देवी नवरात्र मराठी अर्थासह भाग १ ते १०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

*देवीनवरात्र*( मराठी अर्थासह) *भाग १*

*अथाश्विनशुक्लप्रतिपदिनवरात्रारंभः तन्निर्णयः तत्रभार्गवार्चनदीपिकायांदेवीपुराणेसुमेधाउवाच शृणुराजन्प्रवक्ष्यामिचंडिकापूजनक्रमम् आश्विनस्यसितेपक्षेप्रतिपत्सुशुभेदिने इत्युपक्रम्योक्तम् शुद्धेतिथौप्रकर्तव्यंप्रतिपच्चोर्ध्वगामिनी आद्यास्तुनाडिकास्त्यक्त्वाषोडशद्वादशापिवा अपराह्णेचकर्तव्यंशुद्धसंततिकांक्षिभिः इदंचापराह्णयोगिन्याः प्राशस्त्यंद्वितीयदिनेप्रतिपदोभावेज्ञेयम् तथातत्रैवदेवीपुराणेडामरतंत्रेचदेवीवचः अमायुक्तानकर्तव्याप्रतिपत्पूजनेमम मुहूर्तमात्राकर्तव्याद्वितीयादिगुणान्विता आद्याः षोडशनाडीस्तुलब्ध्वायः कुरुतेनरः कलशस्थापनंतत्रह्यरिष्टंजायतेध्रुवं मार्कंडेयदेवीपुराणयोः पूर्वविद्धातुयाशुक्लाभवेत्प्रतिपदाश्विनी नवरात्रव्रतंतस्यांनकार्यंशुभमिच्छता देशभंगोभवेत्तत्रदुर्भिक्षंचोपजायते नंदायांदर्शयुक्तायांयत्रस्यान्ममपूजनमिति स्कांदेपि प्रतिपद्याश्विनेमासिसाशुद्धाशुभदाभवेत् भाद्रपंचदशीकृष्णातयायुक्तानशस्यते विरुद्धफलदासाहिपुत्रदारभयावहेति तथा वर्जनीयाप्रयत्नेन अमायुक्तातुपार्थिव द्वितीयादिगुणैर्युक्ताप्रतिपत्सर्वकामदा तथादेवीपुराणे योमांपूजयतेनित्यंद्वितीयादिगुणान्विताम् प्रतिपच्छारदींज्ञात्वासोश्नुतेसुखमव्ययम् यदिकुर्यादमायुक्तांप्रतिपत्स्थापनेमम तस्यशापायुतंदत्वाभस्मशेषंकरोम्यहम् आग्रहात्कुरुतेयस्तुकलशस्थापनंमम तस्यसंपद्विनाशः स्याज्जेष्ठः पुत्रोविनश्यति अमायुक्तानकर्तव्याप्रतिपच्चंडिकार्चने धनार्थिभिर्विशेषेणवंशहानिश्चजायते नदर्शकलयायुक्ताप्रतिपच्चंडिकार्चने उदयेद्विमुहूर्तापिग्राह्यासोदयदायिनीति देवीपुराणे याचाश्वयुजिमासेस्यात्प्रतिपद्भद्रयान्विता शुद्धाममार्चनंतस्यांशतयज्ञफलप्रदम् रुद्रयामले अमायुक्तासदाचैवप्रतिपन्निंदितामता तत्रचेत्स्थापयेत्कुंभंदुर्भिक्षंजायतेध्रुवं प्रतिपत्सद्वितीयातुकुंभारोपणकर्मणीति यद्यपिरुद्रयामलंडामरंचनिर्मूलंतथाप्यविरोधात् प्रचाराच्चतद्वचनानिलिख्यंते तिथितत्त्वेदेवीपुराणेपि प्रातरावाहयेद्देवींप्रातरेवप्रवेशयेत् प्रातः प्रातश्चसंपूज्यप्रातरेवविसर्जयेत् तत्रैव शरत्कालेमहापूजाक्रियतेयाचवार्षिकी साकार्योदयगामिन्यांनतत्रतिथियुग्मता तथाकुहूकाष्ठोपसंयुक्तांवर्जयेत्प्रतिपत्तिथिम् राज्यनाशायसाप्रोक्तानिंदिताचाश्वपूजन इति।*

आतां आश्विनशुक्ल प्रतिपदेस

देवीनवरात्रारंभ होय. त्याचा

निर्णय – त्याविषयीं

भार्गवार्चनदीपिकेंत – देवीपुराणांत – सुमेधा सांगतो – ” हे राजा, चंडिकेच्या पूजनाचा क्रम सांगतों, श्रवण कर ! आश्विन शुक्ल पक्षीं प्रतिपदेस शुभ दिवशीं ” असा उपक्रम करुन सांगतो – ” तें नवरात्र शुद्ध तिथीस करावें. प्रतिपदा ऊर्ध्वगामिनी असतां शुद्ध संतति इच्छिणार्यांनीं पहिल्या सोळा किंवा बारा घटिका सोडून अपराह्णीं करावें. ” ही जी अपराह्णव्यापिनी प्रतिपदा प्रशस्त सांगितली ती दुसर्या दिवशीं प्रतिपदा नसतां जाणावी. तसें तेथेंच ( भार्गवार्चनदीपिकेंत )

देवीपुराणांत व डामरतंत्रांत देवीवाक्य – ” माझ्या पूजेविषयीं अमावास्यायुक्त प्रतिपदा घेऊं नये. द्वितीयादि गुणांनीं युक्त अशी मुहूर्तमात्र जरी प्रतिपदा असली तथापि तीच घ्यावी. पहिल्या सोळा घटिकांत जो मनुष्य कलशस्थापन करितो तेथें निश्चयानें अरिष्ट होतें. “

मार्केंडेय व देवीपुराणांत – ” शुभ इच्छिणारानें पूर्वविद्धा ( अमावास्यायुक्त ) जी आश्विनशुक्ल प्रतिपदा तिचे ठायीं नवरात्रव्रत करुं नये ; कारण, दर्शयुक्त प्रतिपदेस जेथें माझें पूजन होतें तेथें देशभंग होतो व दुर्भिक्षही होतें. “

स्कंदपुराणांतही – ” आश्विनमासांत जी प्रतिपदा शुद्ध ती शुभदायक होईल. भाद्रपद कृष्ण अमावास्यायुक्त प्रतिपदा प्रशस्त नाहीं. कारण, ती विपरीत फल देणारी पुत्र, स्त्रिया यांस भयावह होतें. ” तसेंच ” हे राजा ! अमायुक्त प्रतिपदा प्रयत्नानें वर्ज्य करावी. व द्वितीयादि गुणांनीं युक्त प्रतिपदा सर्व मनोरथ देणारी होय. ” तसेंच देवीपुराणांत – ” द्वितीयादि गुणयुक्त अशी शारदीप्रतिपदा जाणून जो माझें पूजन नित्य करितो तो अविनाशी सुख पावतो. जर अमायुक्त प्रतिपदेस माझें स्थापन करील तर त्यास मी हजारों शाप देऊन भस्म करीन. जो आग्रहानें माझें कलशस्थापन ( अमायुक्तप्रतिपदेस ) करतो त्याच्या संपत्तीचा नाश होतो व ज्येष्ठपुत्राचा नाश होतो. चंडिकेच्या पूजनाविषयीं अमायुक्त प्रतिपदा करुं नये ; धनाची इच्छा करणारांनीं तर विशेषेंकरुन न करावी. केली तर वंशहानि होते. कलामात्र दर्शानें युक्तही प्रतिपदा चंडिकापूजनाविषयीं करुं नये. सूर्योदयीं दोन मुहूर्तही प्रतिपदा असेल ती घ्यावी. कारण, ती उत्कर्ष करणारी आहे. “

देवीपुराणांत – ” आश्विनमासांत द्वितीयेनें युक्त जी प्रतिपदा ती शुद्ध, तिचेठायीं माझें पूजन केलें असतां तें शंभर यज्ञांचें फल देणारें होतें. ” रुद्रयामलांत – ” अमायुक्त प्रतिपदा सर्वथा निंदित होय. अमायुक्त प्रतिपदेचे ठायीं जर कुंभस्थापन करील तर निश्चयानें दुर्भिक्ष होईल. द्वितीयासहित प्रतिपदा कुंभस्थापनकर्माविषयीं शुभ होय. ” जरी रुद्रयामल व

डामरतंत्र हीं निर्मूल आहेत तरी तीं अविरुद्ध असल्यामुळें व प्रचारांत असल्यामुळें त्यांचीं वचनें लिहिलीं आहेत. तिथितत्त्वांत – देवीपुराणांतही – ” प्रातःकालीं देवीचें आवाहन करावें व प्रातःकालीं स्थापन करावें. दररोज प्रातःकालीं पूजन करुन प्रातःकालींच विसर्जन करावें. ” तेथेंच – ” शरदृतूंत आणि वर्षप्रतिपदेस जी महापूजा करितात, ती उदयव्यापिनी तिथीस ( प्रतिपदेस ) करावी. त्या पूजेविषयीं युग्मवाक्यानें अमावास्यायुक्त प्रतिपदा घेऊं नये. ” तसेंच ” काष्ठा ( कलेचा तिसावा भाग ) प्रमाणही अमावास्यायुक्त प्रतिपदा वर्ज्य करावी. कारण, ती राज्यनाशाकरितां होते, आणि अश्वपूजेविषयीं ती निंदित आहे. “

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

देवीं नवरात्र**भाग २*

*एषुवचनेषुकलशस्थापनग्रहणात् तदेवप्रथमदिनेनिषिध्यतेनतूपवासादि तस्य प्रतिपद्यप्यमावास्येति युग्मवाक्यात् शुक्लास्यात्प्रतिपत्तिथिः प्रथमतइति दीपिकोक्तेः शुक्लपक्षेदर्शविद्धेतिमाधवोक्तेश्च पूर्वदिने प्राप्तस्यबाधेमानाभावादितिकेचित् वस्तुतस्तुपूर्वोक्तवाक्येषुचंडिकार्चनपूजाग्रहणादुपवासादेश्चांगत्वात्प्रधानदेवीपूजादावपिपरेतियुक्तं कलशस्थापनग्रहणंतूपलक्षणम् अतएवदेवलः व्रतोपवासनियमेघटिकैकापियाभवेत् सातिथिस्तद्दिनेपूज्याविपरीतातुपैतृकइति अत्रघटिकामुहूर्त इतिगौडाः यदातुपूर्वदिनेसंपूर्णाशुद्धाच भूत्वापरदिनेवर्धतेतदासंपूर्णत्वादमायोगाभावाच्चपूर्वैव यानिचद्वितीयायोगनिषेधकानिवचनानिकेचित्पठंति तान्यपिशुद्धाधिकनिषेधपराणि परदिनेप्रतिपदोत्यंतासत्त्वेतुदर्शयुतापिपूर्वैवग्राह्या तदाहलल्लः तिथिः शरीरं तिथिरेवकारणंतिथिः प्रमाणंतिथिरेवसाधनमिति यानित्वमायुक्ताप्रकर्तव्येत्यादीनिनृसिंहप्रसादेवचनानितानिसमूलत्वेसत्येतद्विषयाणि अत्रेदंतत्त्वम् पूर्वोक्तवाक्यानांसर्वेषांहेमाद्याद्यलिखितत्वेननिर्मूलत्वात्तैश्चान्यनिर्णयस्यानुक्तेः सामान्यनिर्णयात् पूर्वप्राप्तावपि गौडनिबंधेषुविशेषनिर्णयादौदयिकीग्राह्या तत्रापिघटिकैकेत्यस्य द्विमुहूर्तस्तुतित्वोक्तेर्द्विमुहूर्ताग्राह्या उदितेदैवतंभानावित्यत्रद्विमुहूर्तंत्रिरह्नश्चेतिऔदयिक्याद्विमुहूर्तत्वनियमात् तेन उदयेद्विमुहूर्तापीत्याद्यनुसारोपि मुहूर्तमात्राकर्तव्येतिद्विमुहूर्तस्तुतिः अन्यथाद्विमुहूर्तविधिवैयर्थ्यात् केचित्तु मुहूर्तमात्रेतिवचनात्ततोन्यूनत्वेपरानेत्याहुः गौडाअप्येवम् ।*

वरील वचनांत कलशस्थापन सांगितल्यामुळें तेंच अमावास्यायुक्त प्रतिपदेस निषिद्ध केलें आहे. उपवासादिक निषिद्ध केलें नाहीं. कारण, ‘ प्रतिपदा व अमावास्या यांचें युग्म महाफलदायक आहे. ’ असें युग्मवाक्य प्रथम परिच्छेदांत सांगितलें असल्यामुळें ; आणि ” शुक्लपक्षांतील प्रतिपदा अमायुक्त घ्यावी ” असें

दीपिकावचन असल्यामुळें ; व ” शुक्लपक्षीं ( प्रतिपदा ) दर्शविद्धा करावी ” असें

माधवा चें ही वचन असल्यामुळें पूर्वदिवशीं जें प्राप्त उपवासादिक त्याचा बाध करण्याविषयीं प्रमाण नाहीं, असें

केचित् म्हणतात. वास्तविक म्हटलें तर – पूर्वोक्त वाक्यांत ‘ चंडिकेचें अर्चन – पूजन ’ असें सांगितल्यामुळें पूजा प्रधान व उपवासादिक त्याचें अंग असल्यामुळें प्रधान अशा देवीपूजादिकांविषयीं देखील परा घ्यावी, हें योग्य आहे. कलशस्थापन म्हटलें तें पूजेचें उपलक्षण होय. म्हणूनच देवल सांगतो – ” व्रत, उपवास, नियम यांविषयीं प्रातःकालीं एक घटिकाही जी तिथि असेल ती तिथि त्या दिवशीं पूज्य आहे. पैतृककर्माविषयीं याच्या विपरीत समजावी. ” या वचनांत घटिका म्हणजे मुहूर्त समजावा, असें गौड सांगतात. ज्या वेळीं पूर्वदिवशीं संपूर्ण शुद्ध ( ६० घटिका ) असून परदिवशीं वाढलेली असेल त्या वेळीं संपूर्ण असल्यामुळें व अमावास्येचा योग नसल्यामुळें पूर्वाच घ्यावी. जीं द्वितीयायोगनिषेधक वचनें

केचित् सांगतात तीं देखील पूर्वदिवशीं शुद्ध असून दुसर्या दिवशीं वाढलेल्या तिथीचा निषेध करणारीं आहेत. दुसर्या दिवशीं प्रतिपदा मुळींच नसेल तर दर्शयुक्त असली तरी पूर्वाच घ्यावी. तें सांगतो लल्ल – ” कर्माचें शरीर तिथि आहे. कर्माला कारण तिथि आहे. कर्माला प्रमाण तिथि आहे. आणि कर्माला साधन तिथिच आहे. ” ह्या चार हेतूंनीं ज्या कर्मास जी तिथि सांगितली ती अवश्य असलीच पाहिजे असें समजावें. आतां जीं ” अमावास्यायुक्त प्रतिपदा करावी ” इत्यादिक

नृसिंहप्रसादांत सांगितलेलीं वचनें तीं समूल असतील तर ह्या ( प्रतिपदाक्षया ) विषयीं समजावीं. येथें खरा प्रकार असा कीं, पूर्वीं सांगितलेलीं वाक्यें

हेमाद्रिप्रभृति निबंधकारांनीं न लिहिल्यामुळें तीं सारीं निर्मूळ असल्याकारणानें, व त्या निबंधकारांनीं अन्य निर्णय सांगितला नसल्याकारणानें, सामान्य निर्णयावरुन पूर्वींची प्राप्त असली तरी गौड निबंधांत विशेष निर्णय केल्यानें उदयव्यापिनी घ्यावी. त्या उदयव्यापिनींतही ‘ एक घटिका ’ असें सांगितलें तें द्विमुहूर्ताची स्तुति आहे, असें सांगितल्यावरुन द्विमुहूर्ता घ्यावी. कारण, प्रथम परिच्छेदांत तिथिनिर्णय प्रकरणीं ” उदिते दैवतं भानौ पित्र्यं चास्तमिते रवौ ॥ द्विमुहूर्तं त्रिरह्नश्च सा तिथिर्हव्यकव्ययोः ” असें

विष्णुधर्मवचन आहे. त्याचा अर्थ – ” सूर्योदय झाला असतां दोन मुहूर्त देवांचे आहेत. आणि दिवसाचे शेवटचे तीन मुहूर्त पितरांचे आहेत, म्हणून जी तिथि प्रातःकाळीं दोन मुहूर्त असेल ती देवकर्माविषयीं घ्यावी, आणि जी सायंकालीं तीन मुहूर्त असेल ती पित्र्यकर्माविषयीं घ्यावी. ” या वचनानें उदयव्यापिनी म्हणजे द्विमुहूर्ता असा नियम सांगितला आहे. तेणेंकरुन ‘ उदये द्विमुहूर्तापि ग्राह्या ’ ह्या वर सांगितलेल्या देवीपुराणवचनास अनुसरल्यासारखेंही झालें. ‘ मुहूर्तमात्रा कर्तव्या ’ हें वर सांगितलेलें देवीपुराण – डामरतंत्रांतील देवीवचन तें द्विमुहूर्ताची स्तुति आहे. असें नसेल तर ( मुहूर्तमात्र घ्यावयाची असेल तर ) देवीपुराणांत द्विमुहूर्ताचें विधान केलें तें व्यर्थ होईल. केचित् तर ‘ मुहूर्तमात्रा कर्तव्या ’ ह्या वचनावरुन मुहूर्तापेक्षां न्यून असेल तर परा करुं नये, असें सांगतात. गौडही असेंच सांगतात.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

*देवी नवरात्र*( मराठी अर्थासह)*भाग ३*

*देवीपूजा*

*अत्रदेवीपूजैवप्रधानम् उपवासादित्वंगम् अष्टम्यांचनवम्यांचजगन्मातरमंबिकाम् पूजयित्वाश्विनेमासिविशोकोजायतेनरइतिहेमाद्रौभविष्ये तस्याएवफलसंबंधात् नवमीतिथिपर्यंतंवृद्ध्यापूजाजपादिकमितितत्रैवदेवीपुराणात् शरत्कालेमहापूजाक्रियतेयाचवार्षिकीतिमार्कंडेयपुराणाच्च पूर्ववचनादष्टमीनवमीपूजैवप्रधानमन्यत्सर्वमंगमितिगौडाः एकाहपक्षोपिकालिकापुराणे यस्त्वेकस्यामथाष्टम्यांनवम्यामथसाधकः पूजयेद्वरदांदेवींमहाविभवविस्तरैरिति तत्त्वंतुराजसूयेन्ययागैः समप्रधानायाः सहितायाअप्यवेष्टेरेतयान्नाद्यकामंयाजयेदित्येकत्वान्मध्येविधानाच्च यथाफलार्थोबहिः प्रयोगस्तथा नवरात्रमध्यस्थायाअष्टम्या नवम्यावाफलार्थः पृथक्प्रयोगः रुपनारायणधृतदेवीपुराणे महानवम्यांपूजेयंसर्वकामप्रदायिका सर्वेषुचैववर्णेषुतवभक्त्याप्रकीर्तिता कृत्वाप्नोतियशोराज्यपुत्रायुर्धनसंपदः साचकाम्यानित्याच एवमन्यैरपितथादेव्याः कार्यंप्रपूजनम् विभूतिमतुलांलब्धुंचतुर्वर्गप्रदायकमिति योमोहादथवालस्याद्देवींदुर्गांमहोत्सवे नपूजयतिदंभाद्वाद्वेषाद्वाप्यत्रभैरव क्रुद्धाभगवतीतस्यकामानिष्टान्निहंतिवै इतिकालिकापुराणेफलनिंदाश्रुतेः वर्षेवर्षेविधातव्यंस्थापनंचविसर्जनमितितिथितत्त्वेदेवीपुराणाच्च अत्रोपवासादिकमुक्तंहेमाद्रौभविष्ये एवंचविंध्यवासिन्यांनवरात्रोपवासतः एकभक्तेननक्तेनतथैवायाचितेनच पूजनीयाजनैर्देवीस्थानेस्थानेपुरेपुरे गृहेगृहेशक्तिपरैर्ग्रामेग्रामेवनेवने स्नातैः प्रमुदितैर्ह्यष्टैर्ब्राह्मणैः क्षत्रियैर्नृपैः वैश्यैः शूद्रैर्भक्तियुक्तैर्म्लेच्छैरन्यैश्चमानवैरिति यत्तुरुपनारायणीयेभविष्ये एवंनानाम्लेच्छगणैः पूज्यतेसर्वदस्युभिरिति तत्तामसपूजापरम् विनामंत्रैस्तामसीस्यात्किरातानांतुसंमतेतितत्रैवोक्तेः मदनरत्ने देवीपुराणेपि कन्यासंस्थेरवौशक्रशुक्लामारभ्यनंदिकां अयाचीह्यथवैकाशीनक्ताशीवाथवांब्वदः भूमौशयीतचामंत्र्यकुमारीर्भोजयेन्मुदा वस्त्रालंकारदानैश्चसंतोष्याः प्रतिवासरम् बलिंचप्रत्यहंदद्यादोदनंमांसमाषवत् त्रिकालंपूजयेद्देवींजपस्तोत्रपरायणइति नंदिकाप्रतिपत्तिथिरितिमैथिलाः षष्ठीतिगौडाः ।*

ह्या नवरात्राचे ठायीं देवीपूजाच प्रधान. उपवास, स्तोत्रपाठ, जप इत्यादिक तर अंग आहे. कारण, ” आश्विनमासांत अष्टमी व नवमी या तिथीस जगन्माता अंबिकेचें पूजन केलें असतां मनुष्य शोकरहित होतो – ” ह्या हेमाद्रींतील भविष्य वचनांत पूजेलाच फल सांगितलें आहे. व ” नवमी तिथीपर्यंत वृद्धीनें ( पहिले दिवशीं एक, दुसर्या दिवशीं दोन असें ) पूजा व जप इत्यादि करावें, ” असें तेथेंच देवीपुराण वचन आहे ; आणि ” शरत्कालीं प्रतिवर्षीं महापूजा करितात ” असें

मार्केंडेय पुराणवचनही आहे. वरील भविष्यवचनावरुन अष्टमी – नवमीपूजाच प्रधान आहे ; बाकीचें सर्व अंग होय असें गौड सांगतात. एक दिवसाचा पक्षही सांगतो,

कालिकापुराणांत – ” जो साधक असेल त्यानें एका अष्टमीस अथवा नवमीस वरदादेवीचें मोठ्या ऐश्वर्यविस्तारांनीं पूजन करावें. ” याचें तत्त्व म्हटलें तर असें की, राजसूययज्ञांत अवेष्टि नावाचा याग व इतर याग सांगितले आहेत. इतर यागांत जीं प्रधानकर्मैं तींच या अवेष्टियागांत आहेत. असें असून ती अवेष्टि सर्व यागांसह सांगितली असूनही ‘ जो अन्नादिकांची इच्छा करील त्याच्याकडून ही अवेष्टि करवावी ’ या अर्थाच्या वचनांत ‘ एतया ’ असें एकवचन असल्यामुळें ; आणि मध्यें विधान केल्यामुळें ; त्या अन्नादिफलाकरितां राजसूययज्ञाच्या बाहेर जसा प्रयोग होतो, तसा नवरात्रामध्यें असलेल्या अष्टमीचा किंवा नवमीचा फलार्थ पृथक् प्रयोग होतो. रुपनारायणग्रंथांत – देवीपुराणांत – ” महानवमीचे ठायीं ही पूजा सर्व मनोरथ देणारी होय. हे वत्सा ! सर्व वर्णांविषयीं तुझ्या भक्तीस्तव सांगितली आहे, ही केली असतां यश, राज्य, पुत्र, आयुष्य, धन, संपत्ति, हीं प्राप्त होतात. ” ही पूजा काम्य व नित्यही आहे. कारण, ” असेंच अन्यांनींही बहुत ऐश्वर्यप्राप्तीकरितां धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार वर्ग देणारें देवीचें पूजन करावें. ” ” जो मनुष्य मोहानें अथवा आलस्यानें अथवा दंभानें किंवा द्वेषानें महोत्सवांत दुर्गादेवीचें पूजन करीत नाहीं त्यावर भगवती क्रुद्ध होऊन इष्ट मनोरथांचा नाश करिते. ” असें

कालिकापुराणांत फल व निंदाश्रवण आहे. आणि ” प्रतिवर्षीं देवीचें स्थापन व विसर्जन करावें. ” असें

तिथितत्त्वांत देवीपुराणांत

वचनही आहे. तेथें उपवासादिक सांगतो – हेमाद्रींत – भविष्यांत – ” याप्रमाणें विंध्यवासिनी देवीचेठायीं नवरात्र उपवास, किंवा एक भक्त, किंवा नक्त, अथवा अयाचित करुन जनांनीं प्रत्येक स्थानीं, प्रत्येक नगरीं, प्रत्येक गृहीं, प्रत्येक ग्रामीं, प्रत्येक वनीं नवरात्र करावें. स्नान केलेले अत्यंत आनंदित असे ब्राह्मण, क्षत्रिय, राजे, वैश्य, शूद्र यांनीं व भक्तियुक्त म्लेच्छांनीं व अन्य मनुष्यांनींही देवीचें पूजन करावें. ” आतां जें रुपनारायण ग्रंथांत

भविष्यांत – ” असेंच अनेक म्लेच्छ व भिल्ल इत्यादि चोर देवीची पूजा करितात ” असें वचन तें तामसपूजापर होय. कारण, ” मंत्रावांचून तामसीपूजा भिल्लांस विहित आहे. ” असें तेथेंच सांगितलें आहे. मदनरत्नांत देवीपुराणांतही – ” कन्याराशीस सूर्य असतां शुक्ल प्रतिपदेस आरंभ करुन अयाचित, अथवा एकभुक्त, किंवा नक्त, अथवा उदकभक्षण करुन भूमीवर निद्रा करुन कुमारींस आमंत्रण करुन त्यांना आनंदानें भोजन घालावें. प्रतिदिवशीं वस्त्र अलंकार कुमारींला देऊन संतुष्ट करावें. प्रतिदिवशीं मांसमाषयुक्त भाताचा बलि द्यावा. जप व स्तोत्रपाठ करुन त्रिकाल देवीचें पूजन करावें. ” या वचनांत नंदिका म्हणजे प्रतिपदा तिथि असें मैथिल सांगतात. नंदिका म्हणजे षष्ठी असें गौड म्हणतात.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

देवी नवरात्र*( मराठी अर्थासह )*भाग ४*

*देवी पूजा*

*तच्चपूजनंरात्रौकार्यम् आश्विनेमासिमेघांतेमहिषासुरमर्दिनीं निशासुपूजयेद्भक्त्यासोपवासादिकः क्रमादिति देवीपुराणात् संग्रहेपि आश्विनेमासिमेघांतेप्रतिपद्यातिथिर्भवेत् तस्यांनक्तंप्रकुर्वीतरात्रौदेवींचपूजयेत् रात्रिरुपायतोदेवीदिवारुपोमहेश्वरः रात्रिव्रतमिदंदेविसर्वपापप्रणाशनम् सर्वकामप्रदंनृणांसर्वशत्रुनिबर्हणं रात्रिव्रतमिदंतस्यरात्रौकर्तव्यतेष्यते नक्तव्रतमिदंयस्मादन्यथानरकेगतिरित्यादिवचनाच्च रात्रिव्रतत्वमेवाभिप्रेत्यमाधवेनोक्तम् तस्यनक्तव्रतत्वादिति नतुरात्रिभोजनात् ननु मासिचाश्वयुजेशुक्लेनवरात्रेविशेषतः संपूज्यनवदुर्गांचनक्तंकुर्यात्समाहितः नवरात्राभिधंकर्मनक्तव्रतमिदंस्मृतं आरंभेनवरात्रस्येत्यादिस्कांदात् माधवोक्तेश्चनक्तमेवप्रधानमितिचेत् न नवरात्रोपवासत इत्यादेरनुपपत्तेः तेनपाक्षिकनक्तानुवादोयं नित्यानित्यसंयोगविरोधात् नह्यग्निहोत्रेदशमपक्षेप्राप्तस्य दध्नाजुहोतीत्यस्येंद्रियकामहोमेनुवादोघटते नित्यवदनुवादायोगादित्युक्तंवार्तिके तथात्रापि तेनात्रतद्वदेवगुणात्फलमितिज्ञेयम् ननु रात्रेः कर्मकालत्वेतव्द्यापिनीपूर्वैवप्रतिपत्प्राप्नुयात् मैवम् न्यायतः प्राप्तावपिपूर्वोक्तवचनैर्बाधात् यथापूर्वेद्युः कर्मकालव्यापिनीमपित्यक्त्वास्वल्पापिपरैवरामनवमीतिप्रागुक्तम् यथावा निशीथेसतीमपिपूर्वांजन्माष्टमींत्यक्त्वा रोहिणीयुक्तापरैवेतिमाधवेनोक्तम् तथात्रापि वस्तुतस्तु रात्रेःकर्मकालत्ववचसांहेमाद्याद्यलिखनात् समूलत्वंविमृश्यमेव त्रिकालंपूजयेदित्यादिपूर्वविरोधाच्च माधवोक्तिस्तुपाक्षिकनक्तानुवाद इत्युक्तं तस्मात्सर्वपक्षेषुपरैवप्रतिपदितिसिद्धम् अत्रकेचिन्नवरात्रशब्दोनवाहोरात्रपरः वृद्धौसमाप्तिरष्टम्यांह्नासेमाप्रतिपन्निशि प्रारंभोनवचंड्यास्तुनवरात्रमतोर्थवदितिदेवीपुराणादित्याहुः तन्न अतिह्नासवृद्ध्योर्न्यूनादिकत्वापत्तेः अत्रमूलाभावाच्च तेनतिथिवाच्येवायं तदुक्तं तिथिवृद्धौतिथिह्नासेनवरात्रमपार्थकम् अष्टरात्रेनदोषोयंनवरात्रतिथिक्षयेइति सचनवरात्रशब्दः क्कचिल्लक्षणयाकर्मवाची यथाप्रारंभोनवरात्रस्येत्यत्रेतिदिक् ।*

तें देवीपूजन रात्रीस करावें. कारण, ” आश्विनमासीं मेघांतीं ( शरद्ऋतूंत ) उपवासादियुक्त होऊन क्रमानें महिषासुरमर्दिनी देवीचें भक्तीनें रात्रीस पूजन करावें. ” असें देवीपुराणवचन आहे.

संग्रहांतही – ” आश्विनमासीं मेघांतीं जी प्रतिपदा तिथि होते तिचेठायीं नक्त करावें, आणि रात्रीस देवीचें पूजन करावें. कारण, देवी रात्रिरुपा व महेश्वर दिवारुप आहे. यास्तव हे देवि, हें रात्रिव्रत सर्व पापनाश करणारें व मनुष्यांस सर्व मनोरथ देणारें व सर्व शत्रुनाश करणारें असें आहे. हें रात्रिव्रत रात्रीं करावें, हें इष्ट आहे. कारण, हें नक्तव्रत आहे. हें केलें नाहीं तर नरकांत गति होते. ” इत्यादि वचनही आहे. हें रात्रिव्रत आहे, अशाच अभिप्रायानें माधव सांगतो कीं, ‘‘ तें नक्तव्रत आहे. ” रात्रिभोजनानें हें होत नाहीं.

शंका – आश्विनमासांत शुक्लपक्षांत नवरात्रामध्यें विशेषेंकरुन नवदुर्गेची पूजा करुन समाधानपूर्वक नक्त करावें. नवरात्र नांवाचें हें कर्म नक्तव्रत म्हटलें आहे. नवरात्राच्या आरंभीं. ” इत्यादि स्कांद वचनावरुन आणि वर माधवानें सांगितल्यावरुन ह्या नवरात्रांत नक्तच प्रधान ( मुख्य ) आहे, असें म्हणूं ? समाधान – नक्तच प्रधान असें म्हणतां येत नाहीं. कारण ‘ नवरात्रोपवासतः ” म्हणजे नवरात्र उपवास किंवा एकभक्त अथवा नक्त इत्यादि वर सांगितलेलें ( भविष्यादिवचन ) उपपन्न होणार नाहीं. तेणेंकरुन ( भविष्यादि वचनाच्या अनुपपत्तीवरुन ) असें समजतें कीं, स्कंदवचन, माधव इत्यादिकांनीं सांगितलेलें वैकल्पिक ( विकल्पानें होणार्या ) नक्ताचा अनुवाद आहे, म्हणजे भविष्यादिकांनीं सांगितलेलें नक्तव्रत करावें, असें माधव, स्कांद इत्यादिकांनीं सांगितलें आहे. अपूर्व नक्त सांगितलें नाहीं. आतां याच्या उलट म्हणतों – म्हणजे स्कांद – माधव इत्यादिकांनीं सांगितलेल्या नित्य नक्ताचा वर भविष्यादिकांनीं सांगितलेलें अनित्य ( वैकल्पिक ) नक्त हा अनुवाद असें म्हटलें, तर नित्य तेंच अनित्य ( वैकल्पिक ) म्हटलें असतां नित्यत्वाचा विरोध येईल. कारण, नित्यत्व व अनित्यत्व एकत्र असत नाहींत. अग्निहोत्रांत दहाव्या पक्षीं ‘ दध्ना जुहोति ’ म्हणजे अग्निहोत्राचा होम दह्यानें करावा. असें सांगितलें आहे. हा होम नित्य आहे ; आणि ‘ दध्ना इंद्रियकामस्य जुहुयात् ’ या वाक्यानें इंद्रियें चांगलीं व्हावीं, असें इच्छिणारानें दह्यानें होम करावा, असें सांगितलें आहे. हा होम अनित्य आहे. हा अनित्य होम त्या नित्य होमाचा अनुवाद घडेल काय ? अनुवाद घडत नाहीं. कारण, ” नित्याचा अनित्य अनुवाद होत नाहीं. ” असें

वार्तिकांत सांगितलें आहे. तसेंच येथें समजावें. तेणेंकरुन त्या ठिकाणीं जसें इंद्रियेच्छूला दधिरुप गुणानें फल आहे. तसें येथें नक्तादिव्रत गुणानें फल आहे, असें समजावें. शंका – वरील

संग्रहादि वचनावरुन रात्री हा कर्मकाल झाला असतां रात्रिव्यापिनी पूर्वा ( अमवास्यायुक्त ) प्रतिपदा प्राप्त होईल ? समाधान – प्राप्त होत नाहीं. कारण, न्यायानें ‘ कर्मणो यस्य यः कालस्तत्कालव्यापिनी तिथिः ’ या वचनानें पूर्वीची प्राप्त झाली तरी पूर्वीं सांगितलेल्या अमावास्यायुक्तनिषेधक वचनांनीं बाध होतो. जशी रामनवमी पूर्वदिवशीं कर्मकालव्यापिनी असली तरी ती टाकून पराच सांगितलीं आहे. अथवा जशी जन्माष्टमी मध्यरात्रीं असलेली देखील पूर्वीची टाकून रोहिणीयुक्त पराच करावी, असें माधवानें सांगितले आहे, तसें येथेंही समजावें. वास्तविक म्हटलें तर, रात्रीं कर्मकाल आहे, असें बोधन करणारीं वचनें हेमाद्रि प्रभृति निबंधकारांनीं न लिहिल्यामुळें तीं समूल असल्याविषयींचा विचार करावयाचाच आहे. अर्थात् तीं निर्णयाविषयीं प्रमाण होतील असें म्हणतां येत नाहीं. आणि रात्रीच कर्मकाल म्हटला तर, वर सांगितलेल्या मदनरत्नांत धरलेल्या देवीपुराणांतील ‘ त्रिकालं पूजयेद्देवीं ’ इत्यादि वचनाचा विरोधही येतो. माधवोक्ति तर पाक्षिक नक्ताचा अनुवाद आहे, असें पूर्वीं सांगितलें आहे. तस्मात् सर्व पक्षांचे ठायीं पराच प्रतिपदा घ्यावी असें सिद्ध झालें. या ठिकाणीं केचित् ग्रंथकार – ‘ नवरात्र ’ हा शब्द नऊ अहोरात्रांचा बोधक आहे. कारण, ” एकाद्या तिथीची वृद्धि असतां नवचंडीची समाप्ति अष्टमीस करावी. क्षय झाला असतां अमवास्यायुक्त प्रतिपदेस रात्रीं प्रारंभ करावा. म्हणून नवरात्र हा शब्द यथार्थ होतो ” असें सांगतात. तें बरोबर नाहीं. कारण, अतिह्नास ( दोन तिथींचा क्षय ) किंवा अतिवृद्धि झाली असतां कमज्यास्ती होईल. आणि ह्या वचनाविषयीं मूलही नाहीं. तेणेंकरुन हा नवरात्रशब्द नऊ तिथींचा बोधक आहे. तें सांगतों – ” तिथीची वृद्धि किंवा तिथीचा क्षय असतां नवरात्र निरर्थक होतें. नवरात्रांतील तिथीचा क्षय होऊन आठरात्री झाल्या असतां हा दोष येत नाहीं. कारण, नऊ तिथि आहेत. ” नऊ तिथींचा वाचक तो नवरात्र शब्द क्वचित् ठिकाणीं लक्षणेंकरुन नवरात्रकर्मवाचक होतो. जसें ‘ नवरात्राचा प्रारंभ ’ या ठिकाणीं नवरात्रकर्माचा प्रारंभ, असा अर्थ आहे. ही दिशा समजावी.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

देवी नवरात्र*( मराठी अर्थासह)*भाग ५*

*कुमारींची पूजा*

*अथपूजाविधिः साचजंयतीमंत्रेणनवाक्षरेणवाकार्या तदुक्तंदुर्गाभक्तितरंगिण्यांदेवीपुराणे कुर्याद्देव्यास्तुमंत्रेणपूजांक्षीरघृतादिभिरित्युक्त्वा जयंतीमंगलाकालीभद्रकालीकपालिनी दुर्गाक्षमाशिवाधात्रीस्वधास्वाहानमोस्तुते अनेनैवतुमंत्रेणजपहोमौतुकारयेदिति ॐ दुर्गेदुर्गेरक्षिणिस्वाहेतिनवाक्षरः तत्रप्रतिपदिप्रातरभ्यंगंकृत्वादेशकालौसंकीर्त्य ममेहजन्मनिदुर्गाप्रीतिद्वारासर्वापच्छांतिपूर्वकदीर्घायुर्विपुलधनपुत्रपौत्राद्यनवच्छिन्नसंततिवृद्धिस्थिरलक्ष्मीकीर्तिलाभशत्रुपराजयसदभीष्टसिद्ध्यर्थंशारदनवरात्रप्रतिपदिविहितकलशस्थापनदुर्गापूजाकुमारीपूजादिकरिष्येइतिसंकल्प्य महीद्यौरितिभूमिंस्पृष्ट्वा ओषधयः समितियवान्निक्षिप्य आकलशेष्वितिकुंभंसंस्थाप्य इमंमेगंगेइतिजलेनापूर्य गंधद्वारामितिगंधं याओषधीरितिसर्वौषधीः कांडात्कांडादितिदूर्वाः अश्वत्थेव इतिपंचपल्लवान् स्योनापृथिवीतिसप्तमृदः याः फलिनीरितिफलम् सहिरत्नानीतिपंचरत्नानि हिरण्यंचक्षिप्त्वायुवासुवासाइतिवस्त्रेणावेष्ट्यपूर्णादर्वीतिपूर्णपात्रंनिधायतत्रवरुणंसंपूज्यजीर्णायांनूतनायांवाप्रतिमायांदुर्गामावाह्यपूजयेत् तद्यथा पूर्वोक्तंमंत्रमुक्त्वा आगच्छवरदेदेविदैत्यदर्पनिषूदनि पूजांगृहाणसुमुखिनमस्तेशंकरप्रिये सर्वतीर्थमयंवारिसर्वदेवसमन्वितं इमंघटंसमागच्छतिष्ठदेवगणैः सह दुर्गेदेविसमागच्छसान्निध्यमिहकल्पय बलिंपूजांगृहाणत्वमष्टाभिः शक्तिभिः सहेत्यावाह्यपूर्वोक्तमंत्रेणषोडशोपचारैः पूजयित्वा माषभक्तबलिंकूष्मांडादिबलिंवानिवेदयेत् ।*

आतां पूजाविधि सांगतो – ती पूजा जयंतीमंत्रानें किंवा नवाक्षरानें करावी. तो प्रकार

दुर्गाभक्तितरंगिणींत – देवीपुराणांत सांगतो – ” देवीची पूजा देवीच्या मंत्रानें क्षीरघृतादिक उपचारांनीं करावी. ” असें सांगून, मंत्र सांगतो –

*” जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी ॥ दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वधा स्वाहा नमोस्तु ते ” ॥* याच मंत्रानें जप व होम करावे. *” ॐदुर्गेदुर्गेरक्षिणिस्वाहा. “* हा नवाक्षरमंत्र. तेथें प्रतिपदेस प्रातःकाळीं अभ्यंगस्नान करुन देशकालांचा उच्चार करुन संकल्प करावा. तो असा –

*” ममेहजन्मनि दुर्गाप्रीतिद्वारा*

*सर्वापच्छांतिपूर्वकदीर्घायुर्विपुलधनपुत्रपौत्राद्यनवच्छिन्नसंततिवृद्धिस्थिरलक्ष्मीकीर्तिलाभशत्रुपराजयसदभीष्टसिद्ध्यर्थं*

*शारदनवरात्रप्रतिपदि*

*विहितकलशस्थापनदुर्गापूजाकुमारीपूजादिकरिष्ये “*

असा संकल्प करुन *” महीद्यौ० “*

या मंत्रानें भूमीला स्पर्श करुन, तीवर *” ओषधयः सं० “* या मंत्रानें यव पेरुन *” आकलशेषु० “* या मंत्रानें कुंभ स्थापून *” इमंमेगंगे० ’’* ह्या मंत्रानें उदक कलशांत भरावें. *‘ गंधद्वारां० “* गंध, *” याओषधी० “*

सर्वौषधी घालून, *” कांडात्कांडा० “* दूर्वा, *” अश्वत्थेव० “* पंचपल्लव, *” स्योनापृथिवि० “* सप्तमृत्तिका,

*” याःफलिनी० “* फल, *” सहिरत्नानि० “* पंचरत्नें व हिरण्य घालून *” युवासुवासा० “* यानें वस्त्रानें वेष्टन करुन *” पूर्णादर्वि० “* यानें पूर्णपात्र ठेऊन तेथें वरुणाची पूजा करावी. त्यावर जीर्ण किंवा नवीन प्रतिमा ठेऊन दुर्गादेवीचें आवाहन करुन पूजन करावें. तें असें – वरील मंत्र उच्चारुन –

*” आगच्छ वरदे देवि दैत्यदर्पनिषूदनि । पूजां गृहाण सुमुखि नमस्ते शंकरप्रिये । सर्वतीर्थमयं वारि सर्वदेवसमन्वितं । इमं घटं समागच्छ तिष्ठ देवगणैः सह । दुर्गे देवि समागच्छ सान्निध्यमिह कल्पय । बलिं पूजां गृहाण त्वमष्टाभिः शक्तिभिः सह “*

या मंत्रांनीं आवाहन करुन पूर्वोक्त मंत्रानें षोडशोपचारांनीं पूजा करुन माषभक्तबलि किंवा कूष्मांडादिबलि निवेदन करावा.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

देवी नवरात्र*देवी नवरात्र*( मराठी अर्थासह )*भाग ६*

*ततः कुमारीपूजा तदुक्तंहेमाद्रौस्कांदे एकैकांपूजयेत्कन्यामेकवृद्ध्यातथैवच द्विगुणंत्रिगुणंवापिप्रत्येकं नवकंतुवा तथा नवभिर्लभतेभूमिमैश्वर्यंद्विगुणेनतु एकवृद्ध्यालभेत्क्षेममेकैकेनश्रियंलभेत् एकवर्षातुयाकन्यापूजार्थेतांविवर्जयेत् गंधपुष्पफलादीनांप्रीतिस्तस्यानविद्यते तेनद्विवर्षामारभ्यदशवर्षापर्यंताएवपूज्याः नत्वन्याः तासांचक्रमेण कुमारिकात्रिमूर्तिः कल्याणीरोहिणीकालीचंडिकाशांभवीदुर्गासुभद्रेतिनामभिः पूजाकार्या आसांचप्रत्येकंपूजामंत्राः फलविशेषाश्चतत्रैवज्ञेयाः सामान्यतस्तु मंत्राक्षरमयींलक्ष्मींमातृणांरुपधारिणीम् नवदुर्गात्मिकांसाक्षात्कन्यामावाहयाम्यहम् एवमभ्यर्चनंकुर्यात्कुमारीणांप्रयत्नतः कंचुकैश्चैववस्त्रैश्चगंधपुष्पाक्षतादिभिः नानाविधैर्भक्ष्यभोज्यैर्भोजयेत्पायसादिभिः तथा ग्रंथिस्फुटितशीर्ष्णांगींरक्तपूयव्रणांकिताम् जात्यंधांकेकरांकाणींकुरुपांतनुरोमशाम् संत्यजेद्रोगिणींकन्यांदासीगर्भसमुद्भवाम् तथा ब्राह्मणींसर्वकार्येषुजयार्थेनृपवंशजाम् लाभार्थेवैश्यवंशोत्थांसुतार्थेशूद्रवंशजाम् दारुणेचांत्यजातानांपूजयेद्विधिनानरइति ।*

नंतर कुमारींची पूजा करावी. तो प्रकार सांगतो – हेमाद्रींत – स्कांदांत – ” प्रतिदिवशीं एकेक कन्या पुजावी. अथवा एक वृद्धीनें, किंवा दोन अथवा तीन वृद्धीनें किंवा प्रतिदिवशीं नऊ अशा पुजाव्या. ” तसेंच ” प्रतिदिवशीं नवांनींभूमि प्राप्त होते. दोन वृद्धीनें ऐश्वर्य मिळतें. एक वृद्धीनें कल्याण प्राप्त होतें. प्रतिदिवशीं एकेक पुजली असतां लक्ष्मी प्राप्त होते. एक वर्षाची जी कन्या ती पूजेस वर्ज्य करावी. कारण, तिला गंध, पुष्प, फळ इत्यादिक पदार्थसेवनाची प्रीति नाहीं. ” म्हणून दोन वर्षांपासून दहा वर्षांपर्यंतच कन्या पुजाव्या. अन्य पुजूं नयेत. त्या कुमारिकांचीं अनुक्रमानें नांवें – १ द्विवर्षा ती कुमारिका २ त्रिवर्षा ती त्रिमूर्ति ३ चतुर्वर्षा ती कल्याणी ४ पंचवर्षा ती रोहिणी ५ षड्वर्षा ती काली ६ सप्तवर्षा ती चंडिका ७ अष्टवर्षा ती शांभवी ८ नववर्षा ती दुर्गा ९ दशवर्षा ती सुभद्रा या नामांनीं पूजा करावी. या कुमारिकांचे प्रत्येक पूजामंत्र व विशेष फलें हीं

हेमाद्रींतच पाहावीं. सामान्यतः मंत्र तर हा – *” मंत्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रुपधारिणीम् । नवदुर्गात्मिकां साक्षात्कन्यामावाहयाम्यहम्. “* या मंत्रानें कुमारीचें प्रयत्नानें कंचुक ( चोळ्या ), वस्त्रें, गंध, पुष्प, अक्षता इत्यादिकांनीं पूजन करावें. नानाप्रकारचे भक्ष्य, भोज्य, पायस इत्यादि पदार्थांनीं भोजन घालावें. ” तसेंच ” जिचें अंग ग्रंथियुक्त किंवा फुटलेलें आहे ती ; मस्तक फुटलेली ; रक्त, पू, व्रण यांतें वाहणारी ; जन्मांध ; केकरा ; काणी ; कुरुपा ; शरीरावर केश अल्प किंवा बहुत असलेली ; रोगिणी ; दासीगर्भोत्पन्ना अशी कन्या पूजेविषयीं वर्ज्य होय. ” तसेंच ” सर्व कार्यांविषयीं ब्राह्मणी पुजावी. जयाकरितां क्षत्रियवंशांतील पुजावी. लाभाकरितां वैश्यवंशोत्पन्ना पुजावी. पुत्राकरितां शूद्रवंशजा पुजावी. दारुणकर्माविषयीं अंत्यजापासून उत्पन्न अशा कन्येचें पूजन मनुष्यानें विधीनें करावें. “

संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

* देवी नवरात्र भाग ७**नवरात्रांत वेदपारायण*

*अत्रवेदपारायणमप्युक्तंरुद्रयामले एवंचतुर्वेदविदोविप्रान्सर्वान्प्रसादयेत् तेषांचवरणंकार्यंवेदपारायणायवैइति तथा एकोत्तराभिवृद्ध्यातुनवमीयावदेवहि चंडीपाठंजपेच्चैवजापयेद्वाविधानतः तिथितत्त्वेवाराहीतंत्रे प्रणवंचादितोजप्त्वास्तोत्रंवासंहितांपठेत् अंतेचप्रणवंदद्यादित्युवाचादिपुरुषः आधारेस्थापयित्वातुपुस्तकंप्रजपेत्सुधीः हस्तसंस्थापनादेवयस्माद्वैविफलंभवेत् स्वयंचलिखितंयच्चशूद्रेणलिखितंभवेत् अब्राह्मणेनलिखितंतच्चापिविफलंभवेत् ऋषिच्छंदादिकंन्यस्यपठेत्स्तोत्रंविचक्षणः स्तोत्रेनदृश्यतेयत्रप्रणवंतत्रविन्यसेत् सर्वत्रपाठ्येविज्ञेयस्त्वन्यथाविफलंभवेत् एवंनवमीपर्यंतंप्रत्यहंकुर्यात् अत्रविशेषोहेमाद्रौदेवीपुराणे यदाद्येदिवसेकुर्याच्चंडिकापूजनादिकं द्विगुणंतद्दितीयेह्नित्रिगुणंतत्परेहनि नवमीतिथिपर्यंतंवृद्ध्यापूजाजपादिकमिति एतेननवरात्रेपूजैवप्रधानंउपवासादित्वंगमितिगम्यते तिथिह्नासेतुतिथिद्वयनिमित्तंपूजादिमहालयश्राद्धवदेकदिनेआवृत्त्याकार्यम् वृद्धौतद्वदेवावृत्तिः ततोनवरात्रोपवासादिसंकल्पंकुर्यात् स्वस्याशक्तावन्येनवापूजादिकारयेत् स्वयंवाप्यन्यतोवापिपूजयेत्पूजयीतवेतितरंगिण्यांदेवीपुराणात् इदंचदेवीपूजनंशुक्रास्तादावपिकार्यम् तदुक्तंधर्मप्रदीपे नष्टेशुक्रेतथाजीवेसिंहस्थेचबृहस्पतौ कार्याचैवस्वदेव्यर्चाप्रत्यब्दंकुलधर्मतइति मलमासेतुवचनाभावान्नभवति ।*

या नवरात्रांत वेदपारायणही सांगतो – रुद्रयामलां त – ” असेंच चतुर्वेदवेत्त्या सर्व ब्राह्मणांस प्रसन्न करावें, आणि त्यांना वेदपारायणाकरितां वरावें. ” तसाच ” एकोत्तरवृद्धीनें नवमीपर्यंत चंडीपाठाचा जप यथाविधि स्वतः करावा. अथवा दुसर्याकडून करवावा. “

तिथितत्त्वांत वाराहीतंत्रांत –

” प्रथम प्रणवाचा जप करुन स्तोत्र किंवा संहिता पठन करावी, नंतर अंतींही प्रणवाचा जप करावा, असें आदिपुरुष सांगता झाला, आधारावर पुस्तक ठेवून वाचन करावें. कारण, हस्तांत पुस्तक घेतल्यानें पाठ विफल होतो. स्वतां लिहिलेलें किंवा शूद्रानें लिहिलेलें व अब्राह्मणानें लिहिलेलें पुस्तक असेल तर तेंही वाचन विफल होतें. ऋषि, छंद, देवता यांचा न्यास करुन स्तोत्रपाठ करावा. स्तोत्रांत जेथें प्रणव नसेल तेथें प्रणव योजावा. हा क्रम सर्व पाठांत जाणावा. प्रणवावांचून पाठ विफल होतो. ” असें नवमीपर्यंत प्रतिदिवशीं करावें. याविषयीं विशेष सांगतो

– हेमाद्रींत – देवीपुराणांत – ” जें प्रथमदिवशीं चंडिकेचें पूजनादिक करावें तें दुसरे दिवशीं द्विगुणित व तिसरे दिवशीं त्रिगुणित असें नवमीतिथिपर्यंत पूजा, जप इत्यादिक वृद्धीनें करावें. ” या वचनावरुन नवरात्रांत पूजाच प्रधान आहे, उपवासादिक तर अंग होय, असें समजतें. तिथिक्षय असेल तर दोन तिथिनिमित्तानें करावयाच्या दोन पूजा वगैरे, महालयश्राद्धासारख्या एक दिवशींच आवृत्तीनें कराव्या. तिथीची वृद्धि असतां महालयासारखीच द्विरावृत्ती करावी. नंतर नवरात्रांत कर्तव्य जें उपवासादिक त्याचा संकल्प करावा. आपणांस सामर्थ्य नसेल तर दुसर्याकडून पूजादिक करवावें. कारण, ” स्वतां पूजन करावें किंवा दुसर्याकडून करवावें. ” असें

दुर्गाभक्तितरंगिणींत – देवीपुराणवचन आहे. हें देवीपूजन शुक्रास्तादिकांतही करावें. तें सांगतो धर्मप्रदीपांत – ” शुक्र व गुरु यांचें अस्त किंवा बृहस्पति सिंहस्थ असतांही प्रतिवर्षीं कुलधर्मास्तव आपल्या देवीचें पूजन करावें. ” मलमासांत करण्याविषयीं वचन नसल्यामुळें होत नाहीं.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

देवी नवरात्र*देवी नवरात्र भाग ८*

*नवरात्रात वेद पारायण २*

*अत्रसाश्वस्याश्वपूजनमुक्तम् मदनरत्नेदेवीपुराणे आश्वयुक् शुक्लप्रतिपत्स्वातीयोगेशुभेदिने पूर्वमुच्चैः श्रवानामप्रथमंश्रियमावहत् तस्मात्साश्वैर्नरैस्तत्रपूज्योसौश्रद्ध्यासह पूजनीयाश्चतुरगानवमीयावदेवहिः शांतिः स्वस्त्ययनंकार्यंतदातेषांदिनेदिने धान्यंभल्लातकंकुष्ठंवचासिद्धार्थकास्तथा पंचवर्णेनसूत्रेणग्रंथिंतेषांतुबंधयेत् वायव्यैर्वारुणैः सौरैः शाक्तैर्मंत्रैः सवैष्णवैः वैश्वदेवैस्तथाग्नेयैर्होमः कार्योदिनेदिने कल्पतरौत्वेतदग्रेन्यदपि ज्येष्ठायोगेपुरातत्रगजाश्चाष्टौमहाबलाः पृथिवीमावहन्पूर्वंसशैलवनकाननाम् कुमुदैरावणौपद्मः पुष्पदंतोथवामनः सुप्रतीकोंजनोनीलस्तस्मात्तांस्तत्रपूजयेत् शाक्रादृक्षात्समारभ्यनवम्यंतंचपूर्ववत् अश्ववद्धोमादीत्यर्थः ।*

ह्या प्रतिपदेचे ठायीं ज्याचे अश्व असतील त्यास अश्वपूजन सांगितलें आहे – मदनरत्नांत – देवीपुराणांत – ” आश्विनशुक्ल प्रतिपदेस स्वातीनक्षत्राचा योग असतां शुभ दिवशीं पूर्वीं उच्चैः श्रवानामक अश्वाला प्रथम शोभा प्राप्त झाली, या कारणास्तव अश्वयुक्त मनुष्यांनीं त्या तिथीस उच्चैः श्रव्याची पूजा करावी व अश्वांचीही पूजा नवमीपर्यंत करावी. प्रतिदिवशीं त्यांची शांति व स्वस्त्ययन ( मंगल ) करावें. धणे, भल्लातक ( बिबवे ), कोष्ठकोलिंजन, वेखंड, राई ह्यांचा पंचवर्ण सूत्रानें ग्रंथि बांधून त्यांचे कंठांत बांधावीं. वायु, वरुण, सूर्य, शक्ति, विष्णु, विश्वेदेव, अग्नि यांच्या मंत्रांनीं प्रतिदिवशीं होम करावा. “

कल्पतरुंत तर याच्या पुढें दुसराही प्रकार सांगतो – पूर्वी नवरात्रांतील ज्येष्ठानक्षत्रावर महाबलिष्ठ असे आठ हत्ती पर्वत, अरण्य यांसहवर्तमान पृथ्वीला वाहते झाले, म्हणून पृथ्वी वाहणार्या कुमुद, ऐरावण, पद्म, पुष्पदंत, वामन, सुप्रतीक, अंजन, नील, ह्या आठ हत्तींची पूजा करावी. ती पूजा ज्येष्ठानक्षत्रावर आरंभ करुन नवमीपर्यंत अश्वपूजेप्रमाणें होमादि करुन करावी. “

संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

देवी नवरात्र* *भाग ९*

*अथप्रतिपदादिषुविशेषोदुर्गाभक्तितरंगिण्यांभविष्ये केशसंस्कारद्रव्याणिप्रदद्यात्प्रतिपद्दिने पक्कतैलंद्वितीयायांकेशसंयमहेतवे पट्टदोरमितिगौडपाठः दर्पणंचतृतीयायांसिंदूरालक्तकंतथा मधुपर्कंचतुर्थ्यांतुतिलकंनेत्रमंडनं पंचम्यामंगरागंचशक्त्यालंकरणानिच षष्ठ्यांबिल्वतरौबोधंसायंसंध्यासुकारयेत् सप्तम्यांप्रातरानीयगृहमध्येप्रपूजयेत् उपोषणमथाष्टम्यामात्मशक्त्याचपूजनम् नवम्यामुग्रचंडायाः पूजांकुर्याद्वलिंतथा संपूज्यप्रेषणंकुर्याद्दशम्यांसारवोत्सवैः अनेनविधिनायस्तुदेवींप्रीणयतेनरः स्कंदवत्पालयेद्देवीतंपुत्रधनकीर्तिभिः कृत्यतत्त्वार्णवेलैंगे कन्यायांकृष्णपक्षेतुपूजयित्वार्द्रभेपिवा नवम्यांबोधयेद्देवींमहाविभवविस्तरैः शुक्लपक्षेचतुर्थ्यांतुदेवीकेशविमोक्षणम् प्रातरेवतुपंचम्यांस्नापयेत्सुशुभैर्जलैः षष्ठ्यांसायंप्रकुर्वीतबिल्ववृक्षेधिवासनम् सप्तम्यांपत्रिकापूजाअष्टम्यांचाप्युपोषणम् पूजाचजागरश्चैवनवम्यांविधिवद्वलिः विसर्जनंदशम्यांतुक्रीडाकौतुकमंगलैः अत्रनवम्यांबोधनासामर्थ्येषष्ठ्यांबोधनमितिस्मार्ताः फलभूमार्थिनः समुच्चय इत्यन्ये नवम्यांमंत्रः कालिकापुराणे इषेमास्यसितेपक्षेनवम्यामार्द्रभेदिवा श्रीवृक्षेबोधयामित्वांयावत्पूजांकरोम्यहम् अत्रस्त्रीव्रतेविशेषः परिभाषायांज्ञेयः ।*

आतां प्रतिपदादि तिथींचे ठायीं विशेष सांगतो.

दुर्गाभक्तितरंगिणींत – भविष्यांत – ” केशसंस्कारद्रव्यें प्रतिपदेस द्यावीं. द्वितीयेस केशसंयमना ( बंधना ) करितां पक्क तैल द्यावें. ‘ पक्कतैल ’ या स्थानीं ‘ पट्टदोर ’ असा गौडपाठ आहे. तृतीयेस दर्पण, सिंदूर व अळता. चतुर्थीस नेत्रभूषण, तिलक व मधुपर्क. पंचमीस यथाशक्ति अलंकार व अंगराग द्यावे. षष्ठीस सायंसंध्यासमयीं बिल्ववृक्षाचे ठायीं बोध ( पुढें सांगावयाचा तो ) करावा. सप्तमीस प्रातःकालीं गृहामध्यें आणून पूजन करावें. अष्टमीस उपोषण व आपल्या शक्तीनें पूजन करावें. नवमीस चंडिकेची पूजा व बलिदान करावें. दशमीस सारवोत्सवांनीं पूजन करुन देवी पोंचवावी. या विधीनें जो मनुष्य देवीतें संतुष्ट करतो त्याला देवी पुत्र, धन, कीर्ति हीं देऊन स्कंदासारखें त्याचें पालन करिते. ” कृत्यतत्त्वार्णवांत – लिंगपुराणांत – कन्यासंक्रांतींत आश्विन कृष्णपक्षांत ( दर्शांतमासानें भाद्रपदकृष्णपक्षांत ) आर्द्रानक्षत्रावर किंवा नवमीस मोठ्या ऐश्वर्यविस्तारांनीं देवीचा प्रबोधोत्सव करावा. आश्विन शुक्लपक्षांत चतुर्थीस देवीचें केशविमोक्षण करावें. पंचमीस प्रातःकालींच स्वच्छ जलानें स्नान घालावें. षष्ठीस सायंकालीं बिल्ववृक्षीं अधिवासन करावें. सप्तमीस पत्रिकापूजा. अष्टमीस उपोषण. नवमीस पूजा, जागरण व यथाशास्त्र बलिदान करावें. दशमीस क्रीडा – कौतुक – मंगलांनीं विसर्जन करावें. ” या ठिकाणीं आश्विनकृष्ण नवमीस प्रबोधोत्सवाचें सामर्थ्य नसेल तर आश्विनशुक्लषष्ठीस प्रबोध करावा, असें स्मार्त सांगतात. मोठ्या फलाची इच्छा असेल त्यानें नवमीस व षष्ठीसही प्रबोधोत्सव करावा, असें अन्य सांगतात. आश्विन कृष्ण नवमीस प्रबोधनाचा मंत्र – कालिकापुराणांत – *‘ इषेमास्यसिते पक्षे नवम्यामार्द्रभे दिवा । श्रीवृक्षे बोधयामि त्वां यावत्पूजां करोम्यहम् । ’*

संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

देवी नवरात्र *भाग १०*

*कलश स्थापना*

*इदंकलशस्थापनंरात्रौनकार्यम् नरात्रौस्थापनंकार्यंनचकुंभाभिषेचनमितिमात्स्योक्तेः भास्करोदयमारभ्ययावत्तुदशनाडिकाः प्रातः काल इतिप्रोक्तः स्थापनारोपणादिष्वितिविष्णुधर्मोक्तेश्च रुद्रयामले स्नानंमांगलिकंकृत्वाततोदेवींप्रपूजयेत् शुभाभिर्मृत्तिकाभिश्चपूर्वंकृत्वातुवेदिकाम् यवान्वैवापयेत्तत्रगोधूमैश्चापिसंयुतान् तत्रसंस्थापयेत्कुंभंविधिनामंत्रपूर्वकम्‍ सौवर्णंराजतंवापिताम्रंमृन्मयजंतुवेति ।*

हें कलशस्थापन रात्रीं करुं नये, कारण, “ रात्रीस ( कलश ) स्थापन करुं नये, व कुंभाभिषेचनही करुं नये. ” असें मात्स्यवचन आहे. “ सूर्योदयापासून आरंभ करुन ज्या दहा घटिका तो प्रातःकाळ स्थापना आरोपण इत्यादिकर्माविषयीं सांगितला आहे. ” असें विष्णुधर्मवचनही आहे. रुद्रयामलांत – “ मांगलिक स्नान करुन नंतर देवीचें पूजन करावें. पूर्वी शुद्धमृत्तिकेची वेदिका करुन तिजवर गोधूम व यव पेरावे आणि त्या वेदीवर समंत्रक यथाविधि कुंभस्थापन करावें. तो कुंभ सोन्याचा, रुप्याचा, तांब्याचा, अथवा मातीचा करावा. ”

संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

2 Comments

  1. […] पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *