सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ दुसरा ओवी २६ ते ५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , ,

26-2
तरी आतां काय जाहलें । कायि स्‍नेह उपनलें । हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥26॥
तर मग आताच (यांक्षणी) असे काय झाले, हा मोह कोठून उत्पन्न झाला, (हे मला काहीं कळत नाही) परंतू हे अर्जुना !! हे तू वाईट केलेस. ॥26॥
27-2
मोहो धरिलीया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥27॥
जर या प्रसंगी (युद्ध) तू चित्तामध्ये मोह ठेवलास, तर तुझी असणारी (आजपर्यँतची)प्रतिष्ठा नाहीशी होईल आणि इहलोकसह परलोकासही तू अंतरशील. (गमलवशील) ॥27॥
28-2
हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥28॥
युद्धप्रसंगी हा तुझा मनाचा दुबळेपणा (ढिलेपणा)तुझ्यासाठी हिताचे नाही. कारण, युद्धाच्या वेळी दुबळेपणा ठेवल्याने क्षत्रियांचे अधःपतन होते, हे लक्षात ठेव. ॥28॥
29-2
ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥29॥
अशाप्रकारे (परम कृपाळू) भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विविध प्रकारे समजावले.मग हे सर्व ऐकून अर्जुन पुढे म्हणाला. ॥29॥
अर्जुन उवाच ।
कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रति योत्स्यामि पूजार्हावरिसूदन॥2.4॥

भावार्थ ::-अर्जुन म्हणाला, ” हे मधुसूदना, पितामह भीष्मावर आणि गुरू द्रोणाचर्य यांच्यावर कसा बरा बाण सोडू? हे शत्रूनाशका, ते दोघेही पूजनीय आहेत. ॥4॥
30-2
देवा हें येतुलेवरी । बोलावे नलगे अवधारीं । आधीं तूंचि चित्ती विचारीं । संग्रामु हा ॥30॥
देवा ! ऐका, तू मला एवढे समजावून सांगतोस; पण आधी तूच विचार कर. हे युद्ध आहे का?? ॥30॥

31-2
हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हा ॥31॥
हे युद्ध नव्हे; मोठा अपराध आहे. हे करण्यास आम्ही तयार झालो,तर हा दोष आहे. एव्हडेच नाही; तर आम्ही उघड उघड आराध्यदेवतांचा उच्छेद करीत आहोत. ॥31॥
32-2
देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोष पावविजती । तियें पाठीं केवीं वधिजती । आपुला हातीं ॥32॥
पाहा, माता-पितांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे त्यांना संतुष्ट करावे आणि पुढे आपल्या हाताने त्यांचा वध कसा बरें करावा?? ॥32॥
33-2
देवा संतवृंदु नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे । हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ॥33॥
देवा ! साधूसंतांना नमस्कार करावे, शक्य असेल (घडलें) तर त्यांची पुजा करावी. पण हे न करता आपल्या वाचेने त्यांची निंदा कशी कराव?? ॥33॥
34-2
तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमांचे । मज बहुत भीष्मद्रोणांचे । वर्ततसे॥34॥
भीष्मादिक आमचे गोत्रज आणि द्रोणादी आमचे गुरू आहेत. ते आम्हला सदैव पुजनीय आहेत. पितामह भीष्म व गुरू द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे ! ॥34॥
35-2
जयालागीं मनें विरु । आम्ही स्वप्नींही न शको धरूं । तया प्रत्यक्ष केवीं । घातु देवा ॥35॥
हे देवा !! ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नात ही वैर धरू शकत नाही, तर मग त्यांचा आम्ही प्रत्येक्ष घात कसा बरें करावा?? ॥35॥

36-2
वर जळो हें जियालें । एथ आघवेयांसी हेंचि काय जाहले । जे यांचां वधीं अभ्यासिलें । मिरविजे आम्हीं ॥36॥
आज सर्वांना काय झाले? ज्यांच्या कडून आम्ही ज्या शस्त्रविद्देचा अभ्यास केला, त्याच विद्धेचा उपयोग त्यांचे वध करण्यासाठी करावा, आणि प्रतिष्ठा प्राप्त करावी. यांपेक्षा आग लागो या जगण्याला !! ॥36॥
37-2
मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला । तेणें उपकारें काय आभारैला । वधीं तयातें ॥37॥
मी अर्जुन, पण गुरू द्रोणाचार्यांनी मला (धनूर्विद्धेत निपूण) बनविले. या त्यांच्या उपकाराने मी (दडपलेला)भारभूत झालो आहे, तर त्यांचा वध मी करावा काय? ॥37॥
38-2
जेथींचिया कृपा लाभिजे वरु । तेथेंचि मने व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥38॥
अर्जुन म्हणाला ! ज्यांच्या कृपेने आम्हाला वर प्राप्त झाला, त्यांच्या विषयीच मनात पाप आणावे, असा प्रकारचा मी काय भस्मासूर आहे का?? ॥38॥
39-2
गुरूनहत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्॥2.5॥

भावार्थ :- महान परपूज्य गुरूंना न मारता यालोकी भिक्षा मागून जीवन जगणे (उदरनिर्वाह करणे) हे कल्याणकारी आहे.कारण गुरूजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेल्या अर्थरूप व कामरूप भोगांनाच भोगावे लागणार.
39-2
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे । परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥39॥
देवा, समुद्र गंभीर आहे असे (ऐकतो) म्हणतो. पण त्याचे गांभीर्य वरवरचे आहे.कारण अनेक वेळा तो क्षुब्ध(रागावतो) होतो. परंतु गुरू द्रोणाचार्यांच्या मनात राग निर्माण झालेले कधी माहित नाही. ॥39॥
40-2
हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान । परि अगाध भलें गहन । हृदय यांचे ॥40॥
हे आकाश अमर्याद आहे खरें, पण एखाद्या वेळी त्याचे मोजमापही येईल. परंतू द्रोणाचार्यांचे हृदय ज्ञानाने गहन (अंतःकरण इतके विचारपूर्ण)आणि सखोल आहे. त्यामुळे त्याचे मोजमाप करता येणार नाही. ॥40॥

41-2
वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे । परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥41॥
एकवेळ अमृत आंबेल (विटेल) किंवा वज्र ही फुटेल; पण द्रोणाचार्यांचे मनात क्रोधादि विकार उत्पन्न (निर्माण) करण्याचा कसालाही प्रयत्न केला तरी तरी त्यांचे हे (विशाल हृदय) मन धर्म (अविकारी होणार) सोडणार नाही.
42-2
स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये । परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥42॥
स्नेह,(ममता,प्रेम)हे आईनेच करावे असे म्हणतात, हे खरे आहे. पण गुरू द्रोणाचार्याच्या ठिकाणी (गुरू द्रोण हे) मूर्तिमंत ममता (प्रेम) आहे.
43-2
हा कारुण्याची आदि । सकळ गुणांचा निधि । विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥43॥
अर्जून म्हणाला ! गुरू द्रोणाचार्य हे जणू दयेचे(कारुण्याचे) उगमस्थान आहेत. सर्व सद्गूणांचे भांडार आहेत आणि विद्देचे अमर्याद सागर आहेत.
44-2
हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागी कृपावंतु । आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल ॥44॥
अशा प्रकारे ते (गुरू द्रोण) सर्व गुणांनी श्रेष्ठ असून, त्यांची आमच्या वर कृपा आहे !! तर मग देवा ! तूच सांग, त्यांचा घात करण्याचे विचार देखील माझ्या मनात आणता येईल का?
45-2
ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें । तें मना न ये आघवें । जीवितेंसीं ॥45॥
अशांना (द्रोणाचार्या सारख्या) रणांगणात मारून आपण राज्यसुख भोगावे. ही गोष्ट माझ्या मनात देखील येवू शकत नाही.

46-2
हें येणें मानें दुर्भर । जे याहीहुनि भोग सधर । ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥46॥
इतके हे कार्यकठीण आहे, आणि यापेक्षा राज्यभोग श्रेष्ट असेल, तर ते असू दे, मला तर त्या भोग सुखा पेक्षा भीक मागून जगणे बरें वाटते.
47-2
ना तरी देशत्यागें जाइजे । का गिरिकंदर सेविजे । परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥47॥
अथवा, देशत्याग करावा, डोंगर दर्यात जाऊन रहावे. पण यांचे (द्रोणाचार्य आणि इतर) घात (वध) करण्यासाठी शस्त्रे हाती धरू नये.
48-2
देवा नवनिशतीं शरीं । वावरोनि यांचां जिव्हारीं । भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥48॥
देवा ! नविन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानी प्रहार करून, यांच्या रक्तात बुडालेले ते भोग आम्ही भोगवेत, हे योग्य नाही.
49-2
ते काढूनि काय कीजती । लिप्त केवीं सेविजती । मज न ये हे उपपत्ति । याचिलागीं ॥49॥
ते प्राप्त करून तरी काय उपयोग आहे? रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे उपभोग तरी कसा घ्यायचा? यांकरिता युद्ध करण्याचा तुमचा युक्तिवाद पसंद नाही.
50-2
ऐसे अर्जुन तिये अवससरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं । परि ते मना न येचि मुरारी । आइकोनियां ॥50॥
(याप्रकारे बोलून झाल्या नंतर)
” हे कृष्ण ऎक ” असे अर्जुन म्हणाला, परन्तु एव्हडे सगळे सांगून सुद्धा आपले बोलणे श्रीकृष्णास पटत नाही, हे त्याने (अर्जुनाने) जाणले

, , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *