सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

276-18
विकाशें रवीतें उपजवी । द्रुती अलीकरवी भोगवी । ते सरोवरीं कां बरवी । अब्जिनी जैसी ॥276॥
जशी सरोवरातील कमळे आपल्या बोलण्याने फुलंण्याने रवीचा उदय झाला असे कळवितात व आपल्यातील मकरंदचा भ्रमरांकडून कडून उपभोग घेववितात.
277-18
पुढतपुढती आत्मक्रिया । अन्यकारणकाचि तैशिया । करूं पांचांही तयां । कारणां रूप ॥277॥
तशी आत्म्याच्या ठिकाणी असलेली कर्मे अन्य कारणाने वारंवार उत्पन्न होतात. ती कारणे पाच आहेत. त्यांची लक्षणे तुला सांगतो.
पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे ।
साण्‌ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ॥18.13॥
278-18
आणि पांचही कारणें तियें । तूंही जाणसील विपायें । जें शास्त्रें उभऊनी बाहे । बोलती तयांते ॥278॥
ती पाच कारणे तू ही कदाचित जाणार असशील कारण ज्याविषयी शास्त्राने ऊंच हात करून वर्णन केलेले आहे
279-18
वेदरायाचिया राजधानीं । सांख्यवेदांताच्या भुवनीं । निरूपणाच्या निशाणध्वनीं । गर्जती जियें ॥279॥
ती वेदराजाच्या राज्याच्या राजधानीत सांख्य वेदांत मंदिरात निरूपणरुपी नौबदीने प्रसिद्ध आहेत.
280-18
जें सर्वकर्मसिद्धीलागीं । इयेंचि मुद्दलें हो जगीं । तेथ न सुवावा अभंगीं । आत्मराजु ॥280॥
कारण सर्व कर्माची सिद्धी होण्याकरिता या जगात हीच मुख्य अवश्य आहेत, तर त्यांचे ठिकाणी आत्म्यास कारणीभूत मानू नको.

281-18
ह्या बोलाचि डांगुरटी । तियें प्रसिद्धीचि आली किरीटी । म्हणौनि तुझ्या हन कर्णपुटीं । वसों हें काज ॥281॥
अर्जुना, अशी दवंडी पिटल्याने त्यांची चहूकडे प्रसिद्धी झालेली आहे, म्हणून तुलाही ठाऊक असू दे, उपयोग होईल;
282-18
आणि मुखांतरीं आइकिजे । तैसें कायसें हें ओझें । मी चिद्रत्न तुझें । असतां हातीं ॥282॥
आणि मी ज्ञानरूपी रत्न तुझे हाती असल्यावर, दुसऱ्याचे तोंडातून तू ही गोष्ट ऐकावीस, इतकी अडचण तुला कशास पाहिजे?
283-18
दर्पणु पुढां मांडलेया । कां लोकांचियां डोळयां । मानु द्यावा पहावया । आपुलें निकें ॥283॥
आपल्यासमोर आरसा असल्यावर आपले रुप पाहण्यात लोकांना माझे रूप कसे दिसते ते मला सांगा, अशी विनंती का करावी?
284-18
भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ तें तेंचि होत जाये । तो मी तुझें जाहालों आहें । खेळणें आजी ॥284॥
भक्त ज्या स्थितीत जिकडे पाहिल, त्या ठिकाणी ती वस्तू मी त्यांच्या दृष्टीस पडतो, तो मी आज तुझे खेळणे झालो आहे.(हस्तगत झालो आहे.)
285-18
ऐसें हें प्रीतीचेनि वेगें । देवो बोलतां से नेघे । तंव आनंदामाजीं आंगें । विरतसे येरु ॥285॥
असे प्रेमाच्या भरात देव बोलत असता त्यांना आठवण राहिली नाही, तो इकडे पार्था आनंदात निमग्न होऊन गेला.

286-18
चांदिणियाचा पडिभरु । होतां सोमकांताचा डोंगरु । विघरोनि सरोवरु । हों पाहे जैसा ॥286॥
पौर्णिमेच्या चांदण्यात सोमकांत मण्याचा डोंगर जरी असला, तरी तो पाझरून त्याचे सरोवर बनावे.
287-18
तैसें सुख आणि अनुभूती । या भावांची मोडूनि भिंती । आतलें अर्जुनाकृति । सुखचि जेथ ॥287॥
त्याप्रमाणे सुख व त्याचा अनुभव या भावांचा पडदा नाहीसा होऊन सुखच अर्जुनाच्या आकृतीचे दिसू लागले;
288-18
तेथ समर्थु म्हणौनि देवा । अवकाशु जाहला आठवा । मग बुडतयाचा धांवा । जीवें केला ॥288॥
तेव्हा देव समर्थ असल्यामुळे त्यास आठवण होऊन त्यांनी सुखाचे समुद्रात बुडणार्‍या अर्जुनास वर काढले
289-18
अर्जुना येसणें धेंडें । प्रज्ञा पसरेंसीं बुडे । आलें भरतें एवढें । तें काढूनि पुढती ॥289॥
अर्जुनासारखा थोर असूनही तो बुद्धीच्या प्रसारासह बुडू लागला, एवढे प्रेमाचे भरते आले असून ते बाजूला सारून,
290-18
देवो म्हणे हां गा पार्था । तूं आपणपें देख सर्वथा । तंव श्वासूनि येरें माथा । तुकियेला ॥290॥
देव म्हणाले, “पार्था तू आपले स्वरूप पाहून शुद्धीवर ये.” तेव्हा उसासा टाकून अर्जुनाने मान डोलावली;

291-18
म्हणे जाणसी दातारा । मी तुजशीं व्यक्तिशेजारा । उबगला आजी एकाहारा । येवों पाहें ॥291॥
आणि तो म्हणाला की, हे प्रभो, जो मी तुमच्या सान्निध्यास (द्वैतभावस त्रासून आज तुमच्या ऐक्यास येऊ पाहत आहे,
292-18
तयाही हा ऐसा । लोभें देतसां जरी लालसा । तरी कां जी घालीतसां । आड आड जीवा? ॥292॥
आणि असेच बोलून तुला जी आम्ही भीती दाखवतो; तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रितीस जास्ती बळ येते, अशी ही प्रीती होय.
293-18
तेथ श्रीकृष्ण म्हणती निकें । अद्यापि नाहीं मा ठाऊकें । वेडया चंद्रा आणि चंद्रिके । न मिळणें आहे? ॥293॥
तेव्हा श्रीकृष्णश्रीकृष्ण म्हणतात की, अरे वेड्या, खरोखर तुला अजून कसे माहीत नाही, की चंद्र आणि प्रभा यांचा वियोग घडतो का?
294-18
आणि हाही बोलोनि भावो । तुज दाऊं आम्ही भिवों । जे रुसतां बांधे थांवो । तें प्रेम गा हें ॥294॥
आणि असेच बोलून तुला जी आम्ही भीती दाखवतो; तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रितीस जास्ती बळ येते, अशी ही प्रीती होय.
295-18
एथ एकमेकांचिये खुणें । विसंवादु तंवचि जिणें । म्हणौनि असो हें बोलणें । इयेविषयींचें ॥295॥
या ठिकाणी एकमेकांची खूणेने परस्परांस जे बोलणे तेच आपल्या वाचण्यास कारण होय, म्हणून याविषयी वादविवाद पुरे.

296-18
मग कैशी कैशी ते आतां । बोलत होतों पंडुसुता । सर्व कर्मा भिन्नता । आत्मेनिसीं ॥296॥
मग अर्जुना, आपण काय बरे बोलत होतो की, सर्व कर्मे आत्म्यापासून भिन्न आहेत, असेच ना?
297-18
तंव अर्जुन म्हणे देवें । माझिये मनींचेंचि स्वभावें । प्रस्ताविलें बरवें । प्रमेय तें जी ॥297॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, “देवा, माझ्या मनातील तात्पर्य सांगण्यास तुम्ही होऊन आरंभ केला.
298-18
जें सकळ कर्माचें बीज । कारणपंचक तुज । सांगेन ऐसी पैज । घेतली कां ॥298॥
सर्व कर्मास कारणीभूत अशी पाच कारणे तुला सांगेन अशी जी तुम्ही प्रतिज्ञा केली;
299-18
आणि आत्मया एथ कांहीं । सर्वथा लागु नाहीं । हें पुढारलासि ते देईं । लाहाणें माझें ॥299॥
आणि आत्म्याचा कर्माची काही संबंध नाही असे जे तुम्ही बोलला होता, ते माझे आवडते मला द्या,”
300-18
यया बोला विश्वेशें । म्हणितलें तोषें बहुवसे । इयेविषयीं धरणें बैसे। ऐसें कें जोडे? ॥300॥
हे बोलणे ऐकून भगवान अति संतोष आणि म्हणाले,” याविषयी तू धरणे घेऊन बसलास, असा विचारणारा आम्हाला कुठे मिळतो आहे?

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *