शेगाव संस्थानला जमते ते महाराष्ट्रातील इतर सर्व संस्थानला का जमू नये ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

जे, शेगाव संस्थानला जमतें ते महाराष्ट्रातील इतर सर्व संस्थानला का जमू नये ?
इतर सर्व संस्थान व्यवस्थापनाने याचा विचार करावा .

✍️✍️ हे एक वेगळे प्रकरण।

शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थान हे विदर्भासारख्या ग्रामीण भागात असलेलं लाखो भाविकांच श्रद्धास्थान आहे .हजारो लोक तिथे रोज दर्शनाला येतात. भली मोठी दर्शनबारी असते . लोक भक्ती भावाने रांगेत चालत दर्शनाची वाट पाहत असतात.बऱ्यापैकी शांतता असते .मध्येच एखादा जयघोष नीनादून जातो. शांतता ठेवायला सेवेकरी ( निशुल्क सेवा देणारे ) तत्पर असतात पण त्यांनाही ‘शशश …’ इतकंच म्हणावं लागतं की सर्वत्र शांतता होते .बरेच ठिकाणी टांगून ठेवायच्या ऐवजी ते हातात ‘शांतता राखा’ चा फलक घेऊन उभे राहतात .काय बिशाद की कुठे आवाज होईल .आणि हे सर्व धाकदपटशा करून नाही तर स्वयंप्रेरणेने चालू असतं.

दर्शन बारीत तुम्हाला पाणी चहा निशुल्क उपलब्ध आहेच पण नैसर्गिक विधीला जायचं असल्यास ती पण व्यवस्था चोख असते . जिथं आहात तिथून बारीतून बाहेर पडल्यावर पास मिळतो .विधी उरकून परत पास दाखवून पुन्हा बारीत तुम्हीं बाहेर पडलेल्या जागीच प्रवेश करायचा .
स्वच्छता गृहाच्या प्रवेश द्वारावर पोहचल्यावर मात्र तुम्हाला जोरदार सुखद धक्का बसतो .नाही नाही स्वछता गृह खूप स्वच्छ असतं अश्या चिल्लर बाबी साठी नाही धक्का बसत कारण स्वछता गृह स्वच्छ असणं तिथे नित्याचाच भाग असतो .धक्का असा बसतो की त्या प्रवेश द्वारावर एक पाच सहा छोटे छोटे कप्पे असलेली खुली रॅक असते आणि सूचना लिहिलेली असते ‘हार फुले ठेवण्यासाठी’ !!


आपण स्वछतागृहात हार फुले घेऊन जाणार नाही (हो, भक्तिभावाने दर्शन घेणारा पापभिरू हिंदू जो पुरोगामी वगैरे नसतो तो पूजा साहित्य आत नेणार नाहीच ) हे लक्षात घेऊन ते ठेवण्यासाठी सुंदर सुरेख , चार पाच लोक हार ठेऊ शकतील इतके कप्पे असलेली रॅक बाहेर लावलेली असते. जे व्यवस्थापन इतका सखोल परन्तु अत्यावश्यक विचार करू शकते आणि तशी व्यवस्था करू शकते त्यांच्या बाबतीत काय लिहावं त्याचं कौतुक करावं की आभार मानावे हेच समजत नाही.


इतक्यात पूर्णविराम होत नाही .समाधी दर्शन ,गादी दर्शन घेऊन तुम्ही बाहेर येता तोवर महाप्रसाद बारी लागलेली असते .पुन्हा बारी ,पुन्हा तीच व्यवस्था ,तीच शांतता आणि शिस्त आहेच . 250, 300 लोक एका वेळी बसू शकतील असे चार हॉल असतात .भाविक येत राहतात जेवणं चालूच असतात आणि एकूण 4 ते 5 हजार लोक रोज जेवण करून जातात .जेवणाची व्यवस्था अवर्णनीय असते .स्वच्छ चकाकणारे स्टील चे पाच खणी तबक , पोळी,वरण, भात, एक फळभाजी आणि एक कडधान्याची भाजी हा मेन्यू असतो आणि प्रसाद म्हणून वडी,शिरा वा लाडू असतो .वाढून देणाऱ्या सेवेकर्यांच्या हातात हातमोजे ,अंगावर apron , मंगलवेष( पांढरा सदरा पायजमा) आणि स्त्री सेवेकर्यांचे डोके पदराने झाकलेले असते .आपापले ताट वाढून घेऊन टेबलावर जाऊन बसायचे .तिथेच टेबलावर पाण्याचा ग्लास भरलेला असतो आणि धक्का लागून तो पडून जमीन ओली होणे हा नित्याचा प्रकार होऊ नये म्हणून ग्लास साठी एक खोबण असते त्यात तो ग्लास फिट बसतो . दुसऱ्या वाढी साठी सेवेकरी तत्परतेने ढकलगाडी (ट्रॉली) घेऊन फिरत असतात .त्यात कोणत्या कप्प्यात काय आहे म्हणजे डाळ,भाजी, कडधान्य उसळ ई. याची नेम प्लेट दर्शनी भागावर असते .सेवेकरी तीच स्वच्छता सांभाळत आपुलकीने वाढत असतात. जेवणाची अमृततुल्य चव , चटका बसेल इतकं वाफाळलेल अन्न, माफक तेल आणि मसाला असं सात्विक, सुग्रास जेवण झाल्यावर एका ट्रॉली वर ताट नेऊन द्यायचे असते .तिथे आधी त्यातले खरकटे अन्न एका कप्प्यात जमा करून ताट धुवायला पाठवले जाते.

तुम्हाला दुसरा धक्का आता इथे बसायचा असतो. उष्ट्या पत्रावळीवरचे शिते वेचून खाऊन अन्न हे पूर्णब्रह्म हे उक्ती ऐवजी कृतीतूनच महाराजांनी शिकवलेले आहेच त्यामुळे बहुतांश भाविक ताटात उष्टे टाकत नाहीच पण एखाद्याच्या ताटात उष्टे दिसले तर सेवेकरी उष्टे न टाकण्याची विनंती करतो आणि जर एखाद्या भाविकाने उरलेले अन्न बांधून सोबत घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली तर ते पॅक करण्यासाठी सोबतच्या सेवेकर्यांच्या apron च्या समोरच्या खिशात आयताकृती व्यवस्थित कापलेले कागद तयारच आहेत .हो ,खरंच आहेत .


कोणत्या management च्या पदव्या घेतल्यायत ह्या लोकांनी ? कुठे प्रशिक्षण घेतले ? महाराजांविषयी हृदयातील निस्सीम श्रद्धा आणि मनातील सेवाभाव ह्याच्या भरवश्यावर एखाद्या मोठ्या कारखान्यात व्यवस्थापनात मोठ्या पदव्या घेतलेले तज्ञ कसं नियोजनबद्ध आणि गुणवत्तेवर भर देत काम करून घेतात तसे महाराजांच्या आशीर्वादाने मा.ह.भ.प. शिवशंकरभाऊ पाटलांच्या मार्गदर्शनात हे अखंड सेवाकार्य चालते .इथे सेवेकरी आहेत आणि पगारी नोकर पण आहेत .चप्पल स्टँड वर चप्पल व्यवस्थापन ते बागकाम ते स्वछताकर्मी ते हिशोबनीस ते स्वयंपाक घर काम ते वैद्यकीय अश्या विविध सेवा देण्यासाठी पण नाव नोंदणी करावी लागते आणि त्याचीही वेटिंग लिस्ट आहे .वर्ष दोन वर्षांनी नंबर लागतो . शिवशंकर भाऊ संस्थानचा चहा पण पीत नाहीत इतका निस्वार्थ भाव त्यांच्या ठायी आहे त्यामुळे सगळीच टीम त्याच निर्मोही निस्वार्थ भावनेने काम करते

.संस्थानचे बरेच सेवाकार्य चालते .वारकरी प्रशिक्षणापासून फिरत्या दवाखान्या पर्यंत आणि सातपुड्याच्या आदिवासी भागातील सेवाकार्यांपासून अभियांत्रिकी महाविद्यालया पर्यंत वेगवेगळे 42 सेवा प्रकल्प आहेत ते अहोरात्र चालूच असतात .पैसा साठवायचा नाही , तो फिरता राहिला पाहिजे या महाराजांच्या शिकवणुकीनुसार बांधकामे,अन्नदान,सेवाकार्य आदी चालतात .पैसा येत राहतो अन काम चालूच राहते .पैशासाठी काम कधी थांबले नाही हे भाऊ विनयाने सांगतात .कालचा आवक जावकचा हिशोब आणि शिल्लक रोज फलकावर जाहीर रित्या लिहिली जाते .
पारदर्शकता ,विश्वसनीयता या शब्दांच्या नव्या व्याख्या शेगावच्या या संस्थानात तयार झाल्या आहेत.


काय म्हणावे या व्यवस्थेला , ती आखणार्या संस्थांच्या पदाधिकारी आणि विश्वस्थानां आणि राबवणऱ्या सेवेकर्यांना ? शब्दच नाहीत .केवळ शब्दातीत ! खरं म्हणजे शब्दबद्ध करण्यापेक्षा सरळ नतमस्तकच व्हायच !! या
🙏🏻🌹गण गण गणांत बोते🌹 🙏🏻
( ह्या दैवी कार्याची महती आणि माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून हा प्रपंच)

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *