संत एकनाथ महाराज जल समाधी सोहळा अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

येथे संत श्री एकनाथ महाराज यांच्या
समाधी सोहळ्याचे अभंग अर्थात नाथ षष्ठी अभंग

प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळीं एकनाथ म. समाधी अभंग 1

प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळीं । स्वयें वनमाळी अवतरले ॥१॥
भक्ति मार्ग लोपें अधर्म संचला । कली उदय झाला प्रथम चरण ॥२॥
नानापरी जन वर्ततसें सैरा । न में व्यभिचारा नारी नर ॥३॥
निळा म्हणे इहीं अवतार केले । जग उध्दरिलें महादोषीं ॥४॥

धन्य धन्य एकनाथा । तुमचे एकनाथ म. समाधी अभंग 2

धन्य धन्य एकनाथा । तुमचे चरणी माझा माथा ॥ धृ
१ ॥ दासोपंताचा अभिमान । गेला होताचि दरुशन ॥२॥
दत्तात्रय चोपदार । पुढे उभे काठीकर ॥३॥
यवन अंगावरी थुंकला । प्रसाद देऊनि मुक्त केला ॥४॥
निळा शरण तुमच्या पाया । अनन्य भावे नाथराया ॥५॥

आणिक हे ग्रंथ प्रमाण अष्टोतरशें एकनाथ म. समाधी अभंग 3

आणिक हे ग्रंथ प्रमाण अष्टोतरशें । वदिले स्वरसें गुरुकृपे ॥१॥
रामायण अद्भूत सप्तकांड साचार । तंव प्रयाण विचार आरंभिला ॥२॥
समाधि सुखाचा सोहळा अपार । होतो जयजयकार प्रतिष्ठानी ॥३॥
निळा म्हणे ऐसा ब्रह्मानंद झाला । आनंदी लोटला आनंदचि ॥४॥

पताकांचे भार वैष्णव नाचती एकनाथ म. समाधी अभंग 4

पताकांचे भार वैष्णव नाचती । रामकृष्ण गाती नामावळी ॥१॥
शालीवाहन शके पंधराशे अकरा । विजय संवत्सरा फाल्गुन मास ॥२॥
उत्तम हे तिथी षष्ठी रविवार । प्रयाण साचार दोन प्रहरीं ॥३॥
निळा म्हणे ऐशा नामाच्या गजरी । समाधि गोजिरी प्रतिष्ठानी ॥४॥

आनंदें वैष्णव गाती पैं नाचती एकनाथ म. समाधी अभंग 5

आनंदें वैष्णव गाती पैं नाचती । जयजयकार करिती ऋषीमुनी ॥१॥
विमानांची दाटी पुष्पांचा वरुषाव । स्वर्गीहूनी देव करिताती ॥२॥
स्वयें परब्रह्म करीत सोहळा । सकळ भक्तमेळां प्रतिष्ठान ॥३॥
निळा म्हणे हरि निघालें पंढरी । आनंद भीतरी ब्रह्मादिकां ॥४॥

संत एकनाथांचे सर्व साहित्य खालील तक्त्यात पहा

****॥ विठ्ठल-विठ्ठल ॥*****

वारकरी संत समाधी अभंग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *