काय आहे बलिप्रतिपदेची कथा ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🕉️ बलिप्रतिपदा 🕉️
२६/१०/२०२२, बुधवार

दिवाळी हा सर्व सणांचा राजा असून याला दीपोत्सव असे सुद्धा म्हटले जाते. या दीपोत्सवाची सुरुवातच गोमातेच्या पूजनाने होते व सांगता ही बहिण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या भाऊबीजेने होत असते. या दिवाळीच्या उत्सवामध्येच धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन व त्याचप्रमाणे दीपावलीतील पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा यांसारखे महत्त्वाचे सण येत असतात.
दिवाळीतील पाडवा अर्थात बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त. या दिवशी लक्ष्मी व कुबेराचे पूजन करून व्यापारी लोक वहीचे पूजन करतात.

शुभ मुहूर्त : वही पूजनासाठी सकाळी ६:४५ ते स. ९:३० ही शुभ वेळ असून सकाळी ११ ते दु. १२:१५ व दु.४:३० ते सायं.६ या वेळीदेखील वहीपूजन करता येईल. ज्यांना सायंकाळी वही पूजन करायचे आहे अशा व्यापाऱ्यांसाठी सायं.०७:४० ते सायं.०९:१० या वेळेत वहीपूजन करता येईल.

बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा केली जाते. राजा बळीला भगवान विष्णूकडून अमर होण्याचे वरदान मिळाले होते. या दिवशी त्यांची पूजा केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी लाभते. तुम्हाला माहिती आहे का राजा बळी कोण होता?
अशी एक आख्यायिका बोलली जाते की एकदा भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे तीन पायरी जमीन मागितली होती. राजा बळीने पहिली पायरी ब्रह्मांड आणि दुसरी पायरी पृथ्वी दिली होती. यानंतर वामनाने जेव्हा बळीला तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे विचारले तेव्हाबळीने त्याचे डोके पुढे केले.

वामनाने बळीच्या मस्तकावर पाय ठेवताच राजा बळी अधोलोकात पोहोचला. या वेळी विष्णू भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन प्रतिपदेला तुझी पूजा होईल, असा त्याला आशीर्वाद दिला. तेव्हापासून राजा बळीची बलिप्रतिपदाला पूजा केली जाते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠
संपर्क : पं. प्रभाकर आचार्य गुरूजी आळंदी जिल्हा पुणे
➖➖➖➖➖➖➖➖

पाडवा पूजा विधी
🔵 या दिवशी सुरवातीला बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करावे.
🔵 जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी.
🔵 या दिवशी पक्वान्नांचे भोजन करावे.
🔵 बळीला नैवेद्य दाखवावा.


🔵 यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे.
🔵 बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करावे.
🔵 या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रियांनी पतीला ओवाळावे.
🔵 व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते.
🔵 व्यापरी या दिवशी नव्या वह्यांचे पूजन केलं जातं. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *