About

✔👇 हे ईतरांना पाठवा 👇

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.

संस्थापक

“DVM-ANDRO-LAB”

ह्या सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक आणि प्रमुख आहेत.

धनंजय-महाराज-मोरे ह्यांचा जन्म एका निष्ठावंत वारकरी घराण्यात झाला. ईयत्ता ८ व्या वर्गात असतांना वै. सोपान काका टाले यांच्या मार्गदर्शनाखाली १९८७ मध्ये कार्तिक वारी दरम्यान वै. विठ्ठल बाबा देशमुख (वडगांव रोड आळंदी देवाची) यांच्या कडे पाठविले. तेथे वै. विठ्ठल बाबा देशमुख यांच्याकडे बाबांच्या निगराणीखाली वै. पांडुरंग बोवा वैद्य यांच्याकडे १९९१ पर्यंत मृदंग वाद्याकाम शिक्षण पूर्ण केले.

याच दरम्यान वै. विठ्ठल बाबा देशमुख यांच्या सोबत बद्रीनाथ धाम, केदारनाथ, हरिद्वार, हृषिकेश, द्वारका धाम, गिरनार, सोरटी सोमनाथ, जगन्नाथपुरी धाम, रामेश्वर धाम, पाताळगंगा, आदी बारा ज्योतिर्लिंग, सप्त पुरी, असे भारत दर्शनाचा लाभ मिळाला.

१९९२ ला स्वा:नंद सुख निवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था येथे अधिकृत शिक्षण चालु झाले. आणि ह्याच काळात भारतात संगणकाचे वारे वाहू लागले, १९९३ ला स्वा:नंद सुख निवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा “अमृत महोत्सव” पार पडला. अश्या या वारकरी वातावरणात “संत साहित्यविषयक” आवड निर्माण झाली, वै. विठ्ठल बाबा देशमुख यांच्या जवळ भले मोठ्ठे कपाट अनेक धार्मिक ग्रंथाने भरलेले होते, त्या ग्रंथाचे वाचन होत होते. याच दरम्यान घरगुती कारणाने १९९६ मूळ गांवी बोलावणे आले, आणि आळंदीतील मुक्काम गावी हलवावा लागला प्रारब्ध योगानुसार पुढे आणि १९९७ विवाह झाला.

गावाकडे वास्तव्याला असतांना मृदंग वादन, प्रवचन, कीर्तनकाराच्या गैरहजरी मधील किर्तने, सुरु झाले. वै. विठ्ठल बाबा देशमुख यांच्या जवळ आळंदीला असतांना त्यांच्या श्रीमद् भागवत महापुराण कथेत अतिशय जवळून सहभागी होण्याचा योग अनेक कथेत आणि अनेक वेळा आला.

म्हणून गावाकडे श्रीमद् भागवतमहापुराण कथा करणे सुरु झाले. कथा, किर्तने करत असतांना जाणवले की आपले शालेय शिक्षण तोकडे पडते.

मन स्वस्थ बसू देत नव्हते, पुढील शिक्षणाची तळमळ, प्रचंड वाचनाचीआवड, यातूनच पुढे पुढील शिक्षणाचा मार्गाचा शोध लागला.

बघता बघता 2003 उजाडले “बीए फर्स्ट” {B.A.} इयरला “यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक” यांच्याकडे रीतसर प्रवेश घेतला.

याच दरम्यान 2003 ला प्रथम “p-4” संगणक घरी आणला आणि तेव्हापासून संगणकासोबत नाना प्रकारचे प्रयोग सुरू झाले.
या काळात अँड्रॉइड नावाचा शब्दही अस्तित्वात नव्हता,

नोकिया फोन मध्ये अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर येत असत, असेच सॉफ्टवेअर आपण आपल्या वारकरी संतांचे बनवावेत. सर्वांपर्यंत संत साहित्य पोहोचवावे असा माणस तयार झाला.

आणि त्यातूनच “संत साहित्या आणि तंत्रज्ञान” असे दोन दुवे जर एकत्र आले तर नक्कीच फायदा होईल.
या प्रवासात म्हणजे आत्तापर्यंतच्या गेलेल्या कालखंडातून निश्चित असे एक ध्येय उभे राहिले.
हा कालखंड इंटरनेटच्या गतीच्या तुलनेत फारच मागे होता 2G शिवाय इतर कोणतेही जनरेशन भारतामध्ये अस्तित्वात नव्हते, आणि त्यात 2G सुद्धा मोजक्या गावां मध्ये उपलब्ध होते त्यातून माझ्या मूळ गावी म्हणजे “मांगवाडी तालुका रिसोड जिल्हा वाशिम” या गावात 2018 पर्यंत 2G ची सुद्धा रेंज नव्हती.
(2018 ला JIO 4G गावात्त आले.)

आणि मग पुढील प्रवास सुरू झाला एकीकडे पदवीचा अभ्यास, सोबतच भागवत आणि किर्तने, सात दिवस बाहेरगावी मृदंग वाजवणे त्या निमित्ताने सततचा प्रवास सोबत वैवाहिक जबाबदाऱ्या अशा सगळ्या गुंतणुकीत मनातील ध्येय सतत हुलकावणी देत होते.
काळ काही थांबत नव्हता. काळ पुढे गेला आणि तीन वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून द्वितीय श्रेणीमध्ये पदवी {B.A.} संपादन केली,
पदवीदान समारंभ नाशिकमध्ये पदवी तेथे मिळणार म्हणून नाशिकला जाव लागल. तेथे महान गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या हस्ते पदवी दान समारंभ पार पडला.

नाशिकला नाशिक शहराविषयी माहिती इंटरनेटवर शोधात असतांना एक बातमी………


अजून काही तरी पुढे करायलाच पाहिजे, म्हणून रिकाम्या वेळेत संगणकाचे नाना प्रयोग करण्यात येऊ लागले मुळातच वाचनाची आवड “वैकुंठवासी विठ्ठल बाबा देशमुख वडगांव रोड आळंदी” यांच्याकडे {१९८९ ते १९९६ { पर्यंत राहत असतांना त्यांच्या कडे असलेल्या आणि आळंदीला स्टेट बँकेजवळ (हरिपाठ मंदिर) येथे एक ग्रंथ विक्रेते आपले रस्त्यावर दुकान लावून बसत असत त्यांच्याकडे जावून नवीन ग्रंथ आणि ईतर अवांतर ग्रंथ विनामुल्य वाचावयास मिळत असत. )

असे अनेक ग्रंथांचे वाचन आळंदीत असतांना झालेले असल्याने आणि आत्ता कार्यक्रम करताना अनेक नवीन विषयाची अभ्यासाची गरज भासू लागली सोबत ग्रंथ घेऊन फिरणं अत्यंत जिकिरीचं काम होतं. नोकियाच्या फोन मध्ये मराठी (देवनागरी) काम करत नव्हती. त्या मुळे सर्व भजनी मालिका इंग्रजीत टाईप केली, पण इतरांना ती फार उपयोगाची नव्हती.

आणि यामुळेच मनातल्या निश्चयाला अजून पाठबळ मिळाल की आता आपणच काही तरी करायला पाहिजे आणि त्यातूनच “DVM-ANDRO-LAB” चा जन्म झाला.

याच काल खंडात मराठी लिहिण्यासाठी “श्री लिपी” “बराहा” या सारखे मोजकेच सॉफ्टवेअर वापरावे लागत. ते सर्व सॉफ्टवेअर सर्व संगणकावर चालत नसत. त्यात गावात १२ तास लोड शेडींग ईतर व्यवस्था नाही इंटरनेट तर नाहीच नाही.
लाईन अखंड नाही सारखी ये जा सुरु अनेक वेळा संगणक जाळला. (पॉवर box-SMPS)

s age or add another page.वै. विठ्ठल बाबा देशमुख

✔👇 हे ईतरांना पाठवा 👇