सकाळचा नित्यनेम मंत्र, स्तोत्र, आरती सहित भाग १

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

प्रातः नमन

कर–हस्त-हात नमन

(विधी:
हा मंत्र उठल्या बरोबर अंथरुणात बसूनच दोन्ही हाताच्या तळहाताकडे बघून म्हणावा.)

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वति ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।।१।।

स्नान-अंघोळ करताना म्हणावयाचे श्लोक –

(विधी:
हा मंत्र स्नानाला बसल्याबरोबर पहिला गडवा (तांब्या) पाणी डोक्यावर घेताना. म्हणवा.)

गंगेच यमुनेचे गोदावरी सरस्वती |
नर्मदे सिंधु कावेरि जलैस्मिन् संन्निधिं कुरु

मंत्र स्नान

अपवित्र पवित्रोवा सर्वावस्तांगतोपिवा
यस्मरेत् पुंडरिकाक्षं सभाह्याभंतरशुचिः

धरणी (पृथ्वी) माता नमन

(विधी:
हा मंत्र उठल्या बरोबर अंथरुणात बसूनच उजव्या हाताचा तळवा जमिनीला स्पर्श करून म्हणावा.)

समुद्रावसने देवी पर्वतस्तन मण्डले ।
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।१।।

श्रीकृष्ण स्मरण

(विधी:
हा मंत्र उठल्या बरोबर अंथरुणात बसूनच श्रीकृष्ण स्मरण करून म्हणावा.)

वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।।

कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं |
नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुं करे कंकणम् |

सर्वांगे हरिचंदनं च कल्याण कण्ठेच मुक्तावलिन् |
गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि

पंच पतिव्रता स्मरण

(विधी:
हा मंत्र उठल्या बरोबर अंथरुणात बसूनच पंच पतिव्रता चे स्मरण करून म्हणावा.)

अहल्या द्रौपदी सीता तारा मन्दोदरी तथा ।
पंचकन्या स्मरेन्नित्यं महापातक नाशनम् ।।

सर्व देवता स्मरण
(विधी: हा मंत्र उठल्यावर अंथरुणात बसूनच ब्रम्हदेव, विष्णू, शंकर, व नवग्रह स्मरण करून म्हणावा)

ब्रह्मामुरारिस्त्रिपुरांतकारी । भानुशशी भूमिसुतो बुधश्च ।  
गुरुश्च शुक्रश्च शनि राहु केतवः । कुर्वंतु सर्वे मम सुप्रभातम् ।।

श्रीगुरु-नमन-स्मरण

(विधी:
हे मंत्र उठल्यावर अंथरुणात बसूनच दोन्ही हात जोडून गुरूची मूर्ती मनातआणून/ पाहून म्हणावा.)

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरु: साक्षात: परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः

ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम् ।
मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा ।।

नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो ।
नमः परेभ्यः परपादुकाभ्यः ।

आचार्यसिद्धेश्वरपादुकाभ्यो ।
नमोऽस्तु लक्ष्मीपतिपादुकाभ्यः ।।

सूर्य नमन

(विधी:
हा मंत्र उठल्या बरोबर अंथरुणात बसूनच दोन्ही हात जोडून सूर्याकडे बघून म्हणावा.)

आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर ।
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते

आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिनेदिने ।
जन्मान्तर सहस्त्रेषु दारिद्र्यं नोपजायते

दिवा-दीपक लावण्याचा मन्त्र

(विधी:
हा मंत्र कोणत्याही वेळी दिवा लावताना व सकाळ संध्याकाळ तुलसी वृंदावना जवळ दिवा लावताना अवश्य म्हणावा.)

अधिक माहिती : कापसाची वात तेलात आणि फुलवात, काकडा तुपात भिजवून लावावा.  काकडा १ , फुलवात१ लावावी,  व वाती विषम संख्येत लावाव्या. उदा. १,३,५,७,९,११,ई.

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ।।

दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते ।।

मृत्यंजय मंत्र

(विधी:
हा मंत्र अकालमृत्यू होत असल्यास नित्य रुद्राक्ष माळेने१०८जप  करावा.)

ॐ त्रयम्बकं यजामहे  सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्  मृत्योर्मुक्षीय मामृतात्

दुःस्वप्न नाशन मन्त्र

(विधी:
हा मंत्र वाईट/घाण स्वप्न पडत असल्यास रात्री  झोपताना जप करत झोपी जावे.)

 रामस्कंदं हनूमंतं वैनतेयं वृकोदरम् ।
शयने स्मरणे नित्यं दुःस्वप्नं तस्यनश्यति ।। ।।

झोपण्याचा मंत्र /निद्रा मत्रं

(विधी:
हा मंत्र झोपताना अंथरुणात बसूनच दोन्ही हात जोडून म्हणावा.)

कुष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणत क्लेशनाशाय गोविदाय नमो नम : ।। ३ ।।

सर्व देव नमस्कार/ साष्टांग दंडवत कसा करावा.

(विधी:
देवाला डोके १ , छाती१, २ पाय, २ हात, २ गुडघे, अशी आठ अंगे जमिनीवर टेकून दंडवत/नमस्कार करावा.)

उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा ।
पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामोऽष्टाङ्ग उच्यते।।

विद्दा प्राप्ती मंत्र

(विधी:
हा मंत्र वाईट/घाण स्वप्न पडत असल्यास रात्री  झोपताना जप करत झोपी जावे.)

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम:शाश्वतीःसमा:
यत् क्रौञ्चमिथुनादेकमवधि:काममोहितम् ।।४।।

मंदिराला/देवतेला प्रदक्षणा केल्याचे फल

(विधी:
प्रदक्षिणा नेहमी सव्य म्हणजे उजवी बाजूने करावी, व विषम संख्येत कराव्या. उदा. १,३,५,७,९,११,

अधिक माहिती : शिव लिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, अर्धीच घालावी.

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।।

तीर्थ प्रसाद ग्रहण मन्त्र

(विधी:
हा मंत्र म्हणून उजव्या हातावरील तीर्थ,प्रसाद ग्रहण करावे.)

अकालमृत्यु हरणं सर्वव्याधि विनाशनम् ।
सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ।।

कंकण बंधन मंत्र

(विधी:
हा मंत्र म्हणत कोणतेही कंकण,धागा,गंडा,बांधावे.पुरुषाच्या उजव्या व स्त्री च्या डाव्या हातात बांधा)

स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः । स्वस्तिर्नो बृहस्पतिर्दधातु ।।

जेवणापूर्वी म्हणावयाचे श्लोक

(विधी:
ताट पुढे आल्यावर थोडेसे अन्न ताटाबाहेर काढून मग उजव्या हातात थोडे पाणी घेऊन खालील श्लोक म्हणून पाणी उजव्या बाजूने गोल फिरवावे, राहालेले पाणी पिऊन घ्यावे. (आचमन करावे) व नंतर मौनात जेवण करावे.

ब्रम्हार्पनं ब्रम्ह हविर्ब्रम्हाग्नौ ब्रम्हणाहुतम् ।
ब्रम्हैव तेन गन्तव्यं ब्रम्हकर्मसमाधिना ||

यज्ञशिष्ठाशिन:सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषै: ।
भुञ्जतेते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ||

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तय तत्कुरुष्व मदर्पणम्||

अहं वैश्वनरो भूत्वा प्राणिनां देह्माश्रिता ।
प्राणापान समायुक्त: पच्याम्यन्नं चतुर्विधम् ||

ॐ सह नाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ।
वधीत मस्तु मा विद् विषावहै
ॐ शान्तिः शान्तिः शान्ति||

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे||

 जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रम्ह ।
उदर भरण नोव्हे जाणिजे यज्ञ कर्म||

एक श्लोकी श्रीकृष्ण चरित्र

आदौ देवकिदेविगर्भजननं
गोपीगृहे वर्धनम्
मायापूतनजीवितापहरणं
गोवर्धनोद्धारणम् ।

कंसच्छेदनकौरवादिहननं
कुंतीसुतां पालनम्
एतद्भागवतं पुराणकथितं
श्रीकृष्णलीलामृतम्

शान्ति पाठ

ॐ पूर्णमदः पूर्णमिदँ पूर्णात् पूर्णमुदच्यते |
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते |
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ||

ॐ सह नाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ।
वधीत मस्तु मा विद् विषावहै
ॐ शान्तिः शान्तिः शान्ति||

दैनिक नित्यनेम संग्रह

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *