अवदसा अलक्ष्मी कुठे राहते

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अलक्ष्मी/अवदसा/अवदसा

ही लक्ष्मीची मोठी बहीण असून
ती दुर्भाग्याची देवता मानलेली आहे.

अलक्ष्मीदुर्भाग्य – इत्यादींची अधिपती देवता
संस्कृतअलक्ष्मीः
निवासस्थानपिंपळ वृक्ष
लोकनरक, निर्ऋती, दिक्पाल
वाहनगाढव, कावळा
शस्त्रकेरसुणी
पतीकलि (राक्षस)
अपत्येमृत्यू, अधर्म
अन्य नावे/ नामांतरेज्येष्ठा देवी, निर्ऋती, विषमलक्ष्मी
या अवताराची मुख्य देवतानिर्ऋती, धुमावती
नामोल्लेखपद्मापुराण, विष्णु पुराण लिगंपुराण, कल्किपुराण, श्रीसुक्त

आपल्या समाजात स्त्रीला लक्ष्मी म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार स्त्रियांच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्या भविष्याशी संबंधित गोष्टींबद्दल मजेशीर वर्णन देखील ग्रंथांमध्ये आढळते.

‘बृहद संहिता’ या सुप्रसिद्ध ग्रंथात दोन प्रकारच्या स्त्रियांचे शुभ लक्षण आणि अशुभ चिन्हे सांगितली आहेत. शुभ चिन्हांच्या आधारे स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते,

कल्कि पुराणातील अलक्ष्मी माहात्म्य
कल्किपुराणानुसार

अलक्ष्मी कलि राक्षसाची दुसरी पत्नी,
अधर्म आणि हिंसेची मुलगी,
मृत्यूची, अधर्माची माता आहे.

१. आळस,
२. खादाडपणा,
३. मत्सर,
४. क्रोध,
५. ढोंगीपणा,
६. लोभ
७. असत्य,
८. अस्वच्छता,
९. अनीती,
१०.भ्रष्टाचार व
११. अज्ञान यांची देवता.
१२. वासना,
कलियुगात
जुगार,
दारू,
वेश्याव्यवसाय,
कत्तल,
लोभ येथे राहणे अलक्ष्मीला आवडते.

कल्किपुराण व विष्णुपुराणानुसार, ती
१. कृष्णवर्णी, (रंगाने काळी)
२. आरक्तनेत्र, (लाल डोळ्याची)
३.द्विभुज,
४. लांब नाकाची,
५. लोबलेले मोठे स्तन
६. पोट मोठे असलेली,
७. कमळ व काकध्वज (कावळा) धारण करणारी,
८. बैलासारखी तोंड असलेली व कन्यापुत्रसहित असते. केरसुणी हे तिचे आयुध होय.
९. शरीरावर म्हातारपणाच्या खुणा (तरुणपणीही म्हातारे दिसणे)
१०. केस पिंगट

दक्षिण भारतात या ज्येष्ठेचे मोठे महत्त्व आहे. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे तर गाढव हे तिचे वाहन असते. रोगराई, मरीआई, यांची देवता असेही तिचे वर्णन काही ठिकाणी आलेले आहे.

जन्म

           पद्मपुराणामध्ये हिच्या विषयीची कथा सांगितली आहे ती अशीदेवासुरांनी केलेल्या समुद्रमंथनातून कालकूटानंतर पण लक्ष्मीच्या आधी वर आली म्हणून हिला लक्ष्मीची मोठी बहीण किंवा ज्येष्ठा लक्ष्मी म्हटली आहे. तिच्याविषयीच्या श्‍लोकाचा अर्थ असा- कालकूटानंतर अलक्ष्मी/अवदसा/अवदसा वर आली, तिचे तोंड काळे, डोळे लाल आणि केस पिंगट होते. तिच्या शरीरावर म्हातारपणाच्या खुणा होत्या

 .                          अवदसा कोणत्या घरात राहते ?


 अलक्ष्मी/अवदसा/अवदसा समुद्रातून वर आल्यावर ती देवांना म्हणाली मी काय करु? त्यावर देवांनी तिला सांगितले की तू
१. कोळसे,
२. केस,
३. कोंडा
४. केर, कचरा
५. अस्थी (हाड ) यामध्ये राहा.
६. ज्या घरात कलह असेल तिथे तू राहा.
७. जिथे असत्य, (खोटे बोलणे)
८. कठोर भाषण चालते,
९. सायंकाळी अभक्ष्य भक्षण (मांसाहार) केले जाते,
१०. गुरु,
११. देव,
१२. अतिथी यांचा समादर होत नाही.
१३. वेदमंत्रांचा घोष जिथे नसतो, जिथे
१४. परद्रव्यापहरण (लुबाडलेले धन)
१५. परदारागमन, (पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रियांचा भोग)
१६. सज्जन निंदा
इ. गोष्टी चालतात तिथे तू राहा. त्याप्रमाणे ती राहली.

विवाह

समुद्रमंथनातून लक्ष्मी वर आली. तिचा विष्णूबरोबर विवाह ठरला परंतु ज्येष्ठेच्या आधी कनिष्ठेचे लग्न कसे करायचे असा प्रश्‍न लक्ष्मीने उपस्थित केला तेव्हा विष्णूने अलक्ष्मी/अवदसा/अवदसाचे उद्दालक नावाच्या दीर्घ तपस्या करणार्‍या ऋषीबरोबर लग्न लावून दिले.

त्याग
परंतु उद्दालकाचा वैदिक आचार पाहून तिला तो आवडेनासा झाला आणि उद्दालकालाही तिचा स्वभाव आवडला नाही. अखेर उद्दालकाने अलक्ष्मी/अवदसा/अवदसाला पिंपळाखाली बसायला सांगितले आणि तो निघून गेला. उद्दालक परत येत नाही हे पाहून अलक्ष्मी/अवदसा/अवदसा रडू लागली..

वरप्राप्ती
तिचा तो आक्रोश  ऐकून लक्ष्मी विष्णूसह तिला भेटायला आली विष्णूने तिचे सांत्वन केले व तिथेच राहायला सांगितले तो म्हणाला, दर शनिवारी लक्ष्मी तुला भेटायला येईल व त्यामुळे शनिवारी एशस्थ पूज्य मानला जाईल आणि जे तुझी पूजा करतील, त्यांच्या ठिकाणी लक्ष्मी निश्चल राहील.

वर्णन
अलक्ष्मी/अवदसा/अवदसाच्या मूर्तीचे वर्णन काश्यप शिल्प, अशुमद्भेदागम, सुप्रेभदायम, पूर्व कारणागम इ. ग्रंथामध्ये आढळले आहे. ते वर्णन असे ही द्विभूजा, कृष्णवर्णाची, मोठ्या ओठांची, लांब नाकाची, लोंबणार्‍या स्तनांची, निळे वा लाल रंगाचे वस्त्र नेसलेली, उजव्या हातात कमळ आणि डाव्या हातात कर्‍हा धारण करणारी व भद्रपीठावर पाय सोडून सुखाने बसलेली असून तिने विविध अलंकार धारण केलेले असून वेणी घातलेली आहे. तिच्या रथावर, काक चिन्हांकीत ध्वज असतो. ती कन्यापुत्रासहीत असते. तिच्या उजव्या बाजूला मागे बैलाचे तोंड असलेला मुलगा असतो. लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी/अवदसा/अवदसाला पूजले जाते

कुठे राहते
अलक्ष्मी पिंपळाच्या झाडाखाली निवास करते.

प्रथा

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्‌मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मध्यरात्रीनंतर सुप व दिमडी वाजवून अलक्ष्मीला हाकलून देण्‍याची प्रथा आहे.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कर्कश वाद्ये, फटाके वाजविणे ,मांसाहार टाळावे, कारण त्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाहीत.

बंगालमध्ये आश्विनी अमावस्येस शेणाची ‘क्षणिका अलक्ष्मी’ बनवून लक्ष्मीप्रमाणेच तिची पूजा करतात व मग तिचे विसर्जन करतात.

अन्य नावे
धुमावती ही दहा महाविद्यांपैकी एक मानली जाते.

ज्येष्ठा देवी लक्ष्मीची मोठी बहीण आहे. महाराष्ट्रात ‘अक्काबाई’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही देवी लक्ष्मीची मोठी बहीण होय. समुद्रमंथनाच्या वेळी दोघी बहिणींमध्ये ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. लक्ष्मीशी श्रीविष्णूने लग्न केले पण या मोठीचा हात धरायला कोणी तयार होईना. शेवटी कपिल मुनींनी तिच्याशी लग्न केले अशी कथा पुराणात आढळते. आदिवासी जमातीमध्ये ती गावाच्या सीमेवरील एखाद्या गोल दगडाच्या स्वरूपात असते तर कधी ती एखाद्या लाकडाच्या ओबडधोबड मूर्तीच्या रूपात असते. गावाचे, वस्तीचे रक्षण करणारी ती गावदेवी होते. त्याचसोबत देवी ही विविध रोगांचा नायनाट करणारी म्हणूनही प्रस्थापित असते. मग ती सटवाई, मरीआई, अक्काबाई या नावांनी दिसते.

ततो ज्येष्ठा समुत्पन्ना काषायाम्बरधारिणी।
पिंगकेशा रक्तनेत्रा कूष्माण्डसदृशस्तनी।।
अतिवृद्धा दन्तहीना ललज्जिह्वा घटोदरी।
यां दृष्ट्वैव च लोकोऽयं समुद्विग्नरू प्रजायते।।

कलहप्रिया (भांडणे आवडणे.)आणि आमिषप्रिय (मांसाहार प्रिय)
निर्ऋती (अष्ट-दिक्पाल)आठ दिशांमधील नैर्ऋत्य दिशा ; दक्षिण आणि पश्चिम या दिशांमधील उपदिशा (नाश ; मृत्यू ; नैर्ऋत्य दिशेची देवता )

पद्मपुराणम्/खंड १ (सृष्टिखण्डम्)/अध्यायः ०५. १७ मध्ये, निर्ऋती राक्षसेन्द्रोऽसौ दिक्पतित्वे नियोजितः| स च त्विहागतस्तात पत्न्या सार्द्धं क्रताविह||

नारी महात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *