सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ८५१ ते ८७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

851-18
एवं नवही शमादिक । गुण जेथ निर्दोख । तें कर्म जाण स्वाभाविक । ब्राह्मणाचें ॥851॥
याप्रमाणे शमादिक नऊ गुण जेये निर्दोष दृष्टीस पडतात, ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म आहे, असे समज. 851
852-18
तो नवगुणरत्नाकरु । यया नवरत्नांचा हारु । न फेडीत ले दिनकरु । प्रकाशु जैसा ॥852॥
ज्याप्रमाणे सूर्य स्वभावतःच प्रकाशरूप असतो, त्याप्रमाणे ब्राह्मणाचा हा नवगुणरूपी रत्नांचा हार स्वाभाविक आहे; 852
853-18
नाना चांपा चांपौळी पूजिला । चंद्रु चंद्रिका धवळला । कां चंदनु निजें चर्चिला । सौरभ्यें जेवीं ॥853॥
चाफ्याचा वृक्ष त्याच्याच फुलांनी जसा सुशोभित दिसतो, अथवा चंद्र आपल्या प्रभेनेच जसा प्रकाश असतो, किंवा चंदन आपल्याच परीमळाने जसा चर्चित असतो, 853
854-18
तेवीं नवगुणटिकलग । लेणें ब्राह्मणाचें अव्यंग । कहींचि न संडी आंग । ब्राह्मणाचें ॥854॥
तसे नवगुणरूपी दागिने हे ब्राम्हणाचे अव्यंग लेणे आहे;व हे ब्राम्हणाचे अंग सोडून कधीच रहात नाहीत. 854
855-18
आतां उचित जें क्षत्रिया । तेंहीं कर्म धनंजया । सांगों ऐक प्रज्ञेचिया । भरोवरी ॥855॥
आता हे धनंजया,क्षत्रियांना उचित जे कर्म,ते मी सांगतो.ते तू आपल्या बुद्धीसर्वस्वाने ऐक.855
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् ।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ॥18.43॥

856-18
तरी भानु हा तेजें । नापेक्षी जेवीं विरजे । कां सिंहें न पाहिजे । जावळिया ॥856॥
(शौर्य) सूर्य हा प्रकाश पाडण्याकरिता दुसऱ्याच्या त्याची अपेक्षा करत नाही, किंवा सिंह आपल्या पराक्रमाला सोबत्याच्या मदतीची गरज बाळगीत नाही. 856
857-18
ऐसा स्वयंभ जो जीवें लाठु । सावायेंवीण उद्भटु । ते शौर्य गा जेथ श्रेष्ठु । पहिला गुण ॥857॥
आता असाह्य ते वाचून जो स्वयंभू, बलवान व शूर तो क्षात्र प्रकृतीचा पहिला गुण ‘शौर्य’ होय.
558-18
आणि सूर्याचेनि प्रतापें । कोडिही नक्षत्र हारपे । ना तो तरी न लोपे । सचंद्रीं तिहीं ॥858॥
(तेज:) आणि सूर्याच्या प्रकाशाने कोट्यावधी नक्षत्रे नाहीत अशी होऊन जातात; परंतु चंद्रासह वर्तमान सर्व नक्षत्रे सूर्याचा लोप करण्याविषयी समर्थ होत नाहीत,
859-18
तैसेनि आपुले प्रौढीगुणें । जगा या विस्मयो देणें । आपण तरी न क्षोभणें । कायसेनही ॥859॥
तसे आपल्या महत्वाच्या गुणाने सर्व जगाला आश्चर्य करण्यास लावतात व कसलाही प्रसंग आला तरी आपण घाबरत नाहीत, 859
860-18
तें प्रागल्भ्यरूप तेजा । जिये कर्मीं गुण दुजा । आणि धीरु तो तिजा । जेथींचा गुण ॥860॥
असा जो प्रसंशनीय गुण ‘ तेज’ तो त्या क्षात्र प्रवृत्तीचा दुसरा गुण होय. (धृतिः) व ‘धीर’ हा त्याच प्रतीचा तिसरा गुण होय. 860

861-18
वरिपडलिया आकाश । बुद्धीचे डोळे मानस । झांकी ना ते परीयेस । धैर्य जेथें ॥861॥
आकाशही कोसळून पडले; तरी ज्याच्या बुद्धीचे डोळे-मन हे झाकले जात नाही, त्याचे नाव ‘धैर्य’ होय. 861
862-18
आणि पाणी हो कां भलतेतुकें । परी तें जिणौनि पद्म फांके । कां आकाश उंचिया जिंके । आवडे तयातें ॥862॥
(दाक्ष्यम्) आणि पाणी कितीही खोल असले तरी कमळ हे पाण्याला खाली टाकून वर येते, किंवा आकाशी उंची विषयी सर्व पदार्थ जिंकते 862
863-18
तेवीं विविध अवस्था । पातलिया जिणौनि पार्था । प्रज्ञाफळ तया अर्था । वेझ देणें जें ॥863॥
तशी नाना प्रकारचे प्रसंग प्राप्त झाले तरी पार्था, फलरूप जो अर्थ त्याला बुद्धी जिंकते. 863
864-18
तें दक्षत्व गा चोख । जेथ चौथा गुण देख । आणि झुंज अलौकिक । तो पांचवा गुण ॥864॥
याप्रमाणे सावधगिरी ठेवणे त्याला ‘दक्षता’ म्हणतात व तो क्षात्र प्रकृतीचा चौथा गुन्हा होय. (युध्दे आपलायानम) आणि’ अलौकिक युद्ध पराक्रम’ हा त्याच प्रकृतीचा पाचवा गुण होय. 864
865-18
आदित्याचीं झाडें । सदा सन्मुख सूर्याकडे । तेवीं समोर शत्रूपुढें । होणें जें कां ॥865॥
सूर्य कमळे जशी नेहमी सूर्याच्या सन्मुख असतात, तसे शत्रूंच्या समोर नेहमी असणे. 865

866-18
माहेवणी प्रयत्नेंसी । चुकविजे सेजे जैसी । रिपू पाठी नेदिजे तैसी । समरांगणीं ॥866॥
गरोदर स्त्री पती समागमास जशी प्रयत्न करून चुकविते, तसे शत्रूला रणांगणात पाठ दाखविण्यात येतो चुकवितो. 866
867-18
हा क्षत्रियाचेया आचारीं । पांचवा गुणेंद्रु अवधारीं । चहूं पुरुषार्थां शिरीं । भक्ति जैसी ॥867॥
चार पुरुषार्थ ‘ भक्ती’ हा पुरुषार्थ जास्त आहे, तसा क्षात्र प्रकृतीच्या गुणांमध्ये हा पाचवा गुण इन्द्राप्रमाणे श्रेष्ठ आहे असे समज. 867
468-18
आणि जालेनि फुलें फळें । शाखिया जैसीं मोकळे । कां उदार परीमळें । पद्माकरु ॥868॥
(दानम्) आणि वृक्ष आपली पाने, फुले व फळे ही जशी याचकांसअर्पण करण्यास तयार असतो, अथवा परिमला विषयी कमळ जसे उदार असते; 868
869-18
नाना आवडीचेनि मापें । चांदिणें भलतेणें घेपे । पुढिलांचेनि संकल्पें । तैसें जें देणें ॥869॥
अथवा त्याला जितकी आवड असेल तितके त्याने चांदण्याचे सुख घ्यावे, तसे याचकास त्याच इच्छेप्रमाणे देणे, 869
870-18
तें उमप गा दान । जेथ सहावें गुणरत्न । आणि आज्ञे एकायतन । होणें जें कां ॥870॥
याला ‘अमर्याद दान’ असे म्हणतात. ते क्षात्र प्रकृतीचे सहावे गुणरत्न होय.(ईश्वरभाव:) आणि आज्ञेचे राहण्याचे एका स्थान क्षत्रीय होय. 870

871-18
पोषूनि अवयव आपुले । करविजतीं मानविले । तेवीं पालणें लोभविलें । जग जें भोगणें ॥871॥
आपल्या हस्तपादिक अवयवांचे चांगले पोषण केले असता त्याजकडून वाटेल ते काम करून घेता येते, त्याप्रमाणे प्रजेचे प्रेमाने पालन केले असता प्रजेचा उपभोग राजाला वाटेल तसा घेता येतो. 870
872-18
तया नाम ईश्वरभावो । जो सर्वसामर्थ्याचा ठावो । तो गुणांमाजीं रावो । सातवा जेथ ॥872॥
जो सर्व सामर्थ्याचा आधार लागलाच ‘ईश्वरभाव’ असे म्हणतात, तो या क्षात्र प्रकृतीच्या सर्व गुणांचा राजा असा सातवा गुण होय. 872
873-18
ऐसें जें शौर्यादिकीं । इहीं सात गुणविशेखीं । अळंकृत सप्तऋखीं । आकाश जैसें ॥873॥
अशा शौर्य आदिकरून सात गुणांनी जो पुरुष विशेष अलंकृत आहे, तो सप्तर्षींच्या सात चांदण्यांनी जसे आकाशी शोभते, त्याप्रमाणे शोभतो; 873
874-18
तैसें सप्तगुणीं विचित्र । कर्म जें जगीं पवित्र । तें सहज जाण क्षात्र । क्षत्रियाचें ॥874॥
अशा प्रकारे, या सात पवित्र गुणांनी या जगात जे कर्म पवित्र झालेले असते, ते क्षात्र प्रकृतीचे स्वभावीक कर्म आहे; 874
875-18
नाना क्षत्रिय नव्हे नरु । तो सत्त्वसोनयाचा मेरु । म्हणौनि गुणस्वर्गां आधारु । सातां इयां ॥875॥
अथवा असा जो पुरुष क्षत्रिय नसून स्वरूप सोन्याचा मेरूच होय. म्हणून तो सत्वगुणरुपी समुद्रांनी स्वर्गाला धारण करतो, 875

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading