आत्म्याचा प्रवास, भाग 2, प्रेत स्मशाना पर्यंत कसे आणावे ? चार पावले तरी प्रेतामागून चालावे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

संकलन व लेखन
राष्ट्रीय कीर्तनकार
ह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे

Atmyacha Prawas 2
Dehaci Mr̥tyupurva Avastha,
Marana Javal Alayavaraci Tayari.

The pre-death state of the body, preparation for approaching death.

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||
[ लेखांक दुसरा २ रा ]

कालच्या लेखात मृत्युची प्राथमिक अवस्था
या संदर्भातील माहीती आपण पाहीली पुढे :-

प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो,
पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे हा देह जमिनीवर पडतो.
यावेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडतात,  
या दहा प्राणांची नावे आहेत
१) प्राण,  
२) अपान,  
३) व्यान,  
४) उदान,  
५) समान,  
६) नाग,  
७) कूर्म,  
८) कृकुल,
 ९) देवदत्त,  
१०) धनंजय.

सगळ्यात शेवटी धनंजय वायु शरीरातुन बाहेर पडतो हा वायु देहाला अग्नी स्पर्श होई पर्यंत देहात असतो असे गरूड पुराणात सांगितले आहे.

नंतर आत्मा चार कोषासह सूक्ष्म देह धारण करुन बाहेर पडतो
तेंव्हा
या देहाला मरण येते.
आत्मा अजरामर आहे.
देहा भोवतीच हा आत्मा घुटमळत असतो,  
घरात रडारड सुरु होते,  
शेवटी स्मशानभूमित या देहावर अग्नी संस्कार करण्यासाठी न्यावे लागते ते कसे न्यावे तर,  
सर्व लोक जमा झाल्यावर शांततेणे व प्रसन्न वातावरणात प्रेत यात्रा काढावी.
प्रथम प्रेताला कोमट पाण्याने स्नान घालावे शरीर स्वच्छ करावे कारण ते अग्नीच्या मुखात द्यायचे असते.
आपल्या जीवनातला हा शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंतेष्टी म्हणतात.
अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ.

स्नान घालुन शरीर स्वच्छ कपड्याने पुसावे,  
शरीरास सुगंधी अत्तर लावावे,  
गळ्यात चंदनाची किंवा तुळशीची माळ घालावी,  
सपूर्ण शरीर शुभ्र वस्राने गुंडाळावे फक्त चेहरा व पाय उघडे ठेवावेत,  
उरलेले वस्त्र उत्तरीय वस्त्र म्हणून अग्नी देणाऱ्याने अग्नी संस्काराच्या वेळेस गळ्यात घालायचे असते.
याच वस्त्रात अश्मा बांधुन दहा दिवस घराबाहेर ठेवायचे असते,  
कारण याच अश्म्यावर जीवात्मा दहा दिवस बसलेला असतो.
हे उत्तरीय वस्त्र बाराव्या दिवसा पर्यंत क्रिया कर्म करताना वापरायचे असते,  
बारा दिवसा पर्यंत या उत्तरीय वस्त्राची गाठ सोडु नये.

प्रेताला ताटीवर सुतळीने घट्ट बांधावे,
प्रेतावर फुले व तुळशी वहाव्यात,  
गंगा ठेवावी. प्रेत चौघांनी खांद्यावरून न्यावे किंवा गाडीतून न्यावे.
सर्वात मोठ्या मुलाने किंवा धाकटयाने अग्नी शिंकाळ्यात घेवुन सर्वात पुढे चालावे,  
मागे वळुन पाहु नये,  
प्रेत व अग्नी याच्या मधुन कोणी जावु नये.
वृद्धास पुढे करून प्रेता मागे वृद्ध मंडळींनी चालावे

मागुन बाकीच्या मंडळींनी चालावे.
ज्यांना स्मशानात जाणे शक्य नसेल त्यांनी चार पावलेतरी प्रेताच्या मागुन चालावे.
हे सत्कर्म आहे.

अर्ध्या रस्त्यात गेल्यावर
किंवा
जिथे विसावा असतो तिथे जमिनीवर एक नाणे व सुपारी ठेवुन क्षणभर प्रेत खाली ठेवावे,  
पुढील खांदेकरांनी मागे यावे व मागच्यांनी पुढे जावे.
ज्यांच्या पत्नीला दिवस गेले असतील त्यांनी खांदा देवु नये.
स्मशानातील भूमी शेणाने प्रोक्षण करावी,  
दहन भूमीच्या वायव्य दिशेस अग्नी ठेवावा.
पाच हात लांब व तीन हात रूंद चिता रचावी.
व पुढील संस्कार करावेत.

ते संस्कार काय असतात पुढील लेखात,  पुढे काय होते उद्या पाहु :-

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||
[ लेखांक दुसरा २ रा समाप्त ]
क्रमशः –

WARKARI ROJNISHI
वारकरी रोजनिशी
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
http://www.warkarirojnishi.in
http://www.96kulimaratha.com
96 कुली मराठा
९६ कुळी मराठा

आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading