भाग २ गरुड पुराण ५ गोष्टी कुणालाच सांगू नका १० कामे करू नका.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यंचे वाहन गरुडाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचा संग्रह आहे. यात भगवान विष्णूंनी मुख्य चार गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या कधीच कोणालाच सांगू नयेत, अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होऊन हानी होते. त्या चार गोष्टी कोणत्या आहेत ते काळजीने वाचा.

आणि १० कृत्य करणे म्हणजे पाप होते हे भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितले.
हिंदू धर्मातील मुख्य पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणाने मानवी जीवन हे भोगासाठी नसून ते जीवन योग्य रीतीने जगण्यासाठी अनेक शिकवणी दिलेल्या आहेत. गरुड पुराणात ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या स्वतः भगवान विष्णूंनी सांगितल्या आहेत. गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांच्या वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन आहे.

गरुड पुराण सांगते या गोष्टी दुसऱ्याला मुळीच सांगू नये, नसता तोटा होईल.

१. ​​धन-संपत्तीच्या बद्दल कधीही दुसऱ्याला सांगू नका
मित्रांनो, गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जर तुम्हाला जास्त धन लाभ किंवा जास्त हानी-नुकसान होत असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाच सांगू नये. जर तुम्ही धन कमवले तर ते धन-पैसे मिळवण्यासाठी काही लोक तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे कट-कारस्थान रचू शकतात, यामुळे तुमचे आयुष्य जोखमीचे होऊ शकते. दुसरीबाजू, जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानीबद्दल सांगितले तर ते तुम्हाला मदत करणार नाहीत, उलट दूर जातील.

गरुड पुराण सांगते या गोष्टी दुसऱ्याला मुळीच सांगू नये, नसता तोटा होईल.

.2. आपला अपमान
जर काही कारणास्तव आयुष्यात अपमान झाला असेल तर तुम्ही कोणाच सांगू नये, हे शक्य तितकं गुपित स्वतःकडे ठेवा. जरी एखाद्याला हे कळले असले, तरीही त्यांनी विचारले तर हसून खेळून समर्पक उत्तर शोधून देवा आणि योग वेळी सांगा. जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो. म्हणून, अशा गोष्टी स्वतःकडे ठेवाव्यात.

गरुड पुराण सांगते या गोष्टी दुसऱ्याला मुळीच सांगू नये, नसता तोटा होईल.
.३. कौटुंबिक कलह
मंडळी, गरुड पुराणानुसार, आपल्या घरात वा कुटुंबात भांडण-तंटा आणि कलहाबद्दल कोणाशीही चर्चा करू नये. खरतरं पहिल्याने तुमचं बोलणं खूप काळजीपूर्वक ऐकतील, पण तुमच्या पाठीमागे या गोष्टींचा त्यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही, उलट लोकं तुम्हाला तुमच्या कौटुंबिक वादाबद्दल सांगून, तुमच्या कुटुंबा विरुद्ध भडकवू शकतात. कुटुंबातील भांडण-तंटा आणि कलहाबद्दल लोकांना सांगून आपण फक्त लोकांना चर्चेसाठी एक विषय देत आहोत हे लक्षात घ्या.

गरुड पुराण सांगते या गोष्टी दुसऱ्याला मुळीच सांगू नये, नसता तोटा होईल.
.४. दानधर्म
गरुड पुराणानुसार आपण कोणतेही दान कुणालाही केले, त्या दानाबद्दल कोणालाही सांगू नये. कारण हिंदू धर्मात गुप्त दान हे श्रेष्ठदान मानले जाते. जर तुम्ही दान केले आणि त्या नंतर तुम्हाला ज्यांना तुम्ही दान केले आहे त्या व्यक्तीची कृपा लाभावी असे वाटत असेल तर दान केल्यावर कोणालाही सांगू नये, अशाच देणगीला महत्त्व आहे. म्हणून दानधर्म करून ते विसरले पाहिजे.

.५. डोक्यावरील कर्ज
जर तुम्ही काही कर्ज काढले असेल किंवा झाले असेल तर त्याची समाजात कुठेही आणि कुणालाही सांगू नका, कारण त्याने तुमची समाजातील पत, प्रतिष्ठा कायम राहणार नाही, ज्याने तुमच्या कारभाराला वा घराला किंवा उद्योगाला धक्का बसेल. ज्याने तुमचे प्रतिस्पर्धी, शत्रू, तुमच्याकडून अपमानित झालेले लोक, आणि तुमच्या प्रगतीवर जळत असलेले लोक तुमची वाताहत करतील.

गरुड पुराणामध्ये असे १० काम सांगण्यात आले आहेत,
जे पाप मानले जातात.*

१) पहिले पाप
सामान्यतः स्त्रीचा अपमान कधीच करू नये, परंतु गरोदर किंवा मासिक धर्म दरम्यान स्त्रीला वाईट बोलणे महापाप आहे. अशा व्यक्तीला महादेव आणि देवता माफ करत नाहीत.

२) दुसरे पाप
इतरांचे धन प्राप्त करण्याची इच्छा ठेवणे, हेसुद्धा शास्त्रानुसार पाप आहे.

३) तिसरे पाप
एखाद्या सध्या-सरळ व्यक्तीला किंवा जीवाला कष्ट देणे, नुकसान पोहोचवणे त्यांच्यासाठी बाधा निर्माण करणे हेसुद्धा महापाप आहे.

४) चौथे पाप
चांगले-वाईट, चूक-बरोबर जाणून घेतल्यानंतरही चुकीचे काम करणे महापाप आहे.

५) पाचवे पाप
इतरांच्या पती किंवा पत्नीवर वाईट नजर ठेवणे किंवा त्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हेसुद्धा महापाप आहे.

६) सहावे पाप
इतरांचा मान-सन्मान कमी करण्याच्या इच्छेने खोटे बोलणे, छळ-कपट करणे, षडयंत्र रचणे महापाप आहे

७) सातवे पाप
लहान मुलं, महिला किंवा कोणत्याही कमजोर व्यक्तीची हिंसा करणे, असामाजिक कर्म करणे महापाप आहे.

८) आठवे पाप
एखाद्या मंदिरातील वस्तू चोरणे किंवा चुकीच्या पद्धतीने इतरांची संपत्ती हडपणे महापाप आहे.

९) नववे पाप
गुरु, आई-वडील, पत्नी किंवा पूर्वजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला महादेव कधीही माफ करत नाहीत.

१०) दहावे पाप
नशा करणे, दान केलेल्या वस्तू किंवा धन परत घेणे महापाप आहे. कोणत्याही अधार्मिक कामामध्ये सहभागी होणे महापाप आहे.

वर्तंते पापीनाम् देही पापानी त्रिविधानिच।
महापापोप पापानी पापांनेव स्मृतानिच॥

सुभाषित. 🙏शुक्ल गुरुजी.
ब्रह्महत्या सुरापाणं स्तेयंगुर्वंगनागम:।
महन्तिपातकान्ह्याहू संसर्गश्र्चापितैसह॥

सुभाषित. 🙏शुक्ल गुरुजी.

WARKARI ROJNISHI
वारकरी रोजनिशी
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
www.warkarirojnishi.in
www.96kulimaratha.com
96 कुली मराठा
९६ कुळी मराठा

काय केल्याने पाप निर्मिती होते

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *