४४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ४४.

अर्जुनाच्या मनाची अवस्था पाहुन, श्रीकृष्ण म्हणाला,आतांपर्यंत तुला “सांख्यबुध्दी” म्हणजे “परमार्थ ज्ञानयोग” सांगीतला.आतां कर्मयोग सांगतो. कर्म योग सांगुन झाल्यावर,श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना! तूं फक्त कर्माचा अधिकारी आहे, फलाचा अधिकारी होऊ नकोस.कर्म करीत रहा,फलाची इच्छा ठेवु नकोस.हा सर्व उपदेश ऐकल्यावर अर्जुन बराच स्वस्थचित्त झाला.हे पाहुन श्रीकृष्ण मनात समाधान पावला.आणि स्थितप्रज्ञा चे लक्षण सांगीतले.अर्जुना ह्याच स्थिती ला “ब्रम्हस्थिती” म्हणतात.श्रीकृष्णाचे सर्व तत्वज्ञान ऐकुन त्याला कृष्णाव्दारे नवीनच ज्ञान प्राप्त झाल्याची

जाणीव झाली.मधुसुदना! आतां जो समत्वयोग सांगीतला तो चंचल मनामुळे जमेलसे वाटत नाही.अर्जुना तो अभ्यासाने साध्य होतो.नंतर अर्जुनाने अनेक शंका निर्माण केल्यात व समर्पक समाधान कृष्णाने केले.अर्जुना! तुझे चित्त शुध्द झाल्याने अधिकारी झालास,म्हणुन विज्ञानसहित गुह्यज्ञान तुला सांगतो.धनंजया!सर्वांच्या अंतरी असणारा “मी” अविनाशी आत्मा आहे.आणि सर्वांच्या आदी,मध्य, अंत ही मीच आहे.वेदांमधले सात वेद मीच आहे. देवांमधे इंद्र,रुद्रामधे शंकर!यक्षराक्षसा मधे कुबेर,,अष्टवसुंमधे अग्नी,पर्वतांमधे मेरु या सर्वांमधे मीच व्याप्त आहे.हे सर्व जग मीच व्यापले आहे. हे नक्की समज!


अर्जुन अंतर्यामी पार बदलुन गेला. ज्ञानी,अधिकारी झाला. सविनय कृष्णा ला म्हणाला,हे परमेश्वरा! स्वतःविषयी जे सविस्तर वर्णन केले,ते तुझे दिव्य,अलौ किक,व्यापक रुप दाखवावे घननिळा! ठीक आहे धनंजया!चराचरासहित सर्व जग,आणि तू जे पाहु इच्छितो ते सर्व माझ्या देहामधे एकत्र,एकाच ठीकाणी पहा… आणि अर्जुनाला इश्वरशक्ती बघ ण्यासाठी दिव्यदृष्टी देऊन, महायोगेश्वर श्रीकृष्णाने आपलेपरमश्रेष्ठ विश्वरुप दाखवल्यावर अर्जुन भयभीत स्वरांत म्हणाला, हे प्रभो! आतां प्रसन्न व्हावे. व हे उग्र,अक्राळ-विक्राळ रुप धारण करण्याचा काय हेतू आहे? हेतू? या पृथ्वीवर भार झालेल्या मानव,प्राणीमात्र, जगाचा क्षय करणार! यासाठीच अर्जुना उठ!युध्दास सज्ज हो!धनंजया! मी सांगी तलेले गीताशास्र ऐकलेस ना?अज्ञानामुळे तुझ्या मनात निर्माण झालेला विकल्प नाहीसा झाला ना? होय जगदिश्वरा!मी आतां पुर्ण संशयरहित झालोय!जे तूं सांगशील तसेच वागेन मी…. गुरु-शिष्यां चा संवाद,गुह्य ज्ञान देणारा श्रीकृष्ण आणि धनुर्धारी पार्थ एकत्रीत आल्यावर लक्ष्मी,विजय,ऐश्वर्य,निश्चल नीती या सर्व गोष्टी निश्चितच पांडवांच्या बाजुने असती


दोन्ही पक्षाकडील सेनापती सैन्यांचे व्युह रचण्यांत गुंतलेले असल्यामुळे गुरु शिष्यातील संवादात अडथळा आला नाही,की कुणाला कांही ऐकुही गेलं नाही. संवाद संपला व खाली ठेवलेले धनुष्य अर्जुनाने हाती घेतले.रणशिंगे फुंकल्या गेले.उभय पक्षाकडील सैन्य युध्दार्थ पुढे सरकणार,तेवढ्यात युधिष्ठीराने धनुष्य खाली ठेवुन,कवच काढुन लगबगीने एकटाच पितामह भीष्मांच्या रथाकडे पायी निघालेला पाहुन त्याचे चारही बंधु त्याच्या मागे धावले.श्रीकृष्णाने धर्माचा हेतू जाणला.युध्दापुर्वी,सर्व जेष्ठ श्रेष्ठांची अनुमती व आशिर्वाद घेण्यासाठी निघाला.भीष्मांनी त्याला सद्गदीत स्वरांत म्हणाले,”जिथे धर्म तिथे जय” तेव्हा निःशंक मनाने तयार हो! अरे धर्मा!जिथे कृष्ण तिथे जय हा अविनाशी सिध्दांत आहे,


दोन्हीकडचे सैन्य लढू लागले,भीष्मांचा अतुलनीय पराक्रम पाहुन व ते आवरत नाहीसे पाहुन अखेर श्रीकृष्णाने रथ चक्र उगारुन भीष्मावर चाल केली. कृष्ण स्वतःच आपल्यावर चाल करुन येत असलेला पाहुन भीष्मांनी धनुष्य खाली ठेवले व हात जोडुन म्हणाले! हे देवाधिदेवा!जगधिशा,श्रीकृष्णा!तुझ्या हातुन जर मरण आले तर माझ्यासारखा भाग्यवान कोण असेल?तेवढ्यात शुध्दीवर आलेल्या अर्जुनाने समोरचे दृष्य पाहुन, श्रीकृष्णाला म्हणाला, हे करुणानिधी! भक्तासाठी केलेली प्रतिज्ञा मोडलीस, आतां रथात चढुन सारथ्य कर व बघ माझे सामर्थ्य! श्रीकृष्ण रथारुढ झाला व भीष्मार्जुनाचे घनघोर युध्द संध्याकाळ पर्यत चालले. आणि युध्दाचा नववा दिवस संपला.रात्री दुर्योधन भीष्मांच्या शिबिरात जाऊन त्यांना अपमानकारक बोलल्याने, संतापलेले भीष्म म्हणाले, उद्या एकतर पांडव तरी राहतील किंवा मी उद्याचे युध्द न भूतो न भविष्यती असे भयंकर होईल.निश्चिंत मनाने तुझ्या शिबिरात परत जा….
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *