परमार्थ आणखी वेगळं काय शिकवतो…?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

एकदा असं घडलं, देवळात भागवत कथा झाली… त्या कथेची सांगता झाली आणि त्याचवेळी सर्वांना प्रसादही दिला… सारी आवरा-आवर झाल्यावर, तिथं एक वृद्धा आली… म्हणाली, “प्रसाद कधी भेटेल”?… सारे जिकडचे तिकडे झाल्याचं तिला कळल्यावर, ती थोडीशी खट्टू झाली… तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी… एक लाडू आहे, देते तुला”…

हे ऐकून वृद्धेला आनंद झाला… बुंदीचा लाडू हातात घेऊन तिनं कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन, उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं, तर यातला कणभर त्यालाही देता येईल… कुणी तसंच जायला नगं… “परसाद जीव निवण्यासाठी पायजे… पोट भरण्यासाठी नाय्”… अध्यात्मिकतेनं अनासक्ती येते ती अशी… मन प्रसन्न असेल ना, तर मणानं नाही, कणानंही समाधान लाभतं… हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडलं… हव्यास आणि हट्ट सोडणं महत्त्वाचे… परमार्थ आणखी वेगळं काय शिकवतो आपल्याला?…

संकलक: बाळासाहेब हांडे संग्रहित सर्व साहित्य पहा
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *