थात आषाढ वद्य चतुर्दशी ला ७२७ वी पुण्यतिथीनिमित्त वारकरी रोजनिशी कडून कोटी कोटी दंडवत.

संत सावता महाराज माळी यांची पुण्यतिथी कशी साजरी करावी ?.
उत्तर
:- आधल्या दिवशी आपल्या माळी समाजातील आणि परिसरातील वारकरी बांधवाना तथा सर्व धार्मिक बांधवाना उद्याच्या होणाऱ्या संत सावता माळी महाराज पुण्यतिथी बद्दल माहितीसह आमंत्रण द्यावे. (त्यासाठी वेगळा गट स्थापन करण्याची गरज नाही, अगोदर जर गावात कुणी हि पुण्यतिथी साजरी करत असतील तर त्यांनाच मदत करावी व शक्य होईल तेव्हढे सहकार्य करावे). तसेच आपल्या गावातील ईतर धार्मिक मंडळे, (गणपती दुर्गादेवी. इत्यादी) तथा मंदिरे. संस्थाने यांना या कार्यक्रमाला तथा महाप्रसादाचे आयोजन असल्यास त्याला नक्की आमंत्रण द्यावे.

प्रत्यक्ष पुण्यतिथी दाखवा साजरी होणार असेल तर त्यादिवशी सकाळी लवकर उठून स्नान देवपूजा उरकून श्री संत सावता महाराजांची प्रतिमा उपलब्ध करावी व कार्यक्रम घरी असेल तर मोठ्या मोठ्या जागी उंचा वरती किंवा मंदिरांमध्ये जर असेल तर शक्य तेवढ्या ऊंचीवर नसता खुर्चीवर फोटो मांडून त्याला एक पुष्पहार अर्पण करावा तसेच श्री संत सावता महाराजांचे अभंग गाथा चे सामूहिक पारायण करावे.

त्यासाठी आदल्या दिवशीच परिसरातील गावातील सर्वांना याची कल्पना द्यावी व त्याची नोंद घ्यावी शक्य असल्यास संत सावता महाराजांच्या गाथा प्रतिचे वितरण करावे व पुण्यतिथीच्या निमित्ताने किर्तन अवश्य करावे,

कीर्तनकार उपलब्ध नसेल तर किमान त्यांच्याविषयी व्याख्यान प्रवचन किंवा संत सावता महाराज यांच्या बद्दल व त्यांच्या कार्याबद्दल माहिती संबंधित उपस्थित भाविकांना व्हावी याची काळजी कार्यक्रमाच्या आयोजकांनी घ्यावी.

तसेच किर्तन झाल्याच्या नंतर सामूहिक आरती करावी त्यामध्ये संत सावता महाराजांची आरती सुद्धा आवर्जून म्हणावी व नंतर महाप्रसादाचे वितरण करावे महाप्रसाद अर्थात भोजन नसल्यास उपवासाचा कोणताही एक पदार्थ जसे साखर राजगिरा इत्यादींचे वितरण करावे.

हा कार्यक्रम करताना कोणत्याही प्रकारची नशापाणी मांसाहार अजिबात करू नये मंदिरामध्ये कशी सूचना अगोदर जाहीरपणे द्यावी गावातून शोभायात्रा किंवा मिरवणूक काढावयाचे असल्यास त्या दरम्यान सुद्धा मद्यपान मांसाहार व कोणत्या प्रकारची नशा कार्यकर्त्यांनी केलेली नसावी याची आवर्जून नोंद घ्यावी,

हा एक धार्मिक कार्यक्रम असल्याने संत सावता महाराजांच्या या पुण्यतिथी चा उत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा करावा.

१.
धन्य ते अरण रत्नाची खाण| जन्मला निधान सांवता तो ||१ ||
सांवता सागर प्रेमाचे आगर | घेतला अवतार माळ्या घरी|| २ ||
धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता| साठविला दाता त्रेलोक्याचा|| ३ ||
नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला | वंश उद्धरिला माळीयाचा || ४ ||

टीप : खालील अभंग संपूर्ण म्हणून शेवटचे ६ वे चरण म्हणून संत सावता महाराज प्रतिमेवर (फोटोवर) गुलाल पुष्पवृष्टी करून पुंडलिक वर दे …..असा पारंपारिक गजर करून सावता महाराज कि जय असा उद्घोष करावा.

२.
उठोनी प्रातःकाळीं करूनियां स्नान । घालुनि आसन यथाविधी ॥ १ ॥
नवज्वरें देह जाहालासे संतप्त । परि मनीं आर्त विठोबाचें ॥ २ ॥
प्राणायाम करूनी कुंभक साधिला । वायु निरोधिला मूळ तत्त्वीं ॥ ३ ॥
शके बाराशें सत्रा शालिवाहन शक । मन्मथ नामक संवत्सर ॥ ४ ॥
ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी । आला उदयासी सहस्त्र कर ॥ ५ ॥
सावता पांडुरंगीं स्वरूपीं मीनला । देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥ ६ ॥

1.      कांदा, मुळा, भाजी

कांदा-मुळाभाजी । अवघीं विठाबाई माझी ॥१॥
लसुण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरीं ॥२॥
ऊस गाजर रताळू । अवघा झालासें गोपाळू ॥३॥
मोट नाडा विहींर दोरी । अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥
सावता ह्मणें केला मळा । विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥

2.      आमुचि माळियाची जात

आमुचि माळियाची जात । शेत लावू बागाईत ॥१॥
आम्हा हाती मोट नाडा । पाणी जाते फुलझाडा ॥२॥
चाफा, शेवंती फुलली । प्रेमे जाईजुई व्याली ॥३॥
सावताने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥४॥

संत सावतामाळी म.अभंग गाथा डाऊनलोड करा.

संत सावतामाळी म. संपूर्ण चरित्र वाचा.

वारकरी संत समाधी अभंग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *