सार्थ पांडुरंग अष्टक वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत ज्ञानेश्वर अष्टक पहा

पांडुरंगाष्टकम्
हे आदी शंकराचार्यांनी रचलेले पांडुरंगाची स्तुती करणारे संस्कृत स्तोत्र आहे. यात आठ कडवी असून नववे कडवे फलश्रुतिपर आहे.

।। श्लोक पहिला ।।

क्लिक करा व पांडुरंगाष्ट ऐक

महायोगपीठे तटे भीमरथ्या
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः।
समागत्य तिष्ठन्तमानंदकन्दं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्

||१ ||

महा योगाचे अधिष्ठान असणारी भीमा नदि , तिच्या तीरावर ज्याला पंढरपुर क्षेत्र म्हणतात अशा क्षेत्री आई वडिलांची मनोभावे सेवा करणाऱ्या पुंडलिकाला वरदान देण्यासाठी , अनेक श्रेष्ठ मुनींसह येऊन राहणाऱ्या आनंदाचा कंद अशा परब्रह्म रूपी पांडुरंगाला मी नमस्कार करतो.

।। श्लोक दुसरा ।।

तडिद्वाससं नीलमेघावभासं
रमामन्दिरं सुंदरं चित्प्रकाशम्।
वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुगम्

||२ ||

विद्युल्लतेसम अतीशय शोभिवंत असे वस्त्रे नेसणार्‍या,नीळ्यारंगाच्या मेघाप्रमाणे शोभणाऱ्या अंगकांतीच्या , लक्ष्मीचे निवासस्थान असणाऱ्या,परम सुंदर चित्प्रकाशी,सर्वश्रेष्ठ तसेच भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर समचरण ठेवून अभा आहे अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो.

।। श्लोक तिसरा ।।

प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां
नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात्।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोषः
परब्रह्म लिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्

||३ ||

पांडुरंग आपल्या भक्तांना दर्शवतात की मला शरण येणाऱ्या भाविकांना भवसागर किती खोल आहे? तर कमरे एवढाच आहे. असे आपल्या भक्तांना दाखवण्या करिता ज्याने कमरेवर हात ठेवले आहेत आणि ब्रह्मदेवाला राहण्यासाठी ज्याने नाभिकोष धारण केलेला आहे अशा परब्रह्म रूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो.\

।। श्लोक चवथा ।।

स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे
श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम्।
शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंगम्

||४ ||

गळ्यात दैदीप्यमान कौस्तुभमणी धारण केल्याने अतिशय शोभायमान दिसणार्‍या,ज्याच्या बाहूंवर बाजूबंद (केयूर) शोभत आहेत आणि ज्याच्या ह्रदयात लक्ष्मी निवास करते आहे तसेच जो श्रेष्ठ आहे व लोकांचा पालनकर्ता आहे अशा परब्रह्म रूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो.

।। श्लोक पाचवा ।।

शरच्चंद्रबिम्बाननं चारुहासं
लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गम्।
जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं
परब्रमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्

||५ ||

शरद ऋतुमधे कोजागिरीला चंद्राचे पूर्ण बिंब जसे मोहक दिसते तसे अत्यंत रमणीय असे मुखचंद्र असलेल्या आणि ज्याच्या मुखावर सदा सुहास्य विलसते आहे,कानात शोभणाऱ्या कुंडलांची कांती ज्याच्या गालावर झळाळते आहे आणि ज्याचे ओठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त रंगाचे आहेत तसेच ज्याचे नेत्र अमृतरूपी कमलनयन आहेत अशा परब्रम्हरूपी पांडुरंगाला मी नमस्कार करतो.

*।। श्लोक सहावा ।।*

किरीटोज्ज्वलत्सर्वदिक् प्रान्तभागं
सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घ्यैः ।
त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्

||६ ||
ज्याच्या मस्तकावरील मुकुटाच्या कांतीने सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत,सर्व देवता ज्याची दिव्य व अनमोल रत्ने अर्पण करून पूजा करतात आणि ज्याने गुडघ्यावर रांगणाऱ्या (त्रिभंगाकृति) बालकृष्णाचे रूप घेतले आहे तसेच ज्याच्या गळ्यात वनमाला आहे व मस्तकावर मोरपिसांचा तुरा शोभतो आहे अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो.

।। श्लोक सातवा ।।
विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं
स्वयं लीलया गोपवेषं दधानम्।
गवां वृन्दकानन्दनं चारुहासं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्

||७ ||
सर्व विश्वाला व्यापून राहणाऱ्या,दिव्य वेणुनाद करत फिरणाऱ्या, ज्याचा कोणालाही अंत लागत नाही व सहज लीलेने गोपवेश धारण करणाऱ्या , गाईच्या कळपाला आनंद देणार्‍या, अतीशय गोड,मधुर हास्यमुद्रा आहे ज्याची अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो.

।। श्लोक आठवा ।।
अजं रुक्मिणीप्राणसञ्जीवनं तं
परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्।
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं
परब्रह्मलिङ्गं भचे पाण्डुरङ्गम्
||८ ||


ज्याला जन्म नाही म्हणजे जो अजन्मा आहे असा ,रुक्मिणी मातेचा प्राणाधार असलेल्या ,भक्तांचा परम विश्रामधाम असलेला ,शुद्ध कैवल्य,तसेच जागृती ,स्वप्न व सुषुप्ति अशा तीन अवस्थांच्या पलिकडे असलेल्या,निरंतर प्रसन्न असलेल्या,शरणागतांचे दुःख हरण करणार्‍या व देवांचाही देव असलेल्या अशा पांडुरंगास मी नमस्कार करतो.

*इति श्रीमद् शङ्कराचार्यविरचितं पाण्डुरङ्गाष्टकं सम्पूर्णम्।।*

*वरिल अत्यंत पुण्यदायक असे हे पांडुरंग अष्टक स्तोत्र जो कोणी भक्त एकाग्र चित्ताने प्रेमाणे नित्य पठण करेल तो अंताकळी भवसागर सहजगत्या तरून जाईल आणि त्याला परब्रह्म रूपी श्रीहरी पांडुरंगाच्या शाश्वत स्वरूपाची प्राप्ती होईल.*

संत ज्ञानेश्वर अष्टक पहा.

|| श्री पांडुरंगाष्टकम् प्रारम्भ ||

सार्थ पांडूरंग अष्टक पहा.

रचना : जगद्गुरु आद्य शंकराचार्य
गायक : अनुराधा पौडवाल

महायोगपीठे तटे भीमरथ्या
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागत्य निष्ठन्तमानंदकंदं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ १

तटिद्वाससं नीलमेघावभासं
रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् ।
वरं त्विष्टकायां समन्यस्तपादं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ २ ॥

प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां
नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ३ ॥

स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे
श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।
शिवं शांतमीड्यं वरं लोकपालं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ४ ॥

शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं
लसत्कुण्डलाक्रांतगण्डस्थलांतम् ।
जपारागबिंबाधरं क~जनेत्रं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ५ ॥

किरीटोज्वलत्सर्वदिक्प्रांतभागं
सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः ।
त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ६ ॥

विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं
स्वयं लीलया गोपवेषं दधानम् ।
गवां बृन्दकानन्ददं चारुहासं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ७ ॥

अजं रुक्मिणीप्राणसञ्जीवनं तं
परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ८ ॥

स्तवं पाण्डुरंगस्य वै पुण्यदं ये
पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् ।
भवांभोनिधिं ते वितीर्त्वान्तकाले
हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥

॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यस्य श्रीगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्यस्य श्रीमच्छङ्करभगवतः कृतौपाण्डुरङ्गाष्टकं संपूर्णम् ॥

पांडूरंग अष्टक समाप्त

श्री संत ज्ञानेश्वर अष्टक पहा
येथे क्लिक करा.

स्तोत्र संग्रह

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *