संत चोखोबा महाराज समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

येथे संत श्री चोखोबा महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे अभंग

संत नामदेवांनी चोखोबावरती लिहिलेले अभंग

1.      चोखा माझा जीव चोखा माझा

चोखा माझा जीव चोखा माझा भाव । कुलधर्म देव चोखा माझा ॥१॥
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति । मोही आलो व्यक्ति तयासाठी ॥२॥
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान । तया कधी विघ्न पडो नदी ॥३॥
नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी । घेत चक्रपाणी पीतांबर ॥४॥

संत बांका यांनी चोखोबावरती लिहिलेले अभंग

संत बंका (चोखोबांचे मेव्हणे) व संत नामदेव यांनी त्यांच्या रचनांमध्ये संत चोखोबांबद्दल आपले भाव व्यक्त केले आहेत – 

2.      चोखा चोखट निर्मळ ।

‘चोखा चोखट निर्मळ । तया अंगी नाही मळ ॥
चोखा प्रेमाचा सागर । चोखा भक्तिचा आगर ॥
चोखा प्रेमाची माउली । चोखा कृपेची साऊली ॥
चोखा मनाचे मोहन । बंका घाली लोटांगण ॥

वारकरी संत समाधी अभंग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *