आपली कालगणना व महिन्यांची नांवे हि जास्त शास्त्रीय व खगोलाशी निगडीत आहेत

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आपली कालगणना व महिन्यांची नांवे हि जास्त शास्त्रीय व खगोलाशी निगडीत आहेत उगा कोणाच्या नावानी महिने वगैरेंचा संबंध नाहीच…
म्हणजे ज्या नक्षत्रात त्या महिन्याची पौर्णिमा येते त्या नक्षत्रावरुनच तो महिना ओळखला जातो.

चित्रा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो चैत्र,
विशाखा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो वैशाख,
ज्येष्ठा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो ज्येष्ठ,
पुर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो आषाढ,
श्रवण नक्षत्रातील पौर्णिमा असते तो श्रावण,
पुर्वा भाद्रपदा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो भाद्रपद,
अश्विन नक्षत्रातील पौर्णिमा असते तो आश्विन,
कृत्तिका नक्षत्रातील पौर्णिमा असते तो कार्तिक,
मृगशिर्ष नक्षत्रातील पौर्णिमा असते तो मार्गशीर्ष,
पुष्य नक्षत्रातील पौर्णिमा असते तो पौष,
मघा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो माघ,
पुर्वा फाल्गुनी किंवा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील पौर्णिमा असते तो फाल्गुन.

त्या नंतर असतो दिवस त्याला आपण तिथी महणतो आणी ती रवि व चंद्रा च्या अंतरावर असते म्हणजे रवि पासुन चंद्र १२° पुढे गेला कि एक तीथी…
अमावस म्हणजे दोनीही एकाच अंशात म्हणजे एकत्र असतात तो दिवस म्हणजे म्हणून अमा म्हणजे एकत्र वस म्हणजे वास म्हणजे एकत्र सहवास म्हणून अमावस …

त्या नंतर १२° चंद्र म्हणून प्रतिपदा
त्या नंतर २४° चंद्र म्हणून द्वितीया
त्या नंतर ३६° चंद्र म्हणून तृतीया
त्या नंतर ४८° चंद्र म्हणून चतुर्थी

त्या नंतर ६०° चंद्र म्हणून पंचमी
त्यानंतर ७२° चंद्र म्हणून षष्ठी
त्या नंतर ८४° चंद्र म्हणून सप्तमी
त्या नंतर ९६° चंद्र म्हणून अष्टमी
त्या नंतर १०८° चंद्र म्हणून नवमी
त्या नंतर १२०° चंद्र म्हणून दशमी
त्या नंतर १३२° चंद्र म्हणून एकादशी
त्या नंतर १४४° चंद्र म्हणून द्वादशी
त्या नंतर १५६° चंद्र म्हणून त्रयोदशी
त्या नंतर १६८° चंद्र म्हणून चतुर्दशी
त्या नंतर १८०° चंद्र म्हणून पौर्णिमा

अश्या दोन म्हणजे
पौर्णिमे पर्यंत वाढत जाणारी चंद्र कला तो शुक्ल पक्ष व
आमावस पर्यंत कमी होत जाणारी चंद्र कला तो कृष्ण पक्ष
म्हणजे पृथ्वी भोवती चंद्राची पुर्ण ३६०° प्रदक्षिणा व त्याचे रवी पासुनची अंशात्मक स्थिती नुसार असते त्यावरुन त्याची तीथी हि त्या दिवसाची ओळख
आणी सुर्योदयापासुन ज्या ग्रहाचा पहिला होरा असेल त्या ग्रहावरुन त्या दिवसाचे नांव


सुर्योदयापासुन रवी ग्रहाचा पहिला होरा म्हणून रविवार
सुर्योदयापासुन चंद्र म्हणजे सोम ग्रहाचा पहिला होरा म्हणून सोमवार
सुर्योदयापासुन मंगळ ग्रहाचा पहिला होरा म्हणून मंगळवार
सुर्योदयापासुन बुध ग्रहाचा पहिला होरा म्हणून बुधवार
सुर्योदयापासुन गुरु ग्रहाचा पहिला होरा म्हणून गुरवार
सुर्योदयापासुन शुक्र ग्रहाचा पहिला होरा म्हणून शुक्रवार
सुर्योदयापासुन शनी ग्रहाचा पहिला होरा म्हणून शनीवार

तसेच रात्रीचे तीन भाग करून, त्यांपैकी पहिले दोन भाग अलीकडील दिवसात घेतात व तिसरा भाग पुढच्या दिवसात घेतात. (म्हणजे रात्री 2 ते 2।। या वेळी वार बदलतो.)
असे इतके सोप साध खगोलीय गोष्टिंशी निगडीत कालगणना आहे…
बाकीचे पंचांग हे अधिक गणितीय व सर्व काहि संशोधनाने सिधद झालेले व लॉजिकशीच संबंध असलेले आहे.
फक्त मनापासुन अभ्यास, संशोधन, पाठपुरावा किंवा कमीतकमी जिज्ञासु वृत्तीनं समजून घेतले पाहिजे.

🙋‍♂️ *#आपली भारतीय 🇮🇳 दिनदर्शिका, संस्कृती जगात श्रेष्ठ आहे, का ते आज आपण जाणून घेऊ यात* 😊

*इंग्रजी कॅलेंडरच्या फार गमती जमती आहेत. तर मुस्लिम कॅलेंडरमध्ये देखील फरक आहे.*🤔

✍️भारतामध्ये पोर्तुगीज १४९८, मध्ये आले आणि भारतीय कालगणना व ऋतू एकदम मॅच होतात हे त्यांना पहिल्यांदाच माहीत झालं. आश्चर्य देखील वाटलं. त्यांनी हे भारतीय *चैत्र ते फाल्गुनवालं कॅलेंडर* उचलून त्यांचे *जागतिक धर्मगुरु पोप जार्ज १३,* यांच्याकडे पाठविले.

त्यापूर्वी युरोपात ३५५, दिवसांचे जुलीअन कॅलेंडर ते वापरत. वर्ष ३६५, दिवसांचे असते हेच त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे त्यांच्या “येशूख्रिस्ता सहीत सर्वांचेच जन्मदिवस सर्व ऋतुतून फिरायचे. 😂 कधी उन्हाळा, कधी पावसाळा, कधी हिवाळा. कारण ३५५, दिवसांचे वर्ष असल्याने प्रत्येक वर्षी दहा दिवस मागं सरकायचे. त्यामुळे कालगणना आणि ऋतू यांचा मेळ बसायचाच नाही. 😩 

मग हे भारतीय कॅलेंडर घेवून *पोप जार्ज १३,* ने खगोलशास्त्रीय लोकांना बोलावून ही काय भानगड आहे ते बघा आणि असे कालगणना व ऋतू मॅच करा म्हणून सांगितले. १५८२, मध्ये अचानक ५, ऑक्टोबर नंतर १५, ऑक्टोबर तारीख घेऊन बॅंक तारखा अँंडजस्ट केल्या. तेंव्हापासून येशूचा जन्म 😆 बर्फ पडत असतांनाच होवू लागला. ☃ भारतीय दिनदर्शिकेचा (पंचांग) आधार घेऊन नंतर त्यांनी भारतीयांना माहीत असलेले अनेक शोध स्वतःचेच शोध म्हणून छापून आणले हे आपणांस माहीत आहेच. 🙏

ही आपली दिनदर्शिका (कँलेंडर) सर्व युरोपियन देशांनी लगेचच स्विकारले नाही. अमेरिकेने आणि इंग्लंडने तर हे ग्रेगॅरीअन कॅलेंडर १७५२, मध्ये स्विकारले. बघा हे आपल्या पेक्षा किती मागास होते.

इस्लामी कॅलेंडर अजूनही ३५५, दिवसांचे आहे. त्यामुळे *रमजान ईद दरवर्षी दहा दिवस मागं सरकत सर्व ऋतूतून जाते.* रमजान महिना कधी कडक थंडीत येतो तर कधी कडक उन्हाळ्यात. हे ऋतू नुसार मॅच करण्यासाठी त्यांच्याही धर्मगुरुंनी विचार केला पाहिजे. 😊

*तर मग आहे की नाही आपलीच, संस्कृती, दिनदर्शिका, पंचांग, (कॅलेंडर) श्रेष्ठ* ✊

*टिप :-* पुर्वी वरील विषयावर खुलासे देण्यासाठी फार त्रास व्हायचा. पण आता सोपं झालंय. जिज्ञासूंना वरील बाबीवर खरं खोटं पाहण्यासाठी सध्या गुगल मायबाप २४×७, = ३६५, दिवस म्हणजे अहोरात्र, आपल्या सेवेत तत्पर आहे. पूर्ण आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध🙏असते. आणि आपण ती मिळऊही शकतो. धन्यवाद 🙋‍♂️ आणि हो “इंग्रजी” नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.👍

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *