तुकाराम महाराज बीज वैकुंठ गमन अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

येथे संत तुकाराम महाराज यांच्या
वैकुंठगमन सोहळ्याचे अभंग अर्थात बीज अभंग

आपुल्या माहेरा जाईन मी आता
आपुल्या माहेरा जाईन मी आता । निरोप या संता हाती आला ॥१॥ सुख दु:ख माझे आइकिले कानी । कळवळा मनी करुणेचा ॥२॥ करुनी सिध्द मूक साउले भातुके । येती दिसे ऐके न्यायवासी ॥३॥ त्याची पंथे माझे लागलेसे चित्त । वात पाहे नित्य माहेराची ॥४॥ तुका म्हणे आता येतील न्यायावया । अंगे आपुलीया मायबाप ॥५॥

पैले आले हरि । शंख चक्र शोभे करी
पैले आले हरि । शंख चक्र शोभे करी ॥१॥
गरुड येतो फडत्कारे । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥२॥
मुगुट कुंड्लाच्या दीप्ती । तेजे लोपला गभस्ति ॥३॥
मेघशामवर्ण हरि । मूर्ति डोळस साजरी ॥४॥
चर्तुभुज वैजयंती । गळा माळ हे रुळती ॥५॥
पीतांबर झळके कैसा । उजळल्या दासी दिशा ॥६॥
तुका झालासे संतुष्ट । घरा आले वैकुंठपीठ ॥७॥

आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥ वाड वेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलवीतो ॥२॥ अंतकाळी विठो आम्हासी पावला । कुडी सहित झाला गुप्त तुका ॥३॥

बोलिलो ते आतां पाळावे वचन
बोलिलो ते आतां पाळावे वचन । ऐसे पुण्य कोण माझे गांठी ॥१॥ जातो आतां आदन्या घेउनिया स्वामी । काळक्षेप आम्ही करू कोठे ॥२॥ न घडे यावरी न धरवे धीर । पीड्ता हे राष्ट्र देखोनि ॥३॥ हाती धरोनीया देवे नेला तुका । जेथे नाही लोकां परीश्रम ॥४॥

सकळही माझी बोळवण करा
सकळही माझी बोळवण करा । परतोंनी घरा जावे तुम्ही ॥१॥ कर्मधर्म तुम्हा असावे कल्यान । घ्या माझे वचन आशीर्वाद ॥२॥ वाढवुनी दिले एकाचीये हाती । सकळ निश्चिती झाली तेथे ॥३॥ आता मज जाणे प्राणेश्वरासवे । मी माझीया भावे अनुसरलो ॥४॥

टीप हा : अभंग म्हणून गुलाल उधळणे.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *