सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १३०१ ते १३२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

1301-18
वेद्योदकाच्या सरोवरीं । फांकतां विषयकल्हारीं । इंद्रियषट्पदा चारी । जीवभ्रमरातें ॥1301॥
व जो दृश्यपदार्थ हेंच आहे उदक ज्यांत, अशा सरोवरांत पंचविषयरूप कमले प्रफुल्लीतझाली असता, पंचज्ञानेंद्रिये व मन हे आहेत सहा पाय ज्या जीवभ्रमरांना, त्यांजकडून तो कमलगंध सेवन करवितो.1301
1302-18
असो रूपक हें तो ईश्वरु । सकल भूतांचा अहंकारु । पांघरोनि निरंतरु । उल्हासत असे ॥1302॥
हे रूपक असो; असा समष्टिभूतांच्या अहंकाराचा अभिमान निरंतरधारण करून जो मिरवत असतो. तो ईश्वर होय. 1302
1303-18
स्वमायेचें आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र । बाहेरी नटी छायाचित्र । चौर्याशीं लक्ष ॥1303॥
आपल्या शुद्ध स्वरूपाच्या आपल्याच मायेचा पडदा लावून, एकटा सर्व दोरी हलवून, बाहेर चौर्यांशीं लक्ष विचित्र छायाचित्रे नाचवितो. 1303
1304-18
तया ब्रह्मादिकीटांता । अशेषांही भूतजातां । देहाकार योग्यता । पाहोनि दावी ॥1304॥
तो, ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत अशेष भूतमात्रांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार देह देतो. 1304
1305-18
तेथ जें देह जयापुढें । अनुरूपपणें मांडे । तें भूत तया आरूढे । हें मी म्हणौनि ॥1305॥
त्यावेळीं, ज्या भूतापुढे जो देह त्याला योग्य किंवा अनरूप म्हणून मांडवा, त्या देहांत ते भूत, ‘ हा मी’ अशा बुद्धीने प्रवेश करितें. 1305

1306-18
सूत सूतें गुंतलें । तृण तृणचि बांधलें । कां आत्मबिंबा घेतलें । बाळकें जळीं ॥1306॥
सुतानें सूत गुंतवावें, गवतानेच गवत बांधावें,किंवा बालकाने पाण्यांतील आपलें प्रतिबिंब घेऊ पहावें. 1306
1307-18
तयापरी देहाकारें । आपणपेंचि दुसरें । देखोनि जीव आविष्करें । आत्मबुद्धि ॥1307॥
त्याप्रमाणे पुढे दिसणारी देहाकृति ही आपणच आहों असें भ्रमानें मानून जीव तेथे आत्मबुद्धीनें आविर्भूत होतो. 1307
1308-18
ऐसेनि शरीराकारीं । यंत्रीं भूतें अवधारीं । वाहूनि हालवी दोरी । प्राचीनाची ॥1308॥
ह्याप्रमाणे देहाकार यंत्रांवर भूतांना घालून, त्यांच्या प्रारब्धकर्मानुसार ईश्वर सूत्र चाळवतो. 1308
1309-18
तेथ जया जें कर्मसूत्र । मांडूनि ठेविलें स्वतंत्र । तें तिये गती पात्र । होंचि लागे ॥1309॥
तेथे ज्या ज्या भूताचे (जीवाचे) जें जें स्वतंत्र (निराळे) प्रारब्धसूत्र मांडलेले असते त्या त्या गतीला तें तें भूत प्राप्त होऊ लागले. 1309
1310-18
किंबहुना धनुर्धरा । भूतांतें स्वर्गसंसारा । -माजीं भोवंडी तृणें वारा । आकाशीं जैसा ॥1310॥
किंबहुना अर्जुना, वारा गवताच्या काड्या जशा आकाशांत इतस्ततः उडवितो, तसें हें जीवांचे प्रारब्धकर्म त्यांना स्वर्गा पासून मृत्युलोकापर्यंत इतस्ततः फिरविते. 1310

1311-18
भ्रामकाचेनि संगें । जैसें लोहो वेढा रिगे । तैसीं ईश्वरसत्तायोगें । चेष्टती भूतें ॥1311॥
लोहचुंबकाच्या सान्निध्याने लोखंडाला जशी गति प्राप्त होते, ती ईश्वरसत्तेच्या योगाने भूतें व्यवहार करतात. 11
1312-18
जैसे चेष्टा आपुलिया । समुद्रादिक धनंजया । चेष्टती चंद्राचिया । सन्निधी येकीं ॥1312॥
ज्या प्रमाणे एका चंद्राच्या सान्निध्याने समुद्रादिकांच्या ठीकाणी हालचाल (चेष्टा) चालू होते. 12
1313-18
तया सिंधू भरितें दाटें । सोमकांता पाझरु फुटे । कुमुदांचकोरांचा फिटे । संकोचु तो ॥1313॥
या चेष्टा अशा-समुद्राला भरती येते, सोमकांत मण्याला पाझर फुटतो; चंद्रविकासिनी कमलें फुलतात व व चकोर पक्षांस आनंद होतो. 13
1314-18
तैसीं बीजप्रकृतिवशें । अनेकें भूतें येकें ईशें । चेष्टवीजती तो असे । तुझ्या हृदयीं ॥1314॥
त्याप्रमाणे मूलप्रकृतीच्या अनुरोधानें ईश्वर अनेक भूतमात्र एकसमयावच्छेदैकरून चाळवितो, तो तुझ्या हृदयामध्यें वास करून आहेच. 14
1315-18
अर्जुनपण न घेतां । मी ऐसें जें पंडुसुता । उठतसे तें तत्वता । तयाचें रूप ॥1315॥
अर्जुनाच्या भावनेला स्पर्श न करितां ” केवल मी (अस्तितामात्र) असें जें नित्यस्फुरद्रूप चैतन्य तें त्या ईश्वराचे (परमात्मा) तात्विकरूप होय,15

1316-18
यालागीं तो प्रकृतीतें । प्रवर्तवील हें निरुतें । आणि तें झुंजवील तूंतें । न झुंजशी जऱ्ही ॥1316॥
म्हणून तो ईश्वर, प्रकृतीला प्रवृत्त करून तिच्या द्वारें झुंजणार ही असा निश्चय करून बसलेल्या तुला लढवील हे निश्चित होय. 16
1317-18
म्हणौनि ईश्वर गोसावी । तेणें प्रकृती हे नेमावी । तिया सुखें राबवावीं । इंद्रियें आपुलीं ॥1317॥
म्हणून, सर्व व्यवहाराचा ईश्वर हा मी आहे तो प्रकृतीचे नियमन करितो व तिच्या द्वारा आपली सर्व इंद्रियें आपपला व्यवहार सुखाने किंवा सूरळीत करितात.17
1318-18
तूं करणें न करणें दोन्हीं । लाऊनि प्रकृतीच्या मानीं । प्रकृतीही कां अधीनी । हृदयस्था जया ॥1318॥
म्हणून तू, करणे न करणे वगैरे सर्व गोष्टी प्रकृतीवर सोपवून तीही ज्या हृदयस्थ ईश्वराच्या अधीन आहे. 18
तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत ।
तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥18.62॥

1319-18
तया अहं वाचा चित्त आंग । देऊनिया शरण रिग । महोदधी कां गांग । रिगालें जैसें ॥1319॥
त्याला, गंगानदी जशी महासागराला शरण जाते (मिळते) तसा काया, वाचा,करून शरण हो. (अनन्य, तद्रूप) 19
1320-18
मग तयाचेनि प्रसादें । सर्वोपशांतिप्रमदे । कांतु होऊनिया स्वानंदें । स्वरूपींचि रमसी ॥1320॥
मग त्याच्या प्रसादानें, सर्वांचे खऱ्या विश्रांतीचे स्थान जी शान्ति स्त्री तिचा तू स्वामी होऊन निजानंदस्वरूपांत रममाण होशील 1320

1321-18
संभूति जेणें संभवे । विश्रांति जेथें विसंवे । अनुभूतिही अनुभवे । अनुभवा जया ॥1321॥
जें उत्पत्ति स्थिति, लयाचे आदिकारण, (अधिष्ठान) विश्रांतीचे विश्रामस्थान व अनुभवाचाही अनुभव असे आहे. 21
1322-18
तिये निजात्मपदींचा रावो । होऊनि ठाकसी अव्यवो । म्हणे लक्ष्मीनाहो । पार्था तूं गा ॥1322॥
या स्वात्मस्वरूपपदाचा राजा होऊन, अर्जुना, तेथून तू कधीही च्युत होणार नाहीस बरें, असे लक्ष्मीपति भगवान श्रीकृष्ण म्हणाले. 22
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥18.63॥

1323-18
हें गीता नाम विख्यात । सर्ववाङ्गमयाचें मथित । आत्मा जेणें हस्तगत । रत्न होय ॥1323॥
शब्दराशि सर्व वाङ्मयरूप जो वेद त्याच्या मंथनाने काढलेले हे प्रसिद्ध गीतामृत होय; ह्याच्या सेवनाने करतलावरील रत्नाप्रमाणे आत्मस्वरूप हस्तगत (अपरोक्ष) 23
1324-18
ज्ञान ऐसिया रूढी । वेदांतीं जयाची प्रौढी । वानितां कीर्ति चोखडी । पातली जगीं ॥1324॥
ह्या गीताशास्त्राचे, वेदान्तांत ज्याची अत्यंत थोरवी गाइली आहे असे ज्ञान हे रूढनाम आहे; ‘तिच्या; वर्णनाने शास्त्रे जगात कीर्ती पावली 24
1325-18
बुद्ध्यादिकें डोळसें । हें जयाचें कां कडवसें । मी सर्वद्रष्टाही दिसें । पाहला जया ॥1325॥
ज्या ज्ञानाच्यापुढे बुद्धयादिक म्हणून गणली गेलेली डोळस ज्ञाने ही केवळ अणुमात्र होत; व ज्याच्या उदयाने सर्वद्रष्टा जो मी, त्याचे दर्शन होतें. 25

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading