रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा खुलासा राखी कधी बांधावी 2023

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Ashok Kaka Kulkarni: 🌹 राखी पौर्णिमा खुलासा 🌹
प्रश्न :राखी पौर्णिमा म्हणजे रक्षा बंधन उत्सव कधी करावा? भद्रा काळात राखी बांधावी का? भद्रा दोष असतो का?

वारकरी ✈ विमान यात्रा ✈ प्रस्तुती
केदारनाथ विमान यात्रा आयोजक
विमान यात्रा संपर्क
9422938199, 9823334438
आता बद्री-केदार करा विमानने
वारकरी ✈ विमान यात्रा ✈ प्रस्तुती
केदारनाथ विमान यात्रा आयोजक
विमान यात्रा संपर्क
9422938199, 9823334438
आता बद्री-केदार करा विमानने

🔸उत्तर : पूर्वी रक्षासूत्र बंधन होते.रक्षासूत्र बंधन हे राजा लढाईला जाण्यापूर्वी त्याच्या रक्षणासाठी हातात बांधण्याचे एक बंधन होते.रक्षासूत्र बंधन करण्याचे कर्म हे खूप मोठे आहे. त्यामध्ये मंत्रोपचार करून ते रक्षा सूत्र राजाच्या हातात बांधले जाई.पुढे काही पौराणिक कथेतून हा विधी बहिणीने भावाला बांधलेल्या रक्षा सूत्र म्हणजे राखी बांधणे म्हणजेच रक्षा बंधन स्वरूपात साजरा होऊ लागला.

🔸परंतु आजकाल कोणीही नवीन धर्मशास्त्र तयार करून राखी पौर्णिमा बद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत.ज्यायोगे हिंदू धर्मावर लोकांची श्रद्धा कमी होईल किंवा त्यांनी सण साजरे करू नयेत अशा पद्धतीने प्रत्येक सणापूर्वी असे विचित्र मेसेज प्रसार माध्यमातून पाठवले जातात.

🔸एकविसाव्या शतकातील राखी पौर्णिमा : आजकाल जी राखी पौर्णिमा साजरी केली जाते तो एक लौकिक विधी आहे. म्हणजे बहिणीने फक्त भावाच्या हाताला दोरा बांधण्याचा एक विधी आहे.त्यामध्ये राखी ही वैदिक स्वरूपात दिसत नाही आणि त्यावर कुठलेही मंत्र उपचार होत नाहीत किंवा कुठलाही विधी होत नाही . त्यामुळे त्याबद्दलचे भद्रा किंवा इतर कुठली मूहूर्त बघण्याची कोणतीही आवश्यकता नाही .

🔸मात्र वैदिक पद्धतीने समंत्रक रक्षा बंधन करताना मुहूर्त भद्रा इत्यादी चे पालन केले पाहिजे :- ज्यात वैदीक राखी म्हणजे दुर्वा,अक्षता, चंदन,पांढरी मोहरी,केशर यांची एकत्रित केलेली पुरचुंडी होय आणि त्याला दोन्ही बाजूने दोन सुताचे दोरक असतात.तिचे स्नेह पूर्वक पंचोपचार पूजन करून राखी बांधताना रक्षा बंधन चा मंत्र “येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वामबध्नामि रक्षे मा चल मा चल।।” हा मंत्र म्हणून भगिनी ने भावाला राखी बांधावी.आजकालच्या राखी प्लास्टिक,बीज,देवी देवतांचे फोटो आणि अशा बऱ्याच स्वरूपात वापरल्या जातात.त्यामुळे त्याच्या माध्यमातून रक्षा बंधन करतात मुहूर्त इत्यादी पाहण्याची आवश्यकता नाही.

🔸सर्वांनी आपले सण आनंदाने साजरे करावेत असेच धर्मशास्त्र सांगते .पण आजकाल हे व्हाट्सअप आल्यापासून खूप विचित्र मेसेज फॉरवर्ड होत आहेत. हे  सांगणारे आहेत ते कोणीही धर्मपंडित नाहीत,ते असेच कुठून तरी गोळा करून आपल्या माथ्यावर ते शास्त्र थोपवत आहेत .

🔸आपण सर्वसामान्य व्यक्तींनी याचा विचार केला पाहिजे की आपण सण का साजरे करत आहोत , त्यामागचा उद्देश काय आहे..आणि त्यानुसार आपण पूर्णपणे आनंदाने आपले सण साजरे करावेत.दिवसभरात सूर्योदया पासून सूर्यास्तापर्यंत राखी पौर्णिमा आपण साजरी करू शकतो. त्याबद्दल कुठलेही बंधन नाही आणि धर्मशास्त्रात असे कुठेही उल्लेख नाहीत हे मी माझ्या खात्रीने सांगू शकतो .
जय श्रीराम

लेखन सौजन्य: मा.श्री अशोककाका कुलकर्णी
(ज्येष्ठ धर्म शास्त्र अभ्यासक)
( हा मेसेज अमोलजी पाठक यांनी सुधारणा करून पाठवला आहे , धन्यवाद अमोलजी .)

🌹 राखी व नारळी पौर्णिमा 🌹 भाग १

श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला ‘रक्षाबंधन’ म्हणतात .

हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस ‘पवित्रारोपण’ असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.
काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात.
बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सन्मान हा सुद्धा या सनामधून दिलेला उपदेश होय.
‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:|
यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:|’ ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मान- सन्मान, सत्कार होतो, तेथे सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणी पासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न ह्या सनाद्वारे केला जातो.
“राखी’ ह्या शब्दातच “रक्षण कर’ – “राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.

राखी व नारळी पौर्णिमा 🌹 भाग २

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.
२ पौराणिक कथेनुसार, महाभारतात, जे एक महान भारतीय महाकाव्य आहे, पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा काठ फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे, भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले
या दिवशी सूर्योदयी स्नान करतात. उपाकर्म करून ऋषींचे तर्पण करतात अपराह्नकाळीं राखी तयार करतात. तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्याने रक्षा अर्थातच राखी तयार होते. मग तिची पूजा करतात. नंतर पुढील मंत्राने ती राखी मंत्री राजाला बांधे. –
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल: ।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ॥
(अर्थ- महाबली दानवेद्र बळी राजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे रक्षे, तू चलित होऊ नकोस.) यावरून मूळचे हे बंधन राजासाठी होते असे कळते.
या श्रावण पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती (नऊ धाग्यांची जुडी) करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.
श्रावण महिन्यात जानवी बदलण्याचा कार्यक्रम असतो. हा ऋग्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणांसाठी नागपंचमीच्या दिवशी अर्थात श्रावण शुद्ध पंचमीला, ऋग्वेदी, हिरण्यकेशी आणि तैत्तिरीय ब्राह्मणांसाठी वर्णषष्ठीच्या दिवशी अर्थात श्रावण शुद्ध षष्ठीला, किंवा सर्वसामान्य ब्राह्मणांसाठी श्रावण पौर्णिमेला होतो.
तमिळ पंचांगाप्रमाणे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी अवनी नावाचा तमिळ महिना चालू असतो, म्हणून या दिवसाला तमिळ पंचांग पाळणारे लोक अवनी अवित्तम म्हणतात. अवित्तम म्हणजे धनिष्ठा. दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो. जर पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मणांची श्रावणी असते. सामवेदी ब्राह्मणांची श्रावणी गणेश चतुर्थीला असते.

अशोककाका कुलकर्णी संकलित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *