6 वाचावे असे ” शिळे कर्म, ताजे कर्म ” नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप)

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप) शिळे कर्म, ताजे कर्म👏🌿🌿

एक श्रीमंत माणूस भोजन करीत होता,

तेव्हा दारावर एक भिकारी आला.

या श्रीमंताने म्हटले, ‘पुढे चालू लाग” असे म्हणून त्याने तोंड फिरवले.

त्या घरातील सून भिकाऱ्याला म्हणाली, ‘माफ करा. आपण येथून पुढे जा.

या बंगल्याचा मालकच स्वतः कालची उरलेली शिळी भाकरी खात आहे
आणि
हे शिळेपाके पदार्थ आपणासाठी योग्य नाहीत.’

त्या श्रीमंताने हे ऐकून एकदम संतप्त सुरात म्हटले, ‘सूनबाई, त्या भिकाऱ्याला तू हे भलतेसलते काय सांगत होतीस?’

सून म्हणाली,

आज आपल्याला हे जे उत्तम भोजन मिळत आहे, त्याचे श्रेय आपण पूर्वी केलेल्या कर्मांना द्यायला हवे.
परंतु …….

आता आपणाकडून तसे काही सत्कर्म घडताना दिसत नाही;
तर मग हे भोजन ताजे कसे?

जर ताजे भोजन हवे असेल तर नवे, ताजे, तेज कर्म करायला हवे.’

नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप) 🌼🌸

नाण्याला दोन बाजू असतात. छाप व काटा.
एक बाजू जरी विचारात नाही घेतली (खराब असेल तर ) नाणं खोटं ठरतं.

तसंच आहे माणसाच्या आयुष्यात, आयुष्याच्या दोन बाजू कर्म व भाग्य या दोन्हीही विचारात घ्याव्याच लागतात. केवळ एकाच बाजूची ओळख जमेत धरली तर जीवनाचे मोल खोटे ठरेल.

नाण्यातील छाप म्हणजेच वर्तमान जीवनातील प्रारब्धाची/भाग्याची छाप जी माणसाच्या विचार, संस्कार व प्रत्येक प्रसंग/परिस्थिती वर हावी असते किंवा प्रभाव टाकते.

नाण्यातील काटा म्हणजे वर्तमान जीवनात प्रत्येक परिस्थिती व प्रसंगात निर्णय घेताना किंवा रिस्पॉन्स करताना तराजूच्या काट्यासारखी कसरत / प्रयत्न करावी लागते किंवा काट्याकुट्याची वाट चालावी लागते,

यालाच आम्ही म्हणतो सजगतेने मन व बुद्धीच्या एकाग्रतेने विवेकशील कर्म किंवा पुरुषार्थ करणे. हा पुरुषार्थ पुन्हा पुढील भविष्याचे भाग्य बनवत असते.

कर्म (विचार, उच्चार, हेतू, आचरणातून कर्माची निर्मिती होते) केल्या नंतर खरं तर प्रारब्ध व वर्तमान कर्म याची गोळाबेरीज करून भाग्य किंवा फळ मिळत असते, हे मानवाने सदा ध्यानात घ्यावे. तसेच मिळालेल्या प्रत्येक फळात (सुख किंवा दुःख) कल्याण दडलंय असं समजून….


त्याचा स्विकार करून पुढच्या कर्माकडे वाटचाल करावी.

दुर्भाग्य हे असतं कि यश किंवा सुख प्राप्त झालं की माणूस म्हणतो कि मी केलं.

व दुःख किंवा अपयशात तो कोणाकडे तरी (परिस्थिती, व्यक्ती, समाज, सरकार, ईश्वर) जबाबदारीचं बोट दाखवतो.

सत्य हे आहे कि अपयशात स्वतः जबाबदारी स्वीकारून जोमानं पुन्हा मेहनत करावी व यशात इतरांना व परम्यातम्याला क्रेडिट देऊन पुढील कर्म व भाग्यासाठी आशीर्वाद/शुभभावना/सहयोग प्रारब्धाची पुंजी जमा करावी.

चला तर जीवनाचं नाणं छाप (प्रारब्ध) व काटा (प्रयत्न) दोन्ही विचारात घेऊन सदा खणखणीत वाजेलच याचा आनंद लुटुया.

टीप:- नाण्याच्या तिसऱ्या अदृश्य कल्याणकारी व यथार्थ सत्य बाजूचा विचारही जरूर करायला हवा.

समजून घ्यावे असे……

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *