परमार्थिकास परस्त्रीची कामवासना किती घातक असते ? महत्त्वाची माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

परमार्थिकास परस्त्रीची कामवासना किती घातक असते ? महत्त्वाची माहिती

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी २२६ ते २५० पहा.
तुम्ही जे सर्व आतापर्यंत सांगितलें तें मी सर्व बरोबर ऐकले आहे, पण आता माझी काही विचारायची इच्छा आहे ते मी विचारतो. ॥231॥
अर्जुन उवाच:
अथ केन प्रयुकोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥3.36 ॥

232-3
तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थिति भ्रंशे । मार्गु सांडुनि अनारिसे । चालत देखों ॥232॥
तरी देवा! हे आश्चर्यच आहे की ज्ञानी जे म्हणवितात ते देखिल विहित मार्ग सोडून भलत्या मार्गाने चाललेले व विहित मार्गापासून भ्रष्ट झालेले दिसतात. ॥232॥
233-3
सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती । तेही परधर्मे व्यभिचरति । कवणें गुणें ॥233॥
जे सर्वज्ञ आहेत व जे आपल्या कल्याणाचा मार्ग जाणतात तेहि स्वधर्म सोडून परधर्माने वागतांना जे दिसतात ते कशामुळे? ॥233॥

कबीर
कामी लज्जा न करै,
मन माही अहलाद।
नींद न माँगे साथरा,

भूख न माँगे स्वाद।।
वासनांध व्यक्ती ला आपलं तुपलं कांहीच कळत नाही जसं झोपाळू माणसाला बिछान्याची गरज नाही व भूकेल्यास चविष्ट अन्नाची गरज नसते तसं वासनांध माणसाला लाज शरम कांहीच नसते.

म्हणून संत तुकाराम महाराज एक वचनी अधिकृत पत्नी व्यतिरिक्त अनेक वचनी नारी संग परमार्थात पाप आसल्याचे शिक्का मोर्तब करतात.
संत तुकाराम गाथा अभंग

स्त्रियांचा तो संग नको नारायणा ।
काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥
दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें ।
लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥
नाठवे हा देव न घडे भजन ।
लांलचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥
तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु ।
परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥

वरील अभंगामधे संत तुकोबाराय आपणास परस्त्री संगापासून सावधान करीत आहेत.

महाराज अशा पर स्त्रियांची तुलना दगडासमान करतात, ज्याचे मूल्य शून्य असते. रावण हा विद्वान, धनवान, शक्तीसंपन्न होता परंतु मनामध्ये श्रीरामाच्या पत्नीशी व्यभिचार करण्याचा विचार आला, यामुळे त्याचा सर्वनाश झाला. एका सुसंस्कृत व्यक्तीने मांसाहार, नशापान, जुगार आणि व्यभिचार या ४ गोष्टींपासून दूर राहिले पहिले, कारण हेच भक्ती सोपानाचे ४ पाय मानले जातात.

१) मांसाहार केल्याने दया(करुणा) नष्ट होते.
२) नशापान केल्याने तप नष्ट होते.
३) जुगार केल्याने सत्यता नष्ट होते.
४) व्यभिचार केल्याने शुचि(शुद्धता) नष्ट होते.

जेंव्हा मनुष्य परपत्नीचा भोग घेण्याची कामना करतो तेंव्हा तो भगवंतांस विसरतो आणि जीवनामध्ये दुःख भोगण्यास कारणीभूत ठरतो. “अशा व्यक्तीचे मन सतत इंद्रिय विषयांचे ध्यान करीत असते, त्यामुळे मनाला नियंत्रित करणे त्याला शक्य होत नाही” असे महाराज सांगतात.

तुकोबाराय सांगतात आपण इंद्रियांमार्फत आपल्या दृष्टीच्या समोर आपले मरण पहात असतो.
ज्याप्रमाणे अग्नि(परस्त्री) आणि लोणी(पुरुष) यांचा संपर्क आला तरी अग्नी लोण्यास वितळवतो आणि स्वतः अजून प्रखर होतो. म्हणून वासनांध व्यक्ती जवळ परमेश्वर थांबत नाही. म्हणून बांधवगढवासी हिंदी संत सेना महाराज परमार्थात बहुपत्नीत्व म्हणजे विषयाचे चोचले पुरवणे आसेच समजतात.

238-3
ऐसा बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे । हें बोलावें ह्रषिकेशें । पार्थु म्हणे ।।238।।
अशा प्रकारे पापाचरण करण्याविषयी ज्ञानी पुरुषावर बळजोरी केली जाते, तर हा कोणाचा आग्रह आहे? ” ते श्रीकृष्णा, कृपा करून मला सांग ” असे अर्जुन म्हणाला. ।।238।।
श्रीभगवानुवाच:
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥3.37 ॥
239-3
तंब ह्रदयकमळ आरामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ।।239।।
ह्रदयरूपी कमलात राहणारा, योग्याच्या निष्काम मनातील कामना असलेला श्रीकृष्ण म्हणाला, ” अर्जुना, तुला ह्या प्रशनाचे समाधान करणारे उत्तर सांगतो ते ऐक. ।।239।।
240-3
तरी हे काम क्रोधु पाहीं । जयांतें कृपेची साठवण नाहीं । हे कृतांताचां ठायीं । मानिजती ।।240।।
तर असे पहा, हे काम-क्रोध असे आहेत की, ज्याच्या ठिकाणी अंशमात्रसुद्धा दयाबुद्धी नाही. ते केवळ काळाप्रमाणे निष्ठुर आहेत. ।।240।।
241-3
हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ । भजनमार्गीचे मांग । मारक जे ॥241॥
हे ज्ञानरूपी संपत्तीवर बसलेले विषारी महासर्प आहेत, विषयरूपी पर्वताच्या गुहेत राहणारे महाभयानक वाघ आहेत आणि भजनमार्गाचे ते मारेकरी आहेत.
242-3
हे देहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामीचे कोंड । यांचे व्यामोहादिक बंड । जगामाजि ॥242॥
हे देहरूपी डोंगरी किल्याचे मोठाले दगड आहेत, इंद्रियरूपी गावाच्या भोवती असलेले तट आहेत; आणि सर्व जगामध्ये भ्रम, अविचार इत्यादी उत्पन्न करण्यात ते प्रबळ आहेत.
243-3
हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे । धायपण ययांचे । अविद्या केले ॥243॥
हे मनात असलेल्या (काम, क्रोध) रजोगुणाचे परिणाम आहेत व मुळापासूनच आसुरी संपत्तीचे आहेत; यांचे पालन पोषण अविद्येने केले आहे.(अविद्येने यांना जन्म दिला आहे)
244-3
हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले । तेणें निजपद यां दिधले । प्रमादमोह ॥244॥
हे रजोगुणापासून उत्पन्न झाले असले, तरी ते तमोगुणाला हे अत्यन्त प्रिय आहेत; म्हणून तमोगुणाने प्रमाद व मोह हे आपले निजपद यांना बहाल केली आहेत.
245-3
हे मृत्यूचां नगरीं । मानिजति निकियापरी । जे जीविताचे वैरी । म्हणऊनियां॥245॥
हे मानवाच्या जीवाचे मोठे शत्रू आहेत; म्हणून मृत्यूच्या नगरीत हे श्रेष्ठ मानले जातात.

संत सेना न्हावी यांचा एक अभंग
।।श्रीसंत सेना महाराजांची अभंग गाथा।।

अधिक्षेप पाखंड खंडण

काम वाढवी जया आस।
झाला बाईलीचा दास।।१।।
वचन मोडणे नाही सत्ता।
काय पुरुषार्थ असता?।।२।।
प्रेम इच्छा अवकळी।
श्वान नित्य लोंडा घोळी।।३।।
दोन स्त्रिया जो करील।
तो मरणोन्मुख होईल।।४।।
वीरश्री नाही तो माना।
अज्ञान होता केविलवाणा।।५।।
सेना म्हणे लोचट झाला।
जन्मुनिया व्यर्थ गेला।।६।।

संत सेना न्हावी मध्यप्रदेशातील बांधवगढवासी असून त्यानी सबंध भारत भ्रमण करुन तीन भाषेत रचना केल्या आहेत त्यांनी पंजाबी हिंदी व मराठीत रचना केल्या आहेत. संत सेना महाराज यांचे वडिल व संत ज्ञानेश्वरांचें वडिल विठ्ठल पंत गुरुबंधु होते विशेष म्हणजे ते रामानंद सागर यांचे शिष्य होते. तात्पर्य हे की एका हिंदी भाषिक संताचा वरिल अभंग अस्खलित मराठी भाषेतील अभंग डोळ्यांत अंजन घालणारा वाटतो, नव्हे वासनांधाची भक्ती ढोंग व पाखंड असल्याचे निक्षून सांगतो.

म्हणून कबीर साहेब फक्त दोन ओळीतच परमार्थ व प्रपंच यांचा सुरेख संगम साधताताना मात्र ते प्रत्यक्ष दोन्हीच्या मध्य भागी थांबून निर्देश देतात…

एक अप्रतिम दोहा

कहत_कबीर

जहाँ काम तहाँ नाम नहि,
जहाँ नाम नहि वहाँ काम ।
दोनो कबहूँ नहि मिले,
रवि रजनी इक धाम ।।

जहाँ काम वासना, हो वहाँ प्रभु नहीं रहते और जहाँ प्रभु रहते है वहाँ काम-वासना, नहीं रह सकती। इन दोनों का मिलन असंभव है जैसे सुर्य एंव रात्रि का मिलन नहीं हो सकता। विषयासक्त मणुष्य मे परमात्मा विराजमान नही होते और जिस मणुष्य मे परमात्मा विराजमान होते है उसके अंदर विषयासक्ती नही होती। जैसे प्रकाश और आंधेरे का मिलन नही होता। विषयाधीनता और परमात्म तत्व एकत्रित नही हो सकते, जैसे ज्ञान और अज्ञान की मित्रता नही होती।

विषयलोलुप मणुष्यात परमेश्वर वास करीत नाही व परमेश्वर निवास करणाऱ्या व्यक्ती वासनांध नसतात जसे प्रकाश व आधांर एकत्र येत नाहीत. वासनांध व्यक्ती मध्ये परमेश्वर वास करीत नाही व देवत्व अंगी आसलेल्या व्यक्ती कामातुर नसतात. जसे ज्ञानी महापुरुष व अज्ञानी व्यक्ती एकत्र येउ शकत नाहीत.

कबीर

गीता

श्रीभगवानुवाच:
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥3.37 ॥
239-3

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *