कार्तिकेय

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

कार्तिकेय*

हिंदू पुराणकथांतील शिव-पार्वतीचा जेष्ठ पुत्र व देवांचा सेनापती. त्याच्या जन्माबाबत पुराणांत विविध कथा आहेत. रामायणात तो अग्नी व गंगा यांचा पुत्र असल्याचे म्हटले आहे. स्कंद, कुमार, षडानन, अंगार, सेनानी, देवसेनापती, अग्निभू, व्दादशकर, गुह, गंगा-पुत्र, महासेन, मंगळ (ग्रह), शक्तिधर, सिद्धसेन विशाख इ. नावांनीही त्याचे उल्लेख आढळतात. कृत्तिकांनी त्याचा प्रतिपाळ केला म्हणून त्याला कार्तिकेय नाव आहे. दक्षिण भारतात त्याला मुरुग (मूरुगण) अथवा सुब्रह्मण्य असे नाव आहे. त्याच्या विविध मूर्तीही आहेत. तो युद्धदेव मानला जातो.

दक्षिण भारतात मात्र तो विद्येचा देव मानला गेला. देवांचे सेनापतीत्व करुन त्याने तारकासुर व महिषासुर ह्या दैत्यांचा वध केल्याच्या कथा पद्म, मत्स्यादी  पुराणांत तसेच महाभारतात आहेत. काही कथांत तो ब्रह्मचारी
असल्याचे, तर काही कथांत त्याची पत्नी देवसेना (दक्षिण भारतात तिचे नाव वळ्ळी) व पुत्र शाख, विशाख व नैगमेय असल्याचे म्हटले आहे. विश्वामित्राने त्याचे उपनयन केले विष्णूने त्याला गरुड, मयूर व कुक्कुट वायूने पताका सरस्वतीने वीणा ब्रह्मदेवाने बोकड व शिवाने मेंढा दिला. इंद्र व स्कंद यांच्या संघर्षाची कथा महाभारतात आहे.]


उत्तर भारतात गुप्तकालानंतर त्याची स्वतंत्र देवता म्हणून उपासना होत असल्याचे अथवा त्याची स्वतंत्र मंदिरे उभारल्याचे दिसत नाही. शिवमंदिरातील शिवपरिवारात पार्श्वदेवता म्हणून मात्र तो विराजमान झाला. दक्षिण भारतात मात्र चोलादी राजांनी त्याची स्वतंत्र मंदिरे उभारली. तो ब्रह्मचारी असून स्त्रियांनी त्याचे दर्शन घेतल्यास वैधव्य येते, असा समज महाराष्ट्रात आहे.


उत्तर भारतात त्याच्या कुशाण व गुप्तकालातील अनेक मूर्ती सापडल्या तसेच दक्षिण भारतातही त्याच्या विविध मूर्ती सापडल्या आहेत. षण्मुख, चतुर्भुज, मस्तकी मोरपीस, रक्तवस्त्र, मयूरवाहन, उजव्या हातात कुक्कुट व घंटा, डाव्या हातांत वैजयंती व शक्ती अशी त्याची मूर्ती असावी. म्हणून हेमाद्री (हेमाडपंत) सांगतो. बृहत्संहितेत व्दिभुज, मयूरवाहन, कुमाररुप आणि हातात भाला असे त्याचे वर्णन आहे तर अंशुमद्‌भेदागमात षण्मुख स्कंदाचे व्दिभुज, चतुर्भुज, षड्‌भुज व व्दादशभुज असे चार प्रकार वर्णिले आहेत.

कार्तिकस्नान, त्रिपुरारी पौर्णिमा, हरिहर मिलन महात्म्य विधी फळ

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading