आत्म्याचा प्रवास, भाग 4, ज्या धर्मात अग्नी नाही त्यांचे विधी काय ?, एक वर्षाच्या आतील बालक मृत झाले तर ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संकलन व लेखन
राष्ट्रीय कीर्तनकार
ह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे

Atmyacha Prawas 2
Dehaci Mr̥tyupurva Avastha,
Marana Javal Alayavaraci Tayari.

The pre-death state of the body, preparation for approaching death.
|| मृत्यू नंतर आत्म्याचा प्रवास ||
|| लेखांक ४था ||

मृत्यू नंतर आत्म्याचा प्रवास ||

तिसऱ्या लेखात आपण पाहीले की,
स्मशानात प्रेतावर कशा प्रकारे संस्कार करतात याची सविस्तर माहीती पाहिली. पुढे

—————————————–
प्रश्न – ज्या धर्मात अग्नी देत नाहीत त्यांचे विधी काय असतात ?
उत्तर

ज्या धर्मात अग्नी देण्याची प्रथा नाही त्या धर्मात प्रेत जमिनीत पुरले जाते.
प्रेत पुरण्याची पद्धत आपल्या हिंदू समाजात फार मोठ्या प्रमाणात आहे.
महाराष्ट्रातील महानुभाव, लिंगायत, कबीरपंथी इत्यादी संप्रदायामधे आणि जातीमधे प्रेत दहना ऐवजी प्रेत पुरण्याची चाल प्रचलीत आहे.

तसेच पारशी, मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी धर्मात प्रेत पुरून त्यावर थडगे बांधतात.
प्रेत पुरणे असो वा दहन करणे असो घरातून प्रेत स्मशानात नेण्याचा विधी सारखाच असतो.
घरी प्रेताला स्नान घालुन,नवा कपडा घालुन, फुलांच्या माळा घालुन, भस्म, गंध, अबीर, गुलाल, तुळशिपत्र, तुळशीच्या माळा, गंगा इत्यादी पवित्र वस्तूंनी सुशोभित करून वाजत गाजत स्मशानात आणतात.
गोव्यात काही समाजात अंत्य यात्रेच्या पुढे फटाके वाजवतात.
काही समाजात लाह्या उधळतात,पैसे उधळतात ह्या सर्व प्रथा आहेत याला कुठेही शास्त्रार्थ नाही.

स्मशानभूमीत प्रेत पुरण्या करता जमीन उकरून त्यात पवित्र जलाने, गोमुत्राने प्रोक्षण करतात.
प्रेताला ताटीवरून सोडून दहनाच्या वेळी जे संस्कार करतात तेच संस्कार येथेही करतात.
विस्ताराने हा विधी कसा करतात ते पाहु.

आचमन करून अमुक प्रेतस्य प्रेतत्वविमुक्त्यर्थं
उत्तमलोक प्राप्त्यर्थं च मृत्तिकादानार्थं,
भूमिशुद्धिं, तीर्थादिनां भूमिप्रोक्षणं,
सप्तमातृका पूजनं च करिष्ये |

असा संकल्प करून भूमीला प्रार्थना करावी आणि भूमी प्रोक्षण करावी.
हे भूमी ! अमुक प्रेताच्या प्रेतत्व निवृत्ती साठी, त्यास उत्तम लोक प्राप्त व्हावा म्हणून तसेच या प्रेतास मूठमाती देण्यासाठी मी भूमीशुद्धि व्हावी म्हणून पवित्र जलाने भूमिप्रोक्षण व सप्तमातृकांचे पूजन करतो.

असा संकल्प करून भूमीला नमस्कार करावा.
पवित्र जलाने जिथे प्रेत पुरायचे आहे तिथे प्रोक्षण करावे व प्रार्थना करावी की,
हे पृथ्वी माते तू समस्त लोक स्वतःच्या अंगावर धारण करतेस,
तुला साक्षात विष्णुने धारण केले आहे.

तू मला धारण करून माझे आसन पवित्र बनव अशी प्रार्थना करून प्रेत पुरण्याच्या जागी सात दगड मांडुन हळद कुंकू, गंध फुले वाहुन सप्त मातृकांचे पूजन करावे.

१) ब्राम्ही २) माहेश्वरी ३) कौमारी ४) वैष्णवी ५) वाराही ६) इन्द्राणी ७) चामुण्डा अशा सात मातृका आहेत त्यांचे पूजन करावे.

नंतर सातुच्या पिठाचे सहा पिंड तयार करून एक कपाळावर, एक तोंडावर, दोन्ही बाहुवर दोन, ह्रदयावर एक व पोटावर एक असे सहा पिंड दाबुन बसवावेत.

नंतर मूठमाती देणाऱ्या मुलाने मातीचा कुंभ पाण्याने भरून डाव्या खांद्यावर घ्यावा आणि प्रेताच्या डोक्यापासून सुरूवात करून प्रेताला उलट्या तीन प्रदक्षणा घालाव्यात.
त्यानंतर स्मशानातील एक दगड घेवुन माठ फोडावा.
त्यानंतर खोल खणलेल्या खड्ड्यात प्रेताला अलगद ठेवुन मुठमाती द्यावी.
त्यात मीठ घालावे. मीठ घालण्याचे कारण पुरलेल्या प्रेताला किडा मुंगी लागु नये,
प्रेत सडुनये म्हणून भरपूर खडेमीठ घालावे व खड्डा चांगल्या पद्धतीने बुजवावा.
काही ठिकाणी या खड्ड्यावर समाधी बांधतात.
मुठमाती दिल्यावर सर्वांनी स्नान करून घरी जावे.
त्यानंतर चे विधी प्रेताला अग्नी संस्कार केल्यानंतर जे विधी सांगितले आहेत तेच विधी येथेही करावेत.
आता दुसऱ्या दिवसाचे विधी काय आहेत ते पुढील लेखात पाहु. क्रमशः –

WARKARI ROJNISHI
वारकरी रोजनिशी
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
www.warkarirojnishi.in
www.96kulimaratha.com
96 कुली मराठा
९६ कुळी मराठा

आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *