मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

श्री ऋषीपंचमी व्रत माहिती व हे व्रत का करावे व सर्व स्त्रिया महिलांनी करावे माहिती
मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय? जरूर वाचा.
दिनांक २६/०८/२०१७ रोजी शनिवार भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला ऋषी पंचमी हे व्रत साजरे करतात.व या दिवशी सर्व स्त्रियांनी उपवास करावा….


भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी हे व्रत करतात. ज्ञान व विज्ञान तसेच पुराणे यांची दिक्षा देण्याचे काम ऋषी मुनी फार पुर्वीपासून करत होते ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो, अशा या थोर ऋषींच्या कार्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हा ह्या व्रतामागील सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे.
कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री हे सात ऋषी आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती ह्यांची पुजा करतात. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षांतून किमान एक दिवस तरी स्वत:च्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागे संकेत वा संदेश आहे. ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे.


हे व्रत मुख्यत्वे करुन स्त्रिया रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठी करतात. या व्रताने विविध तीर्थांच्या स्नानाचे, विविध प्रकारच्या ज्ञानाचे पुण्य लागते, व मोक्ष मिळतो अशी आख्यायिका आहे.व्रत कसे करावे
या दिवशी स्त्रियांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत.
आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात, त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करावा.
पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्‍या ठेवून कश्यपादी सात ऋषी आणि अरुंधती यांचे आवाहन अन् षोडशोपचार पूजन करावे.


या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे.
दुसर्‍या दिवशी कश्यपादी सात ऋषी आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे.
बारा वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते.
गांना ऋषी म्हणतात. एका बाजूला स्त्री आणि दुसर्‍या बाजूला पुरुष असा नांगर ओढून त्यातून आलेले धान्य ऋषीपंचमीला खातात. ऋषीपंचमीला जनावरांच्या मदतीने बनविलेल्या धान्याचे अन्न खायचे नसते.


पाळी बंद झाल्यावर स्त्रिया ऋषीऋण फेडण्यासाठी ऋषीपंचमीचे व्रत करतात.
व्याहृती म्हणजे जन्म देण्याची क्षमता. ७ व्याहृतींना ओलांडण्यासाठी ७ वर्षे व्रत करतात. नंतर व्रताचे उद्यापन करतात.


मासिकपाळी का पाळावी ?विटाळ म्हणजे काय ?जरूर वाचा.


नोपगच्छेत्प्रमत्तोsपि स्त्रियमार्तवदर्शने ।
समानशयनेचैव नशयीत तयासह ।। 4-40
रजसाभिप्लुतां नारीं नरस्य ह्युपगच्छतः ।
प्रज्ञातेजोबलं चक्षुरायुश्चैव प्रहीयते ।। 4-41
तां विवर्जयतस्तस्य रजसा समभिप्लुतां ।
प्रज्ञातेजोबलं चक्षुरायुश्चैव प्रवर्धते ।।


मासिकधर्म असताना स्त्रीजवळ जाऊ नये. तिच्या सह शयन करू नये.
जो कोणी मनुष्य रजस्वला स्त्रीच्या जवळ जातो त्याची बुद्धि, तेज, बल, दृष्टी आणि आयुष्य कमीकमी होते.
रजः स्राव होणाऱ्या स्त्रीपासून रजोदर्शन काळात जो दूर राहतो त्याची बुद्धि, तेज, बल, दृष्टी आणि आयुष्य वृद्धिंगत होते.
स्त्रियांच्या रजोदर्शनाचा ज्ञात असलेला प्राचीन उल्लेख म्हणजे कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेतील (२-५-१-१) आहे.

त्याखेरीज श्रीमद्भागवत पुराणात (स्कंध ६-अध्याय ९ वा), स्कंदपुराण (माहेश्वर/केदार खंड अध्याय १६ वा ) तसेच मन्वादि स्मृतिकारांनी व चरक, वाग्भट (अष्टांगहृदय शारीरस्थान अ. १-श्लोक २३ ते २७) आदि आयुर्वेदाचार्यांनी सुद्धा रजोदर्शनाचा विचार केला आहे. महाभारतातील सभापर्वात वस्त्रहरणाचे वेळी द्रौपदी रजस्वला असल्याचे व म्हणून सभेत नेणे उचित नसल्याचे तिने स्वतःच सांगितले आहे. ( महाभारत सभापर्व .अ.६७-श्लोक ३२ गीताप्रेस प्रत)
धर्मकृत्याचे अगोदर योग्यवेळी यजमान व यजमानपत्नी तसेच धर्मकृत्याचे वेळी उपस्थित यजमानकुटुंबातील सदस्यांची शारीरिक व मानसिक शुचिर्भूततेची खात्री करणे व ती असल्यासच धर्मकृत्ये करणे (नसल्यास स्वधर्मशास्त्रोक्त अन्य पर्यायांचा वापर करणे ) अशा विचारांचे आपण पुरोहित अनुकरण करीत असल्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्रातील काही विचार सनातन धर्मशास्त्रास अनुकूल कसे आहेत ? , काही विचारात भेद का आहे ? व पर्यायाने सनातन धर्मशास्त्रात सुद्धा आधुनिक वैद्यकशास्त्रातील विचारच पण धर्माच्या अंगांनी कसे सांगितले आहेत हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांना आवडेल ते सांगण्यापेक्षा आवश्यक ते सांगणेच आमचा धर्म असल्याने आम्हाला ते केले पाहिजे.


धर्मशास्त्रात लिहिलेल्या संज्ञा शब्दार्थानुसारच समजल्यामुळे बरेच अनर्थ रूढ झाले, काही गैरसमज पसरले तर काही संकल्पना कालबाह्य समजल्या जाऊ लागल्या. ‘रजोदर्शन’ संकल्पनेचे वास्तवही तसेच आहे.
‘प्रथमेहनि चांडाली द्वितीये ब्रह्मघातिनी । तृतीये रजकी प्रोक्ता चतुर्थेहनि शुद्ध्यति ।।’ या पाराशरस्मृतीतल्या (७-२०)
श्लोकातील चांडाली, ब्रह्मघातिनी व रजकी पदाचे अनर्थ घेतल्याने स्मृतिकार स्त्रीद्वेष्टे होते असाच प्रचार करण्यात आला. वास्तविक ‘चडि उद्वेगे’ या धातूपासून चंड, चंडी,चीड,चाड असे शब्द सिद्ध होतात. रजोदर्शनाच्या पहिल्या दिवशी चिडचिड होणे आधुनिक वैद्यकशास्त्रास सुद्धा मान्य आहे. अशी चीड येणारी म्हणून ‘चांडाली’ या अर्थानी कधी विचारच केला गेला नाही. ब्रह्म शब्द ‘बृंह वृद्धौ’ धातूपासून सिद्ध होतो. वृद्धिसूचक बीजनिर्मिती होऊन गर्भधारणा न होणे हा अप्रत्यक्ष ब्रह्मघातच आहे.

अशा स्वरुपात असणारी ती ‘ब्रह्मघातिनी’ असा आशय आहे. हे न समजल्यामुळे मोठाच अनर्थ उद्भवला आहे. रजकी शब्दाचा प्रचलित अर्थ आहे धोबीण. अर्थात स्वच्छ करणारी अशा अर्थानेच तो वापरला आहे. त्यांना अन्य ज्ञातीचा स्त्रीसूचक शब्दही वापरता आला असता, पण धोबीण शब्दच का वापरला ? शरीर हे वस्त्राप्रमाणे असल्याचे गीताशास्त्र सांगते आहे.
(‘वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।। २-२२)
आधुनिक वैद्यकानुसार रजोदर्शन काळात स्त्रीच्या गर्भाशयातील अंतःस्थ त्वचा गर्भधारणा न झाल्यास शरीराच्या बाहेर फेकून दिली जाते. वस्त्रास चिकटलेला अनावश्यक व त्रासदायक ठरू शकणारा घटक स्वच्छ, शुद्ध करण्याचे काम जसे धोबीण करीत असते तसेच काम तेवढ्यापुरते रजोदृष्ट स्त्री करीत असल्यामुळे तिला रजोदृष्ट स्त्रीची उपमा दिली आहे . हा गूढार्थ लक्ष्यात घेतल्यास गैरसमज नाहीसे होऊ शकतात.


जसे मलमूत्रविसर्जन करणाऱ्यास तेवढ्यापुरते स्पर्शास, अन्नसंस्कारास, यज्ञास निषिद्ध समजले जाते पण त्या अवस्थेतून शास्त्रानुसार शुद्ध झाल्यावर पुन्हा स्पर्शास, अन्नसंस्कारास,यज्ञास पूर्ववत अधिकार प्राप्त होतो हे सुद्धा वास्तव आहे. रजःस्राव हा सुद्धा एक मलच आहे पण तो केवळ स्त्रियांकडूनच होत असतो म्हणून तो स्त्रीशरीरविशेष आहे.

मलास विरोध केल्याने तो मल शरीराच्या नियमाने पुनः रक्तात जातो व व असह्य वेदना निर्माण करतो. वेग आला की शांतपणे त्याला त्याच्या मार्गाने निघून जाण्यास मदत केली पाहिजे.
‘रसादेव स्त्रियाः रक्तं रज संज्ञं प्रवर्तते ।
एतत्प्रकृत अपानस्य कार्यम् ।।’

या ‘मल’ उपमेतील एक न्यून,त्रुटी अथवा मर्यादा लक्ष्यात घेतली पाहिजे ती म्हणजे मलमूत्रविसर्जन केवळ स्त्रियांकडून होत नाही तर पुरुषांकडूनही होते. ते जन्मापासून मृत्यूपर्यंत चालू असते. परंतु, मलमूत्रविसर्जन प्रक्रिया करणाऱ्यास विशिष्ट स्थानी जाऊनच ती प्रक्रिया करावी लागते. सर्वांसमक्ष ती करता येत नाही. मलमूत्रविसर्जन प्रक्रिया विशिष्ट ठिकाणी करणेच योग्य तर रजोदृष्ट स्त्रीनेही घरातील सदस्यांपासून वेगळ्या, एकांत जागी बसणे अयोग्य कसे ?

खात पीत असताना मलमूत्रविसर्जन केले जात नाही तसेच नेहमीचे श्रमाचे काम करतानाही मलमूत्रविसर्जन केले जात नाही. सहकाऱ्यांशी गप्पा मारत, कार्यालयातील ज्येष्ठांबरोबर चर्चा करताना मलमूत्रविसर्जन केले जात नाही व अशा प्रकारचे नियम आधुनिक वैद्यक तसेच नीतिशास्त्रासही मान्य असताना रजोदर्शनाचे काळात पूर्वोक्त व देवपूजेसारखी पवित्र कृत्ये करणे अशास्त्रीय नाही हे म्हणणे आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार तरी योग्य कसे ठरेल ?


अर्थात ते अयोग्यच समजणे इष्ट. हे सत्य समजल्यावर अशा स्त्रीस केवळ रजोदर्शनाच्या कारणाने घृणास्पद वागणूक देणे अयोग्य आहे हे सुलभतेने समजू शकते. हे समजाविणे आधुनिक वैद्यांचे (डॉक्टर्सचे) जसे कर्तव्य आहे तसेच कर्मकांडाशी संबंधित आम्हा पुरोहितांचे सुद्धा आहे.
रजोदृष्ट स्त्रीच्या सहवासाचा, सावलीचा पशू,पक्षी,वनस्पती यांचेवर काय परिणाम होतो हे सुद्धा अभ्यासले पाहिजे. शेतकी अथवा वनस्पतीशास्त्राचे तज्ज्ञ, माळी, शेतकरी हे “ वाईट परिणाम होतो ” असे म्हणतात. रजोदर्शनकाळात स्त्रीने केलेला स्वयंपाक कुत्रे देखिल खात नाहीत असे म्हणतात. तिच्या ऑरा (शरीराभोवती असणाऱ्या वलया)मध्ये सुद्धा दोष जाणवतात.

अमेरिकेतील डॉ. जॉन्सन यांनी मासिक पाळीत गुलाबांच्या फुलांना स्पर्श केल्यामुळे ती कोमेजल्याचे मान्य केले होते. पशुवैद्यकानुसार स्त्रीपशूंना सुद्धा असे रजोदर्शन असते का ? असल्यास त्या काळातील गायी,म्हशींचे दुधात काही वेगळे घटक आढळतात का ? असे संशोधन प्रसिद्ध केल्यास तुलनात्मक अभ्यासाने विचार केला जाऊ शकतो. नदीला सुद्धा रजोदोष सांगितला आहे. कर्क व सिंह या संक्रांतीमध्ये सर्व नद्या रजस्वला होतात. (निर्णयसिंधू मराठी भाषांतर – कृष्णशास्त्री नवरे पृष्ठ ११० ) याचाही विचार भूगर्भशास्त्रज्ञ व जलतज्ज्ञ करतील का ?पाश्चात्य संशोधकांमध्ये नारीशास्त्रज्ञ वेल्डे, ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ प्रो.शिक यांनी या विषयावर बरेच संशोधन केले आहे. प्रो.शिक सांगतात, “ विटाळशीच्या हातातील फुलांवर नारंगी रेषा येतात. २४ तासानंतर पाकळ्या झाडून जातात. विटाळाच्या पहिल्या दिवशी परिणाम प्रखर असतो. पुढे कमी होत जातो. चौथ्या दिवशी अजिबात नसतो.

विटाळात मेनो-टॉक्सीन हे विष असते. हे जे विष आहे ते विटाळशीच्या काखेतील घामात, कानाच्या लोंबत्या भागातील रक्तातील द्रव्यात (सिरम) लालधातुकणात (R.B.C.) आढळते, ते मेनो-टॉक्सीन विष प्रयोगशाळेतल्या रबरी हातमोजातूनहि ग्रासते.” शिक यांच्या प्रयोगाचे व प्रतिपादनाचे समर्थन मॅश, लुबीन, लामार्ड अशा शास्त्रज्ञांनी केले आहे. वेडले या लेखकाचे ‘आदर्श वैवाहिक जीवन’ , एलीसचे ‘कायमानसाचा अभ्यास’ , प्लॉस व वाल्डेर्स यांचे ‘ नारी’ ही (इंग्रजी) पुस्तके जिज्ञासूंनी अवश्य वाचावीत. वेडले लिहितो, “ विटाळशी स्त्री विलक्षण क्षुब्ध असते. तिच्या रक्तप्रवाहात Auto Intoxication (self poisoning of the system) असते. या संदर्भात शास्त्रज्ञ गोंधळलेले आहेत. अजून त्यांना हे तंत्र काही उलगडलेले नाही.”


लॉरेट या नारीशास्त्रज्ञाने “ मासिक विटाळाच्या काळात स्त्रियांच्या अंगांगातून वीजप्रवाह सुरु झाल्यासारखे वाटून अंगाला कपडे चिकटतात, तंतुवादिनी स्त्रीची बोटे तंतुंवरून सारखी निसटतात, काच आपोआप फुटते, घड्याळ बंद पडते ” अशी निरीक्षणे नोंदविली आहेत. एलीस हा शास्त्रज्ञ म्हणतो, “ पुष्पिणी (विटाळशी) स्त्रिया दूषित असतात. त्या कोणत्या तरी दुष्ट शक्तींनी भारलेल्या असतात. पिशाच्चादि योनीतले जीव त्या देहात प्रविष्ट होतात.” विटाळशीचे रक्त सुद्धा दूषित असते. त्याचा उपयोग अभिचार कर्माकरिता केला जातो. एलिक म्हणतो, “ साखरेच्या कारखान्यात विटाळशी स्त्रियांना बंदी आहे कारण, साखर काळी पडते, अफू अति कडू होते, उग्र होते. एडनर म्हणतो, “ मासिक पाळी म्हणजे स्त्रीशरीर धुवून टाकून सगळे विषमय पदार्थ बाहेर फेकण्याचा निसर्ग.” O. W. Smith हा शास्त्रज्ञ सांगतो, “ इस्ट्रीन व इस्ट्राडिऑल यांचे oxidative decomposition विघटन होते. त्यापासून दूषित विषारी रक्त बनते. या विटाळाच्या दूषित द्रव्यांचा मेंदूवर जबर परिणाम होतो. याला मेनोटॉक्सीन असे म्हणतात. अशा विटाळशी स्त्रीचे बाह्य वस्तूंपासून रक्षण अटळ ठरते.” कुत्रा हा तीव्र संवेदनेचा व अत्यंत कामलंपट प्राणी आहे. वेल्डे सांगतो, “ कुत्र्याची तीक्ष्ण नजर विटाळशी स्त्रीला भयभीत करते. विटाळाच्या काळात स्त्रीच्या ठिकाणी कामवासना जबर असते.” पिशाच्चादि वर्णने जरी अतिशयोक्ति वाटली तरी तद्वत् आचरण असा तिथे अर्थ केल्यास आशय लक्ष्यात येऊ शकतो. पाश्चात्यांना ही संकल्पना त्या मानाने नवीन असल्याने हे संशोधन गेल्या शतकाच्या उत्तरार्धानंतर सुरु झाले त्यांचे निष्कर्ष, प्रगति होण्यास अजून काही काळ जावा लागेल. त्यानी सांगितले की मग आपल्या देशातले लोक आमच्याकडे हे अगोदरच सांगितलेले आहे असे म्हणू लागतील.


आपला मोबाईल हँडसेट अथवा संगणक यामधील घातक घटक म्हणजे व्हायरस इ. वेळच्या वेळी काढले नाही तर मोबाईल अथवा संगणक मंदगतीने कार्य करायला लागून कालांतराने अकार्यक्षम ठरतो. हे टाळण्याकरिता जसे आपण फॉरमॅट/क्लीन करत असतो. दुचाकी अथवा चारचाकी ठराविक कालानंतर सर्विसिंग करून घेतो व ते करत असताना त्या उपकरणाचा अन्यत्र वापर करत नाही. त्या वेळी आपण जरी त्या गोष्टी वापरत नसलो तरी त्यांना हीन, तुच्छ, कमी समजत नाही तर शुद्धिप्रक्रियेचाच तो एक भाग समजतो. निर्जीव गोष्टींना एवढे समजून घेणारे आपण एका सजीव स्त्रीला समजू शकलो नाही व रजोदर्शनासारख्या कारणांमुळे तिला हीन, कमी लेखू लागलो तर. आपल्यासारखे मूर्ख आपणच ठरू. मनूजींनी 5-108 मध्ये मलाची शुद्धि माती आणि जलानी, वेगामुळे नदीची, मासिक धर्मामुळे स्त्रीच्या चित्ताची व संन्यासामुळे द्विजोत्तम म्हणजे ब्राह्मण शुद्ध होतो असे सांगितले आहे.


श्रीऋषी पंचमी कहाणी
ऋषीपंचमीची कहाणी

ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे. केसांना लावावे मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्रे नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नानाप्रकारच्या दानांचं पुण्य लागतं. मनी इच्छिलं कार्य होतं.ऎका ऋषीश्वरांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. पुढं एके दिवशी काय झालं? त्याची बायको शिवेनाशी झाली, विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म झाला. देवाची करणी! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी. आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, “आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे. खीरपुरीचा स्वयंपाक कर”. ती मोठी पतिव्रता होती. तिनं चार भाज्या, चार कोशिंबिरी केल्या. खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला? खिरीचं भांड उघडं होतं त्यांत सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनांत विचार केला,

ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली. पटकन खाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कंबरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातल नाही. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. ती म्हणाली, “मी उपाशी आहे. मला अन्न नाही, पाणी नाही, खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळतं कोलीताने माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करू”? बैलानं तिला उत्तर दिलं, “तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालविलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं, मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं” हे भाषण मुलानं ऐकलं. लागलाच उठुन बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला.दुसरे दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला,

“तु असा चिंताक्रांत का आहेस”? मुलानं सांगितलं, “माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल? ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा”. तेव्हा ऋषींनी सांगितलं, “तू ऋषिपंचमीचं व्रत कर. ते व्रत कसं करावं? भाद्रपद महिना येतो. चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे. केसांना लावावे मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्रे नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते.

नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नानाप्रकारच्या दानांचं पुण्य लागतं. मनी इच्छिलं कार्य होतं”.मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आपल्या आईबापास दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानांत बसून स्वर्गाला गेली. मुलाचा हेतु पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
||HARI OM SHANKAR ||||MANGAL HO ||

नारी महात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *