विष्णुसहस्त्रनामातील ३१ अद्भुत मंत्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

*** *अधिकस्य अधिकं फलम् – १३* ***

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र‘ हा भक्तश्रेष्ठ श्री भीष्माचार्यांनी रचलेला अत्यंत अद्भुत असा एक मालामंत्र आहे. शिवाय यातील प्रत्येक श्लोक हाही स्वतंत्र मंत्र आहे. या विविध मंत्रांचे असंख्य अनुभूत प्रयोगही जुन्या जाणत्या महात्म्यांनी सांगून ठेवलेले आहेत. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या *’श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य’* ग्रंथामध्ये त्यांच्या श्रीगुरुपरंपरेने आलेले अतिशय प्रभावी असे यातील एकवीस मंत्रांचे प्रयोग दिलेले आहेत. हे सर्व स्वानुभूत सिद्ध मंत्रप्रयोग आहेत. आजवर इतरत्र कुठेच यांचा उल्लेखही आलेला नाही. कोणीही श्रद्धेने यांचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतो. आजपासून आपण त्यातील काही मंत्रप्रयोग पाहू या.

*१. इच्छापूर्ती होण्याकरिता मंत्र*

*असंख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्ट: शिष्टकृच्छुचि: I*
*सिद्धार्थ: सिद्धसंकल्प: सिद्धिद: सिद्धिसाधन: II४०II*

अर्थ :-
*असंख्येय:* – ज्याच्यात नाम, रूप इत्यादी भेद नाहीत, असा;
*अप्रमेयात्मा* – ज्याच्या स्वरूपाचे मोजमाप होत नाही, असा;
*विशिष्ट:* – सर्वोत्कृष्ट;
*शिष्टकृत्* – शासन करणारा;
*शुचि:* – परम पवित्र;
*सिद्धार्थ:* – ज्याचे सर्व अर्थ सिद्ध झाले आहेत, असा
*सिद्धसंकल्प:* – सत्यसंकल्प असलेला;
*सिद्धिदः* – कर्माचे योग्य फल देणारा;
*सिद्धिसाधन:* – सिद्धींचा दाता.

या मंत्राचा आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईपर्यंत, शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – १४* ***
*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*३. कार्यसिद्धी होण्याकरिता मंत्र*

*भूतभव्यभवन्नाथ: पवन: पावनोऽनल: I*
*कामहा कामकृत्कान्त: काम: कामप्रद: प्रभु: II४५II*

*भूतभव्यभवन्नाथ:* – त्रैकालिक सर्व प्राण्यांचा स्वामी
*पवन:* – वायुरूप
*पावन:* – चालक
*अनल:* – अनंत
*कामहा* – भक्तांच्या विषयवासना नष्ट करणारा
*कामकृत्* – भक्तांच्या कामना पूर्ण करणारा
*कान्त:* – अत्यंत रूपवान
*काम:* – पुरुषार्थाची आकांक्षा करणाऱ्यांकडून इच्छिलेला
*कामप्रद:* – भक्तांच्या कामना सर्वस्वी पूर्ण करणारा
*प्रभु:* – सर्वोत्कृष्ट.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् -१५* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*
*३. सर्वरोगनाशाकरिता मंत्र*
*अमृतांशूद्भवो भानु: शशबिन्दु: सुरेश्वर: I*
*औषधं जगत: सेतु: सत्यधर्मपराक्रम: II४४II*

*अमृतांशूद्भव:* – चंद्र ज्याच्या पासून उत्पन्न झाला, तो
*भानु:* – प्रकाशमान
*शशबिन्दु:* – चंद्राप्रमाणे प्राणिमात्रांचे पोषण करणारा
*सुरेश्वर:* – देवाधिदेव
*औषधं* – संसाररोगावरचे औषध
*जगत: सेतु:* – भवसागर पार करण्याकरता सेतुरूप
*सत्यधर्मपराक्रम:* – धर्म आदी गुण व ज्याचा पराक्रम सत्य आहे, तो

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून दररोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – १६* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*४. अर्थप्राप्तीसाठी मंत्र*

*विस्तारः स्थावरस्थाणु: प्रमाणं बीजमव्ययम् ।*
*अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः ॥५९॥*

*विस्तारः* – सकल भुवनांचा विस्तार ज्यामध्ये आहे असा
*स्थावरस्थाणुः* – स्वतः स्थिर असून पृथ्वी आदींना स्थैर्य देणारा
*प्रमाणम्* – ज्ञानरूप असल्याने स्वयंप्रमाणरूपी
*बीजमव्ययम्* – संसाराचे एकमेव अविनाशी कारण
*अर्थः* –  सुखस्वरूप असल्याने सर्वजण ज्याची प्रार्थना करतात, तो
*अनर्थः* – कृतकृत्य असल्याने प्रयोजनरहित
*महाकोशः* – अन्नमय इत्यादी महाकोशांनी झाकलेला
*महाभोग:* – आनंदरूप श्रेष्ठ भोजन घेणारा
*महाधनः* – ज्याचे भोगाचे साधनस्वरूप महान धन आहे, असा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – १७* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*५. व्यवसायवृद्धी व नोकरीत बढती होण्याकरिता मंत्र*

*व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः ।*
*परर्द्धि: परमस्पष्टस्तुष्ट: पुष्टः शुभेक्षणः ॥*

*व्यवसाय:* – ज्ञानमात्रस्वरूप
*व्यवस्थानः* – सर्व विश्वाची व्यवस्था करणारा
*संस्थानः* – प्रलयकाळी प्राणिमात्रांचे स्थान असलेला
*स्थानदः* – प्रत्येकाला कर्माप्रमाणे स्थान देणारा
*ध्रुवः* – अविनाशी
*परर्द्धि* – श्रेष्ठ विभूतिस्वरूपी
*परमस्पष्टः* – श्रेष्ठ वैभव व ज्ञान असलेला
*तुष्टः* – एकमात्र परमानन्दस्वरूप
*पुष्ट:* – सर्वत्र परिपूर्ण
*शुभेक्षणः* – दर्शनाने कल्याण करणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – १८* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*२. मानसिक विकार दूर होण्याकरिता मंत्र*

*वेद्यो वैद्य: सदायोगी वीरहा माधवो मधु: ।*
*अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल: ॥३१॥*

*वेद्य:* – कल्याणाची इच्छा असणा-यांकडून जाणण्यास योग्य.
*वैद्य:* – सर्व विद्या जाणणारा.
*सदायोगी* – नेहमी प्रत्यक्ष असणारा.
*वीरहा* – राक्षसांना मारणारा.
*माधव:* – विद्यापती.
*मधु:* – मधाप्रमाणे प्रसन्नता उत्पन्न करणारा.
*अतीन्द्रिय:* – इंद्रियातीत.
*महामाय:* – मायावींच्या वर आपल्या मायेचे वर्चस्व ठेवणारा.
*महोत्साह:* – परम उत्साही.
*महाबल:* – अत्यंत बलशाली.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – १९* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*७. स्मरणशक्ती वाढण्याकरिता मंत्र*

*महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः ।*
*अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् ॥३२॥*

*महाबुद्धि:* – महान बुद्धिमान
*महावीर्यः* – माया हे ज्याचे महान वीर्य आहे, असा
*महाशक्ति:* – महान सामर्थ्यवान
*महाद्युतिः* – अंतर्बाह्य अत्यंत कान्तिमान
*अनिर्देश्यवपुः* – ज्याच्या शरीराविषयी सांगणे शक्य नाही, असा
*श्रीमान्* – समग्र ऐश्वर्यशाली
*अमेयात्मा* – ज्याच्या बुद्धीचे मोजमाप केले जात नाही, असा
*महाद्रिधृक्* – मंदर आणि गोवर्धन या महान पर्वतांना धारण करणारा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – २०* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*८. विवाहयोग जुळून येण्याकरिता मंत्र*

*कामदेवः कामपालः कामी कान्त: कृतागमः ।*
*अनिर्देश्यवपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनंजयः ॥८३॥*

*कामदेवः* – चार पुरुषार्थांची इच्छा करणाऱ्या मनुष्यांनी इच्छिलेला देव.
*कामपाल:* – सकाम भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा.
*कामी* – पूर्णकाम.
*कान्तः* सुंदर शरीर धारण केलेला.
*कृतागमः* – सर्व वेदशास्त्रांची रचना करणारा
*अनिर्देश्यवपुः* – ज्याच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करता येत नाही, असा.
*विष्णु:* – ज्याची कांती पृथ्वी आणि आकाश यांना व्यापून आहे, असा.
*वीरः* – गतिमान.
*अनन्तः* – ज्याला अन्त नाही, असा.
*धनंजयः* – अर्जुनरूप. 

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – २१* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*९. प्रतिकूल काळात रक्षण होण्याकरिता मंत्र*

*ऋतुः सुदर्शन: कालः परमेष्ठी परिग्रहः ।*
*उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः॥५८॥*

*ऋतुः* – काळरूप.
*सुदर्शन:* – ज्याचे दर्शन मोक्ष देणारे आहे, असा.
*कालः* – सर्वांची गणना करणारा.
*परमेष्ठी* – आपल्या सर्वोत्तम महिम्यात राहणारा.
*परिग्रहः* – शरणार्थी ज्याला सर्वत्र पाहतात, असा.
*उग्रः* – सूर्य आदी ज्याचे भय बाळगतात, असा.
*संवत्सरः* – सर्व भूतमात्रांचे निवासस्थान.
*दक्ष:* – सर्व कार्ये तत्परतेने करणारा.
*विश्राम:* – मुमुक्षूंना विश्रांती देणारा.
*विश्वदक्षिणः* – सर्वांत दक्ष.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – २२* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*१०. सर्वप्रकारचे कल्याण होण्याकरिता मंत्र*
|
*अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः ।*
*श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमतांवरः ॥७७॥*

*अनिवर्ती* – रणभूमीतून मागे न हटणारा.
*निवृत्तात्मा* – विषयांपासून स्वभावतः दूर राहणारा.
*संक्षेप्ता* – प्रलयकाळी सृष्टीला सूक्ष्म करणारा.
*क्षेमकृत्* – प्राप्त पदार्थाचे रक्षण करणारा.
*शिवः* – नामस्मरणानेही पवित्र करणारा.
*श्रीवत्सवक्षाः* – वक्षावरती श्रीवत्स चिन्ह धारण करणारा.
*श्रीवासः* – ज्याच्या हृदयात लक्ष्मीचे निवासस्थान आहे, असा.
*श्रीपतिः* – लक्ष्मीचा पती.
*श्रीमतांवरः* – वेदरूप ऐश्वर्याने युक्त अशा ब्रह्मादी देवांच्यापेक्षा श्रेष्ठ.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – २३* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*११. वैषयिक-वासनानाशाकरिता मंत्र*

*भूतावासो वासुदेवः सर्वासुनिलयोऽनलः ।*
*दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः ॥८९॥*

*भूतावासः* – भूतमात्रांचे मुख्य निवास-स्थान.
*वासुदेवः* – आपल्या मायेने जगाला आच्छादणारा देव.
*सर्वासुनिलय:* – सर्व प्राणांचा जीवरूप आधार
*अनलः* – अपार शक्ती आणि संपत्तीने युक्त.
*दर्पहा*  – अधर्मी लोकांचा अहंकार नष्ट करणारा.
*दर्पदः* – धार्मिकांना गौरव देणारा.
*दृप्तः* – नित्य आनंदात मग्न असलेला.
*दुर्धरः* – हृदयामध्ये धारण करण्यास कठीण.
*अपराजितः* – अंतर्बाह्य-शत्रूंकडून पराजित होत नाही, असा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – २४* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*१२. भय, चिंता दूर होण्याकरिता मंत्र*

*सहस्रार्चिः सप्तजिह्व: सप्तैधाः सप्तवाहनः ।*
*अमूर्तिरनघोऽचिन्त्यो भयकृद्भयनाशनः ॥१०२॥*

*सहस्रार्चिः* – हजारो किरण असलेला.
*सप्तजिह्व:* – काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, धूम्रवर्णा, स्फुलिंगिनी व विश्वरुची अशा सात जिह्वा असलेला, अग्निरूप.
*सप्तैधाः* – सात ज्वाला असलेला, अग्निरूप.
*सप्तवाहनः* – सात घोड्यांचे वाहन असलेला, सूर्यरूप.
*अमूर्तिः* – निराकार.
*अनघः* – निष्पाप.
*अचिन्त्य:* – चिंतनाने आकलन न होणारा.
*भयकृत्* – दुष्टांना भयभीत करणारा.
*भयनाशनः* – वर्णाश्रम पाळणाऱ्यांचे भय नाहीसे करणारा.
|
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – २५* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*१३. शांत निद्रा आणि दुःस्वप्ननाश याकरिता मंत्र*

*उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दु:स्वप्ननाशनः।*
*वीरहा रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः ॥११२॥*

*उत्तारण:* – संसार-सागराच्या पार नेणारा.
*दुष्कृतिहा* – पापांचा नाश करणारा.
*पुण्यः* – पुण्य प्रदान करणारा
*दुःस्वप्ननाशन:* – वाईट स्वप्नांचा नाश करणारा.
*वीरहा* – सांसारिकांच्या विविध गतींचा नाश करून त्यांना मुक्ती देणारा.
*रक्षणः* – संरक्षण करणारा.
*सन्तः* – सन्तरूप.
*जीवनः* – सर्व प्राण्यांना प्राणरूपाने जिवंत ठेवणारा.
*पर्यवस्थितः* – विश्वाला व्यापून राहणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – २६* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*१४. भगवत्कृपा होण्याकरिता मंत्र*

*श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावन: ।*
*श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमाँल्लोकत्रयाश्रयः ॥७८॥*

*श्रीदः* – भक्तांना ऐश्वर्य देणारा.
*श्रीश:* – लक्ष्मीपती.
*श्रीनिवासः* – श्रीमंतांमध्ये नित्य वास करणारा.
*श्रीनिधिः* – सर्व ऐश्वर्याचा आधार.
*श्रीविभावनः* – मनुष्यांना कर्मानुसार ऐश्वर्य देणारा.
*श्रीधरः* – मायेला धारण करणारा.
*श्रीकरः* – स्मरण, स्तवन आणि पूजन करणाऱ्यांना ऐश्वर्य देणारा.
*श्रेयः* – परमकल्याणरूपी.
*श्रीमान्* – सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त.
*लोकत्रयाश्रयः* – तीनही लोकांचे आश्रयस्थान.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – २७* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*१५.  साधनेतील विघ्नांचा नाश होण्याकरिता मंत्र*

*वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणव: पृथुः ।*
*हिरण्यगर्भ: शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ॥ ५७॥*

*वैकुण्ठः* – पंचभूतांच्या परस्परविरोधी गती अडवून त्यांना एकमेकांशी जोडणारा.
*पुरुषः* – शरीरात राहणारा.
*प्राणः* – प्राणवायुस्वरूप.
*प्राणदः* – प्राण्यांचे प्राण खंडित करणारा.
*प्रणवः*  – ज्याला वेदही प्रणाम करतात असा, ॐकाररूपी.
*पृथुः* – प्रपंचरूपाने विस्तार पावणारा.
*हिरण्यगर्भः* – ज्याच्यापासून हिरण्यमय अण्डे उत्पन्न झाले, तो.
*शत्रुघ्नः* – शत्रूंना मारणारा.
*व्याप्त:* – कारणरूपाने सर्व कार्यांत व्याप्त असणारा.
*वायुः*  – वायुरूप.
*अधोक्षजः*  – आपल्या स्वरूपापासून क्षीण न होणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

*** *अधिकस्य अधिकं फलम् – २८* ***

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*१७. अज्ञानाने अथवा नकळत झालेल्या पापांच्या नाशाकरिता मंत्र*

*आत्मयोनिः स्वयंजातो वैखानः सामगायनः ।*
*देवकीनन्दन: स्रष्टा क्षितीशः पापनाशनः ॥११९॥*
|

*आत्मयोनिः* – स्वतःच स्वतःचे उपादान-कारण असणारा.
*स्वयंजातः* – स्वतःच स्वतःचे निमित्त-कारण असणारा.
*वैखानः* – भूमीला विशेषरूपाने खोदून काढणारा
*सामगायनः* – सामगान करणारा.
*देवकीनंदन:*  – देवकीचा पुत्र.
*स्रष्टा* – सर्व लोक रचणारा.
*क्षितीशः* – पृथ्वीपती.
*पापनाशनः* – पापांचा नाश करणारा. 

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

पुराणपुरुष श्रीपुरुषोत्तम भगवंतांच्या असीम दयाकृपेने गेले महिनाभर संपन्न झालेली ही सर्व सेवा त्यांच्याच श्रीचरणीं सादर समर्पित असो !
या महिन्याभरात अनेक सद्भक्तांनी आवर्जून आपला प्रतिसाद कळवला, आनंद व्यक्त केला, पोस्ट शेयर करून असंख्य लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्या सर्व सद्भक्तांनाही सादर अभिवादन. सर्वांच्या वतीने ही सेवा श्रीचरणी प्रेमभावे समर्पित असो !
– रोहन विजय उपळेकर.

*_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_*

*१६.  पोटाचे विकार दूर होण्याकरिता मंत्र*

*भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः।*
*अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसु: ॥२९॥*

*भ्राजिष्णुः* – प्रकाशरूप.
*भोजनम्* – मायारूपाने आस्वाद घेण्यास योग्य.
*भोक्ता* – पुरुषरूपाने भोगणारा.
*सहिष्णुः* – दैत्यांचे बळ सहन करणारा (त्यांचा पराभव करणारा.)
*जगदादिजः* – जगाच्या आधी हिरण्यगर्भरूपाने स्वतः उत्पन्न होणारा.
*अनघः* – निष्पाप.
*विजयः* – ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य इत्यादी गुणांनी विश्वाला जिंकणारा.
*जेता* – स्वभावतः भूतमात्रांहून वरचढ.
*विश्वयोनिः* विश्व व त्याचे कारण.
*पुनर्वसु:* – पुन्हा पुन्हा शरीरात आत्मरूपाने राहणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( *संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य – लेखक – प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919* )
*** *अधिकस्य अधिकं फलम् – २९* ***

स्तोत्र संग्रह

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *