मुलगी कोणास द्यावी नवरदेव वरासंबंधी गुणदोष

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

तुमचे आडनांव जर नक्की माहित असेल तर तुमच्या कुळाची माहिती घेण्यासाठी
येथे क्लिक करा.

सर्व आडनांवे-surname- list यादी पहा

माझे आडनांव नाही,
येथे क्लिक करा.

*वरासंबंधी गुणदोष दर्शवणारी वचने*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

( १ ) कन्या बुद्धिमान पुरुषास द्यावी.
( २ ) वर विद्वान असावा.
( ३ ) वरास बंधू असावे, त्याचे शील चांगले असावे, व तो चांगल्या लक्षणांनी युक्त असावा.
*( ४ ) वराचे कुल, शील ( स्वभाव ), वय, रूप, विद्या, संपत्ती व त्याचे पोषण करण्यास कोणकोण मंडळी आहेत, याची परीक्षा पाहून नंतर कन्या द्यावी. इतर गोष्टींबद्दल चौकशी करण्याची जरूर नाही.*


( ५ ) उन्मत्त, पतित म्हणजे धर्मबाह्य झालेले, कुष्ठरोगी नपुंसक, फ़ेफ़रे येणारे, वंदन करण्यास अयोग्य, दूर ठिकाणी राहणारे, संसारातून निवृत्त झालेले, अशा पुरुषांस शहाण्याने कन्या देऊ नये.
( ६ ) वयाने वृद्ध, नीच, कुरूप अगर वाईट स्वभावाचा, अशा पुरुषास कन्या देणारा मनुष्य यास जिवंत म्हणण्यापेक्षा मेलेला असे म्हणावे.
( ७ ) अंगी गुण नसलेला, वृद्ध, अज्ञानी, दरिद्री, मूर्ख, रोगी, कुत्सित, अत्यंत रागीट, अत्यंत दुर्मुखलेला, अंगाचे भाग कमी असलेला, जड, नपुंसक व महापातकाचे आचरण करणारा, अशा पुरुषास जो कोणी आपली कन्या देतो त्यास ब्रह्महत्येचा दोष लागतो.


=======================📕

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *