5 वाचावे असे ” कर्माच्या सिद्धांताचे महत्व. “

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🌈🕉🙏🏻 कर्माच्या सिद्धांताचे महत्व. 👏🇮🇳

सिद्धांत म्हणजे साध्य व मान्यता याचा आधार घेऊन सिद्ध करणे होय.

सिध्दांत सिद्ध करण्यासाठी उतराच्या सुरवातीलाच कोणतीही एक मान्यता मानावी (suppose A=B) लागते. जसे १०वित आम्ही भूमितीत मानत होतो.
त्यानंतर काही समीकरण मांडून शेवटी म्हणून A=B हे सिद्ध झाले म्हणत होतो.

माणसाचे श्रेष्ठ संस्कार मध्ये परिवर्तन करण्यासाठी व धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थाने वागून समोरील व्यक्ती तसेच परिस्थिती याचा पूर्णतः स्वीकार करून सकारात्मक राहून सदा मनात आनंद (BLISS STATE OF MIND) निर्माण करण्याची शक्ती मिळते. हे कर्माच्या सिद्धांताचे साध्य आहे.

आज व्यक्ती परिस्थिती नुसार सिद्धांत वापरतो. त्यालाच आम्ही मान्यता म्हणतो.

यश भेटलं की माझ्या मेहनतीने भेटलं व अपयश दुःख भेटलं की दुसऱ्या व्यक्ती, परिस्थिती, समाज, शासन याला जबाबदार धरतो व प्रगती न करता खचून जाऊन प्रसंगी व्यसनाधीन होऊन दुर्बल समाज निर्मिती करतो.

प्रारब्ध म्हणजे SWOT analysis. (strength, weakness, opportunity, Threats).

शाळेत किंवा घरात या आधारेच मुलातील strength (प्रबळ चांगला गुण, कला, संस्कार) गुरुजी, आचार्य, पालक व त्यानंतर ते मूल स्वतः ओळखून संधीचं (opportunity) सोनं केलं जातं व प्रबळ समाज निर्मिती होते.

गेल्या बऱ्याच जन्मातील माझ्याच संस्कार व कर्म अनुसार आज मी व माझी परिस्थिती अशी आहे. तसेच यथार्थ ज्ञान मिळवून प्रत्येक वेळेस जो मी दृढ इच्छाशक्तीने श्रेष्ठ पुरुषार्थ द्वारे संस्कार धारण करेल तोच माझे भविष्य (उद्याचे व पुढच्या जन्मीचे ) असेल ही पक्की धारणा, मान्यता (belief system) तयार होते. व्यक्ती स्वतः आनंद, सुख, शक्ती, प्रेम, पवित्रता, शान्ति व शक्ती याचा अनुभव करते व इतरांना देऊ शकते. जे माझ्याकडे आहे तेच मी दुसऱ्याला देऊ शकतो.

अध्यात्म ज्ञान व साधना केल्याने या जन्मातील आमचे प्रारब्ध बदलते का?

पूर्णतः बदलतं का ते माहीत नाही पण त्याची तीव्रता (intensity) नक्कीच कमी होऊ शकते किंवा येणारं फळ सुख किंवा दुःख भोगण्याची समान वृत्ती (भाव) तयार होऊन दुःखाची तीव्रता जाणवतच नाही. दुःख सहज सहन करायचा संस्कार तयार होतो. त्यामुळं वर्तमान कर्म श्रेष्ठ बनून भविष्य/भाग्य आणखीनच सुखकर बनायला मदत होते.

म्हणून खरं तर आम्ही समतोल जीवन जगताना कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग व ध्यानयोग-राजयोग या सर्वांचा समावेश करणं अत्यावश्यक आहे.

एखाद्या व्यक्तीला दारू पूर्ण सोडली तर तुमचं नशीब बदलू शकेल, प्रयोग करून बघा असं म्हटलं तर त्यानी तेवढयाच शांतपणे उत्तर दिलं, पण मला सोडायचीच नाही ना. कोण जगायला आलंय सगळेच मरणार आहेत की.

तरीपण मी म्हटलं की पण हा संस्कार पुढच्या जन्मी पण आणखीच दृढ होण्याची शक्यता असते. तर ते म्हणतात. पुढचा जन्म कुणाला माहीत आहे. आता तरी मी असाच बरा आहे.

धर्म म्हणजे काय व धर्माने का वागायचं?

मोक्ष म्हणजे काय व तो कधी मिळू शकतो?

अर्थ व काम याचा श्रेष्ठ पुरुषार्थ का करायचा?

याची उत्तरं व प्रेरणा केवळ कर्म सिध्दांत वर आधारित आहे.

वरील संभाषणातील जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडाफार पालक व जास्त मुलांच्यात बदल घडवून आणण्यासाठी होणाऱ्या व्हाट्सअप्प गट, शिबिर, स्थायी व अस्थायी कार्यक्रमात “कर्माचा सिद्धांत’ अभ्यासक्रम राबवणे नक्कीच हितकारक असेल असं ठाम मत आहे.

नाहीतर जे घडलं ते चांगलंच. जे घडेल तेही फायद्याचेच हे सकारात्मक चिंतन नुसतं बोलून कसं पटेल बरं.

एका व्यक्तीला परदेशात अवॉर्ड घेण्यासाठी विमानानं जायचं होतं.
विमानतळावर जाताना त्याच्या स्कूटरचा अपघात झाला व एक पाय फ्रॅक्चर होऊन ऑपरेशन करावे लागले.

ऑपरेशन करून शुद्धीवर आल्यावर ती व्यक्ती परमेश्वराला फार कोसायला लागली. देवाला माझं अवॉर्ड घेणं बघवलं नाही इ इ. अपघाताने त्याची देवावरची श्रद्धा अस्थिर झाली.

दुसऱ्या दिवशी त्यानी वर्तमान पत्रात वाचले की त्या विमानाला अपघात होऊन एकही प्रवाशी वाचला नाही.

त्यानंतर ती व्यक्ती काय म्हटली असेल हे माझ्या पेक्षा तुम्हीच चांगलं समजले असाल.

समजून घ्यावे असे……

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *