३८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ३८.

जरासंधाचा वध झाल्यावर लगेच श्रीकृष्णाने त्याचा पुत्र सहदेवला गादीवर बसवुन कारागृहात खितपत पडलेल्या सगळ्या राजांची मुक्तता केली.आणि इंद्र प्रस्थास यशस्वी होऊन परत आल्याने धर्मराजाला खुप आनंद झाला.मार्ग निष्कंट झाल्यामुळे राजसूय यज्ञासाठी द्विग्विजयाला निघण्याची सुचना करुन गर्भवती सुभद्रास सोबत घेऊन श्रीकृष्ण द्वारकेस परत आला.श्रीकृष्णाच्या पराक्रमाने व सामर्थ्याने अजिंक्य जरासंधाच्या वधाची वार्ता सर्वीकडे पोहोचल्याने काही राजांना आनंद झाला तर कांहीना कृष्णा च्या वाढते प्राबल्य पाहुन त्यांच्या मनांत विषाद उत्पन्न झाला.पोंड्रीक राजा वासुदेव तर पेटुन उठला. तो स्वतःला देवाचा अवतार समजत असे.तो श्रीकृष्णासारखेच पित वस्रे,गळ्यात वनमाला,शंख,चक्र,गदा,शार्ड्गाःयुध

बाळगुन रथावर गरुडध्वज लावत असे. मत्सराग्निने भडकुन द्वारकेला दूत पाठवून युध्दाचे आव्हान केले.पौंड्रुकावर श्रीकृष्णाने तात्काळ स्वारी केली.तोही ससैन्य काशीजवळ आला.काशीराजही त्याला मिळाला.यादवाचे व त्याचे घनघोर युध्द होऊन श्रीकृष्णाने त्याचे मस्तक ऊडविले.काशीराजालाही ठार केले. दोघांचा वध करुन श्रीकृष्ण विजयी होऊन द्वारकेस सन्मासह परतला. श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार,इंद्र प्रस्थी युधिष्ठीराने आपल्या चारही बंधुना चारी दिशा जिंकण्यासाठी रवाना केले. त्यांनी आपापल्या दिशेचे राजे जिंकुन त्या राजांनीही

आनंदाने करभार देऊन राजसूय यज्ञास येण्याचे मान्य केले.इंद्र प्रस्थात द्रव्याच्या,रत्नांच्या राशी जमा झाल्यात.प्राथमिक तयारी झाल्यावर यज्ञाचा समय निश्चित करुन श्रीकृष्णाला बोलवणे पाठविले.श्रीकृष्णादी विपुल, द्रव्याच्या राशी घेऊन इंद्रप्रस्थात दाखल झाला.श्रीकृष्णाच्या आज्ञेने यज्ञास आरंभ झाला.द्वैंपायन,भारद्वाज,सुमंत, गौतम असित,वशिष्ठ, च्यवन,कण्व,मैत्रेय,विश्वा मित्र, पाराशर,गर्ग,वेंशपायन,कश्यप, धौम्य, भार्गवराम या ब्राम्हवेत्त्या ऋषींना ऋषिजांची अध्वर्दुची कामे वाटुन दिली. स्वतः व्यासमहर्षि ब्रम्ह,याज्ञवल्क अध्वर्यु झालेत.धर्मराजा व द्रौपदीने यज्ञाची दीक्षा घेतली.केवळ भूलोकीचे राजेच नव्हे तर इंद्रादी लोकपाल,ब्रम्हदेव,शंकर,इत्यादी मोठ मोठ्या देवांना प्रार्थनापुर्वक यज्ञाला निमंत्रित केले.


नकुल स्वतः हस्तिनापुरला जाऊन भीष्म,द्रोणाचार्य,धृतराष्र्ट त्यांच्या पुत्रां सह सन्मानाने इंद्रप्रस्थी आणले.आणि यज्ञकृत्यातील योग्य अधिकारही भेदभाव न ठेवतां वाटुन दिले.कृष्णाने स्वतः ब्राम्हणांचे पाय धुवुन त्यांचे पुजन करण्याचे काम स्वतःकडे घेतले.ते यज्ञायतन सतत एक महिन्या पर्यंत दुमदुमत होते.यज्ञाचा शेवटही आनंदमय व्हायला हवा होता पण…..यज्ञविधी आटोपल्यावर अवभृत स्नानाची वेळ आली तेव्हा यज्ञाहरण म्हणजे यज्ञा साठी आलेल्या मोठ्या लोकांचे पुजन करण्याचा समारंभ असतो.हा समारंभात अग्रपुजेचा मान पितामह

भीष्मांनी श्रीकृष्णाला दिलेलं शिशुपालला आवडलं नाही,तो क्रोधाने व संतापाने भडकुन वाटेल तसा अद्वातद्वा व वाटेल तसे दुषने कृष्णाला लावु लागला.सर्व राज्यसभा सुन्न झाली.श्रीकृष्ण अगदी स्तब्द,शांत बसला होता.त्याला भीष्म म्हणाले,जो क्षत्रिय,शत्रुला जिंकुन सोडुन देतो,असा या सभेत एकही राजा दिसत नाही. श्रीकृष्ण अजिंक्य आहे.हा अच्युत आम्हालाच नाही तर तिन्ही लोकात पुज्यत्तम आहे.हा श्रीकृष्ण वयोवृध्द नसला तरी, ज्ञानवृध्द,बलवृध्द आणि धनवृध्द आहे. सर्व द्विजात श्रेष्ठतम,वेदवेदांगाविद व सत्वबलसंपन्न,सर्वांचा आचार्य,गुरु आहे.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *