वारकरी वार्ता:

✔👇 हे ईतरांना पाठवा 👇

महत्वाचे App-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.

ll दु:खद निधन ll
वै. डॉ.रामराव महाराज श्रीक्षेत्र पोहरादेवी
बंजारा समाजाची काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी जि.वाशिम येथील सर्वस्वी डॉ.रामराव महाराज यांना
वारकरी-रोजनिशी कडून
||भावपुर्ण श्रद्धांजली ||

ll दु:खद निधन ll
वै. कृष्णराव रंधवे (गुरुजी)
माउलींचे वंश परंपरागत चोपदार
वारकरी-रोजनिशी कडून
||भावपुर्ण श्रद्धांजली ||
दिनांक १६ ऑक्टोबर २०२०..
रामकृष्ण हरी 😪😪😪
आज पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या माउलींचे (संत ज्ञानेश्वर महाराज) वंश परंपरागत चोपदार रंधवे गुरुजी यांचे वार्धक्याने निधन झाले.

रंधवे गुरुजी यांनी आपल्या घराण्यात प्राप्त झालेली चोपदार कि मोठ्या प्रेमाने, आनंदाने, आणि मेहनतीने, त्यांनी पार पाडली आहे,
माऊलींच्या सोहळ्यामध्ये चिखल असो, पाणी असो, ऊन असो, रिंगणा मधली प्रचंड असणाऱ्या ठिकाणी वारकऱ्यांच्या भावना असो, त्यांनी कधी आपल्या कर्तव्यात कसर ठेवली नाही.
माऊलींच्या पालखी सोहळा रिंगणात माउलीच्या अश्वाला (घोड्याला) रिंगणात नेण्याचा हा बहुमान गुरुजींच्या वाट्याला आला. आणि त्यांनीही तो तेवढ्याच प्रेमाने जोपासला.
यांच्या कालखंडामध्ये माऊलींचा सोहळा हा प्रचंड वेगाने वाढत गेला पर्यायान सोहळ्यामध्ये सर्वात जास्ती जबाबदारीही चोपदार असते अनेक दिंड्यांची शिस्त लावणे, असो नवीन त्यांच्या नोंदणी असो, फडकर्‍यांचे, वारकऱ्यांची दिंडी चालकांची सुखाचे दुःखाचे प्रसंग असो, वेळोवेळी गुरुजींनी त्याला आपलीच जबाबदारी मानून कुठल्याही परिणामाची तमा न बाळगता माउलींची सेवा त्यांनी शेवट पर्यंत केली.
त्यांच्या पश्चात त्यांची दोन्ही मुलं अर्थात राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ तथा समस्त रंधवे परिवार यांच्यावर आज हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे……
माऊली त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच || वारकरी रोजनिशी || कडून श्रद्धांजली….
🙏🙏🙏🙏माउलींचे चोपदार वै. कृष्णराव रंधवे गुरुजीना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली


ll दु:खद निधन ll
श्रीमती यमुनाताई तात्यासाहेब वासकर (ताईसाहेब)
वारकरी-रोजनिशी कडून
||भावपुर्ण श्रद्धांजली ||

ll दु:खद निधन ll
💐💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
वैकुंठवासी. गुरुवर्य तात्यासाहेब बा. वासकर (आबासाहेब) महाराज यांच्या पत्नी श्रीमती यमुनाताई तात्यासाहेब वासकर (ताईसाहेब) यांचे वयाच्या ९० व्या वर्षी मुक्काम वाशी जिल्हा. उस्मानाबाद येथे शनिवार दिनांक १०/१०/२०२० रोजी रात्री १०च्या सुमारास वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास सद्गगती प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली…
सूचना – सर्वांना एक नम्र विनंती सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे कोणीही समक्ष भेटण्यासाठी येवू नये अथवा मोबाइल वरून फोन न करता आपण असाल तेथूनच श्रद्धांजली अर्पण करावी ही विनंती !!

प्रथम पुण्यस्मरण
वै.रामचंद्र बाबा भोदे
वारकरी-रोजनिशी कडून
|| कोटी कोटी अभिवादन ||
आज दि.3-10-20 अ.आश्विन कृष्ण द्वितीया शनिवार प.पू.वै.ह.भ.प.भजन प्रेमी भोदे बाबा ( रामचंद्र बाबा भोदे ) यांचे प्रथम पुण्यस्मरण श्रद्धेय बाबांनी आपल्या जीवनामध्ये भजन, नामस्मरण याशिवाय दुसरे काही केलेच नाही ( तुकाम्हणे येथे भजन प्रमाण ) तुकोबारायांचा गाथा हे त्यांचे जीवन होते बाबांकडे केव्हाही पहा त्यांचे पुढे गाथा आहेच अलीकडच्या काळात स्वा.सु.नि.सद्गुरु जोग महाराजांची निष्काम व विशुद्ध परंपरा चालविणारे ते खर्या अर्थाने वारसदार होते त्यांनी कधी कीर्तन- प्रवचन केले नाही पण आपल्या सानिध्यात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना बाबांनी

आपल्या आचरणाने साधक बनविले ( अभेदभक्ती वैराग्य ज्ञान । स्वये आचरोनि आपण । देखी लावावे
इतर जन । लोकसंग्रह जाण या नाव ॥
) वै. परम श्रद्धेय भोदे बाबा हे माउली चरणी विलीन होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले त्या निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी अभिवादन

बाबांचा 58 वर्षाचा सांगाती – बन्सी दा. उबाळे

विदर्भातील वारकऱ्यांचे काय ?…..
गणेश महाराज शेटे

विदर्भके वारकरीयों क्या ?…..
गणेश महाराज शेटे

देहावसान
वारकरी-रोजनिशी कडून
||श्रद्धांजली||

लोणी श्री सखाराम महाराज संस्थान चे मठाधिपती श्री नाना महाराज यांचे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻🙏🏻💐💐 .
नियतीपुढे कोणाचे काही चालत नाहीं
ईश्वरी इच्छा
बलियेसि

💐💐🙏 त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्राप्त होऊ हीच विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐🙏🙏🙏

देहावसान
वारकरी-रोजनिशी कडून
||श्रद्धांजली||

हरिभक्त परायण, भागवताचार्य, मुख्याध्यापक, धुरंदर राजकारणी, देशाभिमानी, सावरकर भक्त, प्रखर हिंदुत्ववादी ,महाराष्ट्राचे सर्वात लाडके वक्ते श्री वासुदेव नारायण उत्पात तथा वा ना उत्पात गेले पंधरा दिवसापासून दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आज चार वाजता यांचे दुःखद निधन झाले आपल्या ग्रुप वर श्रीमद् भागवत कथा रूक्मिणी स्वयंवर, राम कथा, त्यांच्या सुरस आवाजामध्ये आपण श्रवण केलेल्या आहेत त्याच प्रमाणे त्यांचे सावरकरांच्या वरील व्याख्याने, मातृ महिमा इत्यादी व्याख्याने प्रसिद्ध आहेत पंढरपुरातील ब्राह्मण समाजाचा बुलंद आवाज होते नियतीपुढे कोणाचे काही चालत नाहीं
ईश्वरी इच्छा
बलियेसि
💐💐🙏 त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्राप्त होऊ हीच विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐🙏🙏🙏

देहावसान
वारकरी-रोजनिशी कडून
||श्रद्धांजली||

वारकरी संप्रदायावर शोककळा!
रामदास जाधव कैकाडी महाराजांचं कोरोनामुळे निधन
{वारकरी रोजनिशी कडून भावपूर्ण श्रद्धांजली}

रामदास महाराज जाधव ( कैकाडी) हे मूळ अहमदनगर येथील होते. वारकरी संप्रदायात त्यांना मानाचं स्थान होतं. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

रामदास महाराज हे कैकाडी महाराजांचे पुतणे होतं. तेच कैकाडी मठाचं व्यवस्थापन पाहत होते. विशेष म्हणजे रामदास महाराज मठाची जन्मकथा व तिचा उद्देश प्रभावीपणे सांगतय मठात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे होत असतात.

कैकाडी महाराजांचा मठ परंपरेला अपवाद…

कुठल्याही एका देवाची अथवा महाराजांची प्रामुख्याने उपासना करणारे मठ असतात. मात्र, पंढरपूर येथील कैकाडी महाराजांचा मठ त्या परंपरेला अपवाद आहे. कैकाडी महाराजांनी अनेक वर्षे जमिनीला पाठ न लावता ध्यानसाधना केली. त्यानंतर जेव्हा त्यांचा भक्तगण वाढू लागला आणि गुरूंना काय देऊ असे विचारू लागला होता. तेव्हा त्यांनी भक्तांना नामजप लेखन देण्याचा आग्रह केला. त्यातही विशिष्ट नाम असा आग्रह नव्हता. त्यांनी ज्याचे जे उपासना दैवत त्याचे नाम त्याने लिहावे व तो जपसंग्रह महाराजांना द्यावा, असं सुचवलं. अशा प्रकारे, सहस्र कोटी नामजप त्यांच्याकडे संकलित झाला, असं सांगितलं जातं.

ह.भ.प.ह भ प गुरुवर्य
लक्ष्मीनारायणजी दायमा महाराज
(श्याम सुंदर गोरक्षण संस्था पारस अध्यक्ष व विश्व हिंदू परिषद चे सदस्य)
यांना
वारकरी-रोजनिशी कडून
भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली

दुःखद बातमी
ह भ प गुरुवर्य लक्ष्मीनारायणजी दायमा महाराज (श्याम सुंदर गोरक्षण संस्था पारस अध्यक्ष व विश्व हिंदू परिषद चे सदस्य) आज अकोला येथे रुग्णालयामध्ये अल्पशा आजाराने महाराजांना देवाज्ञा झालेली आहे
श्री दायमा महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातील एक वाघच म्हणायला काय हरकत नाही आयुष्यभर महाराजांनी गौ सेवा केली आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरिता भागवत कीर्तनाच्या माध्यमातून रात्रंदिवस आपला देह चंदनासारखा झिजवला महाराजांची भाषण शैली अतिशय उत्कृष्ट आणि निर्भीड पद्धतीची होती श्याम सुंदर गोरक्षण संस्थांमध्ये वारकरी शिक्षण संस्थेचे सुद्धा नियोजन केलेले असून गोरगरिबांचे मुले पारस येथील गौ शाळेमध्ये वारकरी शिक्षण व शालेय शिक्षण घेत होते
आज महाराज गेल्याने वारकरी संप्रदाय मधील कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे आणि महाराजांच्या भक्त मंडळींवर दुःखाचे फार मोठे डोंगर कोसळले आहे अशा गौ सेवक संत महात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐

शोकाकुल
गुरुवर्य प्रेमनाथ महाराज,अरुण महाराज लांडे,
गणेश महाराज शेटे,
रमेश महाराज इस्तापे,
शिवहरी महाराज इस्तापे,
भगवान भाऊ मेटांगे ,
समस्त पारस वारकरी संप्रदाय भजनी मंडळी,
पंचक्रोशीतील भाविक, व सर्व वारकरी संप्रदाय मधील साधक मंडळी👏

देहावसान
ह.भ.प.रामकृष्णाभाऊ चुकेकर
यांना
वारकरी-रोजनिशी कडून
भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली
गुरुवर्य अमृत महाराज नरखेडकर यांचे मृंदगवादक रामकृष्ण भाऊ चुकेकर यांचे आज देहावसान झाल्याचे समजले.फारच धक्का बसला वारकरी संप्रदायात एक जुने जाणते मृदंगवादक म्हणुण ते पूर्ण महाराष्ट्रात परिचित होते.जुन्या काळातील एक तयार वारकरी भजनी माणुस.पहिले आळंदी वा कुठे शिकुन विद्यार्थी आलेले नव्हते त्या काळात विशेषतः विदर्भातील सर्वांत जुने मृंदगवादक.
गु.रामकृष्ण महाराज नागपुरकर,गु.भाऊसाहेब महाराज वरोलीकर,यांच्या सहवासात तयार झालेले व्यक्तिमत्व.आणी विशेष म्हणजे गु.अमृत महाराज यांच्यासोबत सावलीसारखे ते राहिले.सेवा करत करत किर्तनात मृदंगाच्या साथीने रंग भरला.
अमृत महाराज गेल्यानंतर आमच्या नागपूर येथील जोशी महाराज यांच्या कथेला आतापर्यंत सुंदर तबला साथ दिली.वारकरी संप्रदायातील मोठी मोठी किर्तनकार,गायक वादक त्यांच्या वर खूप प्रेम करत होते.
सर्वांना हवेहवेसे वाटणारे, सतत हसतमुख राहणारे,सतत हास्यविनोद करत सर्वांना प्रसन्न ठेवणारे रामकृष्णा भाऊ आज गेले यावर खरच विश्वास बसत नाही.
माझ्यावरही त्यांचे खुप प्रेम होते, खुप आदर द्यायचे मला.मागच्या वर्षी त्यांचे वडिलांच्या तेरवीच्या किर्तनाकरिता त्यांनी मला विनंती केली महाराज माझ्या गरिबांच्या बापाचे तेरवीचे किर्तन करुन द्या. मी म्हटले फक्त तारिख सांगा, किर्तन झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आलेले समाधान आज माझ्या डोळ्यासमोर उभे राहत आहे.माझ्या बरेच किर्तनात त्यांनी मृंदगसाथ केली.
दोन वर्षांपूर्वी अमृतबुवाजीच्या पुण्यतिथी निमित्त नरखेडला माझे किर्तन होते ते गाडीत माझ्या सोबत आले.परत येताना म्हणाले होते अमृतबुवा असते आणी त्यांनी तुमचे किर्तन ऐकले असते तर त्यांनी तुमच्या पाठिवर शाबासकी दिली असती खुप आर्शिवाद दिले असते.
खुप चांगले व्यक्तिमत्व,किर्तनात केवळ किर्तनकाराला साथ करने उगीच आपले कलाप्रदर्शन नाही.मृदंग आणी तबला प्रचंड अनुभव असुनही सर्वासोबत मोकळे राहणारे रामकृष्णा भाऊ यांची आम्हा सर्व वारकरी किर्तनकार गायक वादक गोतावळ्यास खुप आठवण येत राहील आणी तुमची उणीव भरून निघणार नाही.
आज अमृत महाराज वैकुंठात थोडे प्रसन्न होतील की मला भजनाला साथ करण्यासाठी माझा रामकृष्णा आला😔😔
भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली 🙏🙏💐💐💐

विशाल महाराज बडे बोरी चंद्रशेखर जिल्हा यवतमाळ

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या

तालुका अध्यक्षपदी ह.भ.प.राम महाराज सोमटकर

ह.भ.प. राम महाराज सोमटकर
अखिल भारतीय वारकरी मंडळ
मालेगाव तालुका अध्यक्ष

मालेगाव : अखिल भारतीय वारकरी मंडळाचे वाशिम जिल्हाअध्यक्ष ह.भ.प.सुनिल महाराज घायाळ व अमरावती विभागीय अध्यक्ष (विदर्भ) ह.भ.प.पंकज महाराज पवार या दोघांच्या शिफारशीनुसार अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज डिकसळकर यांनी अ.भा.वा.मंडळाच्या नियम व नियमावलीचे आधीन राहून मंडळाचे कार्य करण्याची इच्छा असलेले ह.भ.प. राम महाराज सोमटकर यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या मालेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची पुढील तीन वर्षांकरिता अथवा राष्ट्रीय अध्यक्षांचे पुढील आदेशापर्यंत या दोन्ही पैकी जे अगोदर घडेल तेव्हड्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती बदल अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने त्यांचे कौतुक केले जात आहे तर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

✔👇 हे ईतरांना पाठवा 👇